राशिभविष्य डिसेंबर २०१५
(के. पी. पद्धतीप्रमाणे)
(खालील राशी भविष्य अॅस्ट्रॉलॉजी काउन्सेलिंग तर्फे देण्यात आलेली आहेत.)
(टीप:सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)
मेष :मेष राशीचा स्वामी मंगळ षष्ठात आणि चंद्र पहिल्या आठवड्यात पंचमात त्यामुळे प्रकृतीसंबंधी काळजी नसावी. मंगळामुळे किरकोळ उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. द्वितीयेश शुक्र सप्तमात आणि मंगळ षष्ठात त्यामुळे अनेक लोकांना धनलाभ होईल. तृतीयेश बुध अष्टमात आणि राहू षष्ठात त्यामुळे प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. चतुर्थेश चंद्र पहिल्या आठवड्यात पंचमात व शुक्र सप्तमात घरगुतीबाबतीत काहीतरी खर्च होण्याची शक्यता आहे. पंचमातील गुरु-चंद्र तुमच्या अध्यात्मिक कार्याला बरीच प्रेरणा देतील, ज्यांना अध्यात्माची आवड आहे ह्या काळात सतत प्रवचन ऐकत राहिल्यास अगर ध्यानधारणा केल्यास लाभ होईल. तसेच पंचमातील गुरु-चंद्र हा प्रसिद्धी योग आहे, काहींना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. षष्ठातील मंगळ, राहू आणि अष्टमातील रवि, बुध, शनि ह्या योगामुळे आर्थिक बाबतीत जपून व्यवहार करावेत. सप्तमातील शुक्र आणि षष्ठातील मंगळ ह्यामुळे काही प्रमाणात जोडीदाराशी वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. दशमेश शनि अष्टमात आणि मंगळ षष्ठात त्यामुळे ज्यांचा व्यवसाय अगर नोकरी इंजिनिअरिंगशी निगडीत आहे (मेकॅनिकल आणि सिव्हील) ह्यांना हा काळ चांगला आहे. एकंदरीत मेष राशीला हा महिना पारमार्थिक दृष्ट्या उत्तम तर संसारिक दृष्ट्या संमिश्र आहे.
वृषभ :वृषभ राशीचा स्वामी शुक्र षष्ठ स्थानी उच्चीचा आहे. मंगळ पंचमात त्यामुळे शारीरिक तक्रारी जरी उद्भवल्या तरी लवकर आराम पडेल. द्वितीयेश बुध सप्तमात आणि राहू पंचमात ह्यामुळे आर्थिक दृष्ट्या व्यवहार जपून करावेत. तृतीयेश चंद्र पहिल्या आठवड्यात गुरू बरोबर चतुर्थात असल्याने ज्यांचा फिरतीचा व्यवसाय आहे, अश्यांना जास्त लाभदायक काळ आहे. लेखकांना देखील हा काळ फलदायक ठरेल. चतुर्थातील गुरु-चंद्र घरातील वातावरण समाधानी ठेवेल. पंचमातील राहू-मंगळ मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम आखण्यास प्रवृत्त करतील. सप्तमात रवि, मंगळ, शनि हे तीन ग्रह कौटुंबिक दृष्ट्या उत्तम आहेत, जोडीदाराशी आनंदाचे संबंध राहतील. अष्टमातील गुरु चतुर्थात असल्याने वाहने जपून चालवावीत. दशमेश व लाभेश शनि व्यवसायाच्या दृष्टीने तेवढा लाभदायक नाही तरीही ज्यांचा व्यवसाय कलेशी संबंधित आहे अश्यांना जरा चांगला काळ आहे. एकुणात वृषभ राशीसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.
मिथुन :मिथुन राशीचा स्वामी बुध षष्ठात आणि राहू चतुर्थ स्थानी कन्या राशीत त्यामुळे शरीर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. द्वितीयेश चंद्र तृतीय स्थानी गुरूच्या बरोबर आहे. त्यामुळे पुस्तक विक्रेते व शिक्षणाशी संबंधित लोकांना हा काळ चांगला आहे. तृतीयात गुरु-चंद्र व तृतीयेश रवि षष्ठात हा योग देखील वरच्या विधानाला पुष्टी देतो. चतुर्थात मंगळ व राहू असल्याने घरगुती बाबतीत काही त्रास संभवतो. पंचमेश शुक्र पंचमातच व मंगळ चतुर्थात हा योग कलाकारांना चांगला आहे मात्र शेअर ब्रोकर्सच्या दृष्टीने तितकासा चांगला नाही. षष्ठात रवि, बुध आणि शनि हे तीन ग्रह असल्याने काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे, तरी शक्य तेवढी प्रकृतीची काळजी घेतल्यास आजार टाळता येईल. सप्तमेश गुरु तृतीयात चंद्राबरोबर असल्याने महिन्याची सुरुवात जोडीदाराबरोबर सलोख्यात जाईल, पुढे चंद्रभमणानुसार फरक पडेल. षष्ठातील रवि काही प्रसंगी मतभेदाचे प्रसंग आणू शकेल. दशमेश गुरु तृतीय स्थानी चंद्राबरोबर आहे त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोकरी संदर्भात शुभ समाचार मिळण्याची बरीच शक्यता आहे. लाभेश मंगळ चतुर्थात व बुध षष्ठात हा योग आर्थिक लाभ दाखवत आहे. एकंदरीत हा महिना मिथुन राशीला चांगला जाईल असे दिसते.
