एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>

बाकी सर्व सोडून द्या, एका मायबोली वर्षाविहारात, एक पुरुष सदस्य पोहोण्याचे कपडे घालून वावरतं हि तक्रार करणार्‍या सर्वजणी स्त्रीयाच होत्या.......

आहे ह्यावर उत्तर ?
<<<

ह्याचा संबंध समजला नाही.

पुरुषांनी असं वागाव हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीयांना नाही हे मान्य केलत ना ? बास झालं. >> अरे पण काही पुरूषांच्या काही वागणुकीमुळं डायरेक्ट स्त्रीयांना त्रास होतो तर त्या पर्टिक्युलर वागण्याबद्दल बोलायचा अधिकार त्यांना नक्कीच आहे.. पुरूषांनी रोजच्या नॉर्मल आयुष्यात काय केलं पाहिजे हे कोणी सांगायला चाललंय काय इथं?

<< तुम्हाला तुमचा मुद्दा मान्य करुन घ्यायची फारच घाई बाबा. >> घाई कुठे दिसली ? मी कोणाला आत्ताच्या आत्ता उत्तर द्या म्हणालो कॉय ? दिसो बापडी, कॉमेन्ट वैयक्तिक आणि दुर्लक्ष करायच्या लायकीची आहे म्हणून उत्तर देत नाही.

<< वर्षानुवर्ष / दशकामागुन दशक स्त्रियांनी काय करावे किंवा करु नये याबद्दल अनेक नियमावली, आज्ञा निघत असताना दुसर्याचे अधिकार वगैरे कधीच फारसे कोणाला जाणवले नाहीत. मात्र आता एखादा चुकार धागा इथे आणि हिफॉरशी सारखी संस्था स्थापन झाली आणि शब्दश: ' पुरुषांनी काय करावे' हे न सांगता ( डिक्टेट न करता) 'सामाजिक जबाबदारी काय असावी' ( नोट - असावीच असे नाही, पण असावी का? असल्यास काय असावी ) अशी चर्चा जर कोणी करु पहात असेल तर लगेचच डिफेन्सिव मोडमधे जाण्याचीही गरज नाही. >>>

डिफेन्सिव्ह मोडमध्ये कोण जातय ? आपण ह्या धाग्यावर चर्चा करतोय त्यामुळे ह्या धाग्यावरच्याच विषयांवर बोलणार, नाही का ?

मुळात तुम्ही पुरुषांना असं काही सांगण्याचा अधिकार स्त्रीयांना नाही हे मान्य करता आहात का ?

<< धागा काहीच बोंबलुन सांगत नाहीये, चर्चा करु पहातोय. ज्या काही पोस्ट चुकीच्या वाटल्या त्याला स्त्री आणि पुरुष दोघांनीही आक्षेप घेतलेलाच आहे. मला धाग्याबाबत जे काय सांगायचं होतं ते मी माझ्या या आधीच्या पोस्ट मधे आणि या पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात सांगितले आहे.>>>

अमान्य, ज्या पोस्टस् दुसर्‍याची जबाबदारी ठरवण्यास विरोध करतआहेत त्या सरसकट दुर्लक्षिल्या जात आहेत.

मनीष,

<< अरे पण काही पुरूषांच्या काही वागणुकीमुळं डायरेक्ट स्त्रीयांना त्रास होतो तर त्या पर्टिक्युलर वागण्याबद्दल बोलायचा अधिकार त्यांना नक्कीच आहे.. >>

आहेच ना, त्यावरच्या उपायांबाबत बोलणं अपेक्षित आहे, पण इथे सरसकट सर्व पुरुषांनी कसे वागावे याची नियमावली बनवली जातेय, पुरुषांच्या स्त्रीस्पर्शाविषयीच्या प्रश्नावल्या तयार केल्या जात आहेत, त्या ह्या पर्टिक्युलर वागण्याविषयीच आहेत असं म्हणायचय तुम्हाला ?

