लागणारे जिन्नस:
मूळ कृती इतकेच सर्व जिन्नसांचे प्रमाण:
ही मूळ कृतीची लिंक .
http://www.maayboli.com/node/55511
बदललेले घटकः
३ कप गाजराचा किस= ३ कप मोदकाचे पीठ
१ कप चणाडाळ = १ कप आंब्याचा रस
प्रथम आंब्याचा रस गॅसवर आटवत ठेवावा. तो आटला की त्यात खोबरं आणि साखर घालुन मोदकांना करतो तसे सारण करुन घ्यावे.
तीन कप पाण्यात दोन चमचे तूप घालुन ते उकळले की त्यात मोदक पीठ घालुन ढवळावे आणि चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. आणि उकड काढावी. थोडी थंड झाली की चांगली मळून घ्यावी.
एक छोटा गोळा घेऊन चित्रात दाखवल्यप्रमाणे त्याच्या वाट्या कराव्यात आणि मोदकपात्रात त्या दहा पंधरा मिनीटे वाफवाव्यात.
त्या गार झाल्यावर त्यात पुरण भरावे. कॅनपीज खाण्यासाठी तयार आहेत.
१)From mayboli
२)
From mayboli
१) ह्या वर्षी पाकृ स्पर्धेला कमी आहे प्रतिसाद. मला ही फार काही सुचत नव्हत पण एक तरी प्रवेशिका वाढेल म्हणून केली ही डिश. तेवढाच गणेशोत्सवात माझा सहभाग.
२) आंबा, नारळ आणि तांदुळ हे तिन्ही एकमेकाना पूरक असल्याने चव छानच लागत होती. ह्यात आंब्या ऐवजी अननस किंवा सफरचंद ही छान लागेल असं वाटतयं
३) मोदक बंद करताना थोडं तरी नाक रहातच जिथे पुरण भरता येत नाही. तसं ह्यात झालं नाही. शिगोशिग भरता आलं पुरण.
३) वाटीला मुरड घालणे जमले नाही तर फोर्क च्या सहायाने डिझाईन करु शकता.
४) ज्यांना मोदकाच्या कळ्या काढणे जमत नाही त्यांच्या साठी छान आहे हे.
५) दुसर्या फोटोत मध्ये जे अर्धे दिसतायत ते कचोरी सारखे केले आणि वाफवल्यानंतर सुरीने मधोमध कापून दोन भाग केले.
६) थोड्या उकडीमध्ये हळद, तिखट, मीठ घातले आणि वाफवल्यानंतर त्यात नारळ, मिरची, मीठ कोथींबीर असे सारण भरुन नमकीन कॅनपीज तयार केल्या.
७) अगदी थोडी उकड उरली होती त्याचेच सजावटीसाठी दिवे केले. ( स्मित)
८) हा पदार्थ स्पर्धेच्या नियमांत बसेल अशी आशा करते.
मस्त दिसतायत कॅनपीज मुरड
मस्त दिसतायत कॅनपीज
मुरड घातलीये का?
सुंदर.. वाट्यांची मुरड सुरेखच
सुंदर.. वाट्यांची मुरड सुरेखच , अगदी साच्यातून काढल्यासारखी.
वा मस्त दिसतायत! अशा कॅनपीज
वा मस्त दिसतायत! अशा कॅनपीज वाफवताना न फुटता शेप मधे राहिल्या बर्या तुमच्या !! सही !
धन्यवाद सर्वांना. हो,
धन्यवाद सर्वांना. हो, आशिका, सजावट म्हणून मुरड घातलीय. नेट प्रॉबलेम मुळे एकदा लिहीलेलं वाया गेलं त्यामुळे आता टप्प्याटप्प्यात लिहीलय.
अगदी १ नंबर डिश आहे ही. मला
अगदी १ नंबर डिश आहे ही. मला तर आत्ता त्या कॅनॅपीज उचलुन तोंडात टाकाव्याशा वाटताहेत.
छान दिसताहेत. बदललेले जिन्नस
छान दिसताहेत. बदललेले जिन्नस वाचताना तीन कप पिठाची उकड उरणार नाही का असा प्रश्न पडलेला. तसं झालेलं दिसत नाही.
मस्त दिसतायत!
मस्त दिसतायत!
बदली घटक एकदम जबरदस्त
बदली घटक एकदम जबरदस्त निवडलेत. तयार पाकृचा फोटो एकदम मस्त आला आहे. तोंपासु!! कॅनपीची कल्पना सॉलिड आहे. त्यांना घातलेली मुरड मस्त दिसतेय अगदी.
पण ही पाकृ स्पर्धेसाठी प्रवेशिका आहे म्हणून हे प्रश्न पडलेत (एरवी अज्जिबात पडले नसते)
१. एक कप आमरस + अर्धा कप खोबरे + चवीसाठी साखर = ह्या प्रमाणात पुरण गडबडणार
२. तीन कप तांपिला अर्धा कप खोबर्याचं पुरण कमी पडणार.
