नवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 23 December, 2015 - 06:05

सध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत, बहुतेक धाग्यावर वाद होत आहेत, फेक आयडीचे प्रमाणही वाढले आहे तेव्हा असे सुचवावेसे वाटते की एखादा धागा उघडायचा तर One time password घेऊन उघडणे सक्तीचे केले तर बोगस धागे निघणे कमी होईल. तुम्हाला काय वाटते??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संकल्पना कळली नाही.
म्हणजे काय म्हणायचेय?
ओ पि टी म्हणजे काय?
ओ टि पी का?
ओटिपी म्हणजे काय असतं?
त्याने बोगस धागे काढायला बंदी कशी होईल?

मोबाईल्वर One time password आल्यानंतर तो Verification झाल्यावर धागा पोष्ट होईल अशी व्यवस्था !

>>नवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर..<< रुन्मेष्...तुझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतयं रं बाबा... Wink

>>>सध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत<<<

वादविवादाचे धागे निघत आहेत का निघालेल्या धाग्यांवर फक्त वाद होत आहेत? आता लग्नाचा खर्च कसा वाचवता येईल ह्या धाग्यावर चाळीस टक्के चर्चा भटजीम्च्या दक्षिणेवर झाली आहे. ती करायला राकुंच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशन कोड आला काय आणि नाही काय, ती कोणताही धागा आला की होणारच आहे. त्यापेक्षा सदस्याला एका धाग्यावर चोवीस तासात जास्तीतजास्त (उदाहरणार्थ) तीनच प्रतिसाद देता येतील असे काहीतरी करावे.

पण यात मायबोलीला आर्थिक भुर्दण्ड बसेल ना मेसेज पाठवायचा?

त्यापेक्षा धागाप्लान काढावा
महिना पाच धागे, पंचवीस धागे आणि धाग्याचे रीळ अशा विविध एककात फी घ्यावी, हवे तर विधायक कार्याला दान करावी

किंवा सदस्यांना केवळ काही शब्दांचे / ओळींचे
उदा-मॅक्सिमम १०० शब्द असेही करायला हवे.
म्हणजे आम्हाला उगाच लंब्याचवड्या पोष्टी जंप करायला नकोत.
Happy

त्यापेक्षा धागाप्लान काढावा
महिना पाच धागे, पंचवीस धागे आणि धाग्याचे रीळ अशा विविध एककात फी घ्यावी, हवे तर विधायक कार्याला दान करावी >>>>>

अमेय - लै भारी आयडिया आहे.... Happy

त्यापेक्षा धागाप्लान काढावा
महिना पाच धागे, पंचवीस धागे आणि धाग्याचे रीळ अशा विविध एककात फी घ्यावी, हवे तर विधायक कार्याला दान करावी
>>

अंशता असहमत.
त्यापेक्षा धाग्यावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादामागे दोन पैसे घ्यावेत. एक पैसा धागाकर्त्याला द्यावा आणि एक पैसा दान करावा Happy

एका दिवसात ३ One time password जमले तर फार तर ३ धागे निघतील .
आणि १ आयडीला १ मोबाईल नंबरवरच login

काहीही लिहा,
प्रतिसाद, लेख, कविता, गझल, इ.इ. शब्दाला रुपया भाव ठेवा (लिहीलेल्या प्रत्येक शब्दासाठी १ रु. चार्ज).
काही लिखाळ ("वाचाळ-उगा तोंडवाजवणारे" सारखे) कमीत कमी लिहतील. उठ-सुट कश्याचाही पो नाही टाकणार.
माझे झाले ३८ रु.

मुक्तेश्वर.... हे मोबाईलचे जरा अवघडच वाटतेय. कारण त्यात प्रशासनाला खर्च आणि डोकेदुखी दोन्ही आहेत.

एका आठवड्यात तीन पेक्षा जास्त घागे उघडायचे असतील तर चढत्या दराने पैसे घ्यावेत, हि कल्पना अंशतः मान्य आहे पण विखारी प्रचारासाठी पैश्याची कमतरता कधीच पडत नाही.

त्यापेक्षा मायबोलीकरांनीच सूज्ञपणे अश्या धाग्यांवर प्रतिसाद न देता ते मागील पानावरच जातील / राहतील असे केले पाहिजे. चांगल्या धाग्यांना प्रतिसाद देणे फार गरजेचे आहे. पण दिसला नवीन धागा कि दे प्रतिसाद, असे धोरण स्वीकारले तर असे अनावश्यक धागेच पहिल्या पानावर राहणार. माझ्यापुरता हा नियम मी केलाच आहे, तो अनेकांनी केला तरच काहितरी होईल.

