ग्रीन मसाला पेस्ट करता साहित्य
१ टेबलस्पून मुळांसकट चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून धने
१/२ टेबलस्पून जिरे
१ १/२ टेबलस्पून चिरलेले गालांगल
१/४ कप लसणाच्या कळ्या
एक छोटा तुकडा आलं
थोडेसे काफिर लाईम zest.( मी काफिर लाईम ची १/४ टी स्पून पावडर वापरलीये)
३, ४ टेबलस्पून लेमनग्रास्,चिरून
१/२ टी स्पून काळे मिरे
मीठ- चवीनुसार
१/२ कप चिरलेले लहान कांदे ( शॅलट्स) इथे मिळाले नाही म्हणून नॉर्मल कांदेच घेतलेत - २ मीडियम आकाराचे
१०,१२ तिखट हिरव्या मिरच्या
मूठभर स्वीट किंवा थाय बेसिल लीव्ज
मूठभर काफिर लाईम ची पाने
१ कॅन कोकोनट मिल्क , ( मी ChaoKoh ब्रँड चा कॅन वापरलाय)
मांसाहारी ग्रीन करी करता, एक पाउंड बोनलेस चिकन घेऊन , ३,४ सें मी लांबीचे पातळ तुकडे चिरून घ्यावे.
शाकाहारी करी करता स्लाईस्ड पांढरे मशरूम्स्,स्नो पीज( धागे काढलेले), उभे दोन भागात चिरलेले बेबी कॉर्न्स, ब्रोकोली ( लहान फ्लोरेट्स मधे चिरुन) , सोलून उभे चार तुकड्यात चिरलेला एखादा बटाटा .
कृती
ग्रीन पेस्ट करता काळे मिरे,धने आणी जिरे भाजून घ्यावे. मग सगळे जिन्नस( काफिर लाईम ची पाने आणी बेसिल लीव्ज सोडून) एकत्र करून ग्राईंडर वर अतिशय बारीक वाटावे.
आता ज्या पातेल्यात किंवा कढई मधे करी करायची असेल ती गॅस वर ठेवून तीत एक टेबलस्पून तेल गरम करा.
मसाला पेस्ट टाकून परता. सुवास सुटला कि चिकन चे तुकडे किंवा सर्व भाज्या टाकून थोडा वेळ परता.
चिकन च्या तुकड्यांचा रंग पिवळसर झाला कि कोकोनट मिल्क चा कॅन आणी कॅन च्या दीडपट पाणी एकत्र करून घाला. उकळी आल्यावर काफिर लाईम लीव्ज आणी स्वीट बेसिल लीव्ज घाला.
गॅस मंद करा. कढई वर झाकण ठेवून चिकन / भाज्या शिजवा.
ही करी स्टीम्ड राईस बरोबर सर्व करा
तो आल्या सारखा दिसणारा लाल तुकडा गालंगल चा आहे, आणी ती लांब पानांची कोथिंबीर आहे. थायलँड मधे हीच कोथिंबीर वापरतात. पण भारतात बहुतेक आपलीच कोथिंबीर वापरावी लागेल.
आजकाल भारतात काफिर लाईम, काफिर लाईम ची पाने, गालंगल्,लेमन ग्रास इ. वस्तू , सहज मिळतात.
करी मधली पानं बघून घरातले मेंब्रं काचकुच करत असल्याने सरळ काढून टाकली..
एंड प्रॉडक्ट.. चिकन आहे तळाशी..
काफिर लाईम ऐवजी , भारतीय लिंबू अजिबात वापरू नये!!
फ्लेवरफुल करी करता कोथिंबीर तिच्या काड्या, रूट्स सकट वापरावी !!
मस्त! >> काफिर लाईम ऐवजी ,
मस्त!
>>
काफिर लाईम ऐवजी , भारतीय लिंबू अजिबात वापरू नये!!<<+१
आम्ही बापूडे रेडीमेड पेस्ट वापरतो, इतकी मगजमारी ना करसे.
