१. फिश - मी तिलापिया मासा घेतला आहे
२. कांदा - १ लहान
३. लसुन - ४/५ पाकळ्या
४. अद्रक - १ से. मी
५. लाल मिरची - ३/४ चवी प्रमाण
६. कोथींबीर
७. तिखट - १ चमचा, चवी प्रमाणे कमी जास्त
८. आमसुल
९. नारळाचे दुध १/२ वाटी
१०. गरम मसाला पावडर - १ चमचा
११.हळद
१२. मिठ
१३. तेल - फोडणीला व मासे तळायला
१४. कडिपत्ता, हिंग
१५. फ्राय करतांना कोटिंग साठी बारीक रवा
१६. लिंबु रस
मास्यांना तिखट, मिठ, हळद लाउन त्यावर लिंबु पिळुन बाजुला ठेवा. मी सगळ्याच माश्यांना मॅरेनेट करते. जरा जाड्सर पिसेस करीसाठी वापरते आणि बाकी फ्राय साठी.
आमसुल पाण्यात भिजत ठेवा. (हे का ते माहित नाही )
करी मसाला:
१. कांदा/ लसुन/लाल मिरची तव्यावर थोडे(च) रोस्ट करुन घ्या. हे रोस्ट केलेले पदार्थ, कोथिंबीर, आल आणि हळद मिक्सर मधे पेस्ट करुन घ्या.
२. पातेलात तेल गरम करुन त्यात कडीपत्ता, हिंगाची फोडणी द्या. त्यात वरील मसाला पेस्ट घालुन २ मिनीट परतुन घ्या. नंतर गरम मसाला, मिठ, आमसुल टाकुन हालवुन घ्या. मग त्यात हवे तितके पाणी टाकुन एकजीव करा. (खुप पातळ नको.) एक उकळी येउ द्या. उकळी आल्यावर त्यात माश्यांची तुकडे टाका. मध्यम आचेवर ५ मिनीट उकळु द्या . नारळाचे दुध टाका. एक उकळी काढुन गॅस बंद करा.
फ्राय साठी:
माश्यांना दोन्ही बाजुने रव्याचे कोटींग करुन गरम तव्यावर थोड तेल टाकुन दोन्ही बाजुने चांगले भाजुन घ्या.
फ्राईड फिश
फायनल प्रोडक्ट
फिश करी बरोबर भातच हवा.
एका बाजुला भात टाकला तर १/२ तासात मस्त जेवण तयार होत.
फोटो टाकते -done
फोटो टाकते -done
पहिली मी. मी व्हेज आहे, पण
पहिली मी. मी व्हेज आहे, पण मला तुमची कृती ब्येस आणी रसरशीत वाटली.
छान दिसताहेत फिश.. ( मी पण
छान दिसताहेत फिश.. ( मी पण व्हेजच आहे
)
वॉव!!! एकदम
वॉव!!! एकदम तोंपासु........................
करीचा सुध्दा फोटो हवा होता. सर्व्ह करण्याआधी बाऊलमध्ये.
छान पाककृती ........
छान पाककृती ........
![smileys-fish-465204.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u55402/smileys-fish-465204.gif)
![cook.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u55402/cook.gif)
वाहवा मस्तच. फोटो पाहुन
वाहवा मस्तच.
फोटो पाहुन तोपासु.
मस्तच..
मस्तच..
मस्त दिसतोय फ्राय फिश, छान
मस्त दिसतोय फ्राय फिश, छान रेसिपी
मस्तच.....
मस्तच.....
य्म्म्म्म,,, मस्तच
य्म्म्म्म,,, मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त य म्मी दिसतंय. असं कॉंबो
मस्त य म्मी दिसतंय. असं कॉंबो मी जनरली साल्मन वापरून करते फक्त रवा न लावता कमी तेलात परतते. ना.दु मध्ये लाइट कोकोनट मिल्क असतं ते घेते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! मी इथे फोटोच बघायला
मस्त! मी इथे फोटोच बघायला आलेलो. फ्राय फिश देखील केलेत हे उत्तम. कारण मला सारातली मच्छी फारशी आवडत नाही, म्हणून आमच्याकडे डोक्याचे सार केले जाते आणि बाकीच्या तुकड्या तळतात ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी या सोबत कोलंबीची चटणी बनवली की आमचा चौरस मत्साहार पुर्ण
मस्त!
मस्त!
आमसुल पाण्यात भिजत ठेवा. (हे
आमसुल पाण्यात भिजत ठेवा. (हे का ते माहित नाही स्मित )>>>>
आमसुलामुळे माशांचा वास निघून जातो.
करीचा फटु न्हाय कुटंच
करीचा फटु न्हाय कुटंच![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
करीनाचा चालंल का?
करीनाचा चालंल का?
शेफ (सैफ) बरोबरचा चालेल का?
शेफ (सैफ) बरोबरचा चालेल का?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दोगंबी बेचव हैत....
दोगंबी बेचव हैत....
मस्तं!
मस्तं!
करीना/कत्रीना नाही पण करीचा
करीना/कत्रीना नाही पण करीचा फोटो टाकेन परत बनवली की, शेफ शिवाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटोत बोर मिरच्या आहेत. या
फोटोत बोर मिरच्या आहेत.
या मिरच्यांची चव वेगळी लागते का? की नॉर्मल लाल सुक्या मिरच्यांसारखीच असते?
ह्या जास्त तिखट असतात. चवी
ह्या जास्त तिखट असतात. चवी नुसार कमी जास्त घेता येतील.
मस्त. भा.प्र.: कट पिसेस मध्ये
मस्त.
भा.प्र.: कट पिसेस मध्ये मासा वर गुलाबी/ पांढरा दिसतो, आणि खाली स्कीन असते ती काढायची असते का खायची असते?
मी स्किनलेस, बोन्लेस घेतलेला.
मी स्किनलेस, बोन्लेस घेतलेला. तिलापीया नेहमी स्किनलेसच घेते. पण इतर काही माश्यांची स्किन (पापलेट, सॅमन) खायला हरकत नाही.
करीची रेसिपी मस्त आहे. मजा
करीची रेसिपी मस्त आहे. मजा आली.