Submitted by मृण्मयी on 31 August, 2015 - 16:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ मोठी जुडी फ्लॅट लीफ पार्सली (चुरगळल्यासारखी दिसणारीपण चालेल. मी तीच वापरली आहे.)
८ लसूणपाकळ्या
३/४ कप एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल
१/४ कप रेड वाइन व्हिनेगर (मी बाल्सामिक वापरलाय. त्यात रेड वाइन व्हिनेगर आहे.)
१ टेबलस्पून लिंबाचा रस
१ टेबलस्पून लाल कांदा, बारीक चिरून
१ टीस्पून सुका ओरेगॅनो
१ टीस्पून मिरपूड (ताजी कुटलेली)
१/२ टीस्पून मीठ
क्रमवार पाककृती:
-पार्सली अगदी बारिक चिरून घ्यायची.
- कांदा आणि लसूणही बाऽरिक चिरलेला हवा. लसूणपाकळी आधी जराशी ठेचून मग चिरली तर जास्त छान लागते.
-भांड्यात सगळे घटक हव्या त्या क्रमानं घालून ढवळायचे.
-चिमिचुर्री सॉस तयार आहे.
वाढणी/प्रमाण:
खाऊ तसं
अधिक टिपा:
- अर्जेंटिनाचा पदार्थ आहे. 'चिमिचुर्री' उच्चार ऐकला आहे. (च चंबूतला)
-ब्रेडचा टोस्ट ते कबाब, स्टेक कश्यावरही घालून अप्रतिम लागतो.
-ह्याच सॉसमध्ये लाल मांसाचा तुकडा मुरवून भाजला तर सुरेख चव येते.
माहितीचा स्रोत:
http://www.food.com/recipe/chimichurri-21151
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी दिसते आहे! (पण पाऊण कप
भारी दिसते आहे!
(पण पाऊण कप तेल.. आर यू शुअर ही वैदर्भीय नाही? :P)
वाह, मस्तं. नवीनच नाव ऐकतेय.
वाह, मस्तं. नवीनच नाव ऐकतेय. छान दिसतोय सॉस.
मस्तच .. मला हा सॉस फार आवडतो
मस्तच .. मला हा सॉस फार आवडतो ..
पण मला वाटलम प्रॉसेस करायचे असेल हे सर्व ..
आणि काही ठिकाणी खाल्ला होता तो जरा स्पायसी लागला होता .. तसा जास्त आवडेल कदाचित ..
वैदर्भीय शब्दामुळे आधीच
वैदर्भीय शब्दामुळे आधीच उपस्थिती देतेय. बाकी मी य वर्षात पार्सलेच आणली नाहीये त्यामुळॅ सॉसपर्यंत मजल जाईल का माहित नाही
फोटॉ मस्त आहे.
स्वाती, ते बघूनच
स्वाती, ते बघूनच खात्रीपूर्वक लिहिलं आहे.
मलाही तेल जास्तं वाटलं, पण इतरांनी केलेला सॉस खाल्ला आहे. तोही असाच तेलकट होता. पण वाईट लागला नाही.
सशल, ह्याला स्पायसी करायला मिरं हा एकमेव घटक आहे. तो जास्तं घातला तरच स्पायसी लागू शकेल.
ही रेसिपी वैदर्भीय म्हणून
ही रेसिपी वैदर्भीय म्हणून लिहिली असतीस तर खुद्द वैदर्भीय लोकांनी तुला ठोकलं असतं कारण मिरच्याच नाहीत रेसिपीत.
आमच्याकडे पार्सली अजिबातच आणली जात नाही तेव्हा..
सही! आंबट शौकीन असल्याने
सही! आंबट शौकीन असल्याने जबरी तोंपासू!!
बायदवे, च चंबूतला असं सांगावं का लागावं असं मनात म्हणून चमच्यातला च वापरून हेच नाव म्हणून पाहिलं तर असलं फनी वाटलं
>> चमच्यातला च वापरून हेच नाव
>> चमच्यातला च वापरून हेच नाव म्हणून पाहिलं
भारी. कांदा कच्चाच घालायचा
भारी. कांदा कच्चाच घालायचा का? (रेसिपीवर प्रश्न न विचारणं हा अधर्म असल्यानं....)