रेडीमेड पेस्ट मधे फिश सॉस/
रेडीमेड पेस्ट मधे फिश सॉस/ श्रिम्प पेस्ट ( थाय नाव ,'नाम प्ला') असते ना.. मला नाही आवडत ती फ्लेवर म्हणून हा खटाटोप
शिवाय थायलँड मधील लाँग स्टे मधे जॉईन केलेल्या कुकरी क्लासेस मधे सर्व इन्ग्रेडिएंट्स खास थाय मॉर्टर मधे वाटायला लावायचे .. म्हणून अॅज सच हा खटाटोप ही वाटत नाही..
आवडली...नक्की करणार !
आवडली...नक्की करणार !
रेड करी,यलो करी खाल्लिय ,
रेड करी,यलो करी खाल्लिय , ग्रिन ट्राय नाही केलिये, थाई कोथिबिरिचे इन्गजि नाव काय आहे?
thai coriander leaves ..
thai coriander leaves ..
मस्त.. आणि शाकाहारी व्हर्जनही
मस्त.. आणि शाकाहारी व्हर्जनही दिले आहे... म्हणून आणखीनच मस्त !!
यप.. दिनेश तुला नक्की आवडेल.
यप.. दिनेश तुला नक्की आवडेल. तुला मिळत असतील ना सगळे इन्ग्रेडिएंट्स .. अॅक्चुली वेजिटेरिअन व्हर्जन जास्त आवडतं मला.. फॉर अ चेंज
" मस्त.. आणि शाकाहारी
" मस्त.. आणि शाकाहारी व्हर्जनही दिले आहे... म्हणून आणखीनच मस्त !!" ....सहमत.
मस्त. म्हण्जे एकंदरीत
मस्त. म्हण्जे एकंदरीत करीसाठी. आम्ही आपले घास्फूसवाले.
यातल्या अर्ध्या गोष्टी एलियन
यातल्या अर्ध्या गोष्टी एलियन आहेत माझ्यासाठी
मस्त दिसतय एकंदर प्रकरण.. सगळ साहित्य हाताशी आल्यावर करुन पाहण्यात येईल
स्लाइस्ड लेमन ग्रासचा फोटो
स्लाइस्ड लेमन ग्रासचा फोटो सोललेली छोटी कोलंबी (करंदी) सारखा वाटला
गुड जॉब.
भारी आहे. करून
भारी आहे.
करून पाहिन.
रच्याकने व्हेज व्हर्जन आधीच देउन तू चार सहा पोस्टी कमी केल्यास बघ
रच्याकने व्हेज व्हर्जन आधीच
रच्याकने व्हेज व्हर्जन आधीच देउन तू चार सहा पोस्टी कमी केल्यास बघ डोळा मारा>>>>>>>>>.नाही नाही एक वाढली बघ.
एंड प्रॉडक्ट.. चिकन आहे
एंड प्रॉडक्ट.. चिकन आहे तळाशी.. >>> त्याची तंगडी पकडून थोडे वर काढता आले असते तर माझ्यासारख्यांसाठी बघायची रंगत वाढली असती
मस्त रेसिपी
वॉव, काय मस्त पा.कृ..
वॉव, काय मस्त पा.कृ..
Sahee recipe. Malahee
Sahee recipe. Malahee readymade paste madhala to vishishta vas avadat nahee.
छानच! लसणाच्या कळ्या हा
छानच!
लसणाच्या कळ्या हा शब्दप्रयोग फार आवडला. आपण सहसा लसणाच्या पाकळ्या म्हणतो. पण अपेक्षित आहे लसणाच्या पाकळ्या आणि कळ्या एकून एकच.
वर्षू, हे लेमनग्रास ओलसर असते
वर्षू, हे लेमनग्रास ओलसर असते का ? आम्हाला मिळते ते कोरडे असते. वाटले तरी खाताना कचकच लागते.