<< पुरूषांनी रोजच्या नॉर्मल आयुष्यात काय केलं पाहिजे हे कोणी सांगायला चाललंय काय इथं?>>

मला वाटतय तुम्ही धागा वाचला नाहिये मग....

पुन्हा एकदा, सर्वांनी मिळून याचं उत्तर शोधणं याला आक्षेप नाहिये, ह्या प्रश्नांच उत्तर हे पुरुषांनी त्यांची जबाबदारी ओळखून वागण्यातच आहे ह्या आम्धळ्या निष्कर्षाला आहे.

पण इथे सरसकट सर्व पुरुषांनी कसे वागावे याची नियमावली बनवली जातेय >> काही पोस्टस तश्या असतीलही पण याचा अर्थ धागाच तसा आहे असा नाही होत. शिवाय धागकर्तीनं आधीच स्पष्ट केलंय.. स्त्रीयांनी काय केलं पाहिजे याची चर्चा आधी भरपूर वेळा झाली आहे पण पुरूषांनी काय केलं पाहिजे याबद्दलही चर्चा झालीच पाहिजे (अर्थात समस्त पुरूषजातीला पिंजर्‍यात उभं न करता). या चर्चेतून आपल्याला काही पॉझिटिव्ह मिळालं तर ते सगळ्यांसाठीच चांगलं आहे..

मनीष, अश्या पोस्टस् ना कुणी आक्षेप घेतलाय ? जिथे कुठे विरोधी सूर लागलाय तिथे अमोरच्या मुद्द्यांना मान्यता देण्यात आलीये ? एक उदाहरण दाखवा......

<< स्त्रीयांनी काय केलं पाहिजे याची चर्चा आधी भरपूर वेळा झाली आहे>> कुठल्या बाफवर ?

<< पुरूषांनी रोजच्या नॉर्मल आयुष्यात काय केलं पाहिजे हे कोणी सांगायला चाललंय काय इथं?>> हे तुमचच वाक्यं, तुम्हाला खरच म्हणायचय का असं ? मग तुमची वरची पोस्ट उलट मत मांडतेय

"सरसकट पुरुषांनी कसं वागावं"आणि "पुरुषांनी सरसकट कसं वागावं" यात फरक आहे ना? Happy
शब्दच्छल आहे पण त्याचे अर्थ नक्कीच वेगळे आहेत Happy मला तरी या धाग्यात मी नॉर्मली वागताना काय केलं पाहिजे हे कोणि सांगितलेलं दिसलेलं नाही..

बेफिकीर, तुम्ही नावानिशी स्पेसिफीक विचारलंत म्हणून फक्त हे उत्तर.
धागा सुरू करताना त्यामागे असलेली कळकळ, काळजी रास्त होती आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून अनेकांनी महत्त्वाचे मुद्दे येतील अशा पोस्टही टाकल्या. उदो उदो करताना त्याचीच एक झिंग चढावी आणि पाऊल घसरावे अशी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. मग स्त्रीमुक्ती, स्त्रीवादी किंवा एकूणच समस्त स्त्रीजातीचा कैवार घेतल्यासारख्या आवेशपूर्ण, अभिनिवेशी पोस्टी यायला लागल्या. स्त्री किती असहाय आणि सहजसाध्य सावज आहे आणि डायरेक्ट आरोपीच नाही तर आजूबाजूला असणारे पुरूष कसे या परिस्थितीला जबाबदार आहेत यावर रंजक चित्रण होऊ लागले. मित्रत्वाच्या नात्याने जी चर्चा व्हायला हवी ती पुढे कबूलीजबाब आणि जबान्या घेण्याच्या थरावर पोचली. तुम्ही मला विचारलेत म्हणून मी ही तुम्हाला थेट विचारते बेफिकीर, तुम्ही सोडून या धाग्यावर आणखी किती पुरूष खरोखरीच सहभागी झालेत आणि ठोस उपाय सुचवले आहेत? इथे तर बायकाच आपली गार्हाणी मांडत आहेत फक्त, जी सगळ्यांना ठाऊक आहेत. पुरूष सहभागी होत नाहीयेत याचं एक सबळ कारण म्हणजे न जाणो आपल्यालाच जाब विचारला तर! जे तुम्ही, बागुलबुवा, लिंबूकाका सर्वांनी अनुभवलं आहेच. मला स्त्रियांची सुरक्षितता गौण वाटते,पुरूषांकडून होणारा त्रास माहीतच नाहीये असा परस्पर समज करून घेतला गेला.इथल्या पुरूषांना अतिशय वैयक्तिक वाटतील असे प्रश्न विचारले गेले, नियम सांगितले गेले हीच गोष्ट उद्या एखाद्या पुरूष आयडीने स्त्रियांबद्द्ल केली तर रणकंदन होईल. मैत्रीपूर्ण, खेळीमेळीच्या वातावरणात जी चर्चा करायची ती भूमिकेचा बुरखा पांघरून आलेल्या आवेश अभिनिवेशापायी चर्चेत सहभागी होणार्यांनाच टारगेट गृप केल्यामुळे फसली.

