माझी छकुली

Submitted by Suryakant Majalkar on 17 August, 2009 - 08:54

ईवले ईवले डोळे तुझे
ईवले ईवले कान
हो-हो म्हणते, ना-ना म्हणते,
डोलवित आपली मान

हम्मा हवी, तुतू हवा
हवी हिला माऊ
बोट दाखवी दाराकडे
सांगी बाहेर जाऊ

चॉकलेट नको , गोळी नको
नको हिला बिस्किट
कुरकुरे , लेर्यस मात्र
खाते डोळे मिचकावीत

खेळण्यातल्या कपामधुन खोटी खोटी चहा देते
देते कसली देता-देता तोच हात मागे नेते
दुडुदुडु पळताना घर अपुरे पडते,
खरं खरं पडताना , कधी खोटच 'पयली' म्हणते
दीदी हवी, दादा हवा, हवी हीला ताई,
पप्पाच्या पाटिवर घोडा, पापा दयायला आई,
अशी माझी छकुली कधी कधी खुप रडते,
काय हवे, काय नको काहिच न समजते

--सुर्यकांत मा.

गुलमोहर: