काही दिवसापूर्वी सागरिका घोष नामक पत्रकार महिलेने असे ट्वीट केले होते की, “पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही “. या बाई व अन्य अनेक तथाकथित “ धर्मनिरपेक्ष सेक्युलर इत्यादि इत्यादि “ पत्रकार व मीडिया मुघल्स यांचीदेखील विचारसरणी व वर्तन पाहता ह्या मंडळींना भारतीय म्हणावे का? व ही मंडळी नक्की भारताच्या भल्यासाठी काम करत असावेत की परकीय अथवा देशविघातक शक्तींच्या अजेंड्याचे समर्थन करण्यासाठी? असा प्रश्न पडतो!
भाजपाप्रणीत केंद्र सरकार अन विविध राज्यातील भाजप सरकारे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पराकोटीचा द्वेष करत सतत कुठलीतरी खुसपटे काढून त्रास देण्याचा प्रयत्न करणे , संघपरिवार आणि अन्य उजव्या विचारांच्या संस्थांना बदनाम करण्याची कारस्थाने करणे , मीडियातून सरकार भ्रष्ट आणि निष्क्रिय असल्याचे खोटे चित्र सतत उभे करणे असे अनेक उद्योग ही मंडळी करत असतातच ,पण भारतीय सैन्यदल आणि प्रशासनातील प्रामाणिक अधिकारी यांच्यावरही यां मंडळींचा डोळा असतो . यांना पैशाचा पुरवठा नक्की कुठून होतो? देशविघातक शक्ती तर अशा मीडिया हाऊसेस ना अप्रत्यक्ष रीत्या कंट्रोल करत नाहीत ना? असा दाट संशय येतो.
असा प्रकार यापूर्वी कथित “पर्यावरणारक्षक” एनजीओज बद्दल झालेला आहे . जगातील भारतद्वेष्ट्या संस्था आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीस खीळ घालू पाहणार्यान मंडळींनी अशा “पर्यावरणारक्षक” एनजीओज ना छुपे फंडिंग करत पर्यावरणाचे बाहुले उभे करून उद्योगधंद्याना व विशेषत: पॉवर प्रोजेक्टस ना अडचणी आणल्या होत्या . तसाच प्रकार मीडिया च्या बाबतीत होत आहे का ? दुसर्या एका धाग्यात उल्लेख केल्यानुसार आज किंवा उद्या प्रत्यक्ष युद्ध झाले ,तर मीडिया ची भूमिका नक्की काय असेल ? व त्याचे काय भीषण परिणाम होऊ शकतात ? अशा अनेक शन्का मनात दाटून आल्या .कारण आजकाल “मीडिया म्हणजे उपाय कमी अन अपाय जास्त” अशी स्थिती सध्या दिसत आहे . म्हणून हा लेखनप्रपंच!
जाणकारांनी आपली मते अवश्य मांडावीत !
उड्न खटोला तुम्हाला हा प्रश्न
उड्न खटोला तुम्हाला हा प्रश्न आत्ताच का पडला ? म्हणजे वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, ललित मोदि, व्यापम घोटाळा, चिक्की घोटाळा हे सुरु झाल्यावरच का पडला ? जेव्हा मिडिया मोदिंची भजने गात होती तेव्हा नाहि पडला ?
माणुस१, छे हो! वरुण गांधींनी
माणुस१,
छे हो! वरुण गांधींनी सोनियांचं नाव घेतल्यावर ललित मोदींच्या नावाने हंगामा करणारी तमाम पत्रकार मंडळी एकदम थंड पडली. म्हणून मला आत्ता पडला हा प्रश्न!
आ.न.,
-गा.पै.
खरच ठरवा मिडियाच करायच
खरच ठरवा मिडियाच करायच काय.मिडीया नंतर अजुनही बरेच असतिल.सार्यांच काय करायच ते ठरवा.चक्क धुतल्या तांदळा सारख्या प्रखर राष्ट्र्भक्तान्वर टिका.खरच कलियुग आलय.
पैलवाना , वरुण गांधीने ललित
पैलवाना ,
वरुण गांधीने ललित मोदीला मोठ्या रकमेच्या मोबदल्यात सोनियाकाकूला सांगून तुला सोडवतो असे सांगितले होते.
