खालील घटना तंतोतंत सत्य आहे आणि माझ्या डोळ्या देखत घडलेली आहे या आधी हि मी ती फेसबुक वर शेअर केली होती. पण आता मी सुधा मा.बो कर झालो आहे त्यामुळे ती मी इथे पोस्ट करत आहे
"मी कल्पेश मूळचा मुंबई मधील गोरेगाव चा. तब्बल १३ वर्षापूर्वी माझ्याबरोबर घडलेली एक घटना आज येथे शेर करावीशी वाटली..
.
.मी तेव्हा 13 वर्षाचा होतो . आणि गावा वरुन आत्ये भावच्या लग्नाची पत्रिका नुकतीच आली होती.मे महिना होता. आणि शाळेला भरपूर सुट्ट्या सुधा होत्या . त्यात गावाला जाण म्हणजे आनंदाची पर्वणीच माझ्यासाठी. एकदाचे आम्ही गावाला येऊन पोहचलो . लग्न असल्यामुळे सगळी भावंड अगोदरच गावाला आली होती. आणि तेव्हा मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे लाड होत असत......
आत्याच गाव चिपळूण पासून सुमारे 12 की. मी अंतरावर आहे गावाच नाव केळने. गाव डोंगराच्या मधे असल्याने निसर्गाने जणू सगळी सुंदरता त्यात भरली होती. आत्ता मैं स्टोरी ला सुरवात करतो.......
तो लग्नाच्या आधीचा म्हणजे हळदिचा दिवस होता घरात लग्न असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या कामात व्यस्त होते. सगळ्या भावंडानी काम वाटून घेतली होती. मी आणि माझी ताई रेखा आमच्या दोघांवर पाणी भरण्याचे काम सोपवण्यात आले. पाणी भरण्या साठी विहरीवर जाव लागत असे. ती विहीर घरा पासून 5 मिनटांच्या अंतरावर होती. आणि ती विहीर जमिनीला लागून होती म्हणजे तिच्या बाजूला सुरक्षा कड नव्हती . त्या मुळे लहान मूलाना सहसा तिथे जाऊ दिले जात नव्हते. विहीर तशी खोल नव्हती 4 ते 5 फुट पाणी असेल त्यात.आणि विहरीच्या बाजूला एक मोठे चिंचेचे झाड होते..
तर झाल अस की रेखा ताई आणि मी दोघ निघालो पाणी भरण्यासाठी दुपारचे 12. ते 12.30 वाजले असतील काही वेळात पोहचलो विहरी जवळ तेवा तिथे कोणीच नव्हते. आमच्या गप्पा चालू होत्या ताई विहरीतून पाणी काढून हंडा भरत होती आणि मी त्या विहरीत वाकून बघत होतो. विहरीत समोरच्या चिंचेची पान पडत होती. सगळ वातावरण एकदम शांत होत . तेवढ्यात ताई म्हणाली तुला माहीत आहे का कल्पेश या झाडावर जखिण राहते अस म्हणतात. ते ऐकून मी ताई ला चिडवत म्हणालो राहते ना मग बोलव मी नाही घाबरत कोणाला . तर मस्करी म्हणून ताई जोरात बोलली ए जखिणी ये आणि धर आमच्या कल्पेश ला. ती हे बोलताच आम्ही दोघे पण हसायला लागलो आणि ताई ने भरलेला एक हंडा माझ्या डोक्यावर दिला आणि म्हणाली हो पुढे आणि ती तिचा हंडा उचलू लागली तसा मी घरच्या दिशेने वळलो. मी 4 ते 5 पावल टाकली असतील अचानक धाड असा मोठा आवाज झाला.. अचानक अंगातून एक शीरशिरी उठली . मी मागे वळून पहिले तर ताई कुठेच दिसत नव्हती. मी घाबरलो पाय थरथारू लागले पण ताई चा विचार करून हिंमत केली आणि विहारी जवळ गेलो आणि खाली डोकवून पहिले. आणि जे पहिले ते कधीच विसरू शकत नाही
