चिकन - १ किलो ( Skin काढून ) ,
तेल - १ मोठी वाटी ,
कांदा - २ मोठे चिरून थोडे तेलावर भाजून पेस्ट केलेली ,
लसूण - २ मध्यम आकाराचे गड्डे ,
हिरव्या मिरच्या - ४ ,
अद्रक / आलं - बोटाच्या २ पेरा एवढा तुकडा ,
(आलं ,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा डोल - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले ,
जिरे - १ चमचा ,
दगडफूल ( प्रमाण बोटाची २ पेर ) ,
कलमी - बोटाएवढा १ तुकडा ,
मिरे - ८ ते १० ,
लवंग - ५ ते ६ ,
विलायची - ३ ,
धने - १० ग्रॅम किंचित तेलात भाजून (+दगडफूल + मिरे + लवंग + विलायची + कलमी +जिरे ) बारीक केलेले ,
हिरव्या मेथी च्या ८ १० काड्यांची पाने बारीक चिरून ,
कोथिंबीर बारीक चिरून ,
तिखट ,
हळद ,
मीठ .
चिकन ३ पाण्यात धुवून घ्यावे . त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे . ३ ते ४ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे .
शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय भाज्यांमध्ये तेलाची तर्री ठेवत असल्यामुळे तेल जास्त टाकतात ) .
तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी , धने आणि इतर जिन्नस असलेली पेस्ट घालून परतावे , त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी .
त्यात बारीक चिरलेली मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून मग ६ चमचे तिखट , दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवून घेताना टाकलेल्या मिठाचा अंदाज घ्यावा ).
आता त्या फोडणीत १/२ पेला पाणी टाकून झाकण ठेवावे . २ मिनिटात फोडणी आणि त्यातले तेल (तर्री ) वेगळे
झालेले दिसेल . त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे . २ ते ३ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे .
आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे . ५ मिनिटांनी वाढावयास घ्यावे .
विदर्भात चिकन मधे रस्सा हा घट्ट न ठेवता पातळ ठेवतात . घट्ट रस्सा ठेवायचा असल्यास मसाल्यांचे प्रमाण कमी करावे .
इथे लोक तेज खातात (तिखट नाही) म्हणून प्रत्येकाच्या चवीप्रमाणे मसाले आणि तिखट कमी जास्त करावं … पहिला घास घेतल्यावर ठसका लागून पाणी प्यायची वेळ आल्यास माझ्यावर नाव नाही रे बा !
माहितीचा स्रोत:
आप्पाजी (आईचे वडील)
varhadi chicken
तळुन मस्त वाटली असती
तळुन मस्त वाटली असती अंडी..
बाकी अंडाकरी मधे इतक तेल नै टाकायच
आणि मसाले शिजवल्यावर असल नसल सगळ्च तेल सुटून जात ना म्हणुन तर्री येते..ती का दिसत नाही आहे यात ?
हे बघ..मोबाईल मघे रात्री काढलेला असल्यामुळे जरासा ब्लर आलाय..
अशी अंडी तळून टाकतात हे मला
अशी अंडी तळून टाकतात हे मला माहित नाही. आता माहित झालंय पण तरीही अंडी तळण्याची एक अॅडिशनल स्टेप कोण करणार? मला नुसतीच उकडलेली अंडी देखिल आवडतात. शिवाय ग्रेव्ही आहेच ना!
तेल तर मी फक्त तीन टे.स्पून घातलं. त्यातून काय कर्माची तर्री उत्पन्न होणार!
मी मागे इथेच वाचून एका
मी मागे इथेच वाचून एका रेसेपीसाठी अंडी तळली होती. पण आमच्या घरी तळलेली अंडी नाही आवडली. चिवट लागतात.
विहीरभर तेल घातलंस तरी
विहीरभर तेल घातलंस तरी कर्माची तर्री नाहीच उत्पन्न होणार
कर्माची तर्री रच्याकने कुठलं
कर्माची तर्री
रच्याकने कुठलं कर्म?
मामी, भारी दिसतेय अंडाकरी!
मामी, भारी दिसतेय अंडाकरी!
मी मागे इथेच वाचून एका
मी मागे इथेच वाचून एका रेसेपीसाठी अंडी तळली होती. पण आमच्या घरी तळलेली अंडी नाही आवडली. चिवट लागतात.++११
वरचा लेयर फक्त तळला जातो
त्यापेक्षा अंडी हार्ड न करता गरम असतानाच ग्रेवीत टाकते मी
चिवट लागतात+१
चिवट लागतात+१
आज वर्हाडी चिकन केले होते.
आज वर्हाडी चिकन केले होते. अफाट झाले होते!! तिखट जरा कमी केले बाकी सर्व रेसिपी इथे दिल्याप्रमाणे फॉलो केली. थॅन्क्यू बरं का टीना !!
इथे फोटो कसे लावायचे??
इथे फोटो कसे लावायचे??
सो बा.. पिकासा वरून अपलोड
सो बा.. पिकासा वरून अपलोड कर..फोटोज!!!
टिने, आत्ताच्याआत्ता झणझणीत वर्हाडी चिकन खावसं वाटतंय..मामी ची एग करी , मैत्रेयी ची चिकन करी ही यम दिस्तीये..
रच्याकने मेरे सावजी मसाले का क्या हुआ????
करुन बघतो...
करुन बघतो...
