Submitted by अबक१ on 7 January, 2016 - 12:27
परिचित ३५ वर्षिय महिलेस माहिती हवी आहे. तिच्या लग्नास १५ वर्शे झाली आहेत. ८ वर्षाची मुलगीआहे. कोलोराडो मध्ये कुणी भारतीय वकील असल्यास कळवावे.
1.Due to husband's visa status, she was unemployed all these years. She recently got EAD but GC is in process.
2. In US since 2007, should she file here or go to India and apply?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतापेक्षा कदाचीत अमेरिकेत
भारतापेक्षा कदाचीत अमेरिकेत जास्त सोपं राहिलं , पण अॅटर्नीची फी देण्याची तिची सांपत्तिक स्थिती आहे का ?
किती फी असते अंदाजे? मी
किती फी असते अंदाजे? मी विचारेन तिला, तिचा नवरा चांगल्या नोकरीत आहे.
ग्रीन कार्ड प्रोसेसमधे आहे ते
ग्रीन कार्ड प्रोसेसमधे आहे ते नवर्याच्या ग्रीन कार्ड बरोबर डिपेंडंट म्हणून होणार आहे का? तसे असेल तर घटस्फोट झाल्यास प्रॉब्लेम येवु शकतो. इमिग्रेशन्सचे रुल्स माहित असलेला फॅमिली लॉयर शोधावा.
GC येईपर्यंत थांबावे का तिने?
GC येईपर्यंत थांबावे का तिने? शक्य होईल असे वाटत नाही पण् मी विचारेन तिला. वकील भारतीयच हवा आहे. कारण ती comfortable असेल.
स्वाती +१. अॅबयुजिव पार्टनर
स्वाती +१. अॅबयुजिव पार्टनर असल्यास वेगळ्या इमिग्रेशन स्टेटससाठी फाइल करू शकते ती. माहिती काढायला सांगा तुमच्या मैत्रिणीला. USCISच्या साइटवर मिळेल कदाचित.
राया, मुलगी कुठली सिटीझन आहे
राया, मुलगी कुठली सिटीझन आहे (बहुतेक इथे जन्म असावा) ह्यावर कस्टडी केस, लग्न कुठे रजिस्टर झाले ह्यावर डिव्होर्स केस आणि अब्युज झाला असेल तर त्यावरून इमिग्रेशन अॅप्लिकेशन (अब्युज नसला तर वेगळे इमिग्रेशन कायदे) अशा कदाचित ज्युरिसडिक्शननुसार वेगवेगळ्या केसेस होतील. http://saharaorg.org/index.html ही कॅलिफोर्नियातील संस्था आहे जी अशा केसेस मध्ये मदत करते. इतर राज्यातील माहिती त्यांना फोन केला तर मिळेल.
वकील भारतीय हवा असा आग्रह धरण्यापेक्षा तिच्या पुढच्या आयुष्याला पोषक असे धोरण आखून केस लढवणारा (उदा: शिक्षण- नोकरीच्या मागे आई धडपडीला लागली की मुलीची कस्टडी १-२ दिवस तरी निभवली पाहिजे बाबाने.) शोधणे गरजेचे आहे.
अब्युज नसावा. असला तरी mutual
अब्युज नसावा. असला तरी mutual divorce petition करायचे आहे तिला. नवरा आज हो, उद्या नाही म्हणतो म्हणुन ती भारतीय वकील शोधत आहे जो mutually, peacefully घटस्फोट मिळवुन देईल.
लिंकबद्दल धन्यवाद सिमंतिनी.
लिंकबद्दल धन्यवाद सिमंतिनी. लग्न पुण्यात, मुलीचा जन्म मुंबईत झाला आहे. अब्युझची काह कल्पना नाही.
घटस्फोट घेतल्यावर जी१ का असं
घटस्फोट घेतल्यावर जी१ का असं काहीतरी स्टेटस मिळतं, माझ्या सोबत एक भारतीय घटस्फोटीत मुलगी जॉब करायची तीचं स्टेटस होतं. तरीही चांगला लॉयरच बघा, कुठे काय माहीती द्यावी काय देउ नये हे सगळं लॉयर्स ना च नीट माहीत असतं.