प्रपोझल वरुणचे होते , काकूंचे नाही.
मदर डाय बट आँट सर्वायव्ह अशी म्हणाहे.
बिच्चार्या वरुने आँट म्हणजे काकु असा अर्थ घेतला.
lalitshinde, मग आपल्या
lalitshinde,
मग आपल्या लोकशाहीच्या चौथ्या खांबाने वरुण गांधींची पोलखोल करायला काय हरकत होती? उपयोग काय नायतर त्या खांबाचा? कोण्या चतुष्पादाची तंगडी वर करायला का?
आ.न.,
-गा.पै.
मी सागरिका घोष यांचे वक्तव्य
मी सागरिका घोष यांचे वक्तव्य वाचलेले नाही वा ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये केले आहे ते ही पाहिलेले नाही. मात्र मला त्यांचा विचार पटला. पत्रकाराने केवळ सत्य समोर आणणे अपेक्षित आहे - तो/ती देशभक्त असायलाच पाहिजे याचा त्याचा/तिच्या पत्रकारितेशी संबंध नाही.
जी माहिती प्रसारीत करणे बेकायदेशीर आहे (कॉन्फिडेन्शिअल असे लेबल असलेली) ती पत्रकार वा इतरही कुणी प्रकाशित करणे हे बेकायदेशीर आहे. पुन्हा त्याचा देशभक्तिशी संबंध नाही.
देशभक्त पत्रकारापेक्षा लायक पत्रकार मी पसंद करेन.
पत्रकारांनी देशभक्त असावेच,
पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही.
>>>
कधी आणि कश्याचा संदर्भात म्हटले होते.
यात तसे वावगे काही नाही. देशभक्त नसणे म्हणजे देशद्रोही असणे असे होत नाही.
वरुण गांधीबद्दल पेप्रात
वरुण गांधीबद्दल पेप्रात आल्यावरच सर्वाना समजले ना ? पत्रकारित चौथा स्तंभ की पाचवा ?
देशभक्त नसणे म्हणजे देशद्रोही
देशभक्त नसणे म्हणजे देशद्रोही असणे असे होत नाही.
सेम असल्या धाटणीचे वाक्य मद्रास कॅफे नामे हेरपटात होते,
बाकी धाग्याबद्दल बोलायचे झाल्यास, धागाकर्त्याने काही गोष्टी स्पष्ट कराव्यात
१ धागा मीडिया काय बोलतोय ह्याच्यावर आहे का?
२ धागा बीजेपी व संघाला विक्टिमहूड क्लेम करायला काढलाय काय?
३ धागा मीडिया च्या देशभक्तिवर असल्यास देशभक्ति ची समग्र परिभाषा धागाकर्त्याच्या विचारांती काय ठरते आहे?
सहसा मला राजकीय फ्रंट वर बोलायला आवडत नाही कारण कायदेशीर सज्ञान प्रत्येक माणसाने प्रत्येक एक एक पक्ष पकडून आपापला एक यूटोपिया बांधलेला असतो अन सहजी आपले विचार मॉडिफाई करायला तो तयार नसतो मग वांझ चर्चा करून उपयोग काय? शिवाय
ह्या प्रश्नावर किंवा धाग्यावर मी काहीही बोललो तरी ही मते बापुसाहेब नामे व्यक्तिची असतील, अधिकारी म्हणुन नव्हे, म्हणुन बोलु का नको ती आगाऊ परवानगी मागतोय
सोन्याबापू, जरूर लिहा.
सोन्याबापू, जरूर लिहा. वाचायला आवडेल.
कायदेशीर सज्ञान प्रत्येक माणसाने प्रत्येक एक एक पक्ष पकडून आपापला एक यूटोपिया बांधलेला असतो अन सहजी आपले विचार मॉडिफाई करायला तो तयार नसतो >>> हा जर नियम असेल तर माझ्यासारखे अनेक त्याला येथे अपवाद आहेत. मी मायबोली वर येउ लागल्यापासून अनेक विषयांवरची माझी मते येथील वेगवेगळे दृष्टिकोन वाचून बदलली आहेत. असे माझ्यासारखे इतर अनेक आहेत जे येथे तशी चर्चा करू पाहतात. आपले जे ठाम समज आहेत त्याच्यापेक्षा वेगळे विचार सांगणारी पुस्तके, लेख वाचणे व त्यातून आपले स्वतंत्र मत बनवणे याकरता एक वैचारिक फ्लेक्झिबिलिटी लागते तसे मला येथे किमान काही लोक दिसले आहेत.
