सारणासाठी :
कोबी, गाजर, पातीचा कांदा, मशरूम्स, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण
सोया सॉस, सिसमी ऑईल
मीठ, मीरपूड
आयत्यावेळी करायचे ठरल्यावर मशरूम्स चटकन उपलब्ध न झाल्याने मी यात वापरले नाहीयेत. पण मशरूम्समुळे खूप छान चव येते.
सारणासाठी प्रमाण असं काही नाही. उपलब्धतेनुसार, आवडीनुसार भाज्या कमीजास्त झाल्यातरी काही फरक पडत नाही. वरचा फोटो पाककृतीच्या प्रमाणासाठी नसून मी ते साहित्य काय प्रमाणात घेतलं आहे त्याकरता आहे.
पारीसाठी :
नेहमीचीच कणिक नेहमीसारखीच मळून किंवा मैदा मळून घेऊन किंवा राईस पेपर
चटणीसाठी :
थोडं पांढरं व्हिनेगर + पाणी एकत्र करून त्यात लाल मिरच्या भिजत ठेवा. हौस असेल तर मिरच्यांच्या बिया काढून टाका. थोड्या लसूण पाकळ्या, सिसमी ऑईल आणि मीठ
कोबी भाजीकरता चिरता तसा चिरून घ्या. बारीक कातरकाम करण्याची गरज नाही. ओबडधोबडही चालेल.
गाजर मोठ्या भोकाच्या किसणीतून किसून घ्या.
पातीचा कांदा (पात व कांद्यासकट) कापून घ्या.
मशरूम्स चिरून घ्या.
आलं किसून आणि लसूण बारीक कापून घ्या.
या सर्व भाज्या एका मोठ्या कढईत / वोकमध्ये थोडं नेहमीच्या वापरातील तेल टाकून थोड्या परतून घ्या. आता त्यावर झाकण ठेऊन एक वाफ आणा आणि मग उघड्यावर पाणी आटेपर्यंत परतत रहा. यातच मग आलं, लसूण, मीरपूड, सोयासॉस आणि सिसमी ऑईल घाला.
भाज्या शिजवताना सुरवातीलाच मीठ घाला. मीठ घातल्यानं मशरूम्स आणि कांद्याला पाणी सुटेल ते सुकवायला हवंय. त्यामुळे मीठ सुरवातीलाच घाला. पण मीठ घालताना या भाज्या शिजून कमी होतील हे ध्यानात ठेवा, नाहीतर खारट होईल. वाटल्यास सुरवातीला जरा कमीच मीठ घाला.
भाज्या अति शिजवायच्या नाहीत. जरा शिजल्या की बस्स!
कणिक मळून घ्या आणि अगदी छोटे गोळे करून लहान लहान चपात्या लाटून घ्या. साधारण पुर्यांएवढ्या. हौस असेल तर आणखीही लहान लाटू शकता. बाईट साईज मोमोज होतील.
तर या चपात्यांवर थोडं थोडं सारण ठेऊन त्यांचे मोमो बनवून घ्या.
मोमोचा टिपिकल आकार येण्यासाठी सारण भरल्यावर अर्ध्या चपातीच्या कडांना चुणा घालायच्या आणि उरलेला अर्धा मोकळा भाग तिथे आणून त्यांना चिकटवून घ्यायचं. खालच्या फोटोत दाखवलंय तसं. खूप काही नामांकित नाहीये पण कल्पना येईल.
आपल्याला हवा तो आकार द्या. मोदक, करंजी काहीही चालेल. राईस पेपर असेल तर स्प्रिंगरोल सारखे रोल्स करून उकडता येतील. ते ही एक करून दाखवलं आहे.
मग हे मोमोज ताटल्यांना थोडं तेल लावून मग त्यावर ठेऊन इडलीपात्र, मोदक पात्र किंवा कुकर (शिटी न लावता) मधून उकडा. कणकेचे केल्यास निदान २० मिनिटं उकडावे लागतात.
चटणीचं सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून काढा. चटपटीत चटणी आणि चविष्ट मोमो तयार.
१. सारण जरा ब्लँडच असलेलं छान लागतं. त्यामुळे मीठ, मिरच्या, आलं आणि लसूण हात राखूनच घाला.
२. कणिक वापरली तर २० मिनिटे, मैदा आणि राईसपेपर १० मिनिटात उकडून होईल.
३. गरमागरम मस्तच लागतं पण पुन्हा गरम करायची वेळ आली तर मायक्रोवेव मध्ये एक पाण्याचा ग्लास ठेऊन त्यासोबत एका प्लेटमध्ये घालून गरम करावेत. किंवा एका काचेच्या भांड्यात झाकण ठेऊन १ मिनिटाकरता गरम करावेत.
४. कणकेचे मोमोज उकडून झाल्यावर अर्ध्या मिनिटाकरता तसेच राहू द्यावेत आणि मग काढावेत. सहज निघतात. खूप गरम असताना काढले तर चिकटतात.
५. हा एक अत्यंत व्हर्सटाईल प्रकार आहे. यातच चिकन, खिमा, पनीर वगैरे घालून मांसाहारी मोमो बनतील. इतरही काही पूरक भाज्या घातल्या तरी चालतील.
मोमो करायला एवढे सोपे असतील
मोमो करायला एवढे सोपे असतील असं वाटलं ही नव्हतं. मामी, आता नक्की करणार.
मस्त रेसिपी आणि सोपीही !
मस्त रेसिपी आणि सोपीही !
