'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी--: बदलः उपवास स्पेशल

Submitted by जम्बो on 26 September, 2015 - 06:04

उपवास स्पेशल-सोप्या म्ह्णता येतील
आधी बायकोने सहज म्हणून केल्या

मग स्पर्धेसाठी पण करू असे ठरवले आणि काल चक्क स्वत: केल्या
फ़ोटो काढले
गाजर आणि चणाडाळ बदलले इतर मूळ रेसीपी आहे तसेच सगळे केले

१) ३ कप गाजराचा कीस बदलून रताळी-- रताळ्याचा कीस
२) १ कप चणाडाळ बदलून वरी व-याचे तान्दूळ घेतले
३) अर्धा कप ओले खोबरे,
४) २ टेबलस्पून तूप- थोडे कमी जास्त
५) २ कप साखर (चवीप्रमाणे कमी-जास्त)
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर

कृती -

प्रेशर कूकरमध्ये थोडे तूप तापवून त्यात रतळ्याचा कीस परतून घेतला

कीस बाहेर काढून त्याच कूकरमध्ये आणखी थोडे तूप घालून वरी आणी नारळ मंद आचेवर परतून घेतला

vadi-91-1.jpgvadi-92-2.jpg

कीस वरी व नारळ एकत्र परतून घेतला

मग त्यात चर कप पाणी घालून ५ मिनिटे शिजवा. वरी शिजायला लागेल तसा वेळ

त्यात साखर मिसळा व सतत हलवत राहा. मिश्रणाचा गोळा जमू लागेल. तसा जमला की गॉस बंद करा.
त्यात वेलची / जायफळ / केशर मिसळा.

तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओता व सपाट करून घ्या,वड्या कापा

vadi-93-3.jpg

२०-२५ वड्या झाल्या
vadi-4.jpg

पहिलाच प्रयत्न आहे साम्भाळून घ्या

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूताई केअश्विनी धन्यवाद
मायबोलीच्या नावाखाली बायकोने माझ्याकडून वड्या करून घेतल्या असा मला संशय येत आहे

काय त्या चार तर स्टेपस " असे तिचे म्हणणे

अर्थात हे सगळ करण्यात आनंद होताच.
संयोजकान्ना धन्यवाद