वोडका शॉट बरोबर किन्वा सलाद - सुपर संडे ब्रंच
http://www.maayboli.com/node/57239
हे वोडका शॉट्स करायला अगदी सोपे आहेत, होम पार्टीज करता काहीतरी अॅडिशनल गम्मत..
१) ३,३ औंस ची ३ जेलो पॅकेट्स. मी Jell-O ब्रँड ची शुगर फ्री जेली वापरलीये. स्ट्रॉबेरी फ्लेवर मधे. तुम्ही आपल्या आवडी ची फ्लेवर घेऊ शकता.
२) २ १/२ कप वोडका ( मी ग्रे गूस ओरिजिनल वापरलीये)
३) ३ १/३ कप पाणी
१) भांड्यात पाणी उकळायला ठेवा. उकळी फुटल्यावर गॅस बंद करा
२) आता जेलो क्रिस्टल्स मिसळून नीट विरघळवून घ्या. तीन चार मिनिटे तसेच ठेवा.
३) आता थंड वोडका अॅड करा.
४) शॉट साईझ प्लास्टिक कप्स मधे ओता.
५) फ्रिज मधे सेट करायला ठेवा. ( फ्रीझर मधे नाही)
घरी पार्टी असेल तर एंटरंस ला सर्व करा. एकेक ग्लास उचलून सरळ तोंडात स्क्वीझ करून गट्टम करता येतात.
कालच प्रयोग केलाय.. अगदी कधी ही अल्कोहोल न घेणार्यांनीही दोन दोन ,तीन तीन शॉट्स एंजॉय केले
'दाखवायच्या' काचेच्या स्टँड मधे सर्व करा..
पुढच्या वेळेकरता तयारी
वेगवेगळ्या फ्लेवर आणी रंगाच्या बनवता येतील..
यापूर्वी, मी मैत्रीणी च्या रेस्टोरेंट मधे ट्राय केले ते तिने डिसपोझेबल इंजेक्शन सीरींज( नीडल बिना हाँ.. ) मधे बनवलेले होते. डायरेक्ट एकेकाच्या तोंडात ती स्वतःच सर्व करत होती. पोलियो ड्रॉप्स ची आठवण आली होती मला..उगीचच..
इथे ऑन लाईन ऑर्डर करता आल्या असत्या सीरींजेस..पण वेळ नव्हता पुरेसा.. म्हणून प्लास्टिक कप्स वर भागवलं..
एवढी इंजेक्शनं एकदम दाखवून
एवढी इंजेक्शनं एकदम दाखवून घाबरवलंस की !
देशामधे वेकफिल्ड किंवा बाकी
देशामधे वेकफिल्ड किंवा बाकी जी जेलीची पाकिटे मिळतात. त्यात जनरली सर्व पाकिटाला मिळून २ कप पाणी असे प्रमाण लिहिलेले असते.
त्यामधे १ अधिक १/५ कप पाणी + ४/५ कप व्होडका असे प्रमाण करायचे.
थोडक्यात म्हणजे पाकिटावर दिलेल्या पाण्याच्या प्रमाणाच्या अर्ध्यापेक्षा थोडे कमी अल्कोहोल आणि उरलेले पाणी असे करायचे. अल्कोहोल जास्त झाले तर सेट होत नाही जेली.
हे प्रकरण जनरली युनिव्हर्सिट्यांमधे नुकतेच दारूयोग्य वयाचे झालेल्या विद्यार्थ्यांमधे जाम फेमस असते.
गजानन.. ... यप .. मलापण
गजानन.. ...
यप .. मलापण इंजेक्शन पाहिलंकी असंच होतं.. पण जेलो शॉट इज गुड..
भारी लागतात हे शॉट्स .
भारी लागतात हे शॉट्स .
पोलियो ड्रॉप्स ची आठवण आली होती >>> तोंडात रांगोळी घातल्यासारखं वाटतं
घ्या झब्बू
घ्या झब्बू
तोंडात रांगोळी... कै च्या
तोंडात रांगोळी... कै च्या कै..
नी.. मस्त झब्बू.. वॉट फ्लेवर ??
Mast photo mast zabbu Karun
Mast photo mast zabbu
Karun baghen
झोपा आणि झोपु द्या गं
झोपा आणि झोपु द्या गं मुलींनो. मला आता टेम्प्ट नका करु. मी जबरी वोडका फॅन आहे + घरात जेली पॅकेट्स आहेत + 'अॅबसोल्युट' ची ३/४ बॉटल आहेच. एकच गोष्ट ब्याड आहे कि आज रविवार असल्यामुळे उद्या सकाळच्या ऑफिसचे वेध लागले आहेत.
सही प्रकरण आहे.. तसेही वोडका
सही प्रकरण आहे..
तसेही वोडका जेल ओ शॉट दारू नसतेच असे शाहरूख कुठल्यातरी पिक्चरमध्ये बोल्लेलाच
ग्रीन होता तो कैरी होता
ग्रीन होता तो कैरी होता बहुतेक आणि लाल आहे तो स्ट्रॉबेरी.
