आवळे - १ की.
मीठ - पाऊण वाटी
कलौंजी - १/२ वाटी
जाड शोप - १/२ वाटी
केप्र आंबा लोणच्या चा मसाला - १ पाकीट
तेल -३ वाट्या
आवळा आरोग्याला छानच. हिवाळ्याच्या दिवसात छान ताजे हिरवे, मगजदार भरिव आवळे मिळतात.या दिवसात हे लोणचे खाण्याची मजा काही औरच आहे..
तर कृती कडे,...
आवळे धुवुन एका भांड्यात (पाणी न ठेवता) कुकर मधे एक शीटी होऊन वाफवुन घ्या..
थंड झाले की, अलगद सुरीने पाकळ्या वेगळ्या करुन घ्या..
मीठ हलक भाजुन घ्या.
आता शोप आणी कलौंजी पण भाजुन घ्या आणि मिक्सर मधुन जाडसर दळा.. (भुकटी नको)
कढईत तेल तापवुन घ्या.
एका परातीमधे मीठ, केप्रे आं.लो. मसाला आणि शोप + कलौंजी ची भरड रचा. त्यावर दोन पळ्या गरम तेल घाला, व्यवस्थीत एकजीव करुन घ्या. आवळ्याच्या फोडी/ पाकळ्या घालुन नीट कालवुन एका काचेच्या दगडीत / बाटलीत ४ ते ५ तास ठेवा. नंतर उरलेल तेल घालुन हवा बंद बरणीत ठेवा..
लोणच खाण्यासाठी तय्यार..:)
पोळी, ब्रेड, पराठे, वरण भात कशाबरोबरही छानच लागते..
कुकर ची एकच शीटी करा, जास्त गहाळ नको,
हे लोणच फ्रीज मधे ठेवले तर, फोडीचा करकरीत पणा जास्त दिवस रहातो..(फीजच्या बाहेर पण टीकते)
मी फ्रीज मधेच ठेवते..हवे तेवढे एका वाटीत काढते.
फोटो मात्र उद्या टाकीन..
फोटो मात्र उद्या टाकीन..:)
मस्तच.... कलौन्जी म्हणजे काय
मस्तच....
कलौन्जी म्हणजे काय ?
छान प्रकार, निदान फोटोत तरी
छान प्रकार, निदान फोटोत तरी आवळे बघीन म्हणतो !
प्रिती, दिनेश दा आभार.. दा,
प्रिती, दिनेश दा आभार..
दा,
कलौन्जी म्हणजे काय ? कांद्याचे बी, काळ्या तीळा सारखे असते.. कुठल्याही वाण्याच्या दुकानात हमखास मिळतात..
मस्त
मस्त
शोप म्हणजे काय..?
शोप म्हणजे काय..?
शोप म्हणजे काय..? ++ सोप
शोप म्हणजे काय..? ++ सोप
आहा.. मस्त दिसतय.. आईला
आहा..
मस्त दिसतय..
आईला दाखवते रेस्पी..घरी आवळे आणले कि लोणचं मुरांबा केला जातोच तसाही
तोंपासु!
तोंपासु!
किलर फोटो.. एक बरणी
किलर फोटो.. एक बरणी माझ्याकरता प्ली.!!!! स्लर्प!!!
जबरी फोटु... पाकृही आवडली !
जबरी फोटु... पाकृही आवडली !
मस्त गं सायु.....कलौंजी
मस्त गं सायु.....कलौंजी माझ्या स्वयंपाकात फारशी नसायची. पण आता हळूहळू वापरायला लागलीये. सध्या बाजारात भरपूर आवळे आहेत. बरंच काही करायचंय आवळ्याचं.....वेळ झाल्यावर.
आणि एक गंमतः
एकदा (म्हणजेच पुरातन कालात) आईला लिहिलेल्या पत्रात(यावरून काळ लक्षात आलाच असेल) आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी विचारली. तिने एका इन्लॅन्ड लेटरवर(आता नवीन पिढीला इन्लॅन्ड म्हणजे काय ते माहिती नसण्याची शक्यता आहे का?) आवळा लोणच्याच्या तीन चार प्रकारच्या रेसिपीज लिहून पाठवल्या होत्या. ते पत्र अजूनही ठेवलंय!
टीना, साती,वर्षु दी, राधिका,
टीना, साती,वर्षु दी, राधिका, मानुषी ताई, ए सगळ्यांना खुप खुप धन्स!!!!
वर्षु दी, डन....:)
मानुषी ताई, व्वा, मस्तच ग, तुझ्या आईच्या रेसिपीज पण टाक ना प्लीज..:)
मानुषीताई ते गुळ घालून करतात
मानुषीताई ते गुळ घालून करतात ते असेल तर लिवा ना प्लीज