एल.ए.चा ट्रॅफीक!
काय शब्दच सुचेना झालेत मला तर आजकाल. इतका भयाण ट्रॅफीक मी खरंच आख्ख्या आयुष्यात पाहीला नाही. हो, अगदी पुण्यातला अलिकडचा वाढलेला ट्रॅफीकही फिक्का आहे अगदी ह्याच्यासमोर. अर्धा-एक तास कधी नुस्तंच स्टिअरिंग व्हील हातात पकडून बसून राहायचे तर कधी आपलं ५ माईल च्या स्पीडने चालवत, व प्रत्येक मिनिटात किमान १७ वेळा तरी ब्रेक दाबत गाडी चालवायची. चालवायची हे क्रियापद फारच फास्ट आहे. रेटायची, ओढायची वगैरे ठिके. अर्थात फ्रीवे नसेल तर दर काही फुटांवर येणारे व जीव जाईस्तोवर लालच राहणरे सिग्नलचे दिवे येतात. त्यातून रस्ते काही सबर्बसारखे प्रशस्त नाहीत.. सगळा गिचमिडकाला.. इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे ना इथे गाडी चालवणे. सिरिअसली.
दोनेक वर्षापूर्वी मला एका कामानिमित्त एके ठिकाणी भल्या सकाळी ८ वाजता पोचायचे असायचे. कित्तीही सकाळी उठले तरीही मी आपली १० ते १५ मिनिटं उशीराच उगवणार. समजतच नाही मला असे होते तरी कसे? बरं अंतर किती असेल ते? ६ नाहीतर ७ माईल्स! ६-७ माईल्सना साधारण ३० माईल्स ताशी वेगाने गेल्यास किती वेळ लागावा? :thinking: २०-२५ मिनिटं? चला अजुन एक्स्ट्राची १५ मिनिटं अॅड करूया. पाऊण तासात पोचू म्हणजे आपण? शक्यच नाही! सकाळी ७ वाजता जरी घरातून निघाले तरीही ८.१५ ला इप्सित स्थळी जायची किमया मी (किंवा एलएच्या ट्रॅफीकने) केली आहे.
पण तरी नशिब मी आमच्या घराच्या जरा साउथला जायचे तेव्हा. घरापासून नॉर्थला जायचे असेल तर देवावरच भरोसा. कारण घराच्या जवळच वाटेत लागतं जगप्रसिद्ध हॉलिवूड बुलेवार्ड. तिथली गर्दी कधी कमी झालेली मी ह्या ४ वर्षात पाहीली नाही. काय त्या मेल्या चांदण्यांच्या रस्त्याचे ( वॉक ऑफ फेम ) किंवा आकाशाकडे दोन पाय व सोंड करून बसलेल्या खांबावरच्या ४ हत्तींचे (हॉलिवूड& हायलँड) किंवा जराश्या भितीदायकच दिसणार्या चायनिज थिएटरचे कौतुक? हा आता ऑस्करचे सोहळे होतात ते कोडॅक/डॉल्बी थिएटर आहे म्हणा तिथे. आणि विविध कॅरॅक्टरसे कॉश्चुम्स घालून किंवा नाचगाणी करणारे कलाकार असतात बघण्यासारखे. कधी चायनिज्/डॉल्बी थिएटरमध्ये प्रिमिअर्स होतात, तेव्हा तर विचारू नका. अतोनात गर्दी हा वाक्प्रचार मलूल वाटतो अगदी.. इतकी तुडूंब गर्दी होते. मला दिसला होता जेम्स फ्रँको! स्पायडरमॅन चित्रपटातला पीटर पार्कर अगदीच आवडायचा नाही पण त्याचा मित्र मात्र आवडायचा. असो.. मागे एकदा काय म्हणे जस्टिन टिंबरलेक अचानक त्या चौकात येऊन नाचगाणी करून जाणार होता. रस्ते बंद. गर्दी गुणीले २. चिडचिड गुणीले १०... ओह आणि मिस्टर प्रेसिडंट - ओबामाला विसरून कसे चालेल? गेल्या २-३ वर्षात ओबामा किमान ५-६ वेळा आला असेल. काय असतील त्यांचे फंडरेझर्स बेव्हर्ली हिल्स एरियात.. पण आमचं काय? किती रस्ते बंद होतात.. गर्दी गुणीले ५.. चिडचिड गुणीले ५०!!