दोन्ही बहुतेक वेकफिल्ड.
दोन वर्षांपूर्वीचे फोटो आहेत त्यामुळे नक्की ब्रॅण्ड लक्षात नाही.
रिया, तू काय करून बघणारेस? व्होडका ही दारू असते.
नी..अगा रीया अॅडल्ट
नी..अगा रीया अॅडल्ट हाये..आता.. काय?? हो ना गं, री..
ओह कैरी फ्लेवर? वॉव.. मला वाटलं मिंट फ्लेवर असेल.. हीही.. पण मिंट फ्लेवर जेली बघितली नाही कुठे..
ज्यांना मिंट फ्लेवर आवडते ते मिंट लिकर वापरून पान शॉट्स बनवू शकतात.. उस्की रेस्पी थोडी अल्लग है.नो जेलो.
रीया , नी बघ तुला च्यालेंज
रीया , नी बघ तुला च्यालेंज देतेय , होऊन जाऊदे !
वॉव, मस्तं, मस्तं! " डायरेक्ट
वॉव, मस्तं, मस्तं!
" डायरेक्ट एकेकाच्या तोंडात ती स्वतःच सर्व करत होती. पोलियो ड्रॉप्स ची आठवण आली होती मला..उगीचच.. "....:D अल्टिमेट प्रकार आहे हा....
जबरदस्त आहे प्रकार हा.. ए पण
जबरदस्त आहे प्रकार हा..
ए पण मी नाही घेणार हा. इंजेक्शन !!!
हौशी बल्लवाचार्यांसाठी...
हौशी बल्लवाचार्यांसाठी...
रियाला चॅलेंज आता. घरी
रियाला चॅलेंज आता.
घरी व्होडका आणायची आणि शॉटस बनवायचे.. बघूचया!
मस्त! विएनातल्या एका
मस्त! विएनातल्या एका रेस्तॉंमधे टेस्टट्युब मधे असे शॉटस् सर्व्ह केले होते, त्याची आठवण आली
मस्त
मस्त
जे काही आहे ते छान
जे काही आहे ते छान दिसतंय.
'दाखवायच्या' : परमिशन घेतली का?
इंजेक्शनच्या सीरिंज? धन्य.
Mi karun baghen
Mi karun baghen lihilay.
Konaasathi banavanarey te nahi lihilay he lakshat ghya
हाव ना! करून खाईन म्हटलिये का
हाव ना! करून खाईन म्हटलिये का ती?
शिव शिव.
या माबोवरच्या पाशवी शक्ती चक्क दारूच्या रेस्प्या टाकून त्यावर चर्चा बिर्चा कर्तात बा!
जगातील सोंस्क्रूतीरक्षकांनो!!
धावा!!
खानेका मैने बोला क्या?
खानेका मैने बोला क्या? व्होडका घरमे लानेका बोला है...
Nee ghar pe bhi
Nee ghar pe bhi laungi.
Kisake ghar pe run nahi bolya Hai ye yad rakhana
व्होडका म्हणजे दारुच ना? हा
व्होडका म्हणजे दारुच ना?
हा धागा वाचुन झाल्यावर गंगाजल छिडकते आता लॅपटॉप वर आणि पुन्हा इकडे फिरकणार पण नाही.
नी रीया दीमा.. विसर्ला
नी रीया
दीमा.. विसर्ला का.. तुमच्याच रिक्वेस्टीवरून डीटेल्ड रेस्पी टाकलीये..
@ भरत.. 'दाखवायच्या' या शब्दा करता परमिशन घ्यायची होती?? दीमांकडून कि काय??
दिनेश, इंजेक्शन बद्दल अगदी अगदी.. नुस्ता शब्द लिहिला , उच्चारला तरी दंड दुखतोयसासा भास होतो मला.. ईक्स!!! बट हे प्रकरण वेगळं है!!!
गोमुत्र छिडकते आता लॅपटॉप
गोमुत्र छिडकते आता लॅपटॉप वर
<<
व्होडकाच शिंपडा हो.
अल्कोहोलमुळे निर्जंतुक तरी होईल.
सकुरा.. होप यू आर किडिंग!!!
सकुरा.. होप यू आर किडिंग!!! धागा वाचण्या ऐवजी फक्त टायटल वाचलं असतं तरी कळ्ळं असतं..सेव युअर लॅपटॉप प्लीज..च!!!
गोमुत्राऐवजी गंगाजल? बाप्रे!
गोमुत्राऐवजी गंगाजल?
बाप्रे! शेवटचे आचके वगैरे देत नाहिये ना तो लॅप्पी?
Lahanpani mala ekane Gangajal
Lahanpani mala ekane Gangajal mhanje acid as sangitalel
होप यू आर किडिंग!!! <<< हो
होप यू आर किडिंग!!! <<< हो ... आले की परत वाचायला..
दीमा, ते गोमुत्र आणि गंगाजल मधला फरक कळत नाही..नेमके कुठल्या वेळेस काय वापरायचे ते अभ्यास वाढवायला लागणार.
Pages