दिवसेंदिवस असे होत चाललेय कि काही वाचण्यासारखे मायबोलीवर असतच नाही. रोजच्या वर्तमानपत्रातल्याच बातम्या रा.कु. देत असतात. ( पुर्वी खेडेगावात पेपर आला कि शाळामास्तर सार्वजनिक वाचन करत असत त्याची आठवण झाली. )

दिनेशदा सहमत आहे ! मी ही प्रतिसाद देणे बंदच केले आहे. मोजक्या धाग्यावर प्रतिसाद देतो.

बर्‍याच जणांनी (माझ्यासकट) राकुंच्या धाग्यावर प्रतिसाद देणे बंद केलेय.
परिणाम काय झाला...

राकुंनी 'टवाळखोर' वाली वॉर्निंग काढून टाकली आणि नव्या दमाने मध्यरात्रीही नानाविध धागे काढू लागले.
Wink

मी तर राकुंचे धागे वाचतच नाही, प्रतिसाद देणे दूरची गोष्ट. Happy दिनेशदा म्हणतात तशा वर्तमानपत्रातल्या बातम्याच इथे देतात, स्वतःचे काही मत नसतेच, त्याला काय म्हणावे? Uhoh

त्यांच्या धाग्यावर कोणीच प्रतिसाद दिला नाही तरच कदाचित ते धागे काढणे बंद करतील.

चला ठरल तर

आजपासून कोण कोण प्रतिसाद देणार नाही. प्रत्येकाने "मी प्रतिसाद देणार नाही" असे या पोस्टीखाली लिहायला सुरुवात करावी.
ज्याने इथे प्रतिज्ञा घेऊन प्रतिसाद लिहिला तर त्याला तळ्यात घागर उपडी करून त्यावर बसवण्यात येईल. मंजूर ?

हो . एक नंबर इंटरनेटसाठी. एक नंबर कंपनीच्या कॉलिंगसाठी. एक नंबर घरच्यांसाठी. एक नंबर इमरजन्सीसाठी. आणि एक नंबर अतिविशिष्ट महत्त्वांच्या लोकांसाठी (जेणेकरून त्यांना माझा फोन इंगेज लागू नये)

जयंत, त्यापेक्षा त्यांना गांधीगिरी म्हणून गुलाबाचे फुल देऊ.. विपूत किंवा वेगळ्या धाग्यावर !
अर्थात प्रतिसाद नसतील तर असे धागे बंद पडतील हाही स्वप्नविलासच माझा.. तडके अजून बसतातच कि !

तडक्यांवर जाउ द्या. ते चांगले सद्गृहस्थ आहे असे दिसून येते. खोड तर लिंब्यासारख्या लोकांची मोडायची असते ना Wink
लिंबूभाऊ Light 1

किती हसतोय!
बहुप्रसव राशिंना का रोखताय?
पुर्वीच्या सिंगल ट्रॅक रेल्वेची आठवण झाली.पुणे सातार मिरज बेळगाव. जाणारी येणारी एकाच रुळावरून.त्यासाठी एक मोठे वेताचे कडे आणि त्याला खाली दांडा असायचा.तो दांडा असल्या/घेतल्या शिवाय रेल्वेला जाता यायचे नाही.फास्ट एकस्प्रेसातला मोटरमनचा असिस्टंट ते कडे शिताफीने रुळाच्या बाजूला ते कडे उंच धरलेल्या माणसाकडून घ्यायचा. r k narayanan च्या गोष्टीत आहे हे चित्र.

हे काही शक्य होणार नाही कारण बरेच जण जीमेल/रेडीफमेल/याहू वगैरे वरून वेगवेगळे पासवर्ड आणि वेगवेगळे आयडी घेऊन धुमाकूळ घालत असतात. पण त्यांना धागे काढण्यची मात्र मर्यादा घालावी .हे बेस होईल Happy

पण त्यांना धागे काढण्यची मात्र मर्यादा घालावी .हे बेस होईल
>>>>
माझ्यामते महिन्याला ७ धागे ही मर्यादा योग्य राहील.
यात माझ्या दुकानाला फटका बसणार नाही Wink

काही सदस्य धाग्याला वेटोळे घालून बसतात आणि चरकातून ऊसाची चिपाडं काढावीत तशी मोठ मोठे प्रतिसाद देऊन धाग्याची अवस्था करून टाकतात. तेव्हढं थांबवा भाऊ, चामड्याचे जोडे करून पायात घालीन.........

माझ्या नाही, वेटोळ्याच्या Lol

Pages