मध्यंतरी असाच एकदा ओबामा आला होता.. तर तेव्हा माझा नवरा घरीच येऊ शकत नव्हता. कारण अपार्टमेंट कॉम्प्लेक्सपाशी जाणारे सगळे मेन रस्ते बंद.. विलशायर बंद, थर्ड बंद, सिक्स्थ बंद.. अक्षरशः मी घरात बसून कोणते रस्ते बंद आहे ते एकीकडे उघडून मॅपवरून चित्र काढून सांगितले आता इकडे वळ, तिकडे जा. व्हेरी फनी!!
एनीवे.. एकदाचा हॉलीवूड बुलेवार्ड पार पाडला.. तरीही गर्दी असतेच. आता काय बाबा? ओह येस. हॉलिवूड बोल! आय स्वेअर, मला त्या हॉलिवूड बोलबद्दल ममत्व वाटायचे हे आता मलाच खरे वाटत नाही. आम्ही कॅमरिओहून एलएला मूव्ह होण्याच्या अगदी एकच वीकेंड अगोदर तिथे एआर रहमान येऊन गेला होता. अगदी टोचलं होतं मनाला. असं कसं मिस झाले. पण नंतर ४ वर्षात तिकडे एकदाही आला नाही. आत्ता जूनमध्ये आला तो आला नोकिआ थिएटरला. डाउनटाऊनला कोण जाणार त्याला पाहायला. असो..
हॉलिवूड बोलला होणार्या कॉन्सर्ट्समुळे होणारा ट्रॅफीक ही कटकट अनमेझरेबल-अनडिनायेबली-पेन-इन-द-नेक-फ्रस्ट्रेटिंग-*ट आहे.. यु जस्ट कॅनॉट डू एनिथिंग. कधीकधी ती गर्दी , तो ट्रॅफीक इतका पूराच्या पाण्यासारखा फुगतो की २-३ माईल्सवर असलेल्या माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या समोरपर्यंत गाड्या आपल्या थांबलेल्या. माझ्या थर्ड स्ट्रीटवरच्या घरावरून हायलँड अॅव्हेन्यूला जायला म्हटले तर ५ मिनिटं लागतात. त्या ५ मिनिटाची १५ होतात. व हायलँडवरचा मुक्काम वाढतो अजुन २० म्निनिटांनी. म्हणजे हायलँडवरून १०१ पकडेस्तोवर ऑल्रेडी पाऊण तासाच्या वर वेळ उलटून गेलेला असतो. त्याच्या पुढे अर्थातच 'दी १०१' ची गर्दी!
सदर्न कॅलिफॉर्नियाच्या लोकांशी आईस ब्रेक करणारे संभाषण कोणते? तर १०१, आय-५ किंवा ४०५. हे दोन,तीन आकडे उच्चारा समोरचा पोपटासारखा बडबड करू लागेल. सगळे नुसते धुमसत असता ह्या दोघा-तिघांच्या नावाने. पण 'धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय' अशीच गत. फ्रीवे घ्यायचा नाही म्हटलं तर न संपणारी सिग्नल्सची रांग पार पाडायचे दिव्य असते. फ्रीवे घेतला तर काय आहेच गर्दी. इथे मिळणार्या 'नेकेड' नावाच्या प्रोटीन ड्रिंकची अॅड्/बिलबोर्ड यायचे मध्यंतरी, अगदी बरोब्बर फ्रीवेच्या आधी..
