१ वाटी तांदूळ
१.५ वाट्या उडीदडाळ
०.५ वाटी चणाडळ
१ चमचा मेथी .
चवीनुसार मीठ.
हळद.
नारळाचा रसः ( अंदाजे)
खवलेलं खोबरं
गूळ
वेलची/जायफळ पूड
गुरुवारी रात्री आईचा फोन आला ,"थंडी पडतेय, आता खापरोळ्याचा बेत करतेय , येशील का शनिवारी रात्री ?"
मी अर्थातच काहीही विचार न करता होकार कळवला.
नवरोबा आणि लेकाला हा प्रकार आवडत नाही त्यामुळे मी नवर्याकडे जाहिर केलं " मी शनिवारी रात्री आईकडे जेवायला जातेय " (तू तुझं काय ते जेवणाचं बघं,अस सुचवलं. त्यानेही तत्परतेने शनिवारी दूपारी मासे आणून , आपल्या आईकरवी स्वतःची सुग्रास जेवणाची सोय करून ठेवली).
मागे कुठल्यातरी पाकृच्या धाग्यावर मी खापरोळ्यांचा उल्लेख केला होता. यावेळी आईकडे पाकॄ विचारून ठेवली आणि काही फोटोज पण काढले.
खापरोळ्या हा कोकणात केला जाणारा खाद्यप्रकार आहे.
नाश्त्याचा प्रकार म्ह्णता येइल , पण चांगला पोटभरीचा आहे , त्यामुळे आम्ही शक्यतो रात्रिच्या जेवणाला करतो.
बर्यापैकी थंडी पडू लागली की हे बेत सुचतात.
आता कॄतीकडे वळूया.
खाण्यावर ताव मारता मारता , आईच्या बोलण्याकडे जितके लक्ष देता येइल , तेवढे देत , जे कानावर पडलं ते सांगते.तसं डोसे, ईडल्या वगैरे करणार्या लोकाना काही कठिण नाही.
पोळ्यांसाठी वर दिलेली धान्य , डाळी वेगवेगळी भिजत घालावीत , साधारणपणे आठ तास.
नंतर उपसून , वाटून एकत्र करावित . चविपूरत मीठ आणि थोडीशी रंग यावा ईतपत हळद घालावी.
पीठ चांगलं ढवळून , पातेलं झाकून ठेवावं. सात आठ तासानी पीठ वर आलं की पोळ्या करायला घ्याव्यात.
पण त्या अगोदर नारळाचा रस तयार ठेवावा .
नारळाच्या दूधात गूळ विरघळवून घ्यावा आणि वरून वेलचीपूड / जायफळ पूड घालावी.
एक चांगला जाड बूडाचा लोखंडी तवा घ्यावा. (१) . मध्यम आचेवर गरम करायला ठेवावा.
त्यावर तेल अजिबात लावू नये . डावाने पीठ सारखे करून , एक डाव पीठ तव्यावर ओतून पसरावे.
तव्यावर एक ताट झाकण ठेवावे.
तोपर्यन्त खायची तयारी करावी . म्हणजे एक तळहाताएवधी खोलगट बशी , एक वाटी , एक चमचा - एका मोठ्या ताटात गोळा करावी.
आता तव्याकडे लक्ष द्यावे. हळू झाकण बाजूला करावे . पोळी वरून शिजलेली दिसेल , बारिक भोकं पडलेली दिसतील . पोळीखालून कलथा फिरवून , सुटते का बघावी.जरा करपल्यासारखी वाटली तरी असूदे . काही बिघडतं नाही. तव्यावरून सोडवून सरळ तशीच्या तशी , ताटात काढावी .(२) आणि लगेच दूसरी पोळी तव्यावर घालावी आणि झाकण द्यावे.
ताटातली पोळी , त्या खोलगट बशीत काढावी आणि ती बूडेल ईतका नारळाचा रस वरून ओतावा . बशीत चमचा ठेवावा. तो पर्यन्त दूसरी पोळी तयार होईलच . ती ताटात काढावी आनि मग गुमानपणे गॅस बन्द करावा.
अख्खं ताट उचलून बाहेरच्या खोलीत यावं. खूर्चीवर मांडी घालून बसावं आणी चमच्याने भिजलेल्या पोळीचा एक तुकडा मोडावा आणि तोंडात घालावा.
तो लुसलुशीत , गोड रसात भिजलेला तुकडा , कॅडबरीच्या जाहीरातीतले लोक कसे डोळे मीटून , तोंडात घोळवत खातात , तसा आनंद घेत खावा. (३)
रसात भिजवून खाव्यात किन्वा ताटात नुसत्या पोळ्या घेउन वाटीत रस घ्या. एक एक तुकडा वाटीतल्या रसात बूडवून खा.
