लिखित पुराव्याने सिद्ध होणाराच खरा इतिहास असे मानले तर ज्या राष्ट्रात परकीय आक्रमकांनी इतिहास नष्ट केला लिखित इतिहास ठेवायची प्रथा नव्हती ,किवा जुने दस्त ऐवज, इतर खाणाखुणा काळाच्या ओघात नष्ट झाल्या त्या संस्कृतीना इतिहासच नव्हता असे मानायचे का ? जिर्ण पिवळ्या कागद पत्रांनी सिद्ध होणारा फक्त इतिहास आणि लोककथा , वदंता, आख्यायिका या द्वारे प्रकट होणारा इतिहास हा इतिहास नाही असे का . आशिया खंड कायम युध्यमान राहिला , सत्तेत स्थित्यनतरे झाली आणि ज्याला इतिहासाची साधने असे रूढ अर्थाने म्हणता येईल ती नष्ट झाली . युरोप त्या मानाने स्थिर राहिला नंतर युरोपिअन जेथे जेथे गेले तेथे जेते म्हणुन म्हणून गेले अन्य आक्रमक जेथे जेथे गेले तेथे त्यांनी इतिहासाची साधने नष्ट केली . पण मोखिक कथा आणि अख्यायीकांच्या रुपात इतिहास राहिला त्यामुळे या देशांना खरा इतिहास नाही असे म्हणणे सयुक्तिक वाटते का ?
कॅस्पियन (कश्यप) समुद्रास खेटून व तुर्कस्तान, इराण आणि रशियांच्या सिमेस लागुन असलेल्या अझेरबैजन नामक देशातल्या एका अग्नी मंदिरात असलेला एक संस्कृत देवनागरी शिलालेख, या शिलालेखाची सुरुवात 'श्री गणेशाय नम:' ने सुरु होते..असे अनेक शिलालेख या परिसरात असल्याने हिंदू धर्माची व्याप्ती एकेकाळी किती होती हे लक्षात येते.
संदर्भ- इतिहासाच्या पाउलखुणा
अमोल बनकर यांनी पुराव्याने हे
अमोल बनकर यांनी पुराव्याने हे त्याच गृपवर खोडून काढले आहे तेंव्हा इथे तिथले संदर्भ देउन नव्याने धागा कशाला.
(No subject)
माफ करा भिडे पण तुमचे लेख
माफ करा भिडे पण तुमचे लेख नेहमी कोणाच्या सौजन्याने, अमुक वरुन साभार असेच का असतात?
सेनापती, इथे धागा आलाच आहे तर
सेनापती, इथे धागा आलाच आहे तर इथे सत्य काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
धागाकर्ता लिहेलच कि. नाही
धागाकर्ता लिहेलच कि. नाही लिहिले तर मी लिंक देईन तुम्हआ विपु मध्ये.
अहो सेनापती ते काय देणार
अहो सेनापती ते काय देणार नाहीत. तुम्हीच द्या.
फेबु वर सर्च करा "इतिहासाच्या
फेबु वर सर्च करा "इतिहासाच्या पाउलखुणा".
सापडेल तिथे, नाही तर धागाकर्ते टाकतील लिंक इथे "विथ साभार"
१८ किंवा १९ व्या शतकातला आहे
१८ किंवा १९ व्या शतकातला आहे ना तो शीलालेख?