नमस्कार,
सदर लेख हा आम्ही तरुणानी आमच्या गावी सुरु केलेल्या 'पातोंडा परीसर विकास मंच' करीता वस्तु वा आर्थिक स्वरुपात मदतीचे आवाहन म्हणुन लिहला असून जमेल त्या पध्दतीने सध्या स्थीती मांडण्याचा प्रयत्न करतोय…
आम्ही म्हणजे पातोंडावासी ता. अमळनेर, जि. जळगाव येथील राहणारे पोटापाण्यानिमीत्ताने गाव सोडुन इतरत्र स्थायीक झालेले लोक, काहींचा तर गावाशी थेट सबंधही न राहीलेला, वेगवेगळ्या वयांचे साधारण तीन पीढीतले वाटस अप च्या वापराने एकत्र जमलोत. गावासाठी काहीतरी उपयुक्त चांगल करुयात या एका जाणीवेने तसेच सध्याची गावातील स्थीती, शेतकर्यांचे पाण्या अभावी होत असलेले हाल, दरवर्षी पाण्याचा तुटवडा शेतीचे राहु द्या पिण्याच्या पाण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट्, बेरोजगारी, योग्य दिशा न सापडल्याणे वाया जात असलेली तरुणाई, देशी दारुचे अड्डे, जुगाराचे वाढते प्रमाण, कौटुबिंक कलहाने, निसर्गाच्या अनितीने कीवा सावकारीच्या जबड्यात फसल्याने दर दोन चार महीण्यात होत असलेल्या आत्महत्या आणि त्यात होरपळले जाणारे बायका पोर आणि अश्या सार्या विषण्ण करणार्या घटना आमच्या गावी घडत होत्या म्हणजे घडतच आहेत... आम्ही यावर आता उत्तरे शोधलेत असे नव्हे पण काहीतरी मार्ग काढण्यासाठी धडपड करत आहोत. सरकारी मदती साठी प्रयन्तशील आहोतच पण शासन दरबारी लालफितीतुन मदत येई पर्यंत कीती जिव ह्या दळदळीच्या खायीत जाणार याची वाट बघण्यापेक्षा आहे त्या स्थीतीत काहीतरी आशादायक करण्याचा प्रयत्न केलाय निदान सुरवात केलीय असे बोलु शकतो.
सुरवातीला जास्तीत जास्त वाट्स अप वापरणारे गावातील व गावाबाहेरील लोक वाट्स अप गृप ने जोडु लागलो. एक एक करुन वय वर्षे, काम धंदा कसलाही आगापिच्छा न बघता गावतला आहे का? एवढ बघत वाटस अप गृपवर सहभागी करत राहिलो. नंतर काय करायचे काय करावे यावर दबत्या स्वरुपात चर्चा होऊ लागल्या. आलेल्या पोस्ट फक्त फॉरवर्ड करणे जिथे ठावुक होते तिथे काहीतरी अजेडां ठेवत चर्चा घडवून आणने सुरवातीला कठीण गेले त्यात खेड्यातले राजकारण बाजुला सारणे अवघड पण गृपवर राजकारणा संबधीत कोणतीही पोस्ट पडु नये असा नियम ठेवत कशोसीने पाळण्याचे ठरवले. गावातील मुलांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयार करावे असा कयास ठेवला. त्यानुसार जागाही शोधली हा आमचा पहीला उपक्रम त्याला 'युवा जागर अभ्यासिका' असे नाव दिले. अभ्यासिका तयार करण्यासाठी लागणारे साधन सामुग्री तसेच पुस्तके व आवश्यक साहीत्य याची यादी बनवुन पदरचे पैसे जमा करत, सर्वाना आवाहन करत हा उपक्रम यशस्वी केला. या बद्दलची माहीती मी या अगोदर मायबोली वर दिली असुन हा खाली दुवा.
