१. तासभर भिजवलेली १/२ वाटी तुरडाळ
२. पोह्यांसाठी चिरतो तसा लांब चिरलेला १ मोठा कांदा
३. ३ हिरव्या मिरच्या
४. ४ लसुण पाकळ्या बारिक चिरलेल्या
५. थोडसं किसलेल अद्रक
६. मोहरी, जिरं, तेल, तिखट, मिठ, हळद, एव्हरेस्ट चिकन मसाला
७. सांभार / कोथिंबीर
* तेल तापल्यावर त्यात मोहरी जिर्याची फोड्णी द्यावी. मग त्यात कांदा + मिरची + लसुण + अद्रक टाकावे.
* कांदा लालसर झाल्यावर त्यात पाऊण चमचा तिखट + मिठ + हळद टाकावे.
* सर्व परतवल्यावर त्यात डाळ टाकावी.. पाऊण वाटी पाणी टाकुन त्यावर झा़कण ठेवावे.
* शेवटी गॅस बंद करुन पाव चमचा चिकन मसाला आणि सांभार टाकून जरा वेळ भाजी झाकुन ठेवावी.
१. यात गोडलिंबाची पान टाकू शकतो.. टाकताना जराशी चुरगाळून टाकावी म्हणजे त्याचा फ्लेवर संपुर्ण भाजीला लागण्यासाठी मदत होते.
२. टोमॅटो सुद्धा टाकु शकतो पण अख्खा टाकु नये..
३. साखर टाकायची आवश्यकता नाही. गोडाची आवश्यकता कांदा पुर्ण करतो. तरिही राहवल नाहीच कुणाला तर अगदी थोडी टाकावी.
विदर्भात सांभार म्हणजे
विदर्भात सांभार म्हणजे कोथिंबीर वड़ी अतिशय वेगळी असते भरपूर कोथिंबीर आमचुर वगैरे घातलेले आंबट गोड सारण पारीत भरून त्याचे क्रीमरोल्स टाइप बंद रोल्स करुन कुरकुरित लाल तळतात अन आमच्या अमरावतीत तर ह्यांच्या सोबत चटणी खटाई वगैरे न देता मस्त गरम अधमुर्या दह्याची कढ़ी देतात वाटीभर
डाळकांदा अप्रतिम दिसतो आहे मॅम हा आमचा विशेष आइटम होता बॅचलर लाइफ मधला आमचे कैक इतर भागांतले दोस्त पुण्याला असताना फ्लॅट वर फ़क्त हे अन चपात्या खायला येत असत.
टिना मस्त रेसेपी. ही अस्सल
टिना मस्त रेसेपी. ही अस्सल विदर्भातली पाककृती आहे.
शीर्षक - वर्हाडी डाळ कांदा कर.
पण ही डाळ शिजते का बोटचेपी?
सोन्याबापू , सांभार वडी.. आहा
सोन्याबापू ,
सांभार वडी.. आहा . काय आठवण करुन दिली.. वर्ष झाले तयार करुन.. केली तर टाकते..
आणि ते मॅम वगैरे नकोच. उगा परत एकदा कॉलेज म्धे सिनीअर झाल्याचा फिल येतो आणि समोर स्वतःची ओळख करुन देतानाचे ज्युनिअर आठवतात .. टीनाच म्हणा.. परत ते अहो जाहो पन नको
बी,
बोटचेपी नाही शिजवत मी. जराशी थाडी ठेवते..
याला आतल्या "फोडणिची डाळ "पण
याला आतल्या "फोडणिची डाळ "पण म्हणतात ना? >> प्राजक्ता, मी पहिल्यांदाच ऐकतेय अस नावं .. काही कल्पना नाही अगं..
आमच्याकडे ह्यालाच बहुतेक पेंडपाला म्हणतात . >> श्री, पुर्णपणे नविन शब्द
टीना, तू पक्की वर्हाडी
टीना, तू पक्की वर्हाडी दिसतेस. किती दिवसानंतर 'थाडी' हा शब्द ऐकला. ग्रेट!!!! माझी आई अर्धकच्ची ठेवते पण वर्हाडी भाषेत ती अदळकच्ची असे म्हणते. मला खूप दिवस लागले नक्की त्या शब्दाचा अर्थ कळायला. असे इतके अपभ्रंश आहेत ना विदर्भात!!