त्यामुळे चर्चा करायला आवडत असेल तर तुमचीही मते वाचायला आवडतील.
सोन्याबापु तुम्ही जरूर लिहा.
सोन्याबापु तुम्ही जरूर लिहा. आणी फारेंड म्हणतो तेही बरोबर आहे.
देशभक्तीचा अर्थ "My country, right or wrong" इतका मर्यादीत असेल तर देशभक्त पत्रकारांपेक्षा लायक पत्रकारच बरे.
इंदिरा गांधींना जिथे तिथे परकिय हात दिसतो अशी टीका करणारा भाजप सत्तेवर येताच त्यांनाही जिथे तिथे परकीय हात दिसू लागला.
देशभक्तीचा अर्थ "My country,
देशभक्तीचा अर्थ "My country, right or wrong" इतका मर्यादीत असेल तर देशभक्त पत्रकारांपेक्षा लायक पत्रकारच बरे. >> या धाग्याचा विषय मलाही thought provoking वाटला. देशद्रोही नाही पण देशभक्तही नाही म्हणजे नक्की काय? सहसा कोणत्याही व्यवसायातील नीतीमत्ता ही देशहिताच्या विरोधी (conflicting) असू शकेल का, आणि तशी ती असली तर देशहिताला प्राधान्य का देउ नये?
>>>> पत्रकाराने केवळ सत्य
>>>> पत्रकाराने केवळ सत्य समोर आणणे अपेक्षित आहे - तो/ती देशभक्त असायलाच पाहिजे याचा त्याचा/तिच्या पत्रकारितेशी संबंध नाही. <<<<
होय रे होय, खर्रच रे टण्या.... तुला पटलय म्हणजे ते योग्यच असले पाहिजे.
पत्रकारांनी केवळ "सत्यच" पुढे आणले पाहिजे, जसे की ते २००८ मधिल हेलिकॉप्टरच्या मार्फत सैन्य उतरविण्याचे दृष्य आख्ख्या जगाला (अन अर्थात अतिरेक्यांनाही) दाखविणे असो वा तत्सम अन्य काही.
आता या सत्याची व्याख्याही करुन टाक.
[उडनखटोला, मिडीया/पत्रकार वगैरेंना मी "लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ" वगैरे मानित नाही. कारण आपण "पत्रकार आहोत" असे कार्ड वगैरे दाखवुन दंडेलशाही करणारे व पैसे/खंडणी वसुल करणारे पत्रकार भेटले आहेतच, शिवाय अमुक एकाला टारगेट करीत आयुष्यातुन उद्ध्वस्त करण्याची त्यांची "दांडगी क्षमता" व ती वापरण्याची तयारी देखिल माहित आहेच. तुम्ही मांडला तो विषय मला पटतो आहे. फक्त यावर काय करावे हे उमजत नाहीये ]
एखादा लबाड देश मुद्दाम दोन
एखादा लबाड देश मुद्दाम दोन देशांत युद्धं लावून स्वतः शस्त्रास्त्र बनवून विकत असेल, आणि पत्रकारांना देश तसं करतोय याची बातमी लागली तर देशाचं आर्थिक हित बाधित होऊ नये म्हणून पत्रकारांनी ती बातमी उजेडात आणावी की न आणावी?
उजेडात आणली तर देशाची बदनामी होऊन, आर्थिक आवकही कमी होणार; न आणावी तर पत्राकारितेशी बेईमानी.
इथे बघा पत्रकारिता आणि देशहित यात कन्फ्लिक्ट आहे.
बायदिवे, "पंचमस्तंभी कारवाया"
बायदिवे, "पंचमस्तंभी कारवाया" यातिल पंचमस्तंभी हा शब्द पत्रकारितेकडे बघुनच आलेला आहे का?
