तूपात केसीन असते का? लेन्टिल्स म्हणजे नक्की कोणत्या डाळी?

Submitted by Mother Warrior on 3 November, 2015 - 22:38

मला मुलाचा जीएफ सीएफ आहार ठरवताना हा प्रश्न पडला आहे. मुलगा मेतकुट तूप भात खातो व मेतकुट ग्लुटेन फ्री आहे. तूप हे डेअरीपासूनच बनते तेव्हा त्यात केसीन असणार असे वाटत आहे. पण असेही वाटत आहे की तूपाची बेरी जी काढतो तेच केसीन असावे का? तसे जरी असले असे गृहित धरले तरी काही अंश तूपात येत असणार का? इंटरनेटवर उलटसुलट मते कळत आहेत. कोणी मला हे शोधून देईल का? तूप अगदी बंद करणे फार जीवावर येत आहे. तूपामुळे त्याला कॉन्स्टिपेशन होत नाही असे वाटते आहे.

हीच बाब डाळींची. मेतकुटातील डाळी म्हणजे लेन्टिल्स असतात का? इंटरनेटवर लेन्टिन्स म्हट्ल्यावर मसूराचे चित्र आले. मुलाला लेन्टिल्स अव्हॉईड करायचे आहेत( फुड सेन्सेटिव्हिटी टेस्टनुसार) पण आपल्या आहारात कितीतरी डाळी असतात. त्या सर्व लेन्टिल्सच का? थँक्स इन अ‍ॅडव्हान्स.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मवा, आपण भारतीय पद्धतीने तूप करतो त्यात केसिन अज्जिबातच नसते.
लोणी म्हणजे बटर यात इनसिग्निफिकंट असला तरी थोडा तरी केसिन आणि लॅक्टोजचा अंश असतो पण तुम्ही म्हणता तसंच तूप म्हणजे क्लॅरिफाईड बटर करताना जी बेरी असते त्यात कार्ब्ज आणि प्रोटिन्स जळून जाऊन फक्तं फॅट तूपाच्या रूपात वर उरतात.

लेन्टिल्स म्हणजे मसूर म्हणू शकता.
अखंड स्वरूपात असताना मसूराच्या आकाराची म्हणजे गोल चपटी बी असते. रंग काळा, डार्क हिरवा किंवा चॉकलेटी.
आतही चपटी डाळ- पिवळ्या ते लाल कोणत्याही रंगाची. प्रत्येक गावात मी वेगवेगळ्या रंगाची अख्खी मसूर पाहिली आहे.

मात्रं मूग, चणा, तूरडाळ हे लेन्टील्स नव्हेत.
पल्सेस किंवा लेग्यूम म्हणू शकता त्यांना.

माझ्या अल्प माहितीनुसार - केसीन हे दुधात असणारे प्रथिन (प्रोटिन). तूप करेपर्यंत जर त्या प्रथिनावर वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्या - फर्मेंटेशन, तूप करताना कढवले जाणे - तर ते प्रथिन मूळ स्वरुपात राहणार नाही - सबब जरी ते केसीन राहिले तरी ते वेगळ्या स्वरुपात असणार - त्याने काही हानी (अ‍ॅलर्जी टाईप) होण्याची शक्यता नगण्य वाटते.
ज्या अगदी लहान मुलांना दूध पचत नाही त्यांना फाटलेल्या दूधाचे पाणी देतात तसेच हे होईल.

अजून कोणी जाणकार (बायोकेमिस्ट) यावर प्रकाश टाकू शकतील. मी माझ्या काही मित्रांना विचारुन पहातो.

धन्यवाद.

माझ्यामते ईंग्रजीमधे पल्सेस म्हणजे डाळी. लेन्टिल्स ही एक डाळ (मसुर हे एक लेन्टिलच आहे). गहू हे ग्रेन आहे. तशी सगळीच धान्ये ग्रेन्स मधे मोडतात. पण गहू हे लेन्टिल वा पल्सेस नाही.

मी वाचलेली एक लिंकः
https://en.wikipedia.org/wiki/Pulse_(legume)
http://www.pulsecanada.com/about-us/what-is-a-pulse
http://indiaphile.info/guide-indian-lentils/

म वॉ,

तुम्ही काही स्पेसिफिक घटक नसलेल्या डाळी वा इतर अन्नपदार्थ शोधत असाल तर इथे जरुर शोधा

http://ndb.nal.usda.gov//

पिजन पी या नावाने तूर डाळीचे, बेंगाल ग्रॅम या नावाने गारबांझो बीन्स चे पूर्ण अनॅलिसिस आहे. दूध, दही , बटर, भाज्या, फळे सर्वांचे अनॅलिसिस शोधू शकता

http://www.pea-lentil.com/core/files/pealentil/uploads/files/Chapter2.pdf इथे वेगवेगळ्या कडधान्यांची नावे व इतर माहिती आहे .

रक्तगट A+ve असणाय्रांना दुध आणि कडधान्ये पचवता येत नाहीत.तुपात फक्त फॅट्स आणि पनीर पूर्ण विघटीत केसीन.चीज हे आणखी एक वेगळे विघटीत केसीन.ग्लुटेन पचण्यासाठी ओवा अथवा 'डिल' बाळंतशोप/शोप/शेपुचं बी.

<<रक्तगट A+ve असणाय्रांना दुध आणि कडधान्ये पचवता येत नाहीत.>> Uhoh
काहीही काय? माझा तोच रक्तगट आहे आणि मला आणि माझ्या माहितितल्या इतर याच रक्तगटाच्या लोकांना कधीही कसलाही त्रास झालेला नाही.

प्लीज अशी अशास्त्रीय विधाने सार्वजनिक रित्या करू नका, नाहीतर त्याचा शास्त्रीय संदर्भ द्या.

रक्तगट A+ve असणाय्रांना दुध आणि कडधान्ये पचवता येत नाहीत>> माझा पण आहे. कधीच त्रास झालेला नाही. ऐतेन.

रक्तगट A+ve असणाय्रांना दुध आणि कडधान्ये पचवता येत नाहीत>> माझा पण आहे. कधीच त्रास झालेला नाही. ऐतेन.>>>>>> +१

यावर एकाने डेटा गोळा करून निष्कर्ष काढलेला.त्याचा लेखही आला हेता मागे टाइम्समध्ये.हे वाक्य लिहायला हवे होते.आता अ,ब, अथवा क यांना त्रास होत नसेल तर ते विधान लगेच खोटे पडते का माहित नाही परंतू त्या संशोधनकर्त्याने प्रोटिन्स पचवणे आणि रक्तगट यावर डेटा गोळा करून विधान केले होते.मी काही ते पेपर्स शोधले नव्हते."चॅाकलेट्सने दात किडतात का" यावरही उलट सुलट विधाने येतात तसेही असेल.त्यामुळे मी माझ्या विधानावर ठाम राहण्यातही काही कारण नाही. सर्वांचे आभार.थोडे अवांतर झाले.

>>dill म्हणजे शेपू. बाळंतशोपा शी काही संबंध नसावा.>>
dill seeds म्हणजे बाळंतशोपा.

srd,
तुम्ही ब्लड ग्रूप डाएट बद्दल बोलत आहात का?
जालावर शोधले असता http://www.biotype.net/diets/Lectin.pdf मिळाले. साती , दिमा वगैरे डॉक्टर मंडळींचे काय मत आहे?