माझ्या नवर्याच्या ऑफिसातल्या एका भारतीय फॅमिलीने इतका गोंधळ घातलेला या सगळ्या फंदात की बाकी सगळं बाजूलाच राहीलं आणि मुलंच जवळजवळ फॉस्टर केअर मधे जाणार होती.
इंडीयन लॉयरचा आग्रह धरु नये.
इंडीयन लॉयरचा आग्रह धरु नये. अॅब्यूझ नसेल इमिग्रेशनचे रुल्स वेगळे . नवर्याच्या ग्रीनकार्डावर डिपेंडंट म्हणून ग्रीनकार्ड करायचे तर घट्स्फोट झाल्यावर ते कठीण होणार. ग्रीनकार्ड झाल्यावर घटस्फोट घ्यायचा तरी २ वर्षांचा वेटिंग पिरीयड असतो बहूतेक. त्यामुळे चांगल्या वकिलाचा सल्ला घेवूनच काय ते करावे.
मनी , जी१ विसा डिप्लोमॅट
मनी ,
जी१ विसा डिप्लोमॅट मंडळींसाठी असतो ना?
इथे काही माहिती दिसते आहे.
इथे काही माहिती दिसते आहे.
http://immigrationvoice.org/forum/forum68-free-lawyer-conference-calls/1...
हो, बरोबर आहे सिमंतिनी पण
हो, बरोबर आहे सिमंतिनी पण तिला भारतात परत जावुन नोकरी क्ररायची आहे. घर आहे तिथे तिच्या नावावर. नवर्याने मुलीचा खर्च करावा and 20/25 lakhs तिचा जम बसणयअ करतअ द (some problem in Marthi typing. she wants all her daughter's expenses taken of by her husband and some money (about 25 lakhs) to settle in her house in India).
इथे कदाचित माहिती मिळेल
इथे कदाचित माहिती मिळेल http://maitri.org/
सिंडरेला, क्रिया, लिक्स साठी
सिंडरेला, क्रिया, लिक्स साठी धन्यावाद,
स्वाती नक्की माहीत नाही पण
स्वाती नक्की माहीत नाही पण तिचा होता बुवा , जी१ का जी४ असाच काहीतरी... तिने तसं सांगितलं तरी होतं पण लॉयरच नीट हेल्प करू शकेल. माझा मुद्दा असा होता कि कुठलातरी विझा मिळतो पण आता या केसमध्ये तिला EAD मिळालंय तर रुल्स वेगळे असू शकतात.
भारतातच जायचं तर ई ए डी चा का
भारतातच जायचं तर ई ए डी चा का विचार?? मग तर प्रश्न अगदी वेगळे होतीलः ९ वर्षे गॅप असताना आधीच्या शिक्षणावर आता भारतात नोकरी मिळेल का? नवे रोजगार प्रशिक्षण लागले तर शिक्षणाचा खर्च वजा जाता २५ लाख तिला दोन- तीन वर्ष पुरतील का? तिची परिस्थिती, ईच्छा इ इ व्यवस्थित समजून आणि व्यवस्थित गणित मांडणारा वकील हवा.
स्वाती योग्य सांगताहेत.
स्वाती योग्य सांगताहेत. भारतीय वकिलाचा अट्टहास नको. कुठलाही केस समजून घेणारा, मुलीचं हित जपणारा, तुमच्या मैत्रिणीचं भलं होईल हे बघणारा वकील हवा. इथे येऊन आता ७-८ वर्षं झालीत. होपफुली तिला भाषेचा प्रश्न नसावा. अभारतीय वकील देखिल वेगळ्या कल्चरमधले वेगळे प्रॉब्लेम्स समजू शकेल.
>>तिला भारतात परत जावुन नोकरी क्ररायची आहे. घर आहे तिथे तिच्या नावावर. नवर्याने मुलीचा खर्च करावा..