चमच्यातला च वापरून >>>
आम्ही चमच्यातला च वापरून हेच
आम्ही चमच्यातला च वापरून हेच नाव म्हणून पाहिलं फरक नाही पडला ..
चिरीमिरी मधला च आहे तो. मी
चिरीमिरी मधला च आहे तो. मी मध्येच दुपारची झोप अनावर झाल्याने चिरीमिरीच वाचलं. म्हटलं नवीन वै रेस्पि आली का काय (आणि झोप उडाली)
विदर्भाचा अॅण्टीरेफरन्स
विदर्भाचा अॅण्टीरेफरन्स
जबरी दिसते आहे. एक दोन वेळा खाउन पाहिली आहे. मस्त लागते. याच्या अस्सल उच्चारात तो स्पॅनिश आर्र्र येतो का (अर्रिबा सारखा)?
बाय द वे, स्पॅनिश कंट्री मधला पदार्थ असल्याने तो लिंबाचा रस सुद्धा रियल लेमन आहे की रिआल लेमन?
मस्त फोटो. मी चिलि फ्लेक्स
मस्त फोटो. मी चिलि फ्लेक्स घालत .पार्सलीच्या जोडीने बेसिल, रोझमेरी, मरवा, थाइम, डिल, सेज , चाइव्ह्स हे पण बारीक चिरुन घालते. एक कप पार्सली असेल तर इतर सर्व सम प्रमाणात एक वाटी भर .
चिमिचुर्री घालून किन्वा सॅलड पण मस्त लागतं.
पार्सले म्हणजे कोथिंबीर असते
पार्सले म्हणजे कोथिंबीर असते का? की वेगळा काही प्रकार असतो ? मला वाटत असे कोथिंबीर म्हणजे कोरीएंडर असते, कृपया हेल्प करा!
मस्त दिसतोय सॉस.. या विकांत
मस्त दिसतोय सॉस.. या विकांत ला बार्बेक्यू साठी बनवून बघतो...
बाकी त्या उच्चारचे बघुन घ्या पण .. आपून का नाम नै लेनेका,, क्या.?
सोबा: पार्सली अगदि आपल्या कोथंबिर सारखीच दिसते..पण वास आणि चवीत फरक आहे बराच. मी नविन नविन कोथंबिर म्हणुन पार्सली आणायचो अन घरी बोलणे खायचो !
मस्तय.
मस्तय.
मस्त
मस्त
पार्सले/ली ची पानं
पार्सले/ली ची पानं कोथिंबीरीपेक्षा किंचित मोठी असतात. वासातही फरक आहे. अमेरिकन ग्रोसरी स्टोअरमध्ये कोथिंबीरीला सिलँट्रो म्हणतात. कोरिएंडर म्हटलं तर हातात धण्याची बाटली देतील बहुतेक.
मस्त. मला पहिले ते बंगाली नाव
मस्त. मला पहिले ते बंगाली नाव वाटले. सध्या इथे बंगाल पासून एस्केप नाही. करके देकतुं.
मस्त!! अर्जेंटिनाचा पदार्थ
मस्त!!
अर्जेंटिनाचा पदार्थ आहे? इथे एका इटालियन रेस्टोमध्ये ब्रेड प्लॅटरबरोबर देतात. पण तेल एकदम भन्नाट उग्र लागतं. ऑलिव्ह ऑईल घालून 'कोथिंबीरीची' चिमिचुर्री करून बघायला हवी.
मी नविनच पहातेय. मृण्मयी
मी नविनच पहातेय. मृण्मयी नविन भाजीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्त आहे रेसीपी!
मस्त आहे रेसीपी!
दोराबजीमध्ये जाऊन चक्कर टाकायला हवी आता. रच्याकने, किती दिवस टिकेल हा सॉस?
सोन्याबापू, पार्स्ले वेगळं अन
सोन्याबापू, पार्स्ले वेगळं अन कोथमिर येगळं.
कोथमिर = सिलांत्रो (उच्चार बरोबर असावा)
पार्स्ले बरीच धष्टपुष्ट असते कोथिंबीरीच्या मानानी
पार्स्लीची उग्र चव आवडत नाही
पार्स्लीची उग्र चव आवडत नाही फारशी. प्रकार इंटरेस्टिंग वाटतोय पण. फोटो मस्तच. मीट ह्यात भिजवून भाजायची कल्पना एकदम आवडली.