किती साध्या सोप्या गोष्टींचा किस पाडला जातोय.
बाबानों संकटात सापडलेल्या मुली-बायांना आपली आई-बहिन समजुन मदत कराविशी वाटली तर करा नाही तर त्यांच्या हालाती वर सोडा.

मनीष, मी पुन्हा एकदा हेच सांगेन की तुम्ही धागा वाचला नाहिये.....

बादवे मी वर विचारलेले प्रश्नही तुम्ही वाचलेले दिसत नाहियेत Proud

तुमचे बाकिचे प्रश्न वाचलेत पण मला या चर्चेत अजून फाटे फोडायचे नव्हते म्हणून उत्तर दिलं नव्हतं. माझ्यासाठी या बाफचा विषय क्लिअर होता त्यामुळं मी असंबध्द पोस्टस इग्नोर करून बाकिच्या गोष्टि वाचत होतो. मला यातून काही चांगलं शिकायला मिळत असेल तर काही असंबध्द गोष्टी मॅटर करत नाहीत..

माझ्याकडं आता त्या पुर्वीच्या बाफांच्या लिंक नाहियेत त्यामुळं लगेच देउ शकणार नाही..

अश्या पोस्टस् ना कुणी आक्षेप घेतलाय ? जिथे कुठे विरोधी सूर लागलाय तिथे अमोरच्या मुद्द्यांना मान्यता देण्यात आलीये ? >> हे झालेलं आहे असं मी कधीच म्हणालो नाहिये.

मी पुन्हा एकदा हेच सांगेन की तुम्ही धागा वाचला नाहिये..... >> सरसकटीकरण करणं थांबवा प्लीजच Happy

तुम्ही सोडून या धाग्यावर आणखी किती पुरूष खरोखरीच सहभागी झालेत आणि ठोस उपाय सुचवले आहेत? इथे तर बायकाच आपली गार्हाणी मांडत आहेत फक्त, जी सगळ्यांना ठाऊक आहेत. पुरूष सहभागी होत नाहीयेत याचं एक सबळ कारण म्हणजे न जाणो आपल्यालाच जाब विचारला तर! जे तुम्ही, बागुलबुवा, लिंबूकाका सर्वांनी अनुभवलं आहेच. मला स्त्रियांची सुरक्षितता गौण वाटते,पुरूषांकडून होणारा त्रास माहीतच नाहीये असा परस्पर समज करून घेतला गेला.इथल्या पुरूषांना अतिशय वैयक्तिक वाटतील असे प्रश्न विचारले गेले, नियम सांगितले गेले हीच गोष्ट उद्या एखाद्या पुरूष आयडीने स्त्रियांबद्द्ल केली तर रणकंदन होईल. मैत्रीपूर्ण, खेळीमेळीच्या वातावरणात जी चर्चा करायची ती भूमिकेचा बुरखा पांघरून आलेल्या आवेश अभिनिवेशापायी चर्चेत सहभागी होणार्यांनाच टारगेट गृप केल्यामुळे फसली.>> +१

किती साध्या सोप्या गोष्टींचा किस पाडला जातोय.
बाबानों संकटात सापडलेल्या मुली-बायांना आपली आई-बहिन समजुन मदत कराविशी वाटली तर करा नाही तर त्यांच्या हालाती वर सोडा.