मुलीची कस्टडी शेअर करावी लागली तर तिला पुढली १० वर्षं भारतात कायमचं जाता येणार नाही. ह्या गोष्टीची मानसिक तयारी हवी. मुख्य म्हणजे सध्या कितीही अडचणीचं वाटलं तरी मुलीच्या वडलांच्या परवानगीशिवाय हिने भारतात जाऊ नये. गोत्यात येऊ शकेल.
मैत्रिणीचा डिव्होर्स सुरळीत पार पडून तिला भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
अजून एक इथे पाहिलेल्या
अजून एक इथे पाहिलेल्या केसच्या माहितीवरूनः जर चांगली सेटलमेंट / पोटगी /सपोर्ट हवा असेल तर चांगला वकील शोधावा. एका केसमध्ये फुटकळ वा कमी सपोर्ट/पोटगीत नवरा सुटला.
अर्थात म्युच्युअल कन्सेन्ट व अमिकेबली घटस्फोट घेत असतील, समजूतदार असतील तर हा प्रश्न येणार नाही
सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे
सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे म्युच्युअल कन्सेन्ट! त्यामध्ये दोघाचा मागणीच्या सुवर्णमध्य काढुन निर्णय घ्यावा
तसे होत नसल्यास आणि भारतात जर परत जायचे असेल (आणि लग्नाची भारतात नोंद केली असेल ) तर माझ्या मते भारतात घटस्पोटाचा अर्ज करणे चांगले. तसे केल्यास प्रत्येक वेळी मुलाला भारतात यावे लागेल आणि न आल्यास कोर्टाचा अवमान ठरुन जेव्हा तो परत भारतात येईल तेव्हा अटक होण्याची शक्यता असते. ( this will give her more bargaining power ) तसेच मुलीला परत भारतात जायचे असल्याने ही केस होईपर्यन्त स्वतः कसे settle व्ह्यायचे ह्याकडे लक्ष देउ शकते. भारतात आई -वडिल किंवा बाकी नातेवाईकाचा मानसिक आधार मिळु शकतो.
पण जर भारतात परत गेल्यास केस सेटल होईपर्यन्त परत अमेरिकेत येता येणार नाही.
मुलीचा जन्म भारतातला म्हणजे
मुलीचा जन्म भारतातला म्हणजे मुलगी देखील डिपेंडंट विसावर असेल ना? मुलीच्या ग्रीनकार्डाचे काय? नवरा तिची कस्टडी द्यायला तयार आहे का? कस्टडीबाबात निर्णय अमेरीकन कोर्टात झाला तर त्याचे दूरगामी परीणाम काय असतील हे देखील लक्षात घ्यावे.
राया, अगदी जवळच्या मित्रांनी
राया, अगदी जवळच्या मित्रांनी वर्षभरापुर्वी डिव्होर्स घेतला. त्या मुलीने वकील हायर केलेला. देसी रेडिओअवर वकिलांच्या अॅड येत असतात. त्यातल्या देसी प्रसिद्ध डिवोर्स लॉयर कडून केस फाईल केली.
मुलीला व्यवस्थित अॅसेट मधले निम्मे पैसे मिळाले. चाईल्ड कस्टडी विभागून मिळाली. फक्त दोघांची (आई वडिल) परवानगी असल्याशिवाय मुलाला व्हेकेशन्ला सुद्धा भारतात नेता येत नाही. तसच जाण्यापुर्वी एक फॉर्म वगैरे पण भरावा लागतो कारण छोटा मुलगा इथला सिटिझन आहे. चाईल्ड सपोर्ट स्टेट नुसार रक्कम बदलते.
ती स्वतः कमवत नव्हती. तिने सर्व केस कंबाईन्ड क्रेडीट कार्ड आणि तिच्या नावावरच्या सेव्हिंग्जने केली. नवर्याला नंतर क्रेडीट कार्डचे बिल द्यावे लागले. (हे सांगायचे कारण म्हणजे तुमच्या मैत्रिणीला नोकरी नाही. पण तरीही चांगला वकील गाठल्यास असा व्यवस्थित सल्ला देवू शकतो. )
ग्रीन कार्ड होवू पर्यंत थांबली. याला कारण म्हणजे नवरा नंतर जीसी अॅपलिकेशन तिचे (किंवा स्वताचे )विथ ड्रॉ करू शकतो.