http://www.maayboli.com/node/54674
साधारण जुलै-२०१५ यामहीण्यात आम्ही अभ्यासिका आणि वृक्षरोपण करुन झाल्यावर पुढचा उपक्रम हाती घेतला जिल्हा परीषद मराठी मुलांची/मुलींची शाळा दुरस्तीकरण सध्या स्थीतीत असलेली शाळा म्हणजे मोडकीस आलेले गेट.. कवलारुंची नासधुस झालेले वर्ग. भले मोठे पटागन असुनही कुठे मुताऱ्याच्या पडक्या भिंती तर कुठे अस्ताव्यस्त अवस्वस्थेत पडलेले बाधकाम, मला निटस माहीती नाही पण शासनाचे 'सर्व शिक्षण अभियान' यातुन नविन वर्ग बाधुन दिले जातात्(अर्थात त्या बाधकामाचा दर्जा त्या त्या कॉन्टक्टर च्या कामावर ठरलेला) परंतु जुने पडीक असलेले वर्ग आहे त्याच स्थीतीत दुरावास्थेत सोडून दिले जातात त्या साठी जिल्हा परीषदे कड़े काही तरतूद आहे का तेही माहीत नाही, तर अश्या या 'सर्व शिक्षण अभियानातुन आम्हला नविन वर्ग मिळत आहेत. पण सध्या असलेल्या शाळेत दुरस्तीकरणाबाबत शिक्षण समीतीने आवाहल देऊनही पुढे काही करता येत नव्हते. शाळेचे तारकंपाऊंड पुर्णपणे नादुरस्त झाले अवस्थेत आहे. शाळेत ना टॉयलेट बाथरुमची सोय अश्या एक धड भराभर दुरावस्थानी ग्रासलेलेल्या शाळेचे काम आम्ही हाती घेतले आहे. आता पर्यत पदरचे पैसे जमा करत आम्ही रंग रगोटी संपवली असुन डिजीटल स्कुल साठी LED टीव्ही मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. प्रत्येकी १५०० रुपये असे गावी-बाहेरगावी असलेल्या लोकांकडुन जमा करत लोक वर्गणीतुन आता पर्यंत गावाच्या सभोवताली जमीनीत पाण्याची पातळी वाढवणे, हगणदारी मुक्त गाव, स्वच्छेते विषयी जागरुकता व इतर अरोग्यासंबधीत जनजागृती सुरु आहे यासारखी कामे आम्ही आमच्या अगामी काळात करायचे ठरवले आहेत.
१)सध्या सुरु असलेल्या कामात आम्हाला डिजीटल स्कुल साठी संगणकांची आवश्यकता असुन कुणा़कडे कॉरपरेट ऑफिसेस कीवा सेवाभाची संस्थामध्ये संगणक मिळवण्यासाठी काही तरतुद असल्यास कळवावे. त्यासाठी आवश्यक असलेली अर्ज वा इतर कागदोपत्रे पोहच करावयाची विल्हेवाट आम्ही करु. योग्य मार्गदर्शनही बहुमूल्य ठरू शकते.
२)गावातील मुलांना स्पर्धा परीक्षासाठी अभ्यासिका तयार करुन देण्यात आली असुन तिथे दर महीण्यात येणारा कीरकोळ खर्च संस्थेमार्फत करत असतो. तरी आम्हला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षासाठी लागणारे पुस्तके, मासिके, साप्तहीके आवश्यक आहेत , येत्या मार्च मध्ये स्पर्धा परीकशासाठी जवळपास ७० पुस्तकांची आवश्यकता आहे त्यासाठी येथील सभासद काही करु शकले तरी आमच्या कामाला हातभार लागेल.
३)अंगणवाडी वा प्राथमिक शाळेच्या मुला/मुली खेळाचे काही साहीत्य कुठून उपलब्ध होत असेल तरी त्या संबधात मायबोलीकर माहीती देऊ शकतात.
४)मी येथे फक्त काहीतरी अर्थिक वा तत्सम मदत मिळावी फक्त यासाठीच लिहले नसुन, आमच्या अभ्यासिकेत गाव व परीसरातल्या मुलांसाठी आठवडयात कीवा पंधरवाड्यात स्पर्धा परीक्षासाठी व्याख्यान(लेक्चर) आयोजीत करत असतो. ज्याना कुणा मान्यवंराना या सबंधीत काही माहीती कीवा मुलाना सदर परीक्षा साठी तुमच्या कडे असलेली बहुमुल्य माहीती शेअर करावेसे वाटत असेल तर तुमच्या मार्गदर्शनासाठी आम्ही उत्सुक आहोत.