(१) आम्ही जाड बूडाचाच तवा वापरतो . निर्लेप , बीडाचा तवा वगैरे वापरून प्रयोग केले नाहीत. तुम्हाला पाहिजे तर करू शकता.
(२) ही पोळी अजिबात परतू नये . तुम्ही आंबोळ्या किन्वा स्पॉन्ज डोसा करत नाही आहात. हाल्फ फ्रायच करावी.
(३) नारळाचा रस , वेलची/जाय्फळ पूड वगैरे प्रकरण एक्दम अंगावर येणार आहे. काही महत्वाची कामे असल्यास हा बेत करू नये.
(४) अवांतर : आम्हा मालवणी लोकाना चहा नुसता चालत नाही . काहीतरी "बुडवायला" लागतं .
चपाती , आंबोळी , बिस्किट ,टोस्ट, बटर झालच तर चकली , साबूदाणा वडा , थालिपीठ ,शिळ्या पुर्या .. काहीही .
( नवरा म्हणतो , हीच्या मनात आल तरं नवर्याला पण बूडवून खाईलं )
तर सांगायचा मुद्दा , अशी लोक , या पोळ्या चहात बूडवून पण खाऊ शकतात.
(५) या पोळ्या वरिजनली खापरावर केल्या जायच्या म्हणून त्याना खापरोळ्या , खापरपोळ्या म्हणतात.
छान फोटो ????
छान फोटो ????
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
माझा अत्यण्त आवडता प्रकार...
माझा अत्यण्त आवडता प्रकार... ह्या तव्यावर बनत असताना जो सुगंध सुटलेला असतो तो केवळ अवर्णनिय.
बाकी लोखंडी तव्यावरही बनु शकतात हे माहित नव्हते. मी कायम बीडाच्या तव्यावरच बनवल्यात. लोखंडी तव्यावर घातल्या तर चिकटतील ही भिती (मला) वाटते.
(४) अवांतर : आम्हा मालवणी लोकाना चहा नुसता चालत नाही . काहीतरी " बुडवायला" लागतं
आदल्या दिवशीच्या कोंबडी वडे बेतातले वडे दुस-या दिवशी तव्यावर (वड्यांना थोडे डाग पडेपर्यंत)गरम करुन मग चहात बुडवुन खाणे म्हणजे सौख्याची परमावधीच.
वाह, मस्तं पाककृती.
वाह, मस्तं पाककृती.
आदल्या दिवशीच्या कोंबडी वडे
आदल्या दिवशीच्या कोंबडी वडे बेतातले वडे दुस-या दिवशी तव्यावर (वड्यांना थोडे डाग पडेपर्यंत)गरम करुन मग चहात बुडवुन खाणे म्हणजे सौख्याची परमावधीच. >>>>>>>>>>. अहाहा , साधनाताई , काय आठवण काढलीस !!
दूपारच्या जेवणाला पुर्या किन्वा वडे जास्त झाले की ती पर्वणी असते . संध्याकाळच्या चहाबरोबर खायला मिळतात.
मस्त .... आदल्या दिवशीच्या
मस्त ....
आदल्या दिवशीच्या कोंबडी वडे बेतातले वडे दुस-या दिवशी तव्यावर (वड्यांना थोडे डाग पडेपर्यंत)गरम करुन मग चहात बुडवुन खाणे म्हणजे सौख्याची परमावधीच>>>>++१११
मस्त पाकृ आहे, स्वस्ति. आता
मस्त पाकृ आहे, स्वस्ति. आता बनवुन बघणारच.
मस्त. आमच्या मालवणच्या घरी
मस्त. आमच्या मालवणच्या घरी करत नसत. आई इथे कारवारी मैत्रिणीकडून शिकली. ती याचे तिखट व्हर्जन पण करते. चांगली खापरोळी नारळाच्या दूधात तरंगली पाहिजे ( इति ओगले आज्जी )
छान आहे रेसिपी.. खापरोळ्या
छान आहे रेसिपी.. खापरोळ्या शब्द श्याम च्या आई पुस्तकात वाचलेला आठवतोय,आत्तापर्यन्त ढिम्म कल्पना नव्हती कि कशाच्या करतात त्या..
आहाहा! वाचूनच तोंडाला पाणी
आहाहा! वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय. केलं पाहिजे.
आहाहा! वाचूनच तोंडाला पाणी
आहाहा! वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय. >>>>> +११११११
मस्त!!! नक्कीच करून बघणार.
मस्त!!!
नक्कीच करून बघणार.
भारी आहे प्रकरण
भारी आहे प्रकरण
छान आहेत खापरोळ्या. आमच्याकडे
छान आहेत खापरोळ्या. आमच्याकडे सकरोल्या करतात.
खापरपोळ्या छान वाटतायत पण
खापरपोळ्या छान वाटतायत पण नारळाच्या दुधात नाही आवडणार मला, चटणीसोबत कशा लागतील?