कर्क :कर्क राशीचा स्वामी चंद्र द्वितीय स्थानी, तिथेच गुरु त्यामुळे काही लोकांना आधीच्या प्रयत्नांचा आर्थिक फायदा मिळेल.तृतीयात मंगळ, राहू व राहू कन्येत असून त्याचा स्वामी बुध पंचमात आहे. त्यामुळे हा योग इव्हेंट मॅनेजमेंट व तत्सम स्वरूपाचा व्यवसाय असणाऱ्यांना आर्थिक योग असल्यास बरीच कामे मिळतील. चतुर्थेश शुक्र चतुर्थातच व मंगळ तृतीयात त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. मंगळामुळे कदाचित चहाच्या पेल्यातील वादळे संभवण्याची शक्यता आहे. पंचमात रवि, बुध, शनि व पंचमेश मंगळ तृतीयात त्यामुळे मुलाबाळांच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानी व द्वितीय स्थान मारक स्थान असल्याने प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्यावी. सप्तमेश शनि पंचमात व तिथेच बुध व रवि त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील, सुखसंवाद होतील. दशमेश मंगळ तृतीयात हा योग इव्हेंट मॅनेजमेंट व तत्सम स्वरूपाचा व्यवसाय असणाऱ्यांना चांगला काळ दाखवतो आणि त्याबरोबरच आर्थिक प्राप्ती देखील दर्शवतो. लाभेश शुक्र पण ह्या गोष्टीला पुष्टी देत आहे. एकुणात हा महिना कर्क राशीला उत्तम आहे असे दिसते.
सिंह :सिंह राशीचा स्वामी रवि चतुर्थ स्थानी, गुरु-चंद्र लग्नी त्यामुळे घरामध्ये वातावरण खूपच चांगले व आनंदी राहील. तसेच प्रकृतीची काळजी रहाणार नाही. द्वितीयात राहू, मंगळ आर्थिक बाबतीत चढ-उतार दर्शवतात. तृतीयेश शुक्र तृतीयातच आहे आणि मंगळ द्वितीयात ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे त्यांच्या व्यवसायच चढ-उतार राहतील. जेवढा प्रवास घडेल तेवढा व्यवसाय फायदेशीर होईल. चतुर्थ स्थानी रवि, बुध, शनि हे तीन ग्रह असल्याने विद्यार्थ्यांना देखील हा काळ उत्तम आहे. पंचमेश गुरु लग्नी असल्याने मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने काळजी नसावी. सप्तमेश शनि चतुर्थात असल्याने जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. दशमेश शुक्र तृतीय स्थानी त्यामुळे नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम काळ आहे. काहींना आर्थिक प्राप्ती देखील चांगली होण्याची शक्यता आहे. लाभेश बुध चतुर्थात आहे त्यामुळे ज्यांना घर विकायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना देखील हा काळ लाभदायक आहे. द्वादाशेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला लग्नी आहे, कदाचित पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात काहींना लहान-सहान प्रवास घडण्याची शक्यता आहे. एकुणात सिंह राशीला हा महिना उत्तम आहे.