>>>> एखादा लबाड देश मुद्दाम
>>>> एखादा लबाड देश मुद्दाम दोन देशांत युद्धं लावून स्वतः शस्त्रास्त्र बनवून विकत असेल, आणि पत्रकारांना देश तसं करतोय याची बातमी लागली तर देशाचं आर्थिक हित बाधित होऊ नये म्हणून पत्रकारांनी ती बातमी उजेडात आणावी की न आणावी? <<<<
साती वर वर पहाता उदाहरण बरोबर वाटतय, फक्त याच्यात तमाम राज्यकर्ते/नेते/प्रशासन हे दुधखुळे आहे असे गृहित धरले आहे. ते तितकेसे पटत नाही.
युद्ध लावुन देणार्यांचा "पर्दाफाश" वगैरे बाजुला ठेवले क्षणभर तरी याव्यतिरिक्त, गेली साठ वर्षे पब्लिकच्या समोर एकाच जळीस्थळीकाष्ठीपाषाणी एकाचएका महात्म्याचा चेहरा नाचवित अस्थानी अतिरेकी "अहिंसेचे" अति कोडकौतुक करीत आपल्याच देशाला स्वसंरक्षणाचे बाबतीत आपणच कमजोर बनवित चाललोत हे सत्य या तथाकथित सत्यान्वेषी पत्रकारांनी कधी उजेडात आणल्याचे आठवत नाही.
शिवाय कित्येकदा आंतरराष्ट्रीय संबंधामधील राजकारणात, समोरचे राष्ट्र शब्दशः अमुक व्यवहारात आपल्याला डोईजड होतय असे माहित असूनही अनेक अन्य कारणात आपला हात अडकलेला असल्याने ते ते व्यवहार तसेच चालू ठेवावे लागतात यात नविन काही नाही, व अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेत एखादा पत्रकार "आपल्याला बरेच काही गुपित" समजल्याचा आव आणित "अर्धवट सत्य" प्रकाशित करतो, तेव्हा ते राष्ट्राच्या धोरणांच्या दृष्टीने घातक ठरते. असे माझे मत.
आता गेली साठहून जास्त वर्षे
आता गेली साठहून जास्त वर्षे किती "सत्याचे समर्थक पत्रकार" हे कबुल करुन बसलेत की "अहिंसेने" राष्ट्राचे संरक्षण होत नाही, झालेले नाही ? का नाही यामागिल सत्य कधी या पत्रकारांनी उजेडात आणले? नाहीच आणणार.... कारण हे तथाकथित पत्रकारही त्यांना व त्यांच्या मालकांना "सोईस्कर" तेव्हडेच अर्धवट सत्य जगापुढे मांडणार, ते देखिल टीआरपीच्या हिशोबात, पब्लिकला चाळवत चाळवत, व सकाळची बातमी संध्याकाळी शिळी होते या नियमाला जागून सदैव निव्वळ "बातम्यांच्या शोधात" वा "बातम्या बनविण्याच्या धन्द्यात" सामिल असणार. तेव्हा या पत्रकार वगैरे मंडळींच्या "सत्याचा आग्रह" वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही.
लिंबुटिंबु, मी पण तेच
लिंबुटिंबु, मी पण तेच म्हणतेय. ( अर्थात प्रशासन दूधखुळे नाही त्यात, देशाची युस्धंविषयक आणि शस्त्रास्त्र विषयक निती प्रशासक आणि राजकारण्यांनीच ठरवलेली आहे.)
वर फारएण्ड यांनी 'कोणत्या व्यवसायाची नितीमत्ता देशहितविरोधी असू शकेल का?' या विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर आहे.