त्यामुळ प्राथमिक माहिती नुसार ग्रीन कार्ड होवू पर्यंत थांबावे जेणे करून तिला इकडे परत येण्याचा मार्ग ओपन राहिल. अॅब्युज नसेल तर तिला सेपेरेट स्ट्ट्स खाली अप्लाय करता येत नाही.
मुलगीची कस्टडी जर नवर्याला मिळाली आणि बायकोला जीसी नसल्याने परत जावे लागले तर , इट विल बी लाँग पेनफुल लिगल बॅटल.
अस सगळ करण्यापेक्षा शक्य असेल तर सामोपचाराने दोघेही भविष्यात कुठे सेटल (किंवा वर्षातले जास्तीत जास्त दिवस रहाणार आहेत) ते डिस्कस करून त्याप्रमाणे ठरवले तर बरे.
वरच्या उदा मुलीने डिव्होर्स फाईल केल्यावर सेपरेट अपार्ट्मेंट रेंट केली आणि आई वडीलांना बोलावले. मुलानेही आपल्या पालकांना बोलावून घेतले. त्यामुळ छोट्या मुलाचे हाल कमी झाले.
ह्या सगळ्यातून तुमचे मित्र/मैत्रिण लवकर बाहेर पडोत आणि त्या छोट्या मुलीला दोघाही जणांचे भरपुर प्रेम मिळो.
धन्यवाद सर्वांचे. खुप चांगली
धन्यवाद सर्वांचे. खुप चांगली माहिती मिळाली. GC व्हाय्ला २/३ वर्षे लागु शकतील. ती थांबेल का ते मी सांगु शकत नाही.
एक नवीन माहिती आहे.
एक नवीन माहिती आहे.
राया, ही सगळी माहिती
राया, ही सगळी माहिती धक्कादायक आहे. वाचून फार वाईट वाटलं तुमच्या मैत्रिणीसाठी. कृपया गैरसमज नको पण हे सगळे डिटेल्स इथे लिहून काय साध्य होइल? तसेच अमेरिकेत बर्याच भारतीयांनी चालवलेल्या संस्था आहेत ज्या अशा केसमध्ये योग्य सल्ला/मार्गदर्शन करू शकतील. रँडम लोकांची मतं मागवण्यापेक्षा अशा कुठल्या संस्थेशी संपर्क साधावा असं मला वाटतं.
सिंडरेला, पटते आहे. पण मी
सिंडरेला, पटते आहे. पण मी यासाठी ईथे विचारले होते की ती परभाषीय आहे (so avoiding her or her relatives from reading all this. she confides in me and I am no expert in all this. but I want to help. At least if I can get her good lawyer references, she can consult and decide her own path ) आणी माबो सारखी दुसरी जागा नाही जिथे मला कुणाला विचारता येईल. असो, मी एडिट केले आहे. ईथे अनोळखी लोकांना विचारताना संकोच वाटत नाही. एखाद्या संस्थेला ती किंवा मी सांगणे हे सर्वस्वी तिच्या निर्णयावर अवलंबुन असेल. ईथे विचारताना तसा प्रश्न येत नाही,
राया, पोस्ट डिलीट केल्याने
राया,
पोस्ट डिलीट केल्याने नक्की काय प्रॉब्लेम आहे समजले नाही पण तुमच्या परीचयातील स्त्रीला मदतीची गरज आहे असे दिसते. एन आर आय विवाहाबाबत मायबोलीवरील माहितीपूर्ण लेखाचा दुवा देत आहे. http://www.maayboli.com/node/27680
या लेखाच्या शेवटच्या भागात परदेशातील मदत करणार्या संस्थांची माहिती आहे तसेच एन आर आय सेलची माहिती आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यास खात्रीशीर मदत मिळेल.
काय पण एकेक अवघड प्रश्न अन
काय पण एकेक अवघड प्रश्न अन परिस्थिति असते लोकांपुढे... बापरे. काण्ट इव्हन इमॅजिन.
तुमच्या मैत्रिणीचे सर्व काही विनाविलंब चांगले होऊदे हीच इच्छा.