मुरड सुरेख घातलीय. त्यामुळे
मुरड सुरेख घातलीय. त्यामुळे अजुन शोभा वाढलीय त्या कॅनपीजची.
फारच मस्त . चवहि अप्रतिम
फारच मस्त . चवहि अप्रतिम असेल .
मस्तच कल्पना आहे
मस्तच कल्पना आहे
सुंदर आहेत कॅनपीज. मी एके
सुंदर आहेत कॅनपीज.
मी एके वर्षी मोदक अपने बस की बात नही हे जाणून असेच ओपन मोदक केले होते त्याची आठवण झाली.
फोटो पण भारी आलेत. खरच उचलून पटकन तोंडात टाकावीशी दिसतेय कॅनपी.
एकदम सुरेख!
एकदम सुरेख!
सॉलिड आहेस तू हेमाताई ! काय
सॉलिड आहेस तू हेमाताई ! काय काय येत तुला . मस्त दिसतायेत् कॅनपीज
मस्तच ...
मस्तच ...
खरच उचलून पटकन तोंडात
खरच उचलून पटकन तोंडात टाकावीशी दिसतेय कॅनपी.>>>>>> + १००००००००००००००००००००
खरच भारी आहेत
सुंदर दिसतंय
सुंदर दिसतंय
छान दिसतंय. कल्पना एकदम
छान दिसतंय. कल्पना एकदम अभिनव. नक्की करून बघेन.
मस्त दिसताहेत. उकड उरली तर
मस्त दिसताहेत. उकड उरली तर दिव्यांची कल्पना आहेच की बाजुला
धन्यवाद सर्वाना. जाई, अग
धन्यवाद सर्वाना.
जाई, अग विशेष नाही काही. प्रयत्न करते एवढच. आणि वेळ चांगला जातो यात. तु आमच्या एवढी झालीस की तु पण होशील या पेक्षा ही एक्स्पर्ट.
शुम्पी, मी पण अगदी ओपन मोदक हेच नाव योजल होत पण आयत्या वेळेस बदललं
मंजूडी, धन्यवाद.प्रतिसादाबद्दल.
अग, मी घेतलेला रस आमच्या घरचा होता त्यामुळे तो चांगलाच घट्ट आणि रंगाने केशरी होता. डब्यातल्या रसासारखा पात्तळ नव्हता.
नारळ थोडा पंख्याखाली सुकवला होता आणि तसं ही साखरेच पुरण चांगल खुटखुटीत आणि कोरड होत.
ते जे कचोरी सारख केलय त्यात जास्त पुरण नाही भरु शकले.
सर्वच पांढर्या आणि एकरंगी नकोत या विचाराने नमकीन कॅनपीज मी नंतर करायच ठरवल त्यामुळे त्यात एक दीड चमचा नारळ जास्त वापरला गेलाय. तसचं त्यात कोथींबीर, मिरची वैगेरे पण घातलीय.
दिव्यात काहीच नाहीये.
ह्या सगळ्या मुळे माप चुकलं नाही.
तसं ही या वर्षीची थीम पहाता थोड तारतम्यांनी घेण गरजेच आहे . मोदकाच्या उकडीच्या कॅनपी करणे हीच खर तर अभिनव कल्पना आहे आणि तीच अधोरेखित व्हायला हवी. नव्या मुलींना याचा खूप उपयोग होऊ शकतो. संयोजकांची ही हीच अपेक्षा असेल असं वाटतय. मला जे वाटलं ते माझं सगळं लिहुन झालयं .
Hema tai.. Kamal aahe.. Itka
Hema tai.. Kamal aahe.. Itka ruchkar prakar. Ani
Presentation kitti sundar... Ya varshi chi theam jara
Awaghad hoti. Itka chhan prakar kartayeil. Asa kadhich dokyat ala nasata..
ममो.. ती मुरड कशी घालायची
ममो.. ती मुरड कशी घालायची याची पण स्टेप सांगा ... पहिल्यांदाच बघतेय
मी मघाशी लिहायला विसरले..
वा.. सुंदर बदल.. सुबक झालीये
वा.. सुंदर बदल.. सुबक झालीये डिश!!
फारच मस्त दिसतेय रेसिपी ..
फारच मस्त दिसतेय रेसिपी ..
मस्तच.
मस्तच.
मस्तच! सुरेख. दिव्यामुळे एकदम
मस्तच! सुरेख. दिव्यामुळे एकदम प्रसन्नता वाटते त्या फोटोत.
कॅनपीज एकदम सही
कॅनपीज एकदम सही दिसताहेत...!फोटुही मस्तच...नक्की करणार.
खुपच सुरेख दिसत आहेत. मस्तच..
खुपच सुरेख दिसत आहेत. मस्तच..
सुबक झालीये डिश!! खरच उचलून
सुबक झालीये डिश!! खरच उचलून पटकन तोंडात टाकावीशी दिसतेय कॅनपी.
कल्पना एकदम सॉलिड . खरच उचलून
कल्पना एकदम सॉलिड .
खरच उचलून पटकन तोंडात टाकावीशी दिसतेय कॅनपी.>>>>>> + १००००००००००००००००००००
Pages