ताई विहरित उभी होती पूर्ण ओले केस डोळे लाल लाल झलेले होते आणि एक विचित्र हास्य तिच्या तोंडावर होते आणि सारखी मान वाकडी तीकडी करत होती तेव्हा
आणि अचानक तिने मला आवाज दिला की ये खाली ये मी तुला घ्यायला आली आहे . हे ऐकून माझी टरकलि . अंगात जेवढी शक्ति होती तेवढी एकवाटून मी घरच्या दिशेने पाळायला लागलो. धापा टाकत अंगणात येऊन पडलो माझी ती गत बघून सगळे माझ्या दिशेने धावत आले मला उचलले आणि पाणी पाजले मी बोललो ताई बावडीत पडली आहे हे ऐकून मामा , आणि दोन चार मोठी मंडळी विहरीच्या दिशेने धावले. अर्ध्या तासाने ते सगळे लोक ताई ला पकडून घेऊन आले . ती जोर जोरात किंचाळत होती. ओरडत होती. की मला तो पाहिजे ते ऐकून मी अजुन घाबरलो मोठ्या मंडळीनी लगेच गावातील एका मंत्रीक बाबाना बोलावले . आणि ताई ला त्यांच्या समोर बसवले काही मंत्र उच्चारण केले आणि ताई ला विचारले कोण आहेस तू आणि का या मुलीच्या मागे लागली आहेस. तेव्हा ती जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली मी चिंचेची शेंद्री जखिण आहे . हिने मला बोलवल आहे. त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आता मी या दोघाना पण सोबत घेऊन जाणार. तेव्हा सगळेच घाबरले मग मंत्रिकने काही अजुन मंत्र म्हटले आणि तिला विचारल या मुलांकडून चुक झाली त्याना क्षमा कर आणि त्या बदल्यात तुला हव ते देतो . तेव्हा ती म्हणाली नाही मला अजुन काहीच नको मला हे दोघ हवे आहेत माझी मस्करी करतात याना मी घेऊन जाणार तेव्हा मंत्रिकाने काही मंत्र म्हटला आणि त्याच्या पिशवीतून एक रखेची पुडी बाहेर काढली आणि ती तिच्या कपाळाला लावली तशी ती रडू लागली तिला त्रास होऊ लागला मंत्रीक पुन्हा म्हणाला जातेस की नाही तेव्हा ती म्हणाली मला हिरवी साडी आणि मांसाहाराच जेवण पाहिजे तरच मी याना सोडेन . मंत्रिकने ते कबूल केल द्यायच आणि मामाना एक साडी आणि मटनाच ताट घेऊन बावडी जवळ ठेवायला संगितल ते सर्व होई पर्यंत मंत्रिकच मंत्र बोलन आणि ताई च माझया कडे रागाने बघन चालूच राहील . मामा सगळ्या विधी करून घरी आला तसा मंत्रिकने ताई कडे बघितल आणि ओरडला जेया आता तुझी मागणी पूर्ण झाली आहे. आणि परत तो अंगारा काही मंत्र बोलून तिच्या आणि माझ्या कपाळाला लावला तसा ताई शांत झाली आणि पडली.......
मंत्रिकने एक दोरा आमच्या हाताला बांधला आणि निघून गेला. सगळ शांत झाले थोड्या वेळाने रेखा ताई उठली आणि म्हणाली अरे आपण इथे कसे आपण तर पाणी आणायला गेलो होतो ना ......... तेव्हा मामा बोलले हो पण तुला चक्कर आली म्हणून तुला घरी आणून झोपवले पाणी भरून झाल आता .... तिकडे जायाच नाही दुसर्या दिवशी लग्न आटोपल तसेच आम्ही मुंबई ची गाडी पकडली कारण अजुन काही विपरीत होऊ नये म्हणून आणि त्या दिवसाला आज १३ वर्ष झाली मी परत कधीच अत्याच्या गावाला गेलो नाही ...."
