असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
स्मित
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. डोळा मारा इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
गणपतीबाप्पा मोरया
गणपतीबाप्पा मोरया
आई ,मी कधीतरी तूझं कोकरू होऊन
आई ,मी कधीतरी तूझं कोकरू होऊन येईन
दुडकत दुडकत माळरानी मी जाईन
गळयात माझ्या रंगेबेरंगी घातली असेल माळ
कळेल का तुला मी ते तुझच सोनुबाळ?
जिणे उरले एक दिसाचे यथेच्छ
जिणे उरले एक दिसाचे
यथेच्छ खाऊ तॄण हिरवे
'पाक' अशा ईदच्या नावे
'हलाल' उद्या व्हायला हवे
आशिका, एकदम समयोचित चारोळी.
आशिका, एकदम समयोचित चारोळी.
धन्यवाद शब्दाली
धन्यवाद शब्दाली
आशिका
आशिका
आशिका....
आशिका....
आशिका सही ! उद्या कापायचाच
आशिका सही !
उद्या कापायचाच आहे
भुईकमळ, कसली सुंदर आशिका ,
भुईकमळ, कसली सुंदर
आशिका , ह्म्म्म
भुईकमळ, सुंदर लिहलय!
भुईकमळ, सुंदर लिहलय!
आशिका.. पर्फेक्ट
आशिका.. पर्फेक्ट टायमिंग..
आज विहरतो कुरणावरती मुक्त
आज विहरतो कुरणावरती
मुक्त असे; अन स्वच्छंदी
खेळ कधी का तुला तो कळला
नियती म्हणते दे 'कुरबानी' !
मला तर बडबड गीत सुचत आहे. चला
मला तर बडबड गीत सुचत आहे.
चला चला दुडु दुडु दुडु
झाडाची पाने आपण सारे खुडु
गवत आहे हिरवेगार
मज्जाच आपली आहे फार!
मनस्विता....बडबड चारोळी भारीच
मनस्विता....बडबड चारोळी भारीच
मेरी चं होते कोकरू एक, लव
मेरी चं होते कोकरू एक,
लव त्याची मऊ सुरेख!
मेरी जाई जिथे जिथे,
कोकरू जाई तिथे तिथे !!!!
मेरी चं होते कोकरू एक, लव
मेरी चं होते कोकरू एक,
लव त्याची मऊ सुरेख!
मेरी जाई जिथे जिथे,
कोकरू जाई तिथे तिथे !!!!
भुईकमळ, कसली सुंदर आशिका ,
भुईकमळ, कसली सुंदर आशिका , ह्म्म्म ))))) +१
गर्द हिरव्या या मखमालीवर हसू
गर्द हिरव्या या मखमालीवर
हसू खेळू मुक्त बागडत
चिंताग्रस्त होण्या काळजीने उद्याच्या
माणूस नच मी तर अजा
सर्वांना धन्यवाद !!!बाकी
सर्वांना धन्यवाद !!!बाकी सर्वांच्या सुध्दा खूप आवडल्या. आशिका,चंबु अगदी वास्तववादी !
खाऊ किती ते गवत हिरवे, मला
खाऊ किती ते गवत हिरवे,
मला कुठे कुणा दुध द्यायचे?
दिसला मज तो नविन पाला
असेल का तो चविष्ट न्यारा?
हिरवा पाला खाऊन व्हावे
हिरवा पाला खाऊन
व्हावे समाधान
लोकांच्या आवडीसाठी
आमचे जीव दान!
आशिका, चंबू, यथार्थ वर्णन!
आशिका, चंबू, यथार्थ वर्णन!
गोंडस कोकरू, हिरवळही
गोंडस कोकरू,
हिरवळही गोंडस,
कशाला उद्याची बात,
आजतरी माझा सुखद दिवस.
कोवळे लुसलुशीत गवत.. आज
कोवळे लुसलुशीत गवत.. आज माझ्याचसाठी
आज मिळेल खायला... उद्याचे सांगत नाही...
कोणी सांगावे उद्या बांधेल ही इथे इमारत...
स्वार्थी माणसांचा कसा तो भरवसा राहीला नाही..!
मायबोलीच्या माळावरती अॅड्मीन
मायबोलीच्या माळावरती
घ्या..!
अॅड्मीन ची असे दहशत भारी
शिरजोरी का कुठे देखिली
त्वरीत चर्वशी 'त्या' पर्णांशी..!
कधीतरी ईद येईन कदाचित माझा
कधीतरी ईद येईन
कदाचित माझा बळी जाईन
जाईन तेंव्हा जीव जाईन
आज आनंदाने मी चारा खाईन!!!
गळ्यात माझ्या तिरंग्याचे
गळ्यात माझ्या तिरंग्याचे रंग
भारतभू मला प्रिय
पुढ्यात माझ्या निसर्गाचे रंग
गवत-पाला अजूनच प्रिय!
कधी वाढेल माझे शिंग अक्कल तर
कधी वाढेल माझे शिंग
अक्कल तर केंव्हाची आली
नका करु मासाहार
माणसाची अक्कल खुंटली!!!
पाय माझे करडे-काबरे बाकी शरिर
पाय माझे करडे-काबरे
बाकी शरिर किती गोरे!
काय लावू मी अंगाला
खावून बघावे का ह्या पांनाना!!!!
मी एक बकरी मला हवा आहे
मी एक बकरी
मला हवा आहे बकरा
लिहा तुम्ही चारोळ्या
मी खाते पानोळ्या.
मी एक टेस्ट ट्युब बेबी मला ना
मी एक टेस्ट ट्युब बेबी
मला ना आई वडील
काय खाऊ काय नाही
हे आता मला कोण सांगीन!!!!
कुणीतरी घ्या रे माझ्या नावाची
कुणीतरी घ्या रे
माझ्या नावाची आयडी
माबोवर पसरवू द्या रे
शाकाहाराची महती!
द्या मला चारा भरपुर फिरु द्या
द्या मला चारा भरपुर
फिरु द्या मला रानभर
काढा माझे दुध
मिळवा रग्गड कॅल्शियम
>>काढा माझे दुध मिळवा रग्गड
>>काढा माझे दुध
मिळवा रग्गड कॅल्शियम<<
बी... तो बोकड आहे..म्हणजे मला दिसतोय..!
(No subject)
नाही बकरी वाटते आहे. जरा
नाही बकरी वाटते आहे. जरा निरखून बघ.
फायनली त्या तिरंग्याचे रंग
फायनली त्या तिरंग्याचे रंग दिसले कुणाला तरी
माझ्या बाजूने बकरा
माझ्या बाजूने बकरा दिसतोय..!
(चला मंडळी.. बकरा असेल तर इथे लाईक करा..)
बी तो बोकड आहे. बोकडाचं दूध
बी तो बोकड आहे.
बोकडाचं दूध ???
बी यांचा चष्म्याचा नंबर
बी यांचा चष्म्याचा नंबर बदललाय.
मला चष्मा लागलाच नाही अजून.
मला चष्मा लागलाच नाही अजून.
मला ते स्तन दिसत होते म्हणून मी बकरी लिहिले.
आणी मी अन्य चारोळय पण लिहिल्या आहेत. त्यावर लिहा.
मायबोलीच्या माळावरती अॅड्मीन
मायबोलीच्या माळावरती
अॅड्मीन ची असे दहशत भारी....