Submitted by बस्के on 13 July, 2015 - 20:59
सध्या एलएच्या संबंधित धागे चक्क पळतायत. क्यालिफॉर्निया ग्रुपात बेएरियातील खादाडी आहे पण एलए- खादाडी असा धागा दिसला नाही. म्हणून हा ही धागा काढला.
माझं मत एलएतील देसी फुडबद्दल इतकं काही बरं नाहीये. माझ्या मते बे एरियातले फुड सुपर्ब असते. पण ते असो. कदाचित ह्या धाग्यातून एखादी नवी जागा कळेल..
आश्चिगने दिलेली लिंक : https://www.google.com/maps/d/edit?mid=zqwbl4XtsLTY.kZZuytXx9nv8
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परवा, समोसा हाऊसला गेले
परवा, समोसा हाऊसला गेले होते. (11510 W washington)
नेहेमीच्या इंडीयन ग्रोसरी स्टोअर/खानावळीच्या मानाने बरंच प्रशस्त व फ्रेश निघाले.. त्यामुळे बरे वाटले. खायला समोसा चाट, दहि पुरी, वडा पाव व कच्छी दाबेली असं वेगवेगळं मागवले होते. पहिल्यांदा समोसा चाट व दहिपुरी आले. दोन्ही खरोखर छान होते. एकदम मस्त वाटले. मग दोन प्लेट्स आल्या. एकात दोन पाव व आतमध्ये काहीतरी. तर दुसर्यात सेस्मी बन व आत काहीतरी. दोन्ही मधले 'आतले काहीतरी' बटाट्याचे आहे व ते भरपूरच तळले आहे हे कळत होते. पण शेवटपर्यंत वडापाव कुठला व दाबेली कुठली कळले नाही. चवीला वाईट नव्हते. पण वरीलदोन्हीपैकी एकाचीही चव नव्हती ती. पुन्हा जाऊही आम्ही. पण वडापाव्/दाबेली मागवणार नाही हे निश्चित.
ओह बायदवे, इथे विकेंडला गुजराती/राजस्थानी थाळी मिळते म्हणे. दालबाटी एकदम भारी असते असं ऐकलंय.
LA मधे नाही, पण Artesia मधे
LA मधे नाही, पण Artesia मधे देशी जेवण १७-१८ वर्षांपूर्वी जेवलो होतो. ढाब्या टाईप रेस्टॉरंट होतं आणि समोर तंदूर लावलेले होते. गरम गरम नान आणि अस्सल घरगुती पंजाबी भाज्या होत्या. किंमत $३.९९! तिथेच एका ठिकाणी चाट खाल्लं होतं. एकंदरीतच Artisia मधे देशी जेवण / पदार्थ त्यावेळेस तरी चांगले वाटले होते.
LA मधे Beverly hills मधलं स्पाईस अफेअर म्हणून इंडीअन रेस्टॉरंट चांगलं वाटलं. तिथेच समोर स्टिंकीग रोज
म्हणून लसणाची थीम असलेलं इटालिअन रेस्टॉरंट आहे. लसणाची चव आवडत असल्यास इथले पदार्थ नक्की आवडतील. तसंच त्याच रोडवर स्क्रॅच बार म्हणून अमेरीकन कंटेपररी रेस्टॉरंट आहे. ते ही छान वाटलं होतं.
अंजली कालच स्पाईस फेअरला
अंजली कालच स्पाईस फेअरला जायचं आहे असं म्हणत होते मी.
समहाऊ देसी रेस्टॉरंट्स व लक्झरिअस असं काँबिनेशन नसतं..
ओह, स्टिंकिंग रोजचा असा फंडा आहे का? मला कळायचंच नाही रेस्टॉरंटला का स्टिंकिंग नाव दिलंय..