५)खर तर वयक्तीक कोणा एका व्यक्तीसाठी कीवा दुर्बल घटकासाठी अश्या प्रकारे मदत मागण्यात कसले वावगे वाटत नाही. पण एका सपुर्ण गावासाठी (म्हणजे गावात सर्व प्रकारचे लोक असून)त्याच्यासाठी येथे मायबोलीवर मी आव्हान करतोय या विषयी मला आपसुक वाईट वाटतय. परंतु काही गोष्टी मोकळ्या पणे इथे लिहतोय गाव जवळपास ७ ते ८ हजार वस्तीचे भलेमोठे असुन जवळपास आठशे ते हजार लोक इतरत्र स्थायीक असावेत परंतु अजुनही गावातुन पाहीजे तसा हातभार आमच्या या कामात मिळत नसुन(त्याची कारणे टीपीकल खेड्यात असतात तशीच समजावी) यापुढे मिळेल तिथुन मदत घेण्याचा आमचा कयास असुन सुरवातीचे हात मायबोलीकरांकडे पसरतो आहे.
-यदु (योगेश्वर पाटील)
सपर्क क्रमाकः- ८४२४००६१८८
पातोंडा परीसर विकास मंच
खाली काही छायाचित्र देतोय त्यानुसार सध्या परीस्थीचा आढावा घेता येईल.
१)खालचे सुरवातीचे तीन फोटो सुरवातीची परीस्थीत दाखवत आहेत.
२)आमच्या परीने रंग रगोटी केल्यानंतर बदलेले थोडस रुप
३) गावात विकास मंच च्या माध्यमातुन नुकतेच योग शिबीर सुरु केले त्याला मिळालेला प्रतिसाद.
४)विकास मंच अर्तगत आमच्या युवा जागर येथे आयोजित केले जाणारे लेक्चर ..
५)हा आमचा विकास मंच चा अधिकृत लोगो.
चांगले काम करत आहात. कृपया
चांगले काम करत आहात.
कृपया लागणा-या पुस्तकांची, साप्ताहिकांची व मासीकांची यादी इथे द्या.
उत्तम कार्य. सध्या सुरु
उत्तम कार्य.
सध्या सुरु असलेल्या कामात आम्हाला डिजीटल स्कुल साठी संगणकांची आवश्यकता असुन कुणा़कडे कॉरपरेट ऑफिसेस कीवा सेवाभाची संस्थामध्ये संगणक मिळवण्यासाठी काही तरतुद असल्यास कळवावे>> याबद्दल चौकशी करुन कळवतो.
चांगले कार्य आहे. हे गाव
चांगले कार्य आहे.
हे गाव कुठे आहे? म्हणजे अॅडरेस.
कृपया लागणा-या पुस्तकांची,
कृपया लागणा-या पुस्तकांची, साप्ताहिकांची व मासीकांची यादी इथे द्या>>>
खाली पुस्तकांची यादी देतोय .. त्यातले काही महागडे असु शकतात पण एक एक दोन दोन करुन जरी आम्हला पुस्तके भेटली तरी आमचा सध्याच्या पुस्तकासंबधीत प्रश्न सुटु शकतो.
