भिजवून थोडे मोड आलेले मसूर एक वाटी
सुके खोबरे किसून पाव वाटी
कांदे ४
तेल ४ चमचे
तिखट १ चमचा
हळद १/४ चमचा
हिंग चिमूटभर
धणे १ चमचा
दालचिनीचे एक इंचाचे तीन तुकडे
लसून ५ पाकळ्या
आलं अगदी छोटा तुकडा
कोथिंबीर
चिंच २ बुटुक
मीठ चवीपुरते
मसूर आधल्या दिवशी ४ वाजता भिजत घालावेत. रात्री उपसून फडक्यात बांधून ठेवावेत. सकाळी निवडून घ्यावेत.
३ कांदे उभे चिरून घ्यावेत. १ कांदा बारीक चिरून घ्यावा.
तळके वाटण * : कढई तापवावी. त्यात उभा चिरलेला कांदा टाकावा. थोडा परतला की १ चमचा तेल टाकून परतावा. त्यात आलं, लसूण चिरून टाकावा. १ चमचा धणे टाका. १ दालचिनीचा तुकडा टाका. चांगला ब्राऊन रंग होई पर्यंत परता. मिक्सरमध्ये हे सर्व काढून घ्या.
आता कढईत सुक्या खोब-याचा किस घाला. मंद आचेवर चांगला लाल होऊ द्या. हेही मिक्सरम्ध्ये घ्या. कोथिंबीरीतला एक हिस्सा यात टाका. आता मिक्सरवर हे वाटण अगदी उगाळलेल्या चंदनसारखे गुळगुळीत वाटून घ्या.
आमटी :
मोठ्या भांड्यात तीन चमचे तेल तापत ठेवा. त्यात दालचिनीचे २ तुकडे टाका. हिंग टाका. गॅस बारीक करून हळद, तिखट आणि १/२ हिस्सा कोथिंबीर घाला. लगेच कांदा घाला. कांदा थोडा परतला, त्याचा रंग बदलला की मसूर घाला. परता. तेल सुटू लागले की त्यात वरचे तळके वाटण टाका. परता. पाणी घालण्याची अजिबात घाई करू नका. ८-१० मिनिटे बारीक गॅसवर परतत रहा. मिश्रण तेल सोडू लागले, रंग ब्राऊन झाला की त्यात आवश्यक तेव्हढे पाणी घाला. आता गॅस मोठा करा. एक उकळी आली की गॅस बारी करून झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवा. भरपूर परतले असल्याने ५ मिनिटात मसूर शिजतात.
आता झाकण काढून मसूर शिजला आहे ना हे तपासा. आता त्यात चवीपुरते मीठ टाका, २ बुटुक चिंच टाका. पुन्हा मंद गॅसवर ५ मिनिटे उकलत ठेवा. आता चिंचेची बुटुकं शोधून बाहेर काढा. मग आमटीत उरलेली किथिंबीर घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा. तयार आहे मसूरची आमटी उर्फ व्हेज मटण.
१. तळके वाटण ही सीकेप्यांची खासियत. प्रत्येक पदार्थानुसार यातले घटक काही प्रमाणात बदलतात. जेसे मटण असेल तर आलं, लसून जास्ती घेतले जाते शिवाय लवंग्-दालचिनी-मिरे अॅड होतात. मूगाचे बिरडे असेल तर आलं, गरम मसाला वगळले जातात, मसूराच्या आमटीला आलं-लसून दोन्ही कमी केले जातात, त्यात दालचिनी अॅड केली जाते, इ...
२. ही आमटी आंबोळ्यांबरोबर फर्मास लागते. तेव्हामात्र आमटीमध्ये पाणी जास्ती घालतात अन तिखटही वाढवतात.
३. वर सांगीतलेली आमटी तांदळाची भाकरी, फुलके, भात या बरोबर मस्त लागते. भात-आमटी, भाजलेला पापड अन लोणचे... वा !
४. श्रावणात आम्हा सीकेप्यांना मटणाचा फार विरह होतो. तो सोसायला ताकद म्हणून हे व्हेज मटण फार फार उपयोगी पडते चव खरोखर मटणासारखी येते. फक्त परतायचा कंटाळा करता कामा नये
मी काल केली होती, थोडे खोबरे
मी काल केली होती, थोडे खोबरे जास्त झाले असावे पण चव भन्नाट आली होती.. कोकणासारखा धुंवाधार पाऊस नव्हता तरीही मजा आली.
(No subject)
आज केली होती ही आमटी. मस्त
आज केली होती ही आमटी. मस्त लागली. आवडली.
चींचेच्या ऐवजी एक टोमॅटो घातला. आणि कोथिंबीर जराशीच होती.
पुन्हा एकदा भरपुर कोथींबीर घालुन करुन बघणार.
धन्यवाद अवल
श्रावण जवळ आला, आता आठवणारच
श्रावण जवळ आला, आता आठवणारच ही आमटी
आरती, चिंच घालून कर एकदा. कोथिंबीर नसली तरी चालेल, चिंच मस्टच ग
आज केली ही आमटी. तिखट अगदी
आज केली ही आमटी. तिखट अगदी नावापुरतेच घालूनही छान चविष्ट बनली. अर्धांगालाही आवडली खूप.
वा वा खूप दिवसात खल्ली
वा वा खूप दिवसात खल्ली नाहीये मसूर आमटी. बरी आठवान झाली.
अजुन एक सजेशन, हे तळके वाटण करून ठेवावे. फ्रीझर मधे १५-२० दिवस रहाते. मग यात अन्डा करी करता येते. किन्वा मसूरीची खिचदी करायला वपरता येते.
अस्सल सीकेपी घरात कायम करून ठेवलेले सपडेल.
काल केली.... ह्याच पद्धतीने
काल केली.... ह्याच पद्धतीने केली. अप्रतिम झाली.... नवर्याने भांडे फोडुन खाल्ली.....
(No subject)
आज चवळीची उसळ केलीय ह्या
आज चवळीची उसळ केलीय ह्या पद्धतीने. करताना हे पान उघडून ठेवलं होतं पण जऽरा खाली स्क्रोल करुन अवलची दुसरीच प्रतिक्रिया न पाहिल्याने ओरिजिनल वाटणातच केली. शिवाय वर कांदा कोथिंबीर फरसाण- मऽस्त लागतेय !
ह्या पद्धतीने उसळ केली की लेक अगदी आवडीने चाटूनपुसून जेवतो
एक पोर्शन वाटण फ्रीझरला टाकलंय. अजून एकदा उसळ होईल.
(No subject)
Pages