सगळ्यात वाईट म्हणजे१०१ घेतला आहे, पण तसा लगेचच तुमचा एक्झिट येणार आहे. ओह नो, गॉड हेल्प यु. जी काय तगमग तगमग होते उजवीकडच्या लेन्सना जाण्याची. त्या महाभयंकर ट्रॅफीकमधून, कधी गाड्या थांबलेल्याच असतील तर काहीच करता येत नाही. पण एकदा जॅम सुटला अन गाड्या सुसाट पळू लागल्या की स्वतःचा व गाडीचा जीव वाचवत ४-५ लेन्सचा बदल करत जाणे ह्यामध्ये हमखास तुमचा एक्झिट मिस होतो. मग आहेच परत लांबचा रस्ता वगैरे वगैरे.
फ्रीवेवर किती व का वेळ लागतो हे मला आजवर समजलेलं नाहीये. उगीच आपलं व्हील घेऊन ताटकळत बसायचे. पाठदुखी करून घ्यायची. पोटात (अन डोक्यात) आगीचा डोंब उसळून घ्यायचा. मागच्या कारसीटवर बसलेल्यांचा आयपॅड संपवायचा.. त्यांचे रड्णं ऐकत , ट्रॅफीकशी झुंज देत, एखाद्या रॅश ड्रायव्हरपासून बचाव करत आपलं घरी यायचं. अक्षरशः सांगते घरी आल्यावर लढाई करून आल्यासारखे वाटते!
पण एक आहे. बाहेरच्यांचे काहीही मत असो.. माझे तर ठाम मत आहे, ह्या सर्वामुळेच लॉस एंजिलीसचे ड्रायव्हर्स( बरं.. बहुतांश ड्रायव्हर्स) एंजल्स असतात अगदी!! ते तुम्हाला गरज असेल तेव्हा डावीकडे वळू देतात, लेन चेंज करायला मदत करतात, समोरच्याला पॅरलल पार्कींग अजिबात जमत नसताना त्याची ती कसरत पाहात शांतपणे वाट पाहतात, जाऊ देतात.. अगदी एंजल्स! उगीच का आमच्या शहराचे नाव, लॉस एंजीलीस आहे, जिथे एंजल्स राहतात ते शहर.
वेल, आय लव्ह माय सिटी. नो डाउट अबाउट इट. इतकं सुंदर, प्रेक्षणीय, उत्तम हवेचे ठिकाण आहे हे. उत्तम वेदरमुळे कधीही बाहेर पडून हवा तो प्रोग्रॅम आखण्याची मुभा, प्रेक्षणिय/थीम पार्क्स/हाईक्स/मॉल्स कशाचीच कमी नाही. पण एक गोष्ट मी अॅब्सोल्युटली बदलून टाकीन तो म्हणजे ट्रॅफीक.
किंवा कोण जाणे. मी कार चालवायला शिकलेच मुळी ह्या एलएच्या रस्त्यांवर. मला कुठूनही आले तरी हॉलिवूड्/हायलँडची गर्दी लागत नाही तोपर्यंत 'घरी' आल्यासारखे वाटत नाही हे ही तितकेच खरे!
(* दोन्ही चित्रे इंटरनेटवरून साभार)
>>१२ मुख्य लेन्स + ८ अॅक्सेस
>>१२ मुख्य लेन्स + ८ अॅक्सेस लेन्स + ६ HOV लेन्स<<
फक्त १२ मुख्य लेन्स? अटलांटामध्ये १६ आहेत, डाउनटाउन कनेक्टरला. आय-१० मध्ये ८ फिडर लेन्स ॲड करणं हि चिटिंग आहे...
बापरे, इतके तास वाया...
बापरे, इतके तास वाया...
किती कंटाळवाणं होत असेल.
२६, १८ , १६ लेन्स असे आकडे वाचुन
होतंय. ( इथे एनएच म्हणायचं आणि मधे डिवायडर पण नसलेल्या खड्ड्यांतुन गाडी हाकायची
अर्थात एक्प्रेसवे, फ्री वे होत आहेत म्हणा. पण अजुन इतक्या लेन पर्यंत गाड्या पोचल्या नसाव्यात )
मस्तच लिहिलंय .<<दोन
मस्तच लिहिलंय .<<दोन गाड्यांमधल्या जागेत भारतात पीएमटी ड्रायव्हर अख्खी पीएमटी घुसवेल.>> .
