अशी ही अदलाबदली - पाककृती क्र.१ - गाजर आणि चणाडाळ वडी

Submitted by भरत. on 26 September, 2015 - 08:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१) ३ कप ताजे पनीर (मूळ गाजराचा कीस)
२) १ कप टमाटो प्युरे (मूळ चणाडाळ)

३) अर्धा कप ओले खोबरे
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर
६) वेलची + केशर

क्रमवार पाककृती: 

मोदक

१) मिक्सर जारमध्ये टमाटो प्युरे, पनीर, खोबरे, साखर आणि अगदी गरजेपुरते पाणी घेऊन गुळगुळीत वाटून घ्यावे.
२) एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून त्यावर हे मिश्रण घालून शिजवावे. मधून मधून ढवळत राहावे. तूप सुटायला लागताच मिश्रण विस्तवावरून उतरावे. वेलचीपूड आणि केशर चुरून टाकावे. (मी तव्यावर लंगडी ठेवून त्यात हे मिश्रण शिजवल्याने सतत ढवळावे लागले नाही.)
३) मिश्रण हाताळता येईल इतके गार होताच साच्यात घालून मोदक करावेत.

1.JPG

वाढणी/प्रमाण: 
२० मोदक झाले
अधिक टिपा: 

१) पूर्वतयारी : ३ लहान टमाटो उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे शिजवून, गार करून, साले काढून त्यांची प्युरे केली.
२) पूर्वतयारी : एक लिटर दुधाचे पनीर करून घेतले.
३) साहित्य half measuring cup = १ कप या प्रमाणे घेतले आहे. (१/२ कप प्युरे, दीड कप पनीर, इ.)
४) चव थेट खव्याची येते.

माहितीचा स्रोत: 
संयोजक, मायबोली गणेशोत्सव २०१५
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबटपणाचा लवलेशही नाही. मस्त पिकलेले टमाटो होते. तसंच पनीर टमाटो पुरेच्या तिप्पट, त्यात ओले खोबरे आणि साखर यांची भर. त्यामुळे टमाटोची चव अजिबात आली नाही. रंग का आला नाही याची कल्पना नाही. अगदी खव्याचे वाटतात.

पहिला प्रयोग पनीरच्या तिप्पट प्युरे घेऊन केला. त्या मिश्रणालाही आटवून आटवून खव्याची चव आलेली. पण त्याची वडीही थापली जात नव्हती. दोनतीन दिवस फ्रीजरच्या खालच्या कप्प्यात पडून राहिल्यावर त्याचे बॉल्स वळता आले.
3.jpg5.JPG

ओके!

Group chukalay pan.
Ganeshotsav २०१५ madhe taka

अहो मयेकर एका शब्दात सांगा ना
चविला कसे लागतात? खव्याच्या मोदका सारखे गोड चवदार की साखर पनिर+टमाटो मिश्रणाची वेगळी चव?

प्रयोग आवडला.रंग रूप चांगलंच जमवलं आहे.पनीरची चव मात्र खव्यासारखी लागेल याबद्दल जरा साशंक .बंगाली सोंदेश पनीरचेच असतात ,खव्याचे नाहीत हे कळतं. बाकी मोदक अफलातून आहेत.