गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?
यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.
नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.
आजची कविता:
मूळ नाव: कविता
कवयित्री: पुलस्ति
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/7955
वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता
"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?
गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता
उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
पुसतील मित्र सारे, टेंगूळ रे
पुसतील मित्र सारे, टेंगूळ रे कशाने
सांगून टाक मुडद्या, 'माझ्या तुझ्यात कविता'!
'हिरवट'
नाव- वचनभंग येईन सांगुनिही का
नाव- वचनभंग
येईन सांगुनिही का भेटण्या न आली
बाबा तिचे घराशी, आहे घरात कविता
नाव- इंधन संपून गॅस गेला
नाव- इंधन
संपून गॅस गेला राकेल स्टोव्ह नाही
चुल पेटवू कश्याने जाळायच्यात कविता?
नाव- तयारी वाचून पाठ झाले अन
नाव- तयारी
वाचून पाठ झाले अन व्याकरण मुखोद्गत
पण एक राहिलेले ,घोकायच्यात कविता
माझ्या प्रतिभेला 'कविता'
माझ्या प्रतिभेला 'कविता' वाचून लईच धुमारे फुटायला लागलेत.
या पानावरून थोडावेळ पळून जाते.
नाव- काव्यनिर्मिती प्रतिभेस
नाव- काव्यनिर्मिती
प्रतिभेस आज माझ्या पडलीत चार छिद्रे
वर शब्द टाकले की गळती पुढ्यात कविता!
रिते असे जाहले; प्राशुनी
रिते असे जाहले; प्राशुनी पात्र सुरेचे
मदिरेत चिंब भिजूनी, गायनी दंग कविता..
"मदिरा"
साती - नॉट लिसनिंग .....
साती - नॉट लिसनिंग .....
साती ... कहर केलास...!!
साती ... कहर केलास...!!
नाव- नॉट लिसनिंग प्रतिभेस
नाव- नॉट लिसनिंग
प्रतिभेस बापुड्या या हसशी कश्या शशांका
ऐकेन लाख मी रे ना ऐकतात कविता
साती
साती
सातीच्या सगळ्या ओळी एकत्र
सातीच्या सगळ्या ओळी एकत्र करून एक नवी भन्नाट कविता तयार होईल वेल डन, साती!
छानछान कविता
छानछान कविता
सातीतै.. कहर!! कुछ लेती क्युं
सातीतै.. कहर!!
कुछ लेती क्युं नही.. धुमारे थोडी देर के लिए कम हो जाएंगी
चनस साती, एक नंबर
चनस
साती, एक नंबर
साती लई भारी.. :)
साती
लई भारी..
साती धम्माल आणलीस....
साती धम्माल आणलीस....
साती
साती
न कळणारी कविता. ना कळते
न कळणारी कविता.
ना कळते तुला, ना कळते मलाही,
तरीही मी का करते कविता.
प्रतिभेस आज माझ्या पडलीत चार
प्रतिभेस आज माझ्या पडलीत चार छिद्रे
वर शब्द टाकले की गळती पुढ्यात कविता! >>> हे म हा न आहे.
भुइकमळ, अंजू कवितेला नवीन नाव
भुइकमळ, अंजू कवितेला नवीन नाव द्यायचय!
ओके स्वरूप, धन्यवाद.
ओके स्वरूप, धन्यवाद.
खात्री पुन्हा तपासण्याची
खात्री
पुन्हा तपासण्याची करण्यास फक्त खात्री
प्रिस्क्रिप्शनाबरोबर दे चार तूच कविता
साती हलके घेशिल. फक्त गम्मत.
(No subject)
साती रॉक्स
साती रॉक्स
साती - छिद्रे द्वीपदी अप्रतिम
साती - छिद्रे द्वीपदी अप्रतिम अशक्य आहे!!
धन्यवाद जयश्री! पुलस्ति,
धन्यवाद जयश्री!
पुलस्ति, धन्यवाद!