नं. पुस्तकाचे नाव प्रकाशन/लेखक माध्यम प्रती
1 lucent english S. chand मराठी १
2 pal & suri के सागर मराठी 2
3 wrain & martin के सागर मराठी 2
4 आधुनिक भारताचा इतिहास -महाराष्ट्राचा विशेष संधर्भासह के सागर मराठी 1
5 इतिहास प्रश्न संच STI PSI ASSTI के सागर मराठी 1
6 इतिहास प्रश्न संच राज्यसेवा के सागर मराठी 1
7 अर्थशास्त्र प्रश्न संच के सागर मराठी 1
8 भूगोल प्रश्न संच के सागर मराठी 1
9 पंचायतराज प्रश्न संच के सागर मराठी 1
10 पर्यावरण प्रश्न संच के सागर मराठी 1
11 मानवी हक्क प्रश्न संच के सागर मराठी 1
12 गणित प्रश्न संच के सागर मराठी 1
13 इंग्रजी प्रश्न संच के सागर मराठी 1
14 OXFERDS DICTIONARY मराठी 1
15 महाराष्ट्र वनसेवा परीक्षा के सागर मराठी 1
16 AN INTRODUCTION TO POLITICAL THEORY DR.O.P.GABA (K SAGAR) मराठी 1
17 ANCENT INDIA ( प्राचीन भारत ) डॉ.आर.एस.शर्मा (के सागर) मराठी 1
18 आधुनिक भारताचा इतिहास डॉ हुकूमचंद जैन (के सागर) मराठी 1
19 जगाचा भूगोल डॉ. मजीद हुसेन (के सागर) मराठी 1
20 world History for Upsc mains जैन and माथुर (के सागर) मराठी 1
21 महाराष्ट्राचा सामाजिक -सांस्कृतिक इतिहास डॉ.प्र.न.देशपांडे;प्रा.ह.श्री.शेणोलीकर(केसागर) मराठी 1
22 Geogrpy of india Gopal sing हिन्दी 1
23 certifiacte physical & human geography G.C. leong हिन्दी 1
24 Our parliament Subhsh kashyp हिन्दी 1
25 भारतीय अर्थव्यवस्था दत्ता सुंदरम हिन्दी 1
26 Wonder than was india A.L.basim हिन्दी 1
27 Mordern india Sumit sarkar हिन्दी 1
28 world Histoy L.N.mukharji हिन्दी 1
29 Human geography Majit husen हिन्दी 1
30 Polity and Governance M. lakshimikant हिन्दी 1
31 constitiustion of india D>D.basu हिन्दी 1
32 Internal Security in india Bajpai हिन्दी 1
33 Envisoining an Empowermed nation APJ abdul kalam हिन्दी 1
34 Indian Economy Mishra & puri हिन्दी 1
35 An introduction to ithics William lillie हिन्दी 1
36 Ethics in Governance ramesh arora हिन्दी 1
37 Ethics,intergrity & Aptitude Sqn. Ldr. Shashikant shetye(Pritvi pub.) हिन्दी 1
38 Environmental Geography Savindra Sing हिन्दी 1
39 Regional Planinig in India Chand & Puri हिन्दी 1
40 mental ability R.S.agrwaal हिन्दी 1
41 Quntiative apttiude r.S.agrwaal हिन्दी 1
42 Puzzles S.Devi,Georgr Summers हिन्दी 1
43 CSAT MANNUAL TMH हिन्दी 1
44 An Advanced History og India Mujumdar,Raichandra हिन्दी 1
45 Data Ashoka & Decline of Mauryan Empire Avasti हिन्दी 1
46 mordern world K.Krishan Reddy हिन्दी 1
47 world History L.Mukharji हिन्दी 1
48 Modern india s.n.sen हिन्दी 1
49 Modern india Spectram Publication हिन्दी 1
50 भारतीय अर्थव्यवस्था देसाई भालेराव हिन्दी 1
51 IBPS clerical प्रश्न संच arihant pub. हिन्दी 1
52 SSC भारती BOOK arihant pub. हिन्दी 1
53 RAILWAY GROUP- C,D-BOOKS arihant pub. हिन्दी 1
54 RAILWAY RECRITMENT BOARD UPKAR PUB. हिन्दी 1
55 Lucent obejective GK Lucent Publication Hindi 1
56 Atlas (WORLD) Oxferd इंग्रजी 1
57 INDIAN NEVY arihant pub. इंग्रजी 1
58 ELECTRICAL ENGGNERING R.S.agrwaal इंग्रजी 1
59 SSC - ELECTRICAL MACHANICAL UPKAR PUB. इंग्रजी 1
60 POWER SYSTEM GUPTA इंग्रजी 1
61 MACHANICAL ENGGNERING MADE EASSY PUB. इंग्रजी 1
62 ELECTRICALENGGNERING MADE EASSY PUB. इंग्रजी 1
63 FUNDMENTAL OF MATHAMATICAL STAT. A.C GUPTA / V.K KAPOR इंग्रजी 1
64 FUNDAMENTAL OF APPLIED STAT. S.C GUPTA / V.K KAPOR इंग्रजी 1
65 AN INTRODUCTION TO PROBABILTY THEORY V.K ROHTAGI इंग्रजी 1
66 SAMPALING THEORY OF SERVAY WITH APPLICATION B.V.SUKHATME इंग्रजी 1
67 OBJECTIVE ELECRTONICS AND TELECOMUNICATIONS Dr. M. P. SINHA/P.K.MISHRA इंग्रजी 1
68 ELECRONICS % COMMUNICATION ENGG. SATTYA PUB.( MR.HANDA) इंग्रजी 1
जागू चांगले कार्य आहे. हे गाव
जागू चांगले कार्य आहे.
