हरीयाली मावा - पाव किलो
साखर - पाव किलो
बारीक रवा - ४ टे. स्पून
कॉर्नफ्लोर - १ टे. स्पून
तूप - तळण्यासाठी
चौकोनी खडीसाखर / साखर / पिस्ता / काळी मनुका/ ड्रायफ्रूट पावडर/ केसर ह्या पैकी एक किंवा वेळ असेल तर सगळ ट्राय करु शकता.
खायचा सोडा - एका चण्याच्या डाळी एवढा
१. प्रथम हरीयाली मावा, रवा, कॉर्नफ्लोर, खायचा सोडा मिक्स करून गोळा बनवा. अर्धा तास झाकून ठेवा.
२. अर्ध्या तासाने पुन्हा हलक मळून त्याचे छोटे गोळे करा. गोल गोळा करून त्यात अंगठयाने दाबून त्यात चौकोनी खडीसाखर / साखर / पिस्ता / काळी मनुका/ ड्रायफ्रूट पावडर/ केसर ह्या पैकी एक किंवा वेळ असेल तर प्रत्येक गुलाबजाममध्ये एकेक प्रकार घालून ट्राय करु शकता.
३. साखरेत तीन वाटी पाणी घालून पाक तयार करून घ्या.
४. तूप गरम करून घ्या आणि स्लो फ्लेमवर गुलाबजाम तळून घ्या. तळलेले गुलाबजाम पाकात घाला.
५. सगळे तळलेले गुलाबजाम पाकात घातल्यावर पाकाला पुन्हा २-३ मि. उकळवा.
६. गरम किंवा पाकात मुरवून थंड कसेही खा.
डाएटवाल्यांनी अर्धा अर्धा खा.
आणि हा कॅलरीजचा विचार न करता खा.
जाडा रवा असेल तर थोड पाणी घालून भिजवून घ्या.
ह्म्म्म.. आता हरियाली मावा
ह्म्म्म.. आता हरियाली मावा म्हणजे नक्की काय यावर शे दोनशे पोस्टी पडल्या की मग रेसिपी वाचु सावकाश.
साधना आरती, आज २ भन्नाट
साधना
आरती, आज २ भन्नाट रेसेप्या टाकल्यास. मला गुलाबजाम फार आवडतात, पण हरीयाली मावा म्हणजे काय? कुठे मिळतो? साध्या खव्यापेक्षा वेगळा आहे का?
साधना , रश्मी, दोन्ही आरती
साधना :हाहा:,
रश्मी, दोन्ही आरती वेगळ्या आहेत. हरीयाली मावा दादरला कबुतरखान्याजवळ फक्त मावा, पनीरची २-३ दुकान आहेत त्यांच्याकडे मिळतो अजून कुठे मिळतो माहित नाही ग.
फोटो का टाकला? अहाहा! उचलुन
फोटो का टाकला?:राग::फिदी: अहाहा! उचलुन अलगद तोन्डात टाकावेत.
रश्मी ठहरोजी. ओर भी फोटो आ
रश्मी ठहरोजी. ओर भी फोटो आ रहे है.
आरती., मस्त फोटो! माझा
आरती., मस्त फोटो!
माझा झब्बू:
साधना, हरियाली मावा म्हणजे गुलाबजामसाठी वेगळा खवा मिळतो. तो थोडा रवाळ असतो. त्याचे गुलाबजाम शक्यतोवर फुटत नाहीत (असं म्हणतात(माझे कैक वेळा फुटले आहेत, पण एका वैदर्भिय मित्राने पुण्यातून ईमेल पाठवून गायडन्स आणि पाठिंबा दिल्यानंतर आता सरावाने जमू लागलेत.)) नेहमीच्या खव्याच्या गुलाबजामांपेक्षा या खव्याच्या गुलाबजामांची चव जास्त छान लागते.
अरे ! सॉरी आरती. मी घोळ
अरे ! सॉरी आरती. मी घोळ घातला. आता लक्षात आले. पूर्वीच्या मायबोलीवर दिनेशजीनी कुठेतरी लिहील्याचे आठवतेय की गुज्जु लोक खव्याला मावा म्हणतात. खाली सापडले.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/136520.html?1196190251
पुण्यात कुठे मिळेल हा हरियाली
पुण्यात कुठे मिळेल हा हरियाली मावा??
असो मी साध्याच खव्याचे करते.
हा माझा झब्बु..नुसत्या
हा माझा झब्बु..नुसत्या खव्याचे आहेत पण..
varsha11 च्या http://www.maayboli.com/node/9112 या रेसेपीवरुन बनवले होते
टीना, गुजा अगदीच तोंपासु. एक
टीना, गुजा अगदीच तोंपासु. एक उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय.
http://www.spiceupthecurry.co
http://www.spiceupthecurry.com/khoya-recipe-homemade-mawa/
शुभांगी, वरची लिंक पाहिल्यावर तुझ्या लक्षात येईल की हरियाली मावा म्हणजे काय ते. दुकानात बहुतेक वेळा भट्टी मावा म्हणजे हाताला घट्ट लागणारा मावा असतो. त्याचे गुजा बनवले तर ते फुटण्याची शक्यता असते.
गुजासाठी एकतर घरीच मावा बनवता येईल (जे जास्त सेफ आहे असे मला वाटते, दुकानातल्या माव्यात खुप वेळा भेसळ असते) नाहीतर बाहेरचा भट्टी मावा आणुन तो चमचाभर दुध घालुन थोडावेळ तव्यावर परतला तरीही मऊ होईल.
