३० + ५ लिंब (रसाळ आणि बर्यापैकी मोठी)
मीठ : अंदाजे
गुळ : १ कीलो (कोल्हापुरी/ भेली)
केप्र लिंबाचे लोणचे मसाला : १०० ग्राम.
३० लिंबाच्या फोडी करुन त्यात ५ लिंबाचा रस आणि अंदाजानी मीठ घालुन हवा बंद बरणीत भरुन
किमान ८ दिवस उन्हात ठेवावे. फक्त रोज न चुकता दिवसातुन एकदा पळी नी ढवळुन घ्या.
८ दिवसा नंतर लिंबाची बरणी एका पक्क झाकण असलेल्या ड्ब्यात ओता.(शक्यतोर पोळ्यांचा डबा घ्या)
८ दिवसा नंतर लिंबाचा रंग बद्ललेला असणार (नासल्या सारखा). पण घाबरण्याच गरज नाहीय. आपल लोणच
खराब होणार नाहीये. आता त्यात १०० ग्राम केप्रे लिंबाचा लोणच्याचा मसाला घालुन नीट कालवुन ड्बा घट्ट बंद करा.
आता कुकर मधे पाणी घालुन स्टान्ड ठेवा त्यावर हा ड्बा ठेवुन ७ शिट्ट्या होऊ द्या. कुकर गार झाला की डबा काढुन सरळ पंख्याखाली ठेवा. लिबं+मसाला गार झाला की १ की.गुळ (व्यवस्थीत फोडलेला) घाला. छान नीट
कालवुन घ्या. १० ते १२ तासात गुळ बर्यापैकी मुरतो. चव घेवुन बघा. हवी असल्यास पीठी साखर / गुळ वाढ्वु शकता. दोन दिवसात लोणच अजुन छान पैकी रसाला येतं.
गुळा ऐवजी सा़खर पण घालु शकता. पण रस्सा पातळ होतो. मी गुळच वापरते कारण आमच्या कडे
गुळावर जास्त जोर आहे. तसेच केप्र च्या ऐवजी दुसरा लिंबाचा मसाला वापरु शकता पण केप्र मधे
हिंगाचे प्रमाण एकदम बरोबर आहे..
हे लोणचे उपासाला चालत नाही..
हे लोणचे उपासाला चालत नाही..
छान आहे लोणाचे. मला खुप
छान आहे लोणाचे. मला खुप आवडते हे.
फोटो धुसर आलाय.
धन्यवाद साधना.. हो अग फोटो
धन्यवाद साधना.. हो अग फोटो पुसट आलय.. मोबाईल मधे क्लीयारीटी नाहीये..
मला आवडते हे. आमटी भाताबरोबर
मला आवडते हे. आमटी भाताबरोबर मस्त. घरी उकडून नाही करत. मुरवतात.
झंपी, धन्यवाद.. एकदा उकडुन
झंपी, धन्यवाद.. एकदा उकडुन करुन पहा... नक्की आवडेल.. खिचडी सोबत पण मस्त लागतं....
आमच्या इथे उन्हाचा प्रोब्लेम
आमच्या इथे उन्हाचा प्रोब्लेम आहे....सरळ फोडी कुकर ला लावल्या तर चालेल का? लोणच कडु होईल का?
साऽऽत शिट्ट्या? लिंबं
साऽऽत शिट्ट्या?
लिंबं हाडांसकट शिजवायची आहेत का?
कुंकु, उन नसेल तर सावलीत
कुंकु, उन नसेल तर सावलीत ठेवा. मीठ आणि लिंबाच्या रसाने फोडी मुरतात...
स्वाती, सात शिट्ट्या मला पण पहिल्यांदा केलं तेव्हा जास्त वाटल्या होत्या.
पण ह्यामुळे लोणच लगेच मुरतं. (गहाळ वगैरे होत नाही) एकदा नक्की करुन पहा.
मस्तच.. मी नेहमी करते ते कुकर
मस्तच..