>> सुपर्ब !! + १

बागुलबुवा आता तुम्ही तुम्हाला जो विषय हवा आहे तो घेऊन नवा बीबी काढावात आणि इथे फाटे फोडणे थांबवावेत हे उत्तम. अति होतय.

सकुरा, करेक्ट लिहीलंत. पण या साध्या सोप्या गोष्टी तर आधीच माहिती आहेत की इथे सर्वांना. त्यांना त्या पलीकडे जाऊन काहीतरी चर्चा करायची आहे. हेच मी, बागुलबुवा केव्हाचं सांगतोय की या पलीकडे तुम्ही काय जाणार?!

वाचून काढला हा सगळा धागा!

स्त्रियांना या अश्या अनुभवांना तोंड द्यावे लागते याबाबत कोणाचेच दुमत नसावे.....आणि हे असे अनुभव पुरुषांकडून येतात याबाबतही
आता असे पुरुष मायबोलीवर असण्याची शक्यता कमी आहे आणि चुकुन असतीलच तर ते त्याची जाहीर कबुली देतील ही फारच बाळबोध अपेक्षा झाली
राहता राहिला प्रश्न आजुबाजुच्या पुरुषांचा..... धाग्यात कुणीतरी लिहिल्याप्रमाणे आता तो त्रास देणारा माणूस आवाक्यातला वाटत असेल तर आजुबाजूचे पुरुष काय स्त्री काय (बहुतांशी) मदतीला धावून येतातच.... त्यात त्या स्त्रीला मदतीची अपेक्षा आहे असे दिसले तर आजुबाजुचे मदत करतातच.... तेव्ह्ढाच हिरोगिरीचा चान्स असा एखादा अंतस्थ हेतूही त्यामागे असतो कधीकधी.... पण ते एक असो!
आता त्रास देणारा गुंड, मवाली आणि आवाक्याबाहेरचा असेल तर डायरेक्ट मध्ये पडून चार ठोसे खाण्याची आणि नंतरच्या परीणामांना सामोरे जाण्याची अपेक्षा आजुबाजुच्या पांढरपेशा मंडळींकडून खरच आहे का? (आणि अशी अपेक्षा व्यक्त करताना आपला नवरा, आपला भाऊ, आपले वडील हे कधी अश्या भानगडीत पडतात का? अश्या वेळी आपली मनोवस्था काय असते याचेही एकदा आत्मपरीक्षण करावे)
इनडायरेक्ट मदतीचे म्हणाल तर ती होतच असते..... भांडणाच्या ठिकाण होऊन पोलिसांना निनावी फोन जाणे, व्हॉट्सअप ग्रुपवर मदतीचे मेसेज जाणे, लपुनछपुन आरडाओरडा होणे वगैरे इनडायरेक्ट मदतीचेच पुरावे आहेत

इतक्या सरळ साध्या फॅक्ट वर ५००+ पोस्ट पडाव्यात आणि १९ पाने भरुन जावीत याचे आश्चर्य वाटते आणि इतके सगळे होउनही वरती उल्लेखलेल्यापेक्षा ठोस काही मांडले गेलेलेच नाही
आता धागाकर्तीला जर यापेक्षा वेगळे काही अपेक्षित असेल तर अश्या पोस्ट्स अभावानेच आल्यात.... असो!

वाटलच मामी,ही पोस्ट येणार म्हणून.

फाटे कसले फोडतोय ? विषयाला धरुनच आहेत माझ्या पोस्टस्

तुम्हाला पटत नसतील तर नको पटू देत

@मनीष,

<< तुमचे बाकिचे प्रश्न वाचलेत पण मला या चर्चेत अजून फाटे फोडायचे नव्हते म्हणून उत्तर दिलं नव्हतं. >> फाटे कसले ? चर्चेच्या अनुषंगाने विचारले गेलेत ते प्रष्न.