सेंचुरी सिटी शॉपिंग मॉलमधले रॉकशुगर मला खूप आवडते!! भन्नाट अँबिअंस, थाई,इंडीयन (बहुधा चायनिज, जॅपनिजही) असे सर्व एशिअन फुड एका ठिकाणी. स्प्रिंग रोल्स, साते छान होते. कॅशू चिकन जबरा होते! (फक्त कॅशू चिकनमध्ये कॅश्यूच टाकायला शेफ विसरला होता. आठवण केल्यावर दिले वाडागाभर काजू).. बटरचिकनही उगीच घेतले होते. पण मला थाईच जास्त आवडले! जरा वेळाने फोटो टाकते.
अॅनाहाइम मध्ये गांधी (समथिंग
अॅनाहाइम मध्ये गांधी (समथिंग ) नावाचं रेस्तराँं होतं, रमाडा हॉटेल्मध्ये. अजुन आहे का, कल्पना नाहि.
आर्टेशिया बुलेवाड्वर एक चाबुक इंडियन रेस्तराँ होतं, अजुन असावं नांव आता आठवत नाहि (तंदुर किंवा तत्सम) पण मालक डॉ. ग्यानदेव पटेल. पटेल साहेब एक्दम राजा माणुस. सायन हॉस्पिटल मधुन एम्बीबिएस/एम्डी केलेले म्हणुन भरपुर कॉमन मित्र निघाले. त्या दिवसांत त्यांची माझी दोस्ती इतकि झाली कि त्यांनी त्यांच्या खास रेसीपीने चिकन डिश बनवली होती.
अरे वा ट्रॅफिकजाम मोकळा
अरे वा ट्रॅफिकजाम मोकळा झालेला दिसतोय!! अभिनंदन!!
(कृ ह घे)
अरे वा! अजून एक एले चा बाफ!!
अरे वा! अजून एक एले चा बाफ!! आणी तो पण खादाडीचा!!
मला Artesia मधलं राजधानी खूप आवडतं...आणी जय भारत, भीमाज मस्त आहे..
Pasadena मधे दोन-तीन नवीन झाली आहेत... Mint house - एकदा गेलो होतो तेव्हा छान वाटले.. Chutneys- थोडी अमेरिकन concept आहे.. भारतीय जेवण- पनीर टिक्का, बटर चिकन वगैरे नान मधे टाको सारखे भरून देतात.... बाजूला चटण्यान्चा बार आहे...अमेरिकन लोकांबरोबर जायला मस्त...
हल्लीच alhambra मधे महान नावाचे restaurant जाऊन बघितले...चाट छान होते...पनीर सुद्धा मस्त!
अजून आठवतील तसे...:)
पुरणपोळी!
पुरणपोळी!
ती घरी आस्चिग!!!
ती घरी आस्चिग!!!

हे वाचूनच भूक लागली...मी
हे वाचूनच भूक लागली...मी चालले मंचुरियन खायला...:)
रॉक शुगर पॅन एशियन किचन माझं
रॉक शुगर पॅन एशियन किचन माझं पण आवडतं आहे, बाकी अॅडीशन्स करीनच :).
एल.एचा फूडसीन अतिशय
एल.एचा फूडसीन अतिशय क्रिएटीव्ह आहे. कल्वर सिटीत कूल्हौस आईसक्रिम मिळते - बेकन्+चिकन सहित.
https://eatcoolhaus.com/menu#menu_icecream
कँडीड बेकन!
Exactly - माउच्या घरी
Exactly - माउच्या घरी
ईंडियन रेस्तराँ लिहून
ईंडियन रेस्तराँ लिहून त्यासमोर 'रॉक्स' लिहिलं तर ती जागा चांगली आहे असं समजायचं की समजायचं ते समजायचं?
माऊ, राजधानी आमचेही आवडते.
माऊ, राजधानी आमचेही आवडते. फार पूर्वी तिथे जास्त पदार्थ असायचे असं आम्हाला अलिकडे उगीच वाटते. पण तरीही आवडते.