मी नेहमी करते ते कुकर मधे नै शिजवत..डायरेक्ट गंजात
छान रेसिपी ,करून बघणार..
छान रेसिपी ,करून बघणार..
धन्यवाद टीना, पलोमा.. खुप
धन्यवाद टीना, पलोमा.. खुप मस्त लागतं हे लोणचं..
छान रेसिपी, आता येताना
छान रेसिपी,
आता येताना मायबोलीकर प्रज्ञाने लिंबाचे वेगळे लोणचे दिले होते... ते घरीच संपले.. इथवर पोहोचलेच नाही ! आता रेसिपी विचारायला हवी तिला.
सायली मस्तंय गं रेसिपी
सायली मस्तंय गं रेसिपी
मस्त!
मस्त!
छान. आज दहा लिंबू आणले आहेत.
छान. आज दहा लिंबू आणले आहेत.
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआ
मस्त आहे रेसिपी सायली. तिखट,
मस्त आहे रेसिपी सायली. तिखट, गोड, आंबट , खारट, सालांची थोड़ी कडसर तुरट अशी षडरस युक्त चव येत असेल ना !
मला आठवते त्याप्रमाणे, माझी
मला आठवते त्याप्रमाणे, माझी आई असच करायची. उकडून पार्ट सोडून. सगळं उन्हातच ठेवून. गूळ टाकून सुद्धा.
पण हा प्रश्ण बावळट वाटेल, (आणि आईला विचारण्यापेक्षा इथेच विचारते नाहीतर ती म्हणेल तुझे लक्ष कुठे असायचं)
ती बाटली उन्हं मावळल्यावर आत ठेवली तर बुरशी नाही येणार?
आणि पुन्हा दुसर्या दिवशी उन्हात? बरोबर
आणि अस आत बाहेर करून, प्रॉबलेम नाही होणार?
(करणं दूर, पण किती प्रश्णं.... हो पण माहीती असलेले बरं, नुसते बडबड करायला. )
पण खरेच विचार आहे कधीतरी करून बघायला.
दिनेश दा, एकदा या पद्धतीने पण
दिनेश दा, एकदा या पद्धतीने पण करुन बघा..:)
हेमा ताई, खुप मस्त लागतं हे लोणच, कडवट अजीबात लागत नाही..
मंजु ताई, अ,आ.. आभार
झंपी,ती बाटली उन्हं मावळल्यावर आत ठेवली तर बुरशी नाही येणार?+++ नाही अजीबात नाही..
मी पण केल . खूप छान
मी पण केल . खूप छान लागत.पण टिकत का?
मी पण करते अशा पद्धतीने पण
मी पण करते अशा पद्धतीने
पण माझ प्रमाण २५+५ लिंब + १ सपाट वाटी मीठ = ३ दिवस ठेवणे . काच / प्लास्टिक मध्ये . गरमी उन्हा पासून लांब .मी घरातच ठेवते. चौथ्या दिवशी केप्र मसाला १ पाकीट ( किती ते काही आठवत नाही . बहुदा २५ लीम्बासाठी चा मसाला अस पाकिटावर लिहलेले असते ) लावून दिवसभर . संध्याकाळी घट्ट झाकण्याच्या डब्यात ठेवून २०-२५ मिनिट कुकर मध्ये बारीक आचेवर . शिट्या मोजत नाही .थोड हात लावण्या इतपत गार झाल कि आधीच्या भांड्यात रात्रभर. सकाळी साखर . संध्याकाळ पर्यंत विरघळते . चव घेवून लागली तर साखर परत. . हवी तशी चव येयीपर्यंत साखर adjust करते
( सकाळ, रात्र संध्याकाळ माझ्या कामाच्या वेळे प्रमाणे केलेलं आहे )
गुळ कधी वापरला नाही आता थोड गुळ घालून पण करेन
प्रभा ताई हो टीकतं हे
प्रभा ताई हो टीकतं हे लोणच...
मृणाल छानच आहे तुमची पद्धत देखिल..
धन्यवाद सायली
धन्यवाद सायली