<<माझ्यासाठी या बाफचा विषय क्लिअर होता त्यामुळं मी असंबध्द पोस्टस इग्नोर करून बाकिच्या गोष्टि वाचत होतो. मला यातून काही चांगलं शिकायला मिळत असेल तर काही असंबध्द गोष्टी मॅटर करत नाहीत..>>

फाईन, पण मग चर्चा म्हणू नका त्याला, तुम्ही फक्त वाचक मोडात असता तर प्रश्न विचारलेच नसते तुम्हाला.

<<माझ्याकडं आता त्या पुर्वीच्या बाफांच्या लिंक नाहियेत त्यामुळं लगेच देउ शकणार नाही..>> हरकत नाही, तोपर्यंत तुमचं विधान होल्डवर ठेवू.

<<अश्या पोस्टस् ना कुणी आक्षेप घेतलाय ? जिथे कुठे विरोधी सूर लागलाय तिथे अमोरच्या मुद्द्यांना मान्यता देण्यात आलीये ? >> हे झालेलं आहे असं मी कधीच म्हणालो नाहिये.>>>>> झालं नाहिये हेच तर सांगतोय मी, मान्य केलय क कुणी ? तुम्ही करताय का मान्य ?

<<मी पुन्हा एकदा हेच सांगेन की तुम्ही धागा वाचला नाहिये..... >> सरसकटीकरण करणं थांबवा प्लीजच >> अजिब्बात सरसकटीकरण नाहिये, पण तुम्ही जे घडलय ते घडलच नाहिये आणि जे घडलच नाहिये ते घडलय म्हणत असाल तर ह्याशिवाय दुसरं कारण तर सांगू शकत नाही ना मी Proud

मुख्य मुद्दा असा आहे कि, गटारात उतरून हात काळे कोण करणार. आणि गटारात उतरल्यावर कोणी अंगावर आल्यावर इतरांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहणार कि आपल्याच भावाला, वडिलांना, नवऱ्याला सोबत घेऊन साफसफाई करणार. चला घराघरात शिवाजी तयार करूया आणि नंतर इतरांच्या घरात डोकाऊन पाहू.

आशूडी,

गेले काही दिवस ह्या धाग्यावर ज्या प्रतिसादांच्या उलथापालथी झालेल्या आहेत त्यामुळे मी थक्क झालेलो आहे असे म्हणालो तर अजिबात खरे वाटणार नाही कोणाला. थक्क का झालो आहे हे येथे लिहिणे आता अर्थहीन झाले आहे आणि बरेचसे असंबद्धही ठरेल आता ते!

आंतरजालावरील प्रचंड वैचारीक रणधुमाळीच्या वातावरणात कोणीतरी एकजण कसकसा प्रवास करतो हे लिहावेसे वाटत आहे. ते फार म्हणजे फारच माझ्याशी / माझ्यापुरते निगडीत असले तरीही ते प्रातिनिधिकही असेल असे वाटते. त्यामुळे त्या विषयावर स्वतंत्र लिहावे अशी इच्छा होत आहे. त्यात येथे चर्चेला येत असलेल्या आणि नसलेल्या अनेकांचे उल्लेखही असणे निकडीचे वाटत आहे.

तेव्हा मी आपले तेच लिहायला घेतो. येथे नव्हे, स्वतंत्र धागा म्हणून!

बाकी येथील चर्चेत भलेबुरे बोलले गेले असल्यास चु भ द्या घ्या आणि माझ्या येथे असण्याचा ज्यांना राग येत होता व ज्यांना गंमत वाटत होती त्यांच्यापैकी सदस्य म्हणून हयात असणार्‍यांना दंडवत! नसणार्‍यांना श्रद्धांजली!

-'बेफिकीर'!