कन्या :कन्या राशीचा स्वामी बुध तृतीयात, तिथेच रवि व शनि त्यामुळे उत्साह चांगलाच राहील आणि प्रकृती देखील उत्तम साथ देईल. द्वितीयेश शुक्र द्वितीयातच (स्वराशीचा) असल्याने निश्चितच आर्थिक लाभ होतील. तृतीयातील तीन ग्रह रवि, बुध, शनि निश्चितपणे छोटा-मोठा प्रवास घडवून आणतील. तसेच प्रवास देखील सुरळीत पार पडतील. चतुर्थेश गुरु बाराव्या स्थानी व रवि तृतीय स्थानी ह्यामुळे काही लोकांना नवीन घर खरेदी करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच हा योग मोठ्या प्रवासासाठी देखील पुष्टी देतो. पंचमेश शनि तृतीयात आणि पंचमेश शनि असल्याकारणाने लिखाणाला जास्त वाव देईल असे दिसते...लेखकांसाठी उत्तम काळ आहे. सप्तमेश गुरु बाराव्या स्थानी व रवि तृतीय स्थानी जोडीदाराशी मतभेद संभवतात. अष्टमेश मंगळ प्रथमात त्यामुळे नोकरीबाबत थोडाफार मानसिक ताण जाणवेल आणि कामाची व्याप्ती देखील वाढेल असे दिसते. दशमेश बुध तृतीय स्थानी त्यामुळे तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमचा दर्जा उंचावेल, कामाची दखल घेतली जाईल किंवा काही लोकांना आर्थिक प्राप्ती देखील होण्याचे योग आहेत. लाभेश चंद्र त्याच्या भ्रमणाप्रमाणे कमी-जास्त लाभ देईल. एकंदरीत हा महिना कन्या राशीसाठी चांगला आहे.
तूळ :तूळ राशीचा स्वामी शुक्र लग्नीच असल्याने तुमची प्रकृती उत्तम साथ देईल, तुम्ही आनंदी राहाल. बाराव्यातील मंगळ कदाचित थोडेसा उष्णतेचा त्रास देऊ शकेल. द्वितीयातील तीन ग्रह रवि, बुध आणि शनि आर्थिक लाभ निश्चितपणे मिळवून देतील. तृतीयातील गुरु लाभात आणि चंद्र देखील महिन्याच्या सुरुवातीला तिथेच त्यामुळे लेखकांना हा महिना चांगला जाईल. चतुर्थेश शनि द्वितीयात त्यामुळे काही लोकांना घरविक्रीचा विचार असल्यास निश्चितपणे लाभ होईल. तसेच चतुर्थ स्थान हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील चांगलेच आहे. पंचमेश देखील शनीच असल्याने मुलाबाळांच्या दृष्टीने फारशी काळजी करण्याचे कारण नाही. षष्ठेश गुरु लाभात व रवि द्वितीयात असल्याने द्वितीय, षष्ठ आणि लाभ हे तिन्ही भाव आर्थिक दृष्ट्या उत्तम आहेत. सप्तमेश मंगळ बाराव्या स्थानी व बुध द्वितीय स्थानी असल्याने जोडीदाराशी सर्वसाधारणपणे सुखसंवाद राहील. अष्टमेश शुक्र व बाराव्या स्थानी मंगळ कदाचित पैशाचा अपव्यय किंवा कामात मानसिक ताण दाखवतो. दशमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला लाभ स्थानी असल्याने सरकारी नोकरी करणाऱ्यांना अतिशय लाभदायक आहे. एकुणात हा महिना तूळ राशीला उत्तम आहे.
वृश्चिक :वृश्चिक राशीतच रवि, बुध व शनि हे तीन ग्रह असल्याने त्यातील रवि तुमची प्रकृती उत्तम ठेवील असे दिसते. द्वितीयेश गुरु दशमात व रवि वृश्चिकेत त्यामुळे तुमच्या कार्याचा योग्य तो गौरव होईल असे दिसते. त्याबरोबर काही प्रमाणात आर्थिक लाभ देखील होईल.तृतीयेश शनि तुमच्याच राशीत, राहू लाभात व बुध वृश्चिकेत त्यामुळे जी मंडळी लेखक असून धार्मिक प्रवृत्तीची आहेत त्यांच्या हातून धार्मिक लिखाण होवून ते प्रसिद्ध होईल. चतुर्थेश देखील शनि असल्याने विद्यार्थ्यांना देखील हा काळ अतिशय चांगला आहे, विशेषत: ज्यांनी फिलॉसोफी विषय अभ्यासासाठी घेतला आहे त्यांना विशेष फायदेशीर राहील. पंचमेश गुरु दशमात असल्याने मुलाबाळांची काळजी नसावी. षष्ठेश मंगळ लाभात हा योग निश्चितपणे आर्थिक लाभ दाखवत आहे. सप्तमेश शुक्र बाराव्या स्थानी व मंगळ लाभात हा योग जोडीदाराशी सलोख्याचे संबंध दाखवतो. नवमेश चंद्र दशमात व शुक्र बाराव्या स्थानी त्यामुळे काही लोकांना परदेशी जाण्याची संधी प्राप्त होईल. दशमात गुरु-चंद्र, लाभात मंगळ-राहू लग्नी तुमच्याच राशीला रवि, बुध व शनि हे सर्व ग्रह तुमच्या व्यवसायात उत्तम लाभ मिळवून देण्यास कारणीभूत ठरतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन पण मिळेल. एकंदरीत हा महिना वृश्चिक राशीला सर्वच दृष्ट्या उत्तम आहे.