मस्त करी चिकन आहे तळाशी >>
मस्त करी
चिकन आहे तळाशी >> कंटाळलं होतं का ?
मस्तय रेसेपी.
मस्तय रेसेपी.
इन्ना!! ऋन्मेष.. बोनलेस ची
इन्ना!!
ऋन्मेष.. बोनलेस ची तंगडी कशी काय रे काढणार बाहेर... तू आपला इमॅजिन कर्बरं!!!
बी, तुला सर्व इन्ग्रेडिएंट्स मिळतील, नक्कीच.. ते ही ताजे.. तुला इंडोनेशिअन करीज आवडल्या असतील तर ही नक्की आवडेल
मानु..अगा.. वरती ये>>वड्या भाज्यांची नावं दिलीत ना शाकाहारी व्हर्जन करता...
दिनेश.. फ्रेश असलं लेमन ग्रास
दिनेश.. फ्रेश असलं लेमन ग्रास तर कच कच लागत नाही. नीट ग्राइंड करता येतं.पण जर वाळकं असेल तर ओवर नाईट पाण्यात भिजवून
ते पाणी करी मधे वापरता येईल. किंवा करीबरोबर एखाद्या पुरचुंडीत बांधून उकळता येईल. खाण्यापूर्वी काढून टाक. फिर नो कचकच. मी पण वाळवलेलेच आणलेत चिंग माय हून..
वरच्या फोटोत पाण्यात भिजवलेले आहे रात्रभर.
माझं गालंगल ही वाळवलेलंच आहे.इथे नाही मिळत हे जिन्नस.
गालांगल चा तुकडा ही रात्रभर भिजत घातला होता पाण्यात. वाटताना त्या पाण्यासकट ग्राईंड केला. छान स्मूथ
झाला.
मी ही रेडिमेड पेस्ट्/सॉस
मी ही रेडिमेड पेस्ट्/सॉस वापरूनच केलं आहे. इन्ग्रेडियंट्समध्ये फीश पेस्ट वगैरे नाही याची खात्री करूनच. बरोबर गरम गरम जास्मिन राईस मस्ट आहे.
यस्स्स जास्मिन राईस इज मस्ट..
यस्स्स जास्मिन राईस इज मस्ट..
सायो कोणत्या ब्रँड ची पेस्ट आहे ??तशी मिळाली तर मग अजून ऑफन करता येईल ही कृती
वरून स्वीट बेसिल ची फ्रेश पाने हल्की क्रश करून टाकली कि एकदम ऑथेंटिक ग्रीन करी तयार होईल
वर्षू, MAESRI ग्रीन करी पेस्ट
वर्षू, MAESRI ग्रीन करी पेस्ट असं शोधून बघ. फोनवरून फोटो अपलोड व्हायला खूप वेळ लागतोय.
थांकु सायो..लगेच सापडली..
थांकु सायो..लगेच सापडली..
विदाऊट नाम प्ला म्हंजे
विदाऊट नाम प्ला म्हंजे पर्र्फेक्ट फॉर मी
थाई करीमध्ये फिश साॅस सर्रास
थाई करीमध्ये फिश साॅस सर्रास वापरतातका?
एकदाच खाल्लेली.चव आवडली नाही.
हो स्वस्ति.. अगदी सर्रास
हो स्वस्ति.. अगदी सर्रास वापरतात.. आपल्या डिश ची ऑर्डर करताना खूप वेळा रिमाइंड करायला लागते. तसंही ते मोस्टली वरून अॅड केलं जातं त्यामुळे ते सहज टाळण्यासारखंही असतं..
तोच प्रकार इंडोनेशिअन फूड्स मधे ही वापरला जातो, वेगळ्या नावाने.. तिथेही बजावून सांगावं लागतं.
व्हॉटस ग्रीन इन धिस व्हाईट
व्हॉटस ग्रीन इन धिस व्हाईट कलर्ड करी?
Pages