स्वरुप्,तुमची पोस्ट संतुलित आहे वास्तविकतेला धरुन आहे.पण येथिल काहीजणांनी धागाकर्तिचा उद्देश समजुन न घेता बरेच गैरसमज करुन घेतलेत जौ दे जेवढे पटले तेवढे घ्यायचे बाकिचे सोडून द्यायचे

सकाळी मी लिहीले होते की काही घटनान्बद्दल लिहीन म्हणून त्या लिहीते.

१) मी १० वीत होते. दुपारी २ वाजता ( सुट्टी असल्याने दुपारी क्लास होता) ट्युशनला चालले होते. एक मुलगा जो माझ्या मागे होता, ( त्याचा विचीत्रपणा मला तेव्हा कळला) त्याने भर रस्त्यात मला लेटर देण्याचा प्रयत्न केला. जो मी हाणुन पाडला. पण त्याने शिव्या द्यायला सुरुवात केल्यावर मी मदतीकरता ओरडले. समोरासमोर अशी चार दुकाने होती, मालक, नोकर काम करत हा तमाशा बघत होते पण एकही जण मदतीला वा त्या नालायकाला जाब विचारायला आला नाही. कशीतरी मी निसटले. मग घरी बाबाना हे सान्गीतले. बाबा खूप सन्तापले. मी त्या मुलाला जाताना पाहील्यावर बाबाना दाखवले. त्यानी त्याला चान्गला दम भरला. त्यानी सान्गीतले की आता समजावतो आहे, पुढे तिच्या वाटेला गेलास तर पोलीसात देईन. मामला तिथे खतम. पण किती दिवस मी एकटी कुठे जातच नव्हते.

२) शहराचे नाव देत नाही. आमचे नातेवाईक जिथे रहातात, त्या गल्लीत त्यान्च्या सोसायटीमधली मुलगी किराणा घेऊन येत होती. तिला शेजारच्या सोसा. मधल्या एका मतीमन्द मुलाने पकडले आणी खाली पाडुन तिचे कपडे फाडायचा प्रयत्न करु लागला.ती रडुन ओरडुन प्रतीकार करत होती. पण बरेचसे लोक ( यात बायका पण होत्या) खिडकी तुन बघत होते, पण कोणी आले नाही. नेमके नातेवाईक आणी त्यान्चा ऑफिसमधला सहकारी तिथुन येत होते, त्यानी त्या मुलाला चार दणके घालुन त्या मुलीला सोडवले. सुखरुप घरी सोडले. त्या मुलाच्या आईला मग बाकी लोकानी दम भरला. पण तो मुलगा आईची नजर चुकवुन बाहेर आला होता. बुद्धीने मन्द असला तरी शरीराने दणकटच होता.

३)वरील घटना बर्‍याच जणान्च्या बाबतीत घडतात देखील. पण प्रश्न हा असतो की ( जो बस्केने लिहीला आहे तरी मी विचारते ) बघणार्‍यात पुरुष वर्ग पण मोठ्या प्रमाणावर असतो, मग तो निव्वळ बघ्याचीच भूमिका का घेतो. उपरोक्त प्रसन्ग आपल्या आई-बहिणी वा बायकोबरोबर पण घडु शकतो हे का विचारात घेतले जात नाही? मागे मुम्बईत एका मतीमन्द मुलीवर लोकलमध्ये अतीप्रसन्ग झाल्यावर तिथल्या अनेक पुरुष प्रवाश्यानी बघ्याचीच भूमिका का घेतली? त्या अत्याचार्‍याला सगळे झाल्यावर का पकडले आधीच का नाही रोखले? की जे चालले आहे ते मनोरन्जक किन्वा ब्ल्यु फिल्म टाईप दिसत होते?

अत्याचारी १ किन्वा २ च असतात, पण बघणार्या पुरुषान्ची सन्ख्या शे- दिडशे असतेच ना? मग ते का नाही मदत करत? बायकान्पेक्षा पुरुष शरीराने दणकट असतात. ( बायका पण असतात, पण अभावाने) मग ते प्रतीकार/ मदत का करत नाहीत?