मी घरी बनवलेल्या माव्याचे गुजा बनवलेत. खुप मऊ आणि लुसलुशित होतात.
पण एका वैदर्भिय मित्राने पुण्यातून ईमेल पाठवून गायडन्स आणि पाठिंबा दिल्यानंतर
पुण्यातुन इ-मेल आला ना, मग ठिक आहे.
मंजुडी, फोटो बदलला.
मंजुडी, फोटो बदलला. मोबाईलवरून घेतलेले आहेत. झब्बू तर देच पण पुण्याहून आलेली रेसिपीपण दे.
तुझ्या मित्राला विचारून पुण्याला हरीयाली मावा कुठे मिळतो हे सुद्धा लिही. पुणेकरांना उपयोगी होईल.
रश्मी.. लिंकसाठी धन्यवाद सही आहे.
टिना झब्बू मस्तच.
आरती , टीना फोटो पाहून
आरती , टीना
फोटो पाहून अक्षरशः पाणी सुटलंय तोंडाला
आहाहा.. काय ते फोटो
आहाहा.. काय ते फोटो
मस्त फोटो.
मस्त फोटो.
वॉव !!तोपासू
वॉव !!तोपासू
वॉव !!तोपासू
वॉव !!तोपासू
मस्त दिसतायंत हरियाली मावा
मस्त दिसतायंत
हरियाली मावा म्हणजे काय ते माहीत नाही पण काही दुकानांत साधा खवा आणि गुलाबजामचा खवा वेगवेगळा विकतात. त्यातला गुलाबजामचा खवा म्हणजे हरियाली मावा का ?
आरती- मस्तच दिसतायत
आरती- मस्तच दिसतायत गुलाबजामुन
आरती., आतापर्यंत
आरती., आतापर्यंत साडेसत्तावीसवेळा तू पाकृ आणि तुझा प्रतिसाद एडीट केला आहेस.
मी खव्याच्या गुलाबजामची
मी खव्याच्या गुलाबजामची recipe विचारायला आले होते. या पद्धतीने खव्याचे गुलाब्जाम होतील ना?
कस्ले जब्री फोटो आहेत.
कस्ले जब्री फोटो आहेत. तोंपासु.
मस्त रेसीपी! फोटो तर झकास
मस्त रेसीपी! फोटो तर झकास
हरीयाली मावा म्हणजे बहुतेक गाईच्या दुधाचा खवा.
गु.जा. चा जो खवा असतो तो गाईच्या दुधाचा असतो; इती मंगला बर्वे - अन्नपूर्णा.
सुंदर दिसताहेत गुजा. मला
सुंदर दिसताहेत गुजा. मला हरियाली मावा असा काही प्रकार माहितीच नव्हता.
धन्यवाद सर्वांना. मंजूडी फोटो
धन्यवाद सर्वांना. मंजूडी फोटो एकदम भारी आहे.
या पद्धतीने खव्याचे गुलाब्जाम होतील ना? <<<< PracheeS, ट्राय करा आणि इथे लिहा व फोटोही द्या.
अरे अरे काय लावलय काय
अरे अरे काय लावलय काय हे,
बघुनच मधुमेह होणार कदाचित, बहुतेक, बहुदा, शक्यतो, वाटतोय,
रेसिपी मस्त .. हरियाली असा
रेसिपी मस्त .. हरियाली असा शब्द का वापरतात पण ? इथे दिल्लीला मिळेल का ? कुठल्या नावाने?
योकु, बरोबर. हरियाली मावा
योकु, बरोबर. हरियाली मावा गायीच्या दुधाचा असतो. इकडे खंडेलवालकडे असतो.
गुलाबजाम तळताना किंवा नंतरही फुटू नयेत म्हणून मी माझ्या मावससाबांची तळण पद्दत वापरते. छोट्या कढईत तूप घेवून तापल्यावर त्यात नीट तरंगतील, गर्दी होणार नाही इतकेच गुलाबजाम टाकायचे. गावी/सांडश//चिमट्याने ते कढलं किंचित उचलून हलकेच गोलगोल फिरवायचं. गुलाबजाम आपलेआपणच गिरक्या घेत सर्व बाजूनी सारखे तळले जातात आणि झारा न लागल्याने फुटत नाहीत. मग पाहिजे तेवढे सोनेरी ब्राऊन झाले की झार्याने अलगद काडून टिश्शूपेपरवर काढायचे. २ मिनिटांनी गरम पाकात टाकायचे. फुटत नाहित.
बाकी आरतीचीच कृती. कधीतरी पाव किलो खव्याला पाव वाटी बारीक रव्याऐवजी पाव वाटी मैदाही घातला आहे. ते ही उत्तम झाले होते.
आरती. दोन नंबरचा फोटो मस्त,
आरती.
दोन नंबरचा फोटो मस्त, पाक अगदी आत्पर्यंत मुरलेला दिसतो आहे.
मंजूडीचा फोटो एकदम भारी, करतेच मी पण आज (चितळ्यांचे)
हरियाली मावा, डोक्यातच
हरियाली मावा, डोक्यातच येईना.. फोटोत हरियाली शोधत होते,
नंतर कळले माव्याचे ब्रान्ड नेम आहे..
साधना
फोटो छान..
Pages