अरे त्या ह्युस्टन मधल्या २६
अरे त्या ह्युस्टन मधल्या २६ लैन्समध्ये ट्रॅफिक तुंबतो दाबूनच. दोन आठवड्यापूर्वी केटी ला जायला तीन तास पेक्षा जास्त वेळ लागला डाउनटाउनमधून.
इथे या आयोवात. मैलो न मैल क्रूझ काढायला लागत नाही
सदर्न कॅलिफॉर्नियाच्या
सदर्न कॅलिफॉर्नियाच्या लोकांशी आईस ब्रेक करणारे संभाषण कोणते? तर १०१, आय-५ किंवा ४०५.
अगदी खरे आहे......मुम्बई पेक्षा वाईट परिस्थिती आहे...
अरे एवढी जागा दिसतेय गाड्या
अरे एवढी जागा दिसतेय गाड्या गाड्यांमध्ये, ना कोणी हारवाला ना कोणी फुगेवाला, ना कोणी बाई कडेवर बाळाला घेऊन समोर हात पसरतेय, ना कोणी तृतीयपंथी काच वाजवतोय, गाड्या पण म्हणाल तर सार्या एका लाईनीत उभारल्यात, एव्हरीथिंग इझ कंट्रोल आणि शिस्तबद्ध दिसतेय .. याला ट्राफिक म्हणतात का
बाकी लिहिलेय मस्त !
पण हे मला एखाद्या पुणेकराने दिल्लीकरांना आपल्या थंडीचे कौतुक सांगावे असे वाटतेय
एलेचं ट्रॅफिक आणि अवेळी
एलेचं ट्रॅफिक आणि अवेळी खिंडीत गाठणारी थंडी याचा चांगलाच अनुभव घेतला आहे
आमचा ९५ बरा म्हणायचा की मग.
रहदारीचा जिव्हाळ्याचा विषय.
रहदारीचा जिव्हाळ्याचा विषय. शेवटी आमचं इस्ट कोस्ट बरं म्हणायचं ;). आमच्या गावात तर कुठूनही कुठे जायला ४५ मिनीटे पुरतात. कित्यकदा वेळेचा अंदाज चुकून आम्ही १० मिनीटं आधीच पोचतो :फिदी:.
पण या मार्चमधे एल ए ला आलो होतो तेव्हा नशिबानं ट्रॅफिकचा अजिबात त्रास झाला नाही. आम्ही त्या हॉलिवूड बुलेवार्डवर अगदी संध्याकाळच्या ५ वाजता होतो.
सशलः १२ मुख्य लेन्स + ८
सशलः १२ मुख्य लेन्स + ८ अॅक्सेस लेन्स + ६ HOV लेन्स >> अगं बाब्बो!!
अॅटलांटामध्ये पीक टाईमला मुख्य हायवेजवर फार काही वेगळी परिस्थिती नसते.
सगळ्या (बाकीच्या) लोकांना नॉर्थ-साऊथ डाकोटा, वायोमिंग, माँटॅना, आयडाहो वगैरे मध्ये पिटाळायला पाहिजे
(No subject)
डीजे - परफेक्ट कार्टून आहे
डीजे - परफेक्ट कार्टून आहे
बस/ट्रेन चा पर्याय असेलच असं नाही म्हणा. इथे ट्रेन लाईनच्या प्लॅनवर बरेच वर्ष चर्चा चालू आहे. Homeowners चा ट्रेनला प्रखर विरोध असल्याने ते होत नाही. त्याबद्दल बाकीचे सगळे homeowners ला कायम शिव्याशाप देतात - जोपर्यंत ते स्वतः homeowner होत नाहीत तोपर्यंत
मंदार, त्या विरोधाबद्दल मला
मंदार, त्या विरोधाबद्दल मला वाटतं की मोटार आणि तेल कंपन्यांनी केलेला प्रोपोगांडा आहे तो. घाबरवून ठेवलंय लोकांना. आणि आताच नाही ४०- ५० वर्षांपासून तीच मनस्थीती आहे. तेव्हा गाड्या कमी आणि रस्ते मोठे होते त्यामुळे हे प्रॉब्लेम कळले नाहीत. आता इकडे आड आणि तिकडे विहीर झालीये आणि राजकारण्यांकडे इच्छाशक्ती नाही हे सोडवायची.
तेल कंपन्या बिचार्या काऽऽही
तेल कंपन्या बिचार्या काऽऽही नाही करत, उगाच त्यांना मधे गोवू नका राव
कार्टुन्स भारी आहेत
कार्टुन्स भारी आहेत
मी आयुष्यात शिव्या द्यायल्या
मी आयुष्यात शिव्या द्यायल्या फार उशीरा शिकले दुसरीकडे पेशन्स म्हणजे काय हे देखील शिकले.. क्रेडिट गोज टु एले ट्रॅफिक
डीजे, तेल कंपन्यांनां दोष
डीजे,
तेल कंपन्यांनां दोष नाही फक्त त्यांच्या लॉबीयींग ला दोष देतो आहोत ..
पण आता इकडे आपल्यासारख्यांनीं एव्हढी गर्दी केली आहे ना की लवकरच ह्यांनां आपल्यासारख्या ट्रेन, बसेस् वगैरे संकल्पना राबवाव्या लागतीलच असं वाटत आहे ..
<<तेल कंपन्या बिचार्या
<<तेल कंपन्या बिचार्या काऽऽही नाही करत, उगाच त्यांना मधे गोवू नका राव >> आला लगेच हा ह्युस्टनमधून....
पण इतर कोणत्याही ठिकाणचे ट्रॅफिक एल ए पेक्षा बरेच म्हणायचे. २२ मैल जायला २ तास सहज लागू शकतात. (हॉलीवूड ते कॉमर्स, शुक्रवार संध्याकाळ)
डीजे, कार्टून मस्त एकदम.
एल.ए काय एकूणच कॅलिफोर्नियाचे
एल.ए काय एकूणच कॅलिफोर्नियाचे ड्रायव्हर लेन मर्ज करताना इंडिकेटर दिला तर मंचुरियात सासर मिळेल अशा भितीने गाडी चालवताना आढळतात
असे एंजल्स सारखे ड्रायव्हर लोक फक्त हाँडा-टोयोटावाले बरं!! 
माझा अनुभव तसा बरा आहे इतर
माझा अनुभव तसा बरा आहे इतर ड्रायव्हर्सबाबत. बरेच जणं नियम पाळतात. थोडी उदाहरणं असतातच, त्यांना लायसन्स मिळतं कसं हा प्रश्न आहे! परवाच एक मिनी कुपर अनप्रोटेक्टेड लेफ्ट टर्नला ग्रीन मिळाल्याबरोब्बर सुसाट निघून गेली.. ऑनकमिंग ट्रॅफीक लिटरली सुन्न होऊन बघत बसले..
ऋन्मेष, गाड्यांमध्ये जागा दिसत आहे म्हणजे ट्रॅफीक नाही , किंवा त्याचा त्रास नाही हा कुठला शोध.
गाड्यांमध्ये तेव्हढी जागा सोडावीच लागते नियमानुसार. ओह कदाचित इकडून तिकडून घुसून चालवता येत नसल्यामुळे काहीच न करता वाऽऽट बघत बसावे लागते, त्यामुळे अजुन चिडचिड होत असणार. 
एनीवे, जोक्स अपार्ट.. पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जायला ६-७ माईल्सच्या रस्त्याला २० मिनिटं दाखवत असताना एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो, म्हणजेच ट्रॅफीक खूप असतो. प्लीज आमच्या एलएच्या ट्रॅफीकला हिणवून एंजल्सना डिमन्स बनवू नका!
डीजे परत एकदा मस्त कार्टून!