पण, उडनखटोला, "सत्य"
पण, उडनखटोला, "सत्य" अर्धवटरित्या व सोईस्कर तेव्हडेच तितकेच एकतर्फी प्रसारित करण्याच्या पत्रकारादी मिडीयाला समांतर अशी एक खंबीर प्रतिकारशक्ति उभी राहिली जी खरेतर प्रत्यक्षात मिडीयाच्या विरोधात जातच नाही, पण मिडीयाने पाजळलेली अक्कल पारखुन तपासुन घेऊन मिडीयाच्याही दसपट वेगाने त्यातिल तथ्य प्रसारित करते, अन या ताकदीचा अनुभव न घेतलेले किंवा त्याचा अंदाज न आलेले लोक सोशलमिडीया/SMS/FACEBOOK/WHATSAPP वगैरे वापरुन इलेक्शना जिंकता येत नाहीत असे म्हणत होते, त्यांना गेल्या सालीच जबरदस्त चपराक बसलेली आहे. पत्रकारांनी प्रसिद्ध केलेले कोणत्यही एकतर्फी अर्धवट सत्याची दुसरी बाजू या सोशल मिडीया मार्फत सामोरी येतेच येते व पूर्वी सारखे एकतर्फी वृत्तपत्रीय/टीव्ही इत्यादीक माध्यमांच्या मार्फत जनसामान्यांचा बुद्धिभेद करण्याची क्षमताच पत्रकार गमावुन बसलेत असे मला वाटते.
सत्य म्हणजे नक्की काय
सत्य म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? सत्य कधीही एकआयामी नस्तं, ते बहुआयामे अस्तं आणि आपण कुठं उभे आहोत आणि आपल्या डोळ्यांवर कुठल्या रंगांचा चष्मा आहे यावर आपल्याला दिसणारं सत्य ठरतं.
>>>> वर फारएण्ड यांनी
>>>> वर फारएण्ड यांनी 'कोणत्या व्यवसायाची नितीमत्ता देशहितविरोधी असू शकेल का?' या विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर आहे <<<<
ओके.... तरी एक प्रश्न रहातोच ग साती..... मूळात फारेन्डाला तरी हा असा इतका बाळबोध प्रश्न का पडावा?
कारण निव्वळ स्वार्थांधाने प्रेरित झालेला कोणताही व्यवसाय देवदेशधर्माच्याविरोधी असू/बनु शकतो हे काय नव्याने सांगायला हवय का? ग्यानबाची मेख इथेच आहे की, जे लोक "देव, देश, व धर्म" यातिल कशालाच न मानण्याचे समर्थन करतात, त्यांच्या स्वार्थान्धत्वाची परिसीमा ती काय वर्णावी? अन असे म्हणणारे लोक व्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थन करताना, हेच व्यक्तिस्वातंत्र्य युरोपअमेरिकेतुन आयात केलेले आहे हे मात्र विसरुन परत युरोपअमेरिकेवर टीका करायला मोकळे होतात, कारण युरोप अमेरिकेतील व्यक्तिस्वातंत्र्य हे पहिल्यादुसर्या महायुद्धातील अपरिमित जिवित हानीतून जन्माला आलेले आहे व त्यांना त्याची किंमतही आहे व त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य देशहिताविरुद्ध जात नाही, मात्र एतद्देशीय सोईपुरते हे व्यक्तिस्वातंत्र वापरतात व ते देखिल तद्दन माओवादी/कम्युनिस्ट/समाजवादी भुक्कड विचारांच्या प्रसाराकरता, ज्या विचारांचा प्रसार होऊन जर खरोखरीच ये देशी कम्युनिस्ट/समाजवादी राजवट आलीच तर व्यक्तिस्वातंत्र्य राहूदे दूर, जगण्याचेही स्वातंत्र हिरावुन घेतले जाइल हे समजायला परत परत रशिया/चीन व अन्य कम्युनिस्ट राजवटींचे दाखले उगाळायला नकोत. असो.
तुम्ही काय लिहिताय हे माझ्या
तुम्ही काय लिहिताय हे माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे.
तेव्हा, फुलस्टॉप!
साती, तुझ्या वरच्या पोस्टला
साती, तुझ्या वरच्या पोस्टला लाईक केले बर का
(No subject)
बाप रे काय डेडली पोस्ट्स आहे
बाप रे काय डेडली पोस्ट्स आहे लिंबू तुझ्या? त्या समजल्या, व त्याचा येथे रीलेव्हन्स काय आहे ते जर समजले, तर लिहीतो :). अहिंसा बिहिंसा ही येउन गेलेली दिसतीय त्यात.