वर्षु नील तै, कसे करू?? मला
वर्षु नील तै, कसे करू?? मला तांत्रिक बाबतीत इतकी गती नाही न!
ऐन श्रावणात ही रेसिपी ...
ऐन श्रावणात ही रेसिपी ... हेट. तसाही घरात चिकन शिजवलं तर माझी हकालपट्टी होणार हे नक्की!
बाकी ह्या रेसिपिनी पोळ्याला अंडाकरी करून पाहणार
तोपर्यंत मसालेच जमवतो कलमी म्हणजे काय?
दालचीनी हो!
दालचीनी हो!
जबरी गाजले हे चिकन नंतरचे
जबरी गाजले हे चिकन
नंतरचे सगळे झब्बु पण एकदम भारी आहेत.
टीना, मस्त रेसिपी आहे. उद्याच
टीना, मस्त रेसिपी आहे. उद्याच बनवते आणी ईकडे कळवते रच्याकने मिसळपाव या संकेतस्थळावर अशीच रेसिपी आली आहे. जिन्नसांचे प्रमाण आणी शब्दांची थोडी फेरफार सोडली तर तंतोतत तुझीच रेसिपी वाटते.
टीना, तुमची रेसिपी सेम टु सेम
टीना,
तुमची रेसिपी सेम टु सेम पाळत बनवली (माइनस दगडफूल मेथी अन सांबार) तूफ़ान जमला रस्सा!! तीच रेसिपी दुसऱ्या साईट ले टाकली तिकडे लोकाइले लै आवडले फोटो!!!
मला तुम्हाला न सांगता असे केले म्हणून ती चोरी टाइप वाटली पण तसे काही इंटेंशन नव्हते माझे!
हे क्रेडिट तुमचे अशी ही थोड़ी लेट पोचपावती
हं.. दगडफुलाशिवाय मज्जा नै
हं..
दगडफुलाशिवाय मज्जा नै येत पन..
मृदुला,
माझी कर रविवारी आहे..मग अजुन एकदा मंगळवारी करेल..
घरी जातेय आणि बाप्पा आणि महालक्ष्मी असल्यामुळे मग परत काही दिवस सामिषाला रामराम करावा लागणार..
मामीची अंडा करी आणि
मामीची अंडा करी आणि मैत्रेयीची वर्हाडी चिकन मस्त दिसतेय! मी पण येत्या रविवारी करणार आहे.
आज मदहोश हुआ जाए रे.. जाए
आज मदहोश हुआ जाए रे.. जाए रे.. जाए रे..
आज मदहोश हुआ जाए रे.. मेरा मन.. मेरा मन.. मेरा मन..
पोळ्याची कर.. श्रावण समाप्ती..
उद्या म्हणजे रात्री फटू टाकतो भाजीचा
मला तर आत्ताच करुन खावीशी वाटतेय..घरचे सगळे कर साजरी करायला शेतावर चाल्ले
मी बिचारी इथ अटकून पडलीए..गॉड ब्लेस माय सोल.. पण मी पन त्यांना उद्या केलेल्या भाजीचा फटू टाकुन जळवणार..हिसाब बराबर..
इथ कुणी या प्रकाराने करुन पाहिली तर आठवणीने फटू टाकान
अरे मेथी अन दगडफुल दोन्ही
अरे मेथी अन दगडफुल दोन्ही नाही वापरले, मग स्वाद बराच बदलेल असे मला वाटले. सोबा, तुमची रेसिपी एक वेगळा पदार्थ म्हणून वापरा
मला फ़क्त तेलाच्या तर्रीशी
मला फ़क्त तेलाच्या तर्रीशी मतलब होता तै!
इकडे तिखट खायला तरसतो जीव
हिकडं म्हंजे कुकडे
हिकडं म्हंजे कुकडे सोहोण्याबाहापु ? दिल्लीले का बाप्पा? तथुल्ले तं तिखटाची काहीच कमी नाही.
दिल्लीले का बाप्पा? ------
दिल्लीले का बाप्पा?
------ तुमच्या लाडक्या शहरी (असा माझा अन्दाज आहे).
रॉहु, सद्धया इलेक्शन ड्यूटी
रॉहु,
सद्धया इलेक्शन ड्यूटी आहे मगध राज्यात आमची! तसेही सद्धया ड्यूटी वर शेजारी असलेल्या वंग राज्य अन अहोम राज्याच्या सीमेवर कार्यरत आहे.
बापु, एकदा दगडफुल टाकुन बनवाच
बापु,
एकदा दगडफुल टाकुन बनवाच तुमी..वज्जेर फरक पडते टेश्ट मदी.. अन भाजी बी खत्रा लागते एकदम..
तळलेल्या कांद्याची पेस्ट पाणी
तळलेल्या कांद्याची पेस्ट पाणी न घालता करायची होती का? मी पाणी घालून केली.त्यामुळे टेक्ष्चर वेगळे आले आहे.आणि भरपूर वेळ परतवायला लागले.मी खात नसल्यामुळी टेस्टला कसे आहे ते सांगू शकत नाही.
टीना, भेटत नाही न अटिसा
टीना,
भेटत नाही न अटिसा दगडफूल लोकाइले ते समजोता समजोता म्याट झालतो म्या! या टाइम ले आलो का आपल्या इकुन इकत न्याव लागन
नाई
नाई भेटत..अर्रे..असकस..
जाऊद्या..
Pages