समाप्त
बापरे
बापरे
अरे हे अमानविय धाग्यावर टाक
अरे हे अमानविय धाग्यावर टाक
scary
scary
पण 'जखिण' हा काय प्रकार आहे?
पण 'जखिण' हा काय प्रकार आहे?
पण 'जखिण' हा काय प्रकार आहे?
पण 'जखिण' हा काय प्रकार आहे? १
मी मायबोली वर नवीन आहे आणि हे
मी मायबोली वर नवीन आहे आणि हे माझ पहिलच लिखाण आहे त्यामुळे कस आणि कुठे टाकायचं याबद्दल तर बर होईल
बापरे...खरच आहे का हे..
बापरे...खरच आहे का हे..
अरे आता लिहील आहेस तर ठीक
अरे आता लिहील आहेस तर ठीक आहे, पण अशा अमानवीय अनुभवांसाठी एक धागा आहे.
http://www.maayboli.com/node/49229
अमावस्येच्या दिवशी हे लिहायची
अमावस्येच्या दिवशी हे लिहायची बुद्धी झाली यातच अमानवी पणाची झलक दिसून येत आहे. जबरदस्त अनुभव.
हमम होत अस, गावात असे प्रकार
हमम होत अस, गावात असे प्रकार आजही होतात
भितीदायक अनुभव. आशा करतो कि
भितीदायक अनुभव. आशा करतो कि रेखाताईंना पुढे काही त्रास झाला नसेल.
याचा अर्थ जखिणीला देखील माहीत
याचा अर्थ जखिणीला देखील माहीत आहे की मानव तिला जखीण म्हणून हाक मारतात
आणि रागावली म्हणजे तिला जखीण म्हटलेले आवडतही नसावे..
छान अनुभव
<<याचा अर्थ जखिणीला देखील
<<याचा अर्थ जखिणीला देखील माहीत आहे की मानव तिला जखीण म्हणून हाक मारतात
आणि रागावली म्हणजे तिला जखीण म्हटलेले आवडतही नसावे..>> प्वाईन्ट हाय.
बाप्रे! माझा या सगळ्यावर तसा
बाप्रे!
माझा या सगळ्यावर तसा विश्वास नाही (तरीही मी घाबरते ही गोष्ट वेगळी) पण सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं आणि टरकली माझी पण
<<<<<< छान अनुभव >>>>>>>>>>>
<<<<<< छान अनुभव >>>>>>>>>>>
???
मस्त! कथा. मला एक कळत नाही,
मस्त! कथा.
मला एक कळत नाही, भुते, मुंजे, जखीणी ही सर्व मंडळी कोकणातच का आढळतात?
असल्या कथांना पार्श्वभुमी नेहमी कोकणातीलच असते. रत्नागिरीत तर म्हणे भुते भाड्यावर मिळतात, कुणाला झपाटायचे असेल तर.
छान म्हणजे ईंटरेस्टींग या
छान म्हणजे ईंटरेस्टींग या अर्थाने.
माझ्या आवडीचा विषय आहे हा.
मला आयुष्यात देव दिसला नाही तरी चालेन पण मरण्यापूर्वी एकदा भूत बघायची इच्छा आहे, वाटल्यास त्यासाठी मी तपस्या देखील करायला तयार आहे
प्रसाद,
मला एक कळत नाही, भुते, मुंजे, जखीणी ही सर्व मंडळी कोकणातच का आढळतात?
>>>>>>>>>>>
कारण कोकण हा भूतलावरचा स्वर्ग आहे
बापरे .. जबरी अनुभव ..
बापरे .. जबरी अनुभव ..
वेडा रे वेडा. तुझ्या ताईने तर
वेडा रे वेडा. तुझ्या ताईने तर तुला धरायला सांगितले होते ना. मग तिला कसे धरले.