धनु :धनु राशीचा स्वामी गुरु नवम स्थानी व महिन्याच्या सुरुवातीला चंद्र पण तिथेच, नवम स्थानी होणारी गुरु-चंद्र युती ही भाग्यस्थानी असल्याने काहीतरी आनंददायी घटना घडेल. तसेच प्रकृती देखील उत्तम राहील. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी, बुध देखील तिथेच व राहू दशमात आणि आधी सांगितल्याप्रमाणे गुरु नवम स्थानी हे सर्व ग्रह लांबच्या प्रवासाचे योग दाखवत आहेत. तृतीयेश शनि देखील ह्याला पुष्टी देतो. पंचमेश मंगळ दशमात त्यामुळे कलाकार, खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल व त्यांना पुढे येण्याच्या दृष्टीने देखील हा काळ उत्तम आहे. शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय करणाऱ्यांनी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. षष्ठेश शुक्र लाभात, मंगळ दशमात व शुक्र लाभात हा योग आर्थिकदृष्ट्या व नोकरी करणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे. सप्तमेश बुध बाराव्या स्थानी, राहू दशमात कार्यबाहुल्यामुळे जोडीदाराबरोबर विशेष संवाद होणार नाही. दशमातील मंगळ चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे कामातील चढउतार दाखवत आहे, काहींना कामाचा ताण राहील. व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, तरी पणशुक्र लाभात आणि मंगळ दशमात असल्याने त्याजोडीला फायदे देखील नक्कीच संभवतात. एकंदरीत धनु राशीला हा महिना अतिशय उत्तम आहे.
मकर :मकर राशीचा स्वामी शनि लाभात आणि राहू नवमात त्यामुळे धार्मिक संस्थेत काम करणाऱ्यांना हा काळ विशेष चांगला आहे.तसेच शरीर प्रकृती देखील उत्तम राहील. द्वितीयेश देखील शनिच असल्याने आर्थिक लाभ देखील बरेच आहेत. तृतीयेश गुरु अष्टमात व बुध लाभात त्यामुळे अनेक लोकांची पेन्शन, वारसा हक्काने मिळणारी संपत्ती अश्यासारख्या गोष्टी मार्गी लागतील. चतुर्थेश मंगळ नवमात व बुध लाभात ह्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. पंचमेश शुक्र दशमात व मंगळ नवमात मुलाबाळांची अभ्यासातील प्रगती उत्तम राहतील. षष्ठेश बुध लाभात असल्याने आर्थिक आवक अनेक मार्गांनी मिळेल, त्याचा फायदा ज्यांचे अनेक व्यवसाय आहेत अश्यांना नक्कीच होईल. सप्तमेश चंद्र त्याच्या भ्रमणाप्रमाणे जोडीदाराबरोबर उत्तम संवाद राहतील...महिन्याचा बराचसा काळ सामंजस्याने जाईल. दशमात शुक्र स्वराशीत असल्याने ज्यांचा व्यवसाय शुक्राशी संबंधित (सौंदर्य प्रसाधने, दागिने, गाड्या इ.) आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. इतरांना देखील कामामध्ये उत्साह आणि आनंद जाणवेल. लाभातील तीन ग्रह रवि, बुध आणि शनि, निश्चितपणे अनेक मार्गांनी लाभ मिळवून देणारे ठरतील. एकुणात हा महिना मकर राशीला अतिशय लाभदायक आहे.
कुंभ :कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात व राहू अष्टमात कन्या राशीत आणि बुध देखील दशमात ह्यामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या हातून काहीतरी उल्लेखनीय कार्य होण्याची शक्यता बरीच आहे. त्या कार्याची समाजाकडून दखल घेतली जाईल. शरीर प्रकृतीबाबत चिंतेचे कारण नसावे. द्वितीयेश गुरु सप्तमात, रवि दशमात बऱ्याच व्यावसायिकांना व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. तसेच नोकरी करणाऱ्यांना देखील आर्थिक दृष्ट्या उत्तम काळ आहे. तृतीयेश मंगळ अष्टमात व बुध दशमात हे ग्रहमान प्रत्यक्षात चांगलेच आहे व राहू-मंगळ एकत्र आणि चंद्राचे भ्रमण हल योग कदाचित थोडा अडथळा आणण्याची शक्यता आहे. चतुर्थेश शुक्र नवमात स्वराशीत त्यामुळे विद्यार्थ्यांना व उच्च शिक्षणासाठी हा काळ उत्तम आहे. पंचमेश बुध दशमात मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहे, तसेच शेअर ब्रोकिंगचाव्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील चांगला काळ आहे. षष्ठेश चंद्र त्याच्या भ्रमणाप्रमाणे किरकोळ स्वरूपाच्या शारीरिक तक्रारी देऊ शकतो. सप्तमातील ग्रहमान जोडीदाराशी सुखसंवाद दाखवते. अष्टमातील मंगळ–राहू नोकरी अगर व्यवसायात थोडाफार कामाचा ताण दाखवतात. नवमातील शुक्र व अष्टमात मंगळ धार्मिक कार्य राहत्या घरीच करावे असे सुचवतात. दशमातील रवि, मंगळ, शनि हे तीन ग्रह उत्तम स्थितीत असल्याने नोकरीतील तुमचे स्थान उंचावेल, तसेच आर्थिक लाभ देखील चांगले होतील. एकंदरीत कुंभ राशीला हा महिना सर्वदृष्ट्या उत्तम आहे.
मीन :मीन राशीला लग्न स्थानी केतू व षष्ठात गुरु महिन्याच्या मध्यापर्यंत प्रकृतीचा थोडाफार जाणवेल, विशेषत: ज्यांना दीर्घ आजार आहेत. द्वितीयेश मंगळ सप्तमात, बुध नवमात हे ग्रहमान आर्थिकदृष्ट्या तेवढेसे लाभदायक नाही.शिवाय सप्तम स्थान बाधक स्थान असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. तृतीयेश शुक्र अष्टमात व मंगळ सप्तमात ह्यामुळे प्रवासात अडचणी उपस्थित होऊ शकतात. चतुर्थेश बुध नवमात त्यामुळे उच्चशिक्षण घेणाऱ्यांना हा काळ चांगला आहे. पंचमेश चंद्र षष्ठात व शुक्र अष्टमात काही काळ मुलांकडे लक्ष देण्याचे सुचवतात. शेअरचे व्यवहार करणाऱ्यांनी व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. सप्तमातील मंगळ-राहू जोडीदाराशी मतभेद उत्पन्न करण्याची शक्यता आहे. शुक्र अष्टमात व मंगळ सप्तमात हे ग्रहमान जोडीदाराला कदाचित आर्थिक प्राप्तीचा योग असल्याचे दाखवते. पारंपारिक दृष्ट्या अष्टमेश अष्टमात हा एक चांगला योग आहे. नवम स्थानातील तीन ग्रह, रवि, मंगळ, शनि नवम स्थानाच्या दृष्टीने उत्तम स्थितीत आहेत, त्यामुळे उच्चशिक्षण घेणाऱ्यांना (पीएच.डी. करणाऱ्यांना) उत्तम काळ आहे. तसेच तुम्ही धार्मिक कार्यात जास्त वेळ घालवाल. काहींना लांबच्या प्रवासाचे देखील योग येऊ शकतात. दशमातील ग्रहमान शिक्षकी पेशासाठी अतिशय अनुकूल आहे. तसेच उत्तरार्धात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लाभेश शनि नवमात व राहू सप्तमात आर्थिक लाभापेक्षा अध्यात्मिक लाभ होण्याचा हा काळ आहे. एकंदरीत हा महिना मीन राशीला संमिश्र स्वरूपाचा आहे.
धन्यवाद
धन्यवाद
कर्क राशीच्या मागे असलेली
कर्क राशीच्या मागे असलेली प्रकृतीची संकटे संपतील तो सुदिन
गेली अनेक वर्षे "प्रकृतीची काळजी घ्या" हे वाक्य भविष्यात लिहिलेले असतेच
धन्यवाद पशुपती
धन्यवाद पशुपती
धन्यवाद.
धन्यवाद.
पशुपती नविन वर्षा च्या भविष्य
पशुपती नविन वर्षा च्या भविष्य कथना ची प्रतीक्षा
January Mahinyache
January Mahinyache Bhavishyachee vaat pahat aahot
पशुपती नविन वर्षा च्या भविष्य
पशुपती नविन वर्षा च्या भविष्य कथना ची प्रतीक्षा>>+१
पशुपती नविन वर्षा च्या भविष्य
पशुपती नविन वर्षा च्या भविष्य कथना ची प्रतीक्षा आहे. जानेवारी महिना संपायला आला आहे.