२ वाटी ताजी पुदीना पाने
१ वाटी चना / हरबरा डाळ
१ वाटी मूग डाळ
१ वाटी उडीद डाळ
पाव वाटी तीळ
२ चमचे धने
२ चमचे जिरे
१० सुक्या लाल मिरच्या
चिंचेचा लिंबाएवढा गोळा
गुळ आवडीनुसार
२ चमचे वा आवश्यकतेनुसार तेल
मीठ चवीनुसार
एका कढईत सर्व डाळी व तीळ वेगवेगळे भाजून घ्यावे. डाळी लालसर भाजाव्यात व थंड होऊ द्यावे.
त्याच कढईत चमचाभर तेल टाकून पुदीना कुरकुरीत भाजावा. पुदीना काढून थंड होऊ द्यावा.
त्याच कढईत अजुन थोडे तेल टाकून धने, जिरे लाल सुक्या मिरच्या व चिंच भाजुन घ्यावी. सर्व जिन्नस वेगवेगळे भाजावे व थंड होऊ द्यावे.
मिक्सरच्या पॉटमधे आधी डाळी व तीळ एकत्र बारीक वाटुन घ्यावे, याच डाळींमधे पुदीना धने, जिरे, मिरच्या, चिंच, गुळ आणि मीठ टाकुन पुन्हा सगळे जिन्नस एकजीव बारीक करावे. मिश्र डाळ पुदीना चटणी तयार.
थंड करुन चटणी काचेच्या बरणीत भरून ठेवावी.
डाळी लालसर कराव्यात करपु देऊ नये.
चटणी सुकी आहे पाणी वापरू नये.
चिंच गुळाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे.
मऊ भात, डोसा याच्यासोबत छान लागते.
छान आहे कृती. ( जनरली
छान आहे कृती. ( जनरली कश्यासोबत खातात ? )
मऊ भात डोसा यासोबत खातात
मऊ भात डोसा यासोबत खातात
मस्त.. पण किती वेळ टिकते?
मस्त..
पण किती वेळ टिकते? (फ्रीजमध्ये / बाहेर ठेऊन)
दोन तीन महिने सहज टिकते,
दोन तीन महिने सहज टिकते, बाहेर किंवा फ्रिज मधे आपल्या सोयीनुसार