सुलभा ब्रम्हनाळकरांच्या एका
सुलभा ब्रम्हनाळकरांच्या एका लेह लदाखवरील लेखात वाचल्यापासुनच मी मोमोजच्या प्रेमात पडलेले .आतातर तुम्ही सर्व डीटेल्ससकट पाकृ .दिलीत खूप धन्यवाद !
सोपी रेसिपी. नात्यातल्या
सोपी रेसिपी. नात्यातल्या कॉलेज पब्लिकसाठी करायला हरकत नाही. घरगुती असल्याने चांगले.
लोकं मोमो मोमो करत हा पदार्थ हाणत असतात. मोमोची दुकानंही/स्टॉल्सही दिसतात. तिथे गर्दीही असते. म्हणून मी एका गटगला मोमो फार उत्सुकतेने खाल्ला होता. अगदीच नाही आवडला. आजारी माणसाला मिळमिळीत सॅलड खाल्लं जावं म्हणून तयार झालेला पदार्थ वाटला. त्या चटणीला लावून जरा तरी चव येते. मामी म्हणते तसं जरा बदल करुन तिखट करता आले तर बरे लागतील.
जमल रे जमलं.. मला हवीच होती
जमल रे जमलं..
मला हवीच होती मोमोची पाकृ..थँक्यु मामी मोमो बद्दल
तोंपासु!
तोंपासु!
मी केलेले मोमोज
मी केलेले मोमोज
अय्यो मुग्धा केदार, मस्त
अय्यो मुग्धा केदार, मस्त दिसतायत ही मोमो बोचकी!
मैदा सैल झाला त्यामुळे बोचकी
मैदा सैल झाला त्यामुळे बोचकी
बोचकी... ... मस्तच दिसताहेत
बोचकी... ...
मस्तच दिसताहेत
मस्तच.
मस्तच.
मामी चा मो मो आणि मुग्धा
मामी चा मो मो
आणि
मुग्धा केदार यान्चा
बोच-किमो खूप छान
तोपासू
लवकर च करून बघण्यात येइल.
लवकर च करून बघण्यात येइल.
अरे व्वा! पाककृती, फोटो आणि
अरे व्वा! पाककृती, फोटो आणि झब्बू सर्वच एकदम अफलातून!!!
तांदळाच्या उकडीचे करू शकतो
तांदळाच्या उकडीचे करू शकतो का? म्हणजे मोदक करायचे आणि थोड्या उकडीचे मोमोज करायचे (अर्थात व्हेज मोमोज)
मस्त आले आहेत फोटो!
मस्त आले आहेत फोटो!
मस्त चटपटीत. आवडले, खाल्ले
मस्त चटपटीत. आवडले, खाल्ले नाहीत कधी, आता करुन बघता येईल. मामी, सोप्या कृतीबद्दल धन्यवाद.
अरे व्वा! क्या याद दिलाई
अरे व्वा! क्या याद दिलाई मामी... नॉर्थ ईस्ट ला चविष्ट मोमो खाल्यावर इथे फूड कोर्ट मधे एकदा ट्राय केले ते एवेढे टेस्ट्लेस होते की परत इथे खायची इच्छा झालीच नाही. आता घरी करून नक्की बघेन, व्हेज पेक्षा नॉन्वेज जास्त आवडतात.
मधे एकदा व्हॉट्सअॅप वर मोमो चे वेगेवेगेळे शेप्स बनवण्यासाठी एक छान विडीओ बघण्यात आला होता.
मस्त दिसत आहेत मोमोज नक्की
मस्त दिसत आहेत मोमोज नक्की करुन बघेन
सिक्किम मधे (ड्यूटी च्या
सिक्किम मधे (ड्यूटी च्या ठिकाणी) किंवा हिमाचल मधे (भटकंती च्या ठिकाणी) कुठेच मी शिजवलेल्या सारणाचे मोमो खाल्ले नाहीत सगळीकडे भाज्या कच्च्या होत्या गाजर अगदी बारीक चिरलेले कांदे कोबी ही तसेच, इकडे घरगुती हॉटेल चालवणाऱ्या स्त्रिया एक गंमत करतात भाज्या चिरायला कंटाळल्या की एका परातीत अर्ध्या चिरलेल्या मोमो सारण भाज्या घालतात अन एक उभी कडा नसलेली वाटी उलटी करुन त्यावर ठोकत बसतात, सोबत पहाड़ी गाणी असतात संगतीला , अश्याकारणे भाज्या एकदम बारीकssss होतात शिवाय मोमो मधे आलं लसुण नाही इकडे पाहण्यात आले चटणी मधे मात्र आलं लसुण सोया सॉस अन ख़ास नेपाळी सिक्कीमीज टच साठी चार पाच मेथीदाणे घालतात !
अर्थात तुमची रेसिपी भारीच आहे , मी बोललो ती रेसिपी ऑथेंटिक आहे असा काही दावा नाही माझा फ़क्त जरा वेगळे काही निरिक्षण केले ते नोंदवले इतकेच
मशरुम होते त्यामुळे ते घालुन
मशरुम होते त्यामुळे ते घालुन सारण केले, सारण चटपटितच केले होते पण समहाउ मला फार आवडले नाही, पण घरच्या ज्यु.नाखटाना लई आवडले... त्यामुळे सक्सेस म्हणावे लागेल.
वाह मामे मस्त रेसिपी
वाह मामे मस्त रेसिपी
मस्तच !
मस्तच !
Pages