साती - ते उदाहरण बरोबर आहे कॉन्फ्लिक्ट चे. मगाशी वाचून गेलो आणि आणखी विचार केल्यावर असे वाटले की हा खरा कॉन्फ्लिक्ट नाही. कारण एखाद्या देशाने असे केले तर ज्या राजकीय संस्था ते करत असतात ते त्यांच्या स्वतःच्या नियमाविरूद्ध व कदाचित देशाच्या कायद्याविरूद्धही असते, त्यामुळे ते उघड करणे ही पत्रकारीय नीतीमत्ता देशहिताच्या आड येणार नाही. हा अँगल योग्य वाटतो का? I am not sure myself.
बाय द वे यातील लबाड देश जर अमेरिका असेल तर तेथे असे उघड करणे सर्रास होत असते. पण हेच जर रशिया चीन ने केले तर कोणाला कळणारच नाही. त्यामुळे लोकशाही देश अशा बाबतीत आपोआप कमकुवत होतात - कारण त्यांची सिक्रेट खुली असतात, इतरांची नाहीत. त्यामुळे पत्रकारांनी इथे level playing field आहे का हे ही बघायला पाहिजे.
मूळात फारेन्डाला तरी हा असा
मूळात फारेन्डाला तरी हा असा इतका बाळबोध प्रश्न का पडावा? >>> लिंबू, सॉरी पण मुद्दा नीट समजून न घेताच बाळबोध रीतीने अर्थ तूच लावत आहेस येथे. तू दिलेली बरीच उदाहरणे मुळात पत्रकारीय नीतीमत्तेत सुद्ध बसणार नाहीत, ती देशविरोधी असतील तर त्यात आश्चर्य नाही. इथे वाद चालला आहे तो एखादी गोष्ट पत्रकाराच्या व्यवसायाच्या दृष्टीने योग्य असेल पण देशहिताच्या विरोधी असेल - असे मुळात असू शकते काय (साती ने एक उदाहरण दिले आहे), आणि अशा वेळेस देशहिताचीच बाजू का घेऊ नये यावर चालला आहे.
काही पत्रकार कसे चोर/देशद्रोही आहेत हे जर तू म्हणत असशील तो तो इथे मुद्दाच नाही हे लक्षात घे.
>>> काही पत्रकार कसे
>>> काही पत्रकार कसे चोर/देशद्रोही आहेत हे जर तू म्हणत असशील तो तो इथे मुद्दाच नाही हे लक्षात घे <<< माझे म्हणणे असेल की काही पत्रकार देशप्रेमी असतात. पण हा विषय नाही हे पटले.
>>> आणि अशा वेळेस देशहिताचीच बाजू का घेऊ नये यावर चालला आहे. <<< तर "अशा वेळेस (वा कशाही वेळेस) देशहिताची बाजू का घेऊ नये" हा प्रश्नच कसा काय पडू शकतो या तीव्र भावनातिरेकामुळे माझ्या बाकिच्या पोस्टी होत्या असे समजुन घेऊन जमल्यास व गैरलागू वाटल्यास कृपया दुर्लक्ष करावे ही विनंती! बाकी चर्चा छान चालु आहे.
मी आपला चुकून तेव्हा या पत्रकार वगैरे मंडळींच्या देशप्रेमापेक्षाही महत्वाचा असा महात्म्याने सांगुन ठेवलेला पत्रकारितेतील "सत्याचा आग्रह" वगैरेच्या थोतांडावर माझा विश्वास कसा व का नाही हे मांडत होतो.
माझे दोन पैसे - पत्रकारांनी
माझे दोन पैसे -
पत्रकारांनी फक्त बातमी द्यावी. जशी आहे तशी. Just blunt, raw facts. त्याच्यावर म्हणी, फिल्मी मथळे ह्यांचं संस्करण करू नये. बातमीचे कुणावर काय परिणाम होतील हे पाहण्याचं/ठरवण्याचं काम त्यांचं नाही.
सातीच्या फुलस्टॉप पोस्टला
सातीच्या फुलस्टॉप पोस्टला +१००
टण्या, >> मी सागरिका घोष
टण्या,
>> मी सागरिका घोष यांचे वक्तव्य वाचलेले नाही वा ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये केले आहे ते ही पाहिलेले नाही.
>> मात्र मला त्यांचा विचार पटला. पत्रकाराने केवळ सत्य समोर आणणे अपेक्षित आहे - तो/ती देशभक्त
>> असायलाच पाहिजे याचा त्याचा/तिच्या पत्रकारितेशी संबंध नाही.
एक सांगतो. बघा पटतंय का.
वृत्तपत्राला म्हणून वेगळं खास असं वृत्तपत्रस्वातंत्र्य घटनेने बहाल केलेलं नाहीये. तुम्हाआम्हासारख्या सामान्य माणसाला जेव्हढं अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे तेव्हढंच पत्रकाराला आहे. पण पत्रकाराच्या हातात वृत्तपत्र नामे शक्ती असते. त्यामुळे तो स्वत:ला सामान्य माणसांपासून वेगळा समजत असतो. यात काही चुकीचं नाही.
मात्र हा वेगळेपणा म्हणजे शहाणपणाचा मक्ता नव्हे. हे भान सगळ्या संपादकांना नाही. मला वाटतं इथवर मी जे काही बोललो त्यास तुम्ही सहमत असाल.
पण काळ झपाट्याने बदलला. हल्ली वृत्तपत्रासारखीच अभिव्यक्तीची ताकद सामान्य माणसाच्या हाती आलीये. त्याला मेलनस्थळे (=सोशल मीडिया) म्हणतात. सांगण्याचा मुद्दा काय आहे की पत्रकार आणि सामान्य माणूस यांच्यातली अभिव्यक्तीची ताकद समान पातळीवर आलीये.
तर मग तुमचं उपरोक्त विधान तुम्ही स्वत:लाच लावून पहा. तुमच्या हाती महत्वाची माहिती असेल, तर तुम्ही ती प्रकट कराल काय? करायची तर का करायची? नाही तर का नाही? करायची ठरवली ते कोणत्या निकषांवर? इत्यादि प्रश्न स्वत:चे स्वत:लाच विचारून पहा. कदाचित वेगळे पैलू ध्यानी येतील.
आ.न.,
-गा.पै.
गापै, वरील पोस्टमधे तुम्ही
गापै, वरील पोस्टमधे तुम्ही नेमक्या मुद्याला हात घातलात.
मुरारी देशपांडे Via
मुरारी देशपांडे Via -Facebook
सर्वोच्च न्यायालयापेक्षा माध्यमे मोठी नाहीत असे माझे आजवर मिळवलेले ज्ञान मला सांगते .
माध्यमांचे अलीकडच्या काळातील वागणे देशहिताला बाधक ठरू शकेल कि काय असे वाटावे
इतके दर्जाहीन आणि बेजबाबदार होत चालले आहे . त्यांना सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी
जबाबदारीचे भान वेळीच न आल्यास लोक त्यांना नजीकच्या काळात भानावर आणतील
असे मला खात्रीने वाटते . ती वेळ येऊ न देणे माध्यमांच्याच हातात आहे .
------------------------------------------------------------------------------
न्यायसंस्थेवर प्रगाढ विश्वास असणारा भारतीय नागरिक ----------मुरारी
WhatsApp वरुन आलेली पोस्ट
WhatsApp वरुन आलेली पोस्ट
दळभद्री मिडीयावाले आत्ता याकुब मेमनच्या घरच्यांच्या अशा मुलाखती दाखवतायत.. जसं काय तो याकुब देशभक्तीसाठीच फासावर जातोय. लेनिनचं एक वाक्य आहे. "क्रांति यशस्वी करायची असेल तर यादी काढुन पहिले पत्रकार मारा..! " खरंच मनापासून पटतंय आता. एका तरी वाहिनीवर स्फोटांमधे चिंधड्या होवुन मेलेल्या निरपराध मुंबईकरांच्या घरच्यांची मुलाखत दाखवली का..?
भाटगिरीची एक हद्द असते राव. सगळे पत्रकार टायटॅनिक सारखे जहाजामधे बसवुन समुद्रात पार लांब नेऊन बुडवले पाहीजेत.
सोन्याबापू यांची पहिली पोस्ट
सोन्याबापू यांची पहिली पोस्ट आवडली. फारेण्डचं उत्तर देखील.
बाकी सवडीने.