आज संध्याकाळी बाजारात फिरतांना मस्त ताजे स्वीट कॉर्न मिळाले. दोनच कणसं घेतले पण दाणे मस्त भरलेले होते, त्यात पुढल्या दोनही रेसिपीज झाल्या.
स्वीट कॉर्न सूप करता इथे पाहा
बॉईल्ड कॉर्न
- स्वीट कॉर्न
- चवीनुसार मीठ, चाट मसाला, काळीमीरी भरड, लिंबू यातलं एक किंवा आवडत असल्यास सगळे
- बटर
गार्लिक ब्रेड
- ब्रेड
- बटर
- लसूण
- मीठ
सजावटीकरता मिळाल्यास पार्स्ले/ बारीक चिरलेली कोथिंबीर
स्वीट कॉर्न सूप करता इथे पाहा
प्यायला घेताना गरमगरमच घ्यावं. वरून लागलं तर बटर, ताजी कुटलेली मिरी इ घेता येईल. फोटोमधल्या सूपामध्ये बटर नाहीये. डायरेक्ट पाण्यात कॉर्नपेस्ट घालून बाकी कृती वर दिलेल्या लिंक प्रमाणे केली आहे.
बॉईल्ड कॉर्न करता:
कणसाचे दाणे कुकरला शिजवून घ्यावे. गरम असतांनाच प्लेट्मध्ये घेऊन वर थोडं बटर आणि चवीप्रमाणे मीठ, तिखट, चाटमसाला, लिंबू इ घालावं. गरमच खायला घ्यावं.
गार्लिक ब्रेड
बटर थोडंसं वितळवून घ्यावं. चमच्यानी घोटून स्मूथ करावं
यात आता भरपूर लसूण घालावा (मी ३ ते ३.५ टीस्पून बटर वितळवून घेतलं त्यात एक लहान लसणाचा गाठा घेतला होता). लसूण बारीक चिरून वा ठेचून घालावा. पेस्ट नको
शक्यतोवर बटरमध्ये मीठ असतंच तरी चवीप्रमाणे मीठ घालून नीट ढवळून हे मिश्रण तयार ठेवावं.
ब्रेड स्लाईसला हे तयार बटर लावून मंद आचेवर ब्रेड-स्लाईसेस खरपूस भाजाव्या. ब्रेड भाजतांना प्रेस करू नये.
मस्तपैकी सूप + गार्लिक ब्रेड + बॉईल्ड कॉर्न अशी प्लेट खायला घ्यावी. बरोबर मित्र मैत्रिणी अन गप्पा
लागणार्या वेळात सूप करायचा वेळ + पूर्वतयारीचा वेळ धरलेला नाही.
कणसाचे दाणे हातानीच काढावेत, सुरीनी काढल्यास बॉईल्ड कॉर्न नीट होत नाही
बटर + बाकी चवीचे जिन्नस आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येतात, मात्र ब्रेड्करता लसूण; सूपमध्ये मिरी भरड आणि बॉईल्ड कॉर्न करता लिंबामध्ये कंची मारू नये. जरा जास्त घेतले की मस्त चव येते.
अरे वा, गार्लिक ब्रेड एवढे
अरे वा, गार्लिक ब्रेड एवढे सोपे असते बनवणे. हे तर मी सुद्धा करून बघू शकतो..
धन्यवाद
वाह वाह.. माझा फेवरेट मेनु..
वाह वाह.. माझा फेवरेट मेनु..:)
छान रेसिपी योकु. मी पण असेच
छान रेसिपी योकु.
मी पण असेच कॉर्न करते फक्त फ्रोजन कॉर्नचे.
गार्लिक ब्रेडच्या बटरमधे थोडं ऑलिव्ह ऑईल आणि थोडा फ्रेश किम्वा ड्राय ओरेगनो चुरुन घातला तर अजून छान चव येते.
मस्तय
मस्तय
मस्तय
मस्तय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त........ फोटोही सुरेख
मस्त........ फोटोही सुरेख आहे. माबोमगमध्ये सुप.
फोटो मस्त!!
फोटो मस्त!!
फोटो मस्त. मला स्वीट कॉर्न चे
फोटो मस्त. मला स्वीट कॉर्न चे दाणे नुसते मीठ घालुन शिजवलेले आवडतात. त्यांव्ही स्वतःची जी चव असते ती आवडते. कॉर्न सुप नॉर चं आणुन ही डीश करणार.
ऋ,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गा ब्रे ह्यापेक्शाही सोपा असतो.
सुटसुटीत मस्त प्रकार. योकु,
सुटसुटीत मस्त प्रकार. योकु, घरात उपलब्ध असेल तर थोडी चिली फ्लेक्स पण मस्त लागेल.
इथे बघा.
http://www.khushifoods.com/ProductDetail.aspx?ProductId=1
हा वरचा मसाला घालुन मी आजकाल गार्लिक चीज ब्रेड करते. छान लागतो,.
मस्त..
मस्त..
मस्त आहे . मी कॉर्न
मस्त आहे .
मी कॉर्न शिजवल्यावर , ऑरिगानो आणि बटर घालून मावेत गरम करते.
ऋ , आणखी एक http://www.amul.com/products/amul-garlic-butter-info.php
मस्त फोटो आणि टेबल मॅटही छानच
मस्त फोटो आणि टेबल मॅटही छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो दिसतोय. आत्ता समोर
मस्त फोटो दिसतोय. आत्ता समोर असतं तर संपवलं असतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वस्ति लिंक धन्यवाद. या
स्वस्ति लिंक धन्यवाद. या बद्दल माहीत नव्हते. खरे तर ब्रेडबटर माझा आवडता आणि फ्रिक्वेंट नाश्ता, पण बाजारहाट स्वता न करण्याचा परीणाम.. ट्राय करतो आता ते गार्लिक बटर.. आणि त्यावरचे वेगवेगळे प्रयोग.
श्या ह्या मुलाला अजुन अमुल
श्या ह्या मुलाला अजुन अमुल गार्लिक बटर माहीत नाहीये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
धन्यवाद लोक्स! गार्लिक बटर
धन्यवाद लोक्स!
गार्लिक बटर माहितिये पण ते मिळवण्याचा आळस आड आला.
अमूल गार्लिक बटर आम्ही एकदा
अमूल गार्लिक बटर आम्ही एकदा आणले आणि पस्तावलो. ओव्हर dehydrated गार्लिकचे बारकुंडे तुकडे घातलेले बटर.
मस्त रेसिपी आणि फोटो ही.
मस्त रेसिपी आणि फोटो ही.
मस्त रेसिपी आणि फोटो ही.
मस्त रेसिपी आणि फोटो ही.
मस्तं!
मस्तं!