असले बाफ काढणे हा 'ले'करांचा
असले बाफ काढणे हा 'ले'करांचा चावटपणा आहे. आम्ही इथल्या थंडीला कंटाळून पश्चिमेची स्वप्न बघतो आणि जॉब सर्च करायची वेळ आली की असले ट्रॅफीक, किंवा बे एरिया मधल्या जागांच्या किंमती सारखे बाफ काढून आत्ताचं १० मिनिट कम्युट, ऐसपैस घर ह्या लक्झरी आहेत हे पटवून देण्यात ते यशस्वी होतात. तीव्र निषेध.
अमितव +१
अमितव +१
हेहेहे... मस्त ट्रॅफिक
हेहेहे... मस्त ट्रॅफिक चर्चा..
ऑस्टीन सारख्या त्या मानानी छोट्या शहरामध्ये ही कम्युट साठी भरमसाठ वेळ लागु शकतो तर मी एल्.ए,ह्युस्टन, डॅलस सारख्या शहरांची फक्त कल्पनाच करु शकते.
पब्लिक दळणवळण व्यवस्था वाढु न देणं हे तर इथल्या कार लॉबीचे पार पूर्वी पासुनचे कारस्थान आहे. कार लॉबी, ओइल जायन्ट्स -शेल, एक्सॉन सारखे... हे सरकारचे मोठे गुंतवणुदार, पैसा पुरवणारे आहेत. त्यांना नाराज करणं म्हणजे 'आ बैल मुझे मार' सारखी अवस्था आहे.
वर दिलेले कार्टुनस ही मजेशीर आहेत.
--कमळी.
अमितव
अमितव
झकोबा म्हणतो तसे खरच वरचा
झकोबा म्हणतो तसे खरच वरचा शिस्तशीर ट्रॅफिकचा फोटो पाहून डोळे पाणावले...
>>>> एकदा मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस वे ला या. वरच्या फोटोत सगळ्या गाड्या निमूट आपापल्या लेनमध्ये पाहून सर्कशीतल्या रिंगमास्टरची आठवण झाली. <<<
अहो मुंबईच कशाला, इकडे कुठेही या... आडव्यातिडव्या गाड्या घुसविल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. कायम भिती की आपण कुणाला घासुन जातोय का दुसरा कुणी आपल्याला खरडून जातोय!
शब्दशः इंच इंच खेटुन जात असता गाड्या. इकडे गाडी चालवायचि तर नसलेला हार्ट अॅटॅकचा विकार दहापाच वर्षे आधीच येईल.
तुम्ही जितक्या वैतागता आहात त्याहीपेक्षा जास्त मी वैतागतो फक्त ३.२ किमी मधेच. जरा पाच मिनिटे उशीर झाला निघायला की आमच्या इथे शाळांना सोडायला येणार्या कारवाल्यांची गर्दी होते, सगळेच घाईत व सगळेच बेशिस्त. त्यातुन यांच्या शाळा खरे तर ढुंगणापाशी असूनही कारमधुनच सोडायचा सोस भारी. ते ही अगदी शाळेच्या दरवाज्यापर्यंत, शक्य असते तर यांनी शाळेच्या वर्गापर्यंतही गाडी नेली असती. मुंबईत किमान काही तरी लेनची शिस्त आहे. पादचारीही उगाच आडवेतिडवे कुठुनही कसेही चालत नाहीत. इकडे पुण्यात सावळा गोंधळ. मुंग्यांच्या वारुळावर काही पडल्यास मुंग्या जशा सैरावैरा दशदिशांना उधळतील, तशागत इकडचे ट्रॅफिक असते.
रोजच्या रोज माझ्याकडून एखाददोन जण तरी सणसणीत शिवी खातातच. अगदी आईबाप उद्धरून.
हे इतके सांगायचे कारण येवढेच की तुम्ही आहे त्यात समाधान माना कारण तुमच्यापेक्षा भयाण स्थिती इकडे आहे. तुम्ही फार सुखी आहात.
तुलनात्मक सुखाची जाणीव करूण
तुलनात्मक सुखाची जाणीव करूण दिल्याबद्दल आभार!

