असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
प्रचंड पर्वत हिममुकुट
प्रचंड पर्वत हिममुकुट शीर
रोधे मेघा, दे शीतल जल नित
धुमकीट धुमकीट ततांग धुमकीट
बोले अनील, पाषाण, हरित तृण..
नीलरंगी नभ उतरले शुभ्र
नीलरंगी नभ उतरले
शुभ्र हिमकडयावर,
ही अनुभूती करते नि:शब्द,
जोडते फक्त मी कर.
मस्त दोन्ही चारोळ्या! लाईक!!!
मस्त दोन्ही चारोळ्या! लाईक!!!
Thanx अंजली.
Thanx अंजली.
धन्स अंजली
धन्स अंजली
हिममंडीत हे शिखर मनोहर भास
हिममंडीत हे शिखर मनोहर
भास जसा तो सांब सदाशिव
विराजमान तो हरित आसनी
पाषाणपुष्पे अर्पण चरणी !
हिमशिखरांतून उतरता उन्हे झाली
हिमशिखरांतून उतरता
उन्हे झाली सोन्याची
आसमंतभर दाटलेली
गाज शांततेची.
इथे भव्य उत्तुंग नांदे
इथे भव्य उत्तुंग नांदे हिमाद्री, धरित्रीस गंगा इथे पालवे
नभोमंडपी गुंजती कोंदलेले अनाहत स्वयंभू सुरांचे थवे
मतीला न माझ्या कळे धर्म, नीती, मला ज्ञात ना ईश दिसतो कसा
उमटला असावा परी येथ केव्हातरी पावलाचा तयाच्या ठसा
स्वाती, तुस्सी कम्माल
स्वाती, तुस्सी कम्माल हो!
सगळ्यांच्याच चारोळ्या मस्त
स्वाती, दंडवत घ्या. सगळ्या
स्वाती, दंडवत घ्या. सगळ्या चारोळ्यां- तीटिकांसाठी.
धन्यवाद, स्वरूप. भरत,
धन्यवाद, स्वरूप.
भरत, बास्का!
स्वाती, निव्वळ अप्रतिम!!
स्वाती, निव्वळ अप्रतिम!!
मृण
मृण
क्या बात है, स्वाती!
क्या बात है, स्वाती!
स्वाती..क्या बात है!!
स्वाती..क्या बात है!! सुपरलाईक चारोळी! मनापासून आवडली!
भरतजी मस्त चारोळी!
सगळ्या चारोळ्यां लई भारी!
सगळ्या चारोळ्यां लई भारी!