हिरवी मिरची लसूण खर्डा

Submitted by अंजली on 4 January, 2016 - 22:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरव्या मिरच्या
आवडेल त्या प्रमाणात लसूण. साधारणपणे मिरच्यांच्या निम्म्या प्रमाणात. मला जास्त प्रमाणात लसूण घातलेला आवडतो त्यामुळे मिरच्यांच्या जवळपास बरोबरीनं घेते.
जीरे
हिंग (ऐच्छिक)
मीठ
तेल

क्रमवार पाककृती: 

या खर्ड्यासाठी लोखंडी खोलगट तवा असल्यास उत्तम. माझ्याकडे नसल्यानं मी नॉनस्टीक पॅनमधे केला.

तेल तापवून त्यात जीरं आणि हिंग घालावं.

मिरच्या आणि लसूण घालावे.

लसूण मऊ झाल्यावर मीठ घालून वाटी / दगडी बत्ता किंवा इतर उपल्ब्ध साधनानं तव्यावरच खरडत (?) / ठेचत बारीक करावे.

झाकून एक वाफ काढावी.

वाढणी/प्रमाण: 
खर्ड्याचं प्रमाण काय सांगणार?
अधिक टिपा: 

आवडत असल्यास हिंग जीर्‍याची फोडणी करून वरून घ्यावी. किंवा दही घालूनही छान लागतो.
पराठ्याबरोबर दही घेतल्यास त्या दह्यात खर्डा मिक्स करून घेतल्यास मस्त चव येते.
कुठल्याही भाजीच्या फोडणीत (कोबी, दुधी भोपळा, झुकीनी वगैरे) हिरवी मिरची ऐवजी चमचाभर ठेचा घातल्यास खमंग चव येते.
एकूण व्हर्सटाईल प्रकरण आहे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली खूप छान दिसतो आहे ठेचा. तू जे साधन वापरले ते लाकडी आहे का? बटाट्याचा लगदा करण्यासाठी असे लाकडी साधन मी पाहिले आहे. ठेचा खूप आवडतो पण केला जाता नाही कारण ठेचायला साधन सुचत नव्हते. पाटा वरवंटा तर शक्यच नाही पण मिस्कर मधून ठेचा करायचाही कंटाळा येतो एकट्यापुरता. ही तुझी कढईतल्या कढईतच ठेचायची पद्धत सोपी आणि अमलात आणायला शक्य आहे. तेंव्हा, करुन पाहीन. धन्यवाद.

Masta

खेड्यात फोडणी वगैरे नसते. मिरच्या तळून ठसकल्या वर त्यात मीठ घालून मोकळ्या तांब्याने अथवा मोठ्या वाटीने रगडण्यात येतो. बाकी पदार्थ , दही घातल्याने त्यातला मझा जातो असे माझे मत्त. ठेच्याचा तिखटपणा कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्याचा स्वाभिमान घालवण्यासारखे आहे ::फिदी:

मस्त आहे फोटो!
आम्ही कच्चीच लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ ठेचून घेतो. एकदा तू लिहिल्याप्रमाणे करून बघेन.

खरडा आणि ठेचा ह्यात फरक असा आहे की खरडा हा कोरडा असतो तर ठेचा हा ओला असतो.

खरडा करताना आधी मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यायचे. मग, तेल तापवून त्यात जिरे घालायचे आणि त्यात मिरची आणि लसूण जो की ठेचला आहे ते मिश्रण घालायचे. मिरचीमधील पाणी आटेपर्यंत खरडा अरत परत करायचा. ह्यात दाण्याचा कुट सुद्धा घालतात.

वर तू जी पद्धत लिहिली आहे ती ठेच्याची आहे.

छान.

तोंपासू प्रकरण आहे :), मी असाच करते नेहमी, ब्रेडवर सुद्धा लावून खाता येतो.

ठेपले भाजताना ते दाबण्यासाठी फोटोतील उपकरण वापरले जाते ( त्याचे नांव माहीत नाही.)

पावभाजी मॅशर असा असतो.
PB.jpg

जबरी आहे खर्डा.
माझी बाई असाच करते फक्त जिरे, हिंग नाही घालत. मिरच्या तव्यावर टाकल्या की उठणार्‍या ठसक्यापासूनच या खर्ड्याच्या विचाराने तोंडाला जे पाणी सुटते ते थांबवणे कठीण. फक्त मी एक चमचा साखर आणि शेंगदाणे घालते.

दक्षिणा शेंगदाणे ठीक आहे एकवेळ पण साखर? ईईईईईईईईईईईईईईई कशाला खायचा खर्डा मग? जिरे हिंगाचं काही कामच नाही त्यात खरं म्हनजे...

मराठवाड्यात असाच करतात पण त्याला ठेचा म्हणतात. ठेच्यात साखर किंवा रस्सममध्ये साखर/गूळ म्हणजे त्या पदार्थाचा अपमानच ... अर्थात आवड आपली आपली Happy

तो एक बीबी होता ना मला आवडत्या वस्तू अशा खायला आवडतात , त्यात टाका. मला खर्डा साखर घालून आवडतो::फिदी:

साखर घालणं माझा चॉईस असू शकतो ना?>>

मी चहामधे कांदेपोहे घालून वरण भाताप्रमाणे खायचो बालपणी. तेंव्हा असे करायला आवडायचे आता नाही.

चहामध्ये फक्त पोहे बुडवुन खातात हे माहीती आहे, पण तुम्ही 'कांदेपोहे' खायचात म्हणजे कमालच आहे. Happy
अर्थात तो तुमचा चॉईस असू शकतो.

अरे ठेचा/ खर्डा मधे जीरं, हिंग, शेंगदाणे, साखर, लिंबु काय ?
कश्या कश्याची गरज नाही. फक्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या+लसुन्+मीठ. तव्यात तेलावर घालुन थोड्या परतुन तव्यातच ठेचायचं. तोंपासु.

मी पण खाते कांदेपोहे आणि चहा. फक्त कांपो एक चमचा तोंडात घालते आणि तो चावत असताना चहाचा एक घोट घेते. म्हणजे चहात कांपो बुडवुनच फक्त तोंडात.

Pages