सुख म्हणजे तरी नक्की काय असतं? कितीतरी लोक शिडीच्या आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर आहेत किंवा त्यांच्यापेक्षा आपण उंच ठिकाणी आहोत हे समाधान!
मस्त लिहीले आहेस बस्के . एले
मस्त लिहीले आहेस बस्के :). एले ला शक्यतो वीकेण्ड्सनाच गेलो असल्याने खूप ट्रॅफिक बघितलेला नाही. पण ४०५ बद्दल खूप ऐकले आहे - "बिगेस्ट पार्किंग लॉट" वगैरे
एले च्या या हायवेज वर इलेक्ट्रिक कार्स वगैरेंचा काही फायदा नाही का? ब्राउन साहेबांनी २०१९ पर्यंत कारपूल दिलेले आहे. इकडे बे एरियात तरी फायदा होतो.
बस्के, अहो ते असेच गंमतीने
बस्के, अहो ते असेच गंमतीने म्हटले हो,
पण तरीही जेव्हा चार दिशांनी वेड्यावाकड्या गाड्या घुसून गुंता झाला असतो, डिव्हायडर नसल्याने विरुद्ध दिशेने गाडी घुसवायच्या प्रयत्नात काही मध्येच फसले असतात, दुचाकी वाले आपला मार्ग बनवायच्या नादात ट्राफिकमधील उरल्यासुरल्या पोकळ्याही भरून टाकतात, जेव्हा दुसर्याला जागा देण्याची ईच्छा तर असते पण ती देण्यास स्वताला मागे सरकायला जागा नसते, जेव्हा कोणीतरी मसीहाच येऊन आता हा जांगडगुत्ता सोडवेल या आशेने त्याला पुकारायला सारे हॉर्न वाजवतात, आपण कुठल्यातरी टॅक्सीत बसलो असतो आणि जागच्या जागी आपले मीटर धावत असते. ना त्या टॅक्सीत एसी असतो ना बाहेरून वार्याची झुळूक येत असते. उलट धुराच्या वासाने नाक आणि हॉर्नच्या आवाजाने डोके चोंदून निघाले असते. अगदी शंभर मीटरवर एक टर्न घेतला की तिथे हा ट्राफिक नसेल अशी आशा असते, पण मिनिटाला एक मीटर या स्पीडने आपली टॅक्सी सरकत असते. मनात येते की ही टॅक्शी ईथेच सोडून उतरून सरळ चालत जावे आणि पुढून दुसरी टॅक्सी पकडावी, पण नैतिकतेला धरून ते शोभत नाही. अश्यावेळी हा ट्राफिक फक्त त्रास आणि त्रासच देतो.
सुख म्हणजे तरी नक्की काय
सुख म्हणजे तरी नक्की काय असतं? कितीतरी लोक शिडीच्या आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर आहेत किंवा त्यांच्यापेक्षा आपण उंच ठिकाणी आहोत हे समाधान!
>>>>>>
असहमत हिरा,
जर तुम्ही बाह्य जगाशी तुलना करून त्यात सुख शोधाल तर ते कधीच चिरंतन नसेल. सुख आपल्या आतूनच शोधायचे असते. असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय झाला.
>>> सुख आपल्या आतूनच शोधायचे
>>> सुख आपल्या आतूनच शोधायचे असते. असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय झाला. <<<
ऋन्मेषा, कधी कधी तू भलतेच भारी वाक्य बोलून जातो रे...! या धाग्याचा विषय नाही म्हणुन, नै तर यावर याच्या बाजुने व विरोधी असे हात हात भर प्रवचन झोडता येईल इतके पोटेन्शिअल आहे तुझ्या वाक्यात.
ऋन्मेऽऽष, >> सुख आपल्या आतूनच
ऋन्मेऽऽष,
>> सुख आपल्या आतूनच शोधायचे असते.
बरोबरे! बाहेर रहदारीचा एव्हढा गोपाळकाला झालाय की सुख आतमध्येच शोधावं लागणार!
आ.न.,
-गा.पै.
Pages