)
जय भारतला गेलो होतो. आवडले होते. पण ५-६ वर्षं झाली.
तेव्हा मुंबई की गलियोंसे नुकतेच निघाले होते. मराठी, बाँबे स्ट्रीट फुड वगैरे. चांगले होते. पदार्थांची क्वालिटी छान. (पण मालक टेबलापाशी येऊन अती बोलत बसायचा. आता प्लीज आम्ही खाऊ का? असं विचारावेसे वाटायचे.
हे रॉकशुगरचे फोटो:
LA khadadi favorite
LA khadadi favorite restaurants are Mediterranean
Carousel ( Glendale ) Raffi's ( Glendale ) Asal (winnetka, ventura blvd) + downtown jewelry district area madhe anek tapri type restaurants ( 'Farid' is my favorite galli restaurant in jewelry district )!
यात भर घालू शकता:
यात भर घालू शकता: https://www.google.com/maps/d/edit?mid=zqwbl4XtsLTY.kZZuytXx9nv8
बस्के, सगळ्यात वर दुवा देता येईल का?
हो देते..
हो देते..
धन्यवाद!
धन्यवाद!
आशिष, त्यात नवीन अॅड्रेस कसा
आशिष, त्यात नवीन अॅड्रेस कसा अॅड करायचा? मी राजधानी अॅड करणार होते. पण समजले नाही.
दिलेल्या लिंकवर जायचं मॅपमधील
दिलेल्या लिंकवर जायचं
मॅपमधील सर्चबॉक्समध्ये नाव-पत्ता द्यायचा - एंटर की दाबायची
सर्चबॉक्सखाली (मॅपवर नाही) असलेल्या टियरड्रॉपवर टिचकी मारायची
खाली योग्य ठिकाणी दिसत असलेल्या टियरड्रॉपच्फ्या खालच्फ्या टिंबाजवळ क्लिक करायचं
पॉईंट क्ष असं लिहिलेला बॉक्स येईल
त्यातील पेन्सीलीच्या चिन्हावर क्फ्लिककरुन योग्य ते नाव द्यायचं
सेव्हचं बटन दाबायचं
य बर्याच स्टेप्स वाटल्या तरी सगळं पटापट होतं
अल्हाम्ब्रातील महान छान
अल्हाम्ब्रातील महान छान आहे
कोरीयाटाऊनमधील बान्ग्लादेशी अलादीन
पॅसॅडेनातीलः
न्यु देल्ही पॅलेसः ठिक-ठिक
सितार: कधी ठिक, कधी नाही
आर्केडियतील निर्वाणा रागीट आन्ध्रकाका गेल्यापासून साधारण
रागीट आन्ध्रकाका
रागीट आन्ध्रकाका
स्टिंकीग रोज फार मस्त
स्टिंकीग रोज फार मस्त वाटतय..नक्की जाणार..
वा............ मस्त
वा............ मस्त धागा..............दुपारपर्यंत लिहितो डिटेलवार सगळे.....
ती पुरणपोळी कुठे मिळते ते
ती पुरणपोळी कुठे मिळते ते सांगा प्लीज
पुरणपोळी, कुठंय पुरणपोळी
पुरणपोळी, कुठंय पुरणपोळी
णिशेध! आम्ही ले तून
णिशेध! आम्ही ले तून निघाल्यावर ले खादाडीचा धागा? बहुत नाईन्साफी है!
ही घ्या पुरणपोळी माझ्या घरी
ही घ्या पुरणपोळी

माझ्या घरी येता का?
वरच्या रॉकशुगरचा फोटो भारी
वरच्या रॉकशुगरचा फोटो भारी आहे एकदम. होप जेवणही तितकंच चांगलं असेल.
माउ पुपो अगदी मस्त दिसत आहेत.
माउ पुपो अगदी मस्त दिसत आहेत. एले ला चक्कर झाली की खादाडीमध्ये माउचे घर अॅड झालेले आहे
Pages