पान्ढरपेशा समाज जास्त धोकादायक असतो. यान्ची केवळ बघ्याचीच भूमिका असते. एखादा चोर सापडला की लोक त्याला मारुन हात साफ करुन घेतात मग बायकाना मदतीची वेळ आली की मागे का? जे मदत करतात ते नक्कीच प्रशन्सनीय आहेत. पण एक-दोघेच का? सारा समाज का नाही?

हे ठामपणे विचारतेय कारण माझ्या घरचा अनूभव आहे. माझ्या घरच्या लोकानी केवळ बघ्याची भूमिका न घेता मदत केली आहे. त्यामुळे मला मामीन्चा प्रश्न योग्य वाटतो आहे. २ दिवस इथे नसण्याची शक्यता असल्याने उत्तर देता आले नाही तर गै. नसावा

रश्मी.. परत एक्दा टाकतो

मुख्य मुद्दा असा आहे कि, गटारात उतरून हात काळे कोण करणार. आणि गटारात उतरल्यावर कोणी अंगावर आल्यावर इतरांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहणार कि आपल्याच भावाला, वडिलांना, नवऱ्याला सोबत घेऊन साफसफाई करणार. चला घराघरात शिवाजी तयार करूया आणि नंतर इतरांच्या घरात डोकाऊन पाहू.

सुनटुन्या मला हेच म्हणायचे आहे की इथे सन्स्काराची पण कमी पडतेय. माझ्याच एका नातेवाईक पुरुषाने घरातल्या मुलाना ठणकावुन सान्गीतले होते की तुम्हाला बहीण नाहीये, त्यामुळे आईला स्वयम्पाकापासुन सर्व प्रकारची मदत केलीच पाहीजे. तुम्हालाही सर्व आलेच पाहीजे आणी मुख्य म्हणजे तुम्हाला बहीण नसली तरी बाजूच्या स्त्रीयाना -मुलीना मान द्यायला शिका. मला मान खाली घालावी लागेल असे वागु नका. मुले आज खरोखर आदर्श आहेत. तोन्डात कधीही अपशब्द नसतो आणी वागतही नाहीत. असेच सन्स्कार लहानपणापासुन आपल्या मुला-मुलीन्वर केले तरच घरा-घरात शिवाजी महाराज आणी झाशीची राणी जन्माला येतील.

मतीमन्द मुलीवर लोकलमध्ये अतीप्रसन्ग झाल्यावर तिथल्या अनेक पुरुष प्रवाश्यानी बघ्याचीच भूमिका का घेतली? त्या अत्याचार्‍याला सगळे झाल्यावर का पकडले आधीच का नाही रोखले? >>>> रश्मी, मला वाटते की त्या एका क्षणात जर आपल्याकडून स्पाँटेनियसली हालचाल झाली तरच हे शक्य होते.म्हणजे व्यक्ती करते पेक्षा व्यक्तीकडून उत्स्फूर्त्पणे केले गेले.जसे चेंबूरच्या घटनेत दुकानदारावर तलवारीचा हल्ला करण्यार्‍यावर गिर्‍हाईकाने पटकन त्याचा हात धरला होता.ती क्रिया त्या माणसाकडून केली गेली.

देवकी, हो ती घटना ( चेम्बुरची) मी टिव्हीवर बघीतली. मदत करणारी व्यक्ती चे मला खरच खूप कौतुक वाटले. जीवाची पर्वा न करता त्यानी मदत केली. पण मतीमन्द मुली बाबत का असे घडले? समाज ( ते लोकलमधले लोक) का थिजला? मध्यन्तरी २ मुली बेस्टच्या धक्क्याने जखमी झाल्या, त्या मदत मागत होत्या, पण कुणी मदत केली नाही ( एक अमृता नावाच्या स्त्रीचा अपवाद सोडला तर). त्या दोघी बिचार्‍या जागीच गेल्या. समाज खरच एवढा हृदयशुन्य झालाय? पोलीस मागे लागतील असे गैरसमज असतात का? मला काय त्याचे असे वाटते का?