आम्हा मालवणी लोकाना चहा नुसता चालत नाही . काहीतरी "बुडवायला" लागतं . >> हे मात्र पटलं. माझ्या मालवणी मैत्रीणीची आई तर चहासोबत केळं पण खाते.
वा पाककृती आणि वर्णन दोन्ही
वा पाककृती आणि वर्णन दोन्ही आवडले.
वा!
वा!
साधना कही तुम मेरी जत्रेमे
साधना कही तुम मेरी जत्रेमे खोयी हुयी बहिण तो णही? स्लर्प स्लर्प करणारी बाहुली
प्रीती , लगता है हम सभी
प्रीती ,
लगता है हम सभी मेलेमे खोयी हुई बेहने है .
: हात पसरून धावत येणारी बाहुली :
सर्वाना धन्यवाद
साधनाताई , तवा थोडा जास्त काळा होतो , जरा घासावा होता . पण नाही चिकटत .
दिनेशदा , मलाही वाटत होत की कोकाणातल्या लोकाना ही पाकृ माहित असेल .
त्यादिवशीच माझी एक दूरची मावसबहिण आलेली . तिचा जन्म , शिक्षण सगळं कोकणातलचं .
तिने हा प्रकार कधीच चाखला नव्हता. पहिल्यान्दा बघितला आणि खाल्ला.
तिखट पोळ्या ऐकल्या आहेत , पण खाल्ल्याच्या आठवत नाही .
निल्सन , चटणी सोबत ही लागतील चान्गल्या . माझ्या बाबाना आवडत नाहीत , पण मला या पोळ्यांची स्वत ची चव फार आवडते . मी मध्येच एखादी नुसतीच कोरडी पण खाते .
केळं जरा जास्तच प्रकरण आहे
तशी माझी एक मैत्रिण आम्लेट-पाव बुडवून खायची.
मामी,मंजूतै नक्की करून बघा.
वर म्हटल्याप्रमाणे , ज्या दिवशी हवेत गारवा जास्त त्यादिवशी खाण्यात जास्त मज्जा
पोळीचा खालचा पापुद्रा एक्दम कुर्कुरीत व्हायला हवा आणि वरचा भाग गादीसारखा मउ.
म्हणजे , चमच्याने अलगद खरवडलतं तर , खालचा थर अखंड राहीला पहिजे
सस्मित , सरकोल्या ?
होउन जाउदे आणखी एक पारंपारिक पाकृ
सरकोल्या नाही हो. सकरोल्या.
सरकोल्या नाही हो. सकरोल्या.
रेस्पी बिस्पी माझ्याच्याने नाही लिहुन व्हायची.
सरकोल्या नाही हो. सकरोल्या >>
सरकोल्या नाही हो. सकरोल्या >> गलतीसे मिस्टेक हो गया .
चुकीला माफी नाही - तरी पण एक डाव माफ करा ताई
मस्त रेसिपी आणि लिखाण ही.
मस्त रेसिपी आणि लिखाण ही. नक्की करणार .
अरे वा, ह्यो तर एकदम आवडीचो
अरे वा, ह्यो तर एकदम आवडीचो प्रकार! शनिवार सकाळचो हमखास बेत, फक्त आमच्याकडे बिडाचो तवो वापरतंत. मी तर कुकरचा छोटा भांडा घेऊन, त्यात दोन खापरोळ्ये पूर्ण नारळाच्या रसात बुडवून हादडतंय. नरम - कुरकुरीत, मेथी - वेलची असे चवीचे कॉन्ट्रॅस्ट्स मस्त लागतंत.
हा प्रकार खरेच ऑल टाईम फेव
हा प्रकार खरेच ऑल टाईम फेव आहे.
नन्दन
नन्दन
ट्राय करावाच म्हणते.
ट्राय करावाच म्हणते.
वडा , थालिपीठ ,शिळ्या पुर्या
वडा , थालिपीठ ,शिळ्या पुर्या .. काहीही .
( नवरा म्हणतो , हीच्या मनात आल तरं नवर्याला पण बूडवून खाईलं डोळा मारा )>>>>>>
चविष्ट रेस्पी!
स्वस्ति आ गले लग जा
स्वस्ति आ गले लग जा
सुंदर फोटो. मला चटणीबरोबर
सुंदर फोटो. मला चटणीबरोबर खायला आवडेल, नवऱ्याला नारळाच्या रसाबरोबर.
हा प्रकार मालवण साईडलाच करतात कि काय कारण माझं माहेर संगमेश्वर तालुक्यात तिथे माहिती नाही आम्हाला, पण बाबा मला म्हणाले कि देवगडला करत असतील खापरोळ्या (सासर देवगड तालुका), बाबांनी सासूबाईना विचारले पण तुमच्याकडे करतात का? तर सासूबाई म्हणाल्या आम्ही नाही करत.
Pages