हे गाव कुठे आहे? म्हणजे अॅडरेस.>>>
गावाचे नावः- पातोंडा, ता. अमळनेर जि. जळगाव. अमळनेर-चोपडा रस्तावर आहे.
ओके जळगाव जिल्हा.
ओके जळगाव जिल्हा.
पुस्तकं मिळाल्यास पोहोचती कशी
पुस्तकं मिळाल्यास पोहोचती कशी करायची? एवढ्यातच मी एकाद्या तासासाठी अंमळनेरमध्ये असणार आहे आणि एका रात्रीपुरती अंमळनेर तालुक्यातल्या एका गावात. पण नक्की कुठे असणार आहे ते मलाही माहित नाही. नाहितर लागलीच जमेल तशी खरेदी करुन पुस्तके तिथपर्यंत आणली असती.
त्यामुळे पुस्तकं पोहोचती करायचा दुसरा मार्ग सांगा.
डासांना हद्दपार करणारी गावं!
डासांना हद्दपार करणारी गावं! (नंदकुमार सुतार)
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5453522673954829853&Sectio...(%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0)
‘मॅजिक पिट’ची माहिती देताना
‘मॅजिक पिट’ची माहिती देताना नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे
‘नांदेड पॅटर्न’
http://mr.vikaspedia.in/agriculture/
विहीर पुनर्भरण पुनर्भरण चर भूजल पुनर्भरण
टेंभुर्णी गाव : येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे नाहीत. ‘मॅजिक पिट’मुळे गटारांवरील खर्च वाचला.
http://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923
shirpur pattern
search these keywords you will get lots of skims
शोषखड्डे अन् डासमुक्तीचा
शोषखड्डे अन् डासमुक्तीचा ‘नांदेड पॅटर्न’
IT कंपनी तुम्हाला जुने संगणक
IT कंपनी तुम्हाला जुने संगणक पुरवू शकते.
Infosys मध्ये चौकशी करा, त्यांचा एक विभागच आहे अश्या कामांसाठी. तुमची गरज पाहून ते मदत करतात तुम्हाला फक्त योग्य कागदपत्र सुपूर्द करावी लागतील. माझ्या मित्रांपैकी काहींनी त्यांच्या गावासाठी हि मोहीम राबवली होती.
अधिक माहिती साठी सनराइज प्रतिष्ठान (NGO) ला संपर्क करा त्यांनी डिजीटल स्कुल साठी संगणक हि योजना infosys च्या माध्यमातून राबवली आहे ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. खाली त्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत.
अमित जोशी - ८६९८९५०३३३
अतुल पारखे - ९९७०९६१७८५
ज्ञानेश्वर दसपुते - ९५५२५०१२२७
अश्विनी के… धन्यवाद शक्य
अश्विनी के… धन्यवाद शक्य झाल्यास फोन करा. मी माझा मोबाईल नंबर दिला आहे. तुम्ही जर पुस्तके विकत घेउन देत असाल तर ने-आण ची व्यवस्था आम्ही करू. पुण्या-मुबईत गावातील बरीच लोक आहेत. त्या द्वारे हे काम होऊ शकते. तुम्ही फ़क्त कळवा. पुढची व्यवस्था आम्ही बघतो.
ओके. पुढच्या आठवड्यात बोलते.
ओके. पुढच्या आठवड्यात बोलते.
तनमयी >>खरच खुप उपयुक्त
तनमयी >>खरच खुप उपयुक्त माहीती. धन्यवाद. शक्य ते फोरवर्ड करतो आमच्या गृपवर.
तोफखाना धन्यवाद साहेब, मी सपर्क केला दसपुते सरांशी ते प्रयत्न करणार आहेत त्यांच्या परीने. धन्यवाद.