समाज खरच एवढा हृदयशुन्य झालाय? पोलीस मागे लागतील असे गैरसमज असतात का? मला काय त्याचे असे वाटते का?>>>.दुर्दैवाने हे खरे आहे.आपल्याला काय करायचंय, पोलिसांना कोण तोंड देणार्,त्यापासून चार हात लांब राहिलेले बरे, हे आणि असेच काहीतरी.
त्या घटनेच्यावेळी मलाही हाच प्रश्न पडला होता.तो एकटा होता ,भले सुरा हातात होता,पण डब्यातले कोणीच कसे धावले नाही.अजूनही ती घटना सतावते.

झाले गेले विसरुन जा. कृपया भांडु नका.
१) सगळे पुरुष 'तसेच' असतात- अजिबात नाही. महिल्या एकट्या असताना वाईट पुरुष वाटेत आला तर कित्येक वेळेला दुसरा पुरुषच मदतीस येतो.
शक्तीने दुय्यम असणारी (हे नैसर्गिक आहे. अपवाद आहेतच) स्त्री, शक्ती जास्त असलेल्या पुरुषा कडे मदतीच्या अपेक्षेने बघते.
२) पुरुषांना मदत करताना 'नको करयला' असे वाटणे या साठी काहि स्त्रियांच- खोट खोट कांगावा करणार्‍या जबाबदार आहेत. त्यातुन कायदे स्त्रियांच्या बाजुने आहेत. मग नाहक बदनामी, पुढचे मनस्ताप हे टाळणे हे पण नैसर्गिक आहे.
३) नक्की कुठे कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न सगळ्यांना लागु आहे.

हा धागा पुरुषांना आणि फ़क्त पुरुषांना टारगेट करणे या साठी नक्किच नाहिये.

आई अथवा आजी, घरातील वडिलधारी स्त्रि, वयात येणार्‍या मुलीला ज्या काही सुचना/सल्ले देते तश्या प्रकारच्या सुचना/सल्ले पुरुष म्हणुन मुलाला दिल्या जात नाहित. (हे सरसकट विधान नाहिये. अपवाद आहेतच).
वडिलांनी, आजोबांनी, अथवा मोठ्या भावाने.. वयात येणार्‍या 'मुलांना' जर हे सांगीतले, ही जाणीव दिली की, तुझ्या बरोबर शिकणारी, खेळणारी, ओळखीची किंवा अनोळखी मुलगी हिच्या कडे बघण्याची नजर चांगली असुदे. ती सक्षम आहे पण गरज पडल्यास तु नक्की मदत कर. इ.इ.
हे ज्यांना नाही सांगीतले ते सगळे वाईट च निघाले अस अजीबात नाही. कृपया यावर गैरसमज करुन घेवु नये.

स्त्रियांन साठी अनेक अलिखित नियम आहेत - कपडे, वाग़णे, बोलणे कसे असावे या साठी, पण मग ते मुलांन साठी पण असावेत इतकेच.
हे समानता या अर्थाने पेक्षा समाजातील नियम या अर्थानेच असावे/ घ्यावे.

शिर्षका तील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर खुप सोप्पय. जे लिम्बु जीनी दिलय. एक पिता, समाजातील पुरुष सगळ्या भुमिका विचारात घेवुन उत्तर दिले आहे. दि.मा. नी अजुन एक कोन दिला.

इथे विचारण्यात आलेल्या प्रश्ना ची उत्तरे माझ्या घरातील पुरुषा ना विचारेन.
बघुया काय उत्तरे मिळतात.

अवांतर होतेय पण माझ्या आईच्या, कॉलेजदिवसातला किस्स्सा.
एक पोक्त माणूस, सकाळी कॉलेजजवळील रस्त्याच्या कडेला उभा रहायचा आणि मुली दिसल्या की अश्लील चाळे करायचा.प्रथम दुर्लक्ष केले.नंतर एका मुलीने त्याच्या खाडकन मुस्काटीत भडकावली आणि म्हणाली उद्यापासून इथे दिसलास तर याद राख.दुसर्‍या दिवशीपासून तो माणूस तिथून गायब झाला.

Pages