धाग्याचे नाव बदल. छान दिसेल. आपला प्रांत .. आपल्या पाकृ!!!
थाडी = अदळकच्ची = कच्चट एकच
थाडी = अदळकच्ची = कच्चट एकच
बी विपू केलीय..
मस्त गं टिना! हे माझी वहिनी
मस्त गं टिना!
हे माझी वहिनी करते. पण ती घरचा कांदा लसूण मसाला घालून करते. तोंपासु.
हो आणि थाडी आणि सांभार हे शब्द पहिल्यांदाच ऐकले. कळला अर्थ.
बी आणि टीना एकमेकांशी 'विदर्भ
बी आणि टीना एकमेकांशी 'विदर्भ स्वतंत्र झाल्यासारखे' बोलत आहेत.
मानुषी बेफि
मानुषी
बेफि
टीने, ही भन्नाट रेसिपी उद्याच
टीने, ही भन्नाट रेसिपी उद्याच ट्राय करण्यात येईल कारण आज भाजी आणलेली नाहीये उद्यासाठी.
फोटो सजावट आणि लिहीण्याची स्टाईल तिन्ही सुंदर.
आरे, ही आमच्यकडे एकदम आवडती
आरे, ही आमच्यकडे एकदम आवडती रेसिपी आहे. जनरली मी कांदालसूण मसाला घालूनच करते.
टिना स्लर्प रेसेपी. आम्ही पण
टिना स्लर्प रेसेपी. आम्ही पण करु म्हणजे महाराष्ट्रातली होईल ही.:डोमा:
श्री, यात मेथी, पालक सारख्या तत्सम पालेभाज्या घातल्या की हा पेन्डपालाच होईल. माझी मामी करायची हे. सोलापूरकडची कृती सेम.
बेफी
टीना, मस्तं पाककृती! फोटो तर
टीना, मस्तं पाककृती! फोटो तर भारीच.
टीना, मस्तय रेसिपी! बरेच
टीना, मस्तय रेसिपी! बरेच वर्हाडी शब्द माहिती आहेत पण 'थाडी' माहिती नव्हता! तुझ्या रेसिप्या वाचायला मजा येते.
विदर्भात सांभार म्हणजे कोथिंबीर वड़ी अतिशय वेगळी असते भरपूर कोथिंबीर आमचुर वगैरे घातलेले आंबट गोड सारण पारीत भरून त्याचे क्रीमरोल्स टाइप बंद रोल्स करुन कुरकुरित लाल तळतात >> अहाहा, माझ्याकरता ही खरी कोथिंबीर वडी. (दिसायला थोडी बाकरवडी सारखी). काकू अशीच करायची.
विदर्भात त्याला पुडाच्या
विदर्भात त्याला पुडाच्या वड्या म्हणतात ना. एकदा टिव्हीवर दाखवलं तेव्हा त्यात ओले खोबरे आणि गोडा मसाला घातलेला कोथिंबीरीबरोबर.
हो बरोबर. ओलं खोबरं मलाही
हो बरोबर. ओलं खोबरं मलाही माहिती आहे. (बरोबर खसखस पण का?)
कोणीतरी रेसिपी टाका :).
मो, विचारपूस बघ.
मो, विचारपूस बघ.
मृण नी कोपच्यात दिली. मी
मृण नी कोपच्यात दिली.
मी व्यवस्थित बडवलाय कीबोर्ड. ही रिक्षा - पुडाची वडी
केलं बै आजच डाळकांदा! मस्त
केलं बै आजच डाळकांदा! मस्त झालं होतं. पण आम्ही आपलं काळ्या मसाल्यात केलं.
मस्तं चटपटीत प्रकार दिसतोय हा
मस्तं चटपटीत प्रकार दिसतोय हा आणि नक्की करून बघीन.
छान
छान
Pages