४-६ वर्षे वयातील मुलांना
४-६ वर्षे वयातील मुलांना आवडतील अशी English पुस्तके देऊ का ?
एकदम सोप्या भाषेतील... चित्रे रंगवणे, रस्ता शोधणे असे काही काही आहे त्यात.
साहेब म्हणून लाजवू नका, आणखी
साहेब म्हणून लाजवू नका, आणखी काही मदत लागल्यास जरूर कळवा. शक्य ती मदत करण्यात येईल.
तुम्ही अजून बाकीच्या IT कंपनी मध्ये प्रयत्न करून पहा मदत मिळेल. शासनाने सुरु केलेल्या CSR योजने अंतर्गत ह्या कंपनींना त्यांचा नफ्याच्या काही टक्के रक्कम समाजहिता साठी वापरणे अनिवार्य आहे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा. _/\_
धन्यवाद सर्वाचे. धनवन्ती तै
धन्यवाद सर्वाचे. धनवन्ती तै मी करतो पुढची व्यवस्था.
माझ्याकडे इंग्रजी आणि गुजराथी
माझ्याकडे इंग्रजी आणि गुजराथी शब्दांचे फ्लॅश कार्डस आहेत. मी मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहते. माझ्याकडून कोणी घेऊन जाईल का? त्याचा वापर कसा करायचा मी भेटल्यावर सांगेन. शिवाय लहान मुलांचे a b c d कॅपीटल आणि स्मॉल चे लाकडाचे ट्रे आहेत. योग्य खाचेत नॉबवाले योग्य अक्षर बसवा असे. तेसुद्धा हवे तर देऊ शकेन. शिवाय काही भाज्या पक्षी प्राणी असे पुठ्याचे ट्रे आहेत. तेही देईन. फक्त कोणी तरी घेऊन जा.
गेले तीन वर्ष ह्या वस्तू माझ्याकडे नुसत्या पडून आहेत. विकत घ्यायला कोणी मिळत नाही आणि फुकट कोणाला द्यायचे तर योग्य शाळा संस्था मिळत नाहीत.
लहान मुलांच्या मराठी गाण्यांच्या सीडीज आहेत.
ह्याशिवाय डॉट कार्ड्स, आकार, रंग ह्यांचे लॅमिनेटेड फ्लॅश कार्ड्स आहेत. हे सगळे मला अशा बालवाडीला किंवा अंगण्वाडीला द्यायचे आहेत जिथे मुले शाळेत जायला कंटाळा करतात. अजूनही काही एज्युकेशनल टॉय्ज आहेत.
सगळे काही एकाच वेळी देत येणार नाही. तरीही ज्यांना आदिवासी पाड्यांच्या अंगण वाड्या अशा ठिकाणी ही खेळणी द्यायची आहेत त्यांनी मला सम्पर्क करा.
देशाबाहेर वास्तव्यास असल्याने
देशाबाहेर वास्तव्यास असल्याने प्रत्यक्षात व्यक्तिशः येणे किंवा साहित्य पाठवणे सध्या तरी शक्यं नाही.
आर्थिक मदतीसाठी बँकेच्या अकाऊंटचे डीटेल्स कृपया द्याल का?
फार चांगला उपक्रम. खुप
फार चांगला उपक्रम. खुप शुभेच्छा.
वेल धन्यवाद मी स्वता मुंबईत
वेल धन्यवाद मी स्वता मुंबईत राहायला आहे. शनिवारी वेळ काढु शकतो. तुम्ही तुमचा फोन नंबर कीवा पत्ता ठेवा. धन्यवाद पुन्हा एकदा.
त्रुत्विका खुप खुप धन्यवाद मी खाली आमच्या मंच चा बैक डिटेल देतो. पैसे ट्रान्सफर करण्याअगोदर कॄपया मला या नंबर ८४२४००६१८८ फोन कीवा वाट्स अप मेसेज करा.
पातोंडा परीसर विकास मंच
खातेदाराचे नावः- विलास साहेबराव पाटील
खाते नंबर :-१७०३०१००००७१०८
बैकः- बैंक ऑफ बडोदा
शाखा:- पातोंडा
IFSC Code:-BARB0PATONDA(B नंतर शुन्य आहे.)