मला आयुष्यात देव दिसला नाही
मला आयुष्यात देव दिसला नाही तरी चालेन पण मरण्यापूर्वी एकदा भूत बघायची इच्छा आहे, वाटल्यास त्यासाठी मी तपस्या देखील करायला तयार आहे >>>>
मुंबईत राहून भूत कसे दिसेल ? त्यासाठी कोकणात जाऊन एखाद्या निर्मनुष्य वाड्यावर अमावास्येच्या रात्री एका पायावर (तेही पाय गुढघ्यात उलटे करून) तपस्या करावी लागेल. बोला, आहे तयारी? (हलकेच घ्या)
बाप रे! माझा या सगळ्यावर तसा
बाप रे!
माझा या सगळ्यावर तसा विश्वास नाही (तरीही मी घाबरते ही गोष्ट वेगळी) पण सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं आणि टरकली माझी पण >> +१
रत्नागिरीत तर म्हणे भुते भाड्यावर मिळतात, कुणाला झपाटायचे असेल तर.>>
हे कोणी सांगितले तुम्हाला?
त्यासाठी कोकणात जाऊन एखाद्या
त्यासाठी कोकणात जाऊन एखाद्या निर्मनुष्य वाड्यावर >>> निर्मनुष्य वाडा भेटलाच तर एकटा कशाला ग'फ्रेंड बरोबरच जाईन
बाकी याचा अर्थ असा घ्यायचा का की भूत निर्मनुष्य स्थितीतच दर्शन देते आणि दोघांत तिसरा बनायला येत नाही.
तसेच त्या अमावस्येचा आणि भुतांचा खरेच काही संबंध असतो की उगाच त्या रात्री काळोख असल्याने हवा केलीय.
अरे वा भुते मटन खातात.नि
अरे वा भुते मटन खातात.नि हिरवि साडि मागितलि म्हणजे जखिनिला हळदिकुंकवाला जायचे असावे बहुधा.
रत्नागिरीत तर म्हणे भुते
रत्नागिरीत तर म्हणे भुते भाड्यावर मिळतात, कुणाला झपाटायचे असेल तर.>><< हो बायंगी म्हणतात त्याला. "भाड्यानं" असं नाही, पण भुतांना वश करून आपलं काम करवून घेता येतं.
नंदिनी, भुत झपाटायला
नंदिनी, भुत झपाटायला भाड्याने मिळतात असं म्हणतायत ते. बायंगी माहितेय मला पण हे नव्हतं माहित.
भुते भाड्यने>>>>>>>>>>>>>>
भुते भाड्यने>>>>>>>>>>>>>> बायंगी +१
बाकी भाडं कुणाला आणि कुठी पोचतं करायच असतं? की भुतं प्रोवाइड करणारी प्लेसमेन्टस आहेत.
पोस्ट थोडी अवांतर वाटल्यास
पोस्ट थोडी अवांतर वाटल्यास क्षमस्व,
पण एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे भूताच्या भुमिकेत बाटलीत दाखवला होता
शिट्टी वाजवल्यावर तो अमानवीय कामे करून द्यायचा असाही काही सीन होता.
ते बायंगी प्रकरण होते का?
अनुभव चांगला आहे. असे अनेक
अनुभव चांगला आहे. असे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. आपल्या दृष्टीआड असतात इतकच. याचा अभ्यास करायचा असेल तर अधिकारी लेखकांची (ज्यांचा पारलौकिक जगाचा अभ्यास आहे) पुस्तके उपलब्ध आहत. आणि खरच अनुभव घ्यायचा असेल तर...
कळवा.
माझ्या पहिल्याच प्रयत्नाला
माझ्या पहिल्याच प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोली करांचे मनापासून आभार
खरच अनुभव घ्यायचा असेल
खरच अनुभव घ्यायचा असेल तर...
कळवा. >>>>>>>>> किरु, तुम्ही भुतं भाड्याने देता का?
Pages