१. तासभर भिजवलेली १/२ वाटी तुरडाळ
२. पोह्यांसाठी चिरतो तसा लांब चिरलेला १ मोठा कांदा
३. ३ हिरव्या मिरच्या
४. ४ लसुण पाकळ्या बारिक चिरलेल्या
५. थोडसं किसलेल अद्रक
६. मोहरी, जिरं, तेल, तिखट, मिठ, हळद, एव्हरेस्ट चिकन मसाला
७. सांभार / कोथिंबीर
* तेल तापल्यावर त्यात मोहरी जिर्याची फोड्णी द्यावी. मग त्यात कांदा + मिरची + लसुण + अद्रक टाकावे.
* कांदा लालसर झाल्यावर त्यात पाऊण चमचा तिखट + मिठ + हळद टाकावे.
* सर्व परतवल्यावर त्यात डाळ टाकावी.. पाऊण वाटी पाणी टाकुन त्यावर झा़कण ठेवावे.
* शेवटी गॅस बंद करुन पाव चमचा चिकन मसाला आणि सांभार टाकून जरा वेळ भाजी झाकुन ठेवावी.
१. यात गोडलिंबाची पान टाकू शकतो.. टाकताना जराशी चुरगाळून टाकावी म्हणजे त्याचा फ्लेवर संपुर्ण भाजीला लागण्यासाठी मदत होते.
२. टोमॅटो सुद्धा टाकु शकतो पण अख्खा टाकु नये..
३. साखर टाकायची आवश्यकता नाही. गोडाची आवश्यकता कांदा पुर्ण करतो. तरिही राहवल नाहीच कुणाला तर अगदी थोडी टाकावी.
दही असल्यामुळे कांदा, काकडी,
दही असल्यामुळे कांदा, काकडी, लिंबु घेतले नाही ताटात..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान रेसिपि आहे टीना!! मी बरेच
छान रेसिपि आहे टीना!! मी बरेच वेळा करते...विदर्भातिल रेसिपि आहे ना ही?
हो अगं मला आपल्याकडेच दिसली
हो अगं मला आपल्याकडेच दिसली ही भाजी करताना म्हणुन वैदर्भीयच म्हणुया .. कामचलाऊ भाजी.. ज्यावेळी घरात काही नसते त्यावेळी करायचा प्रकार पण तरी मला खुप जास्त आवडतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
आपल्याकडेच दिसली ही भाजी
आपल्याकडेच दिसली ही भाजी करताना म्हणुन वैदर्भीयच म्हणुया + १ मला खुप आवद्ते हि भाजि
छानच रेसिपी. खुपसे संदर्भ
छानच रेसिपी.
खुपसे संदर्भ विदर्भातले आहेत म्ह्णून वाचताना मजा येतेय. ( अद्रक, गोडलिंबाची पाने, पोह्यासाठी लांब कापलेला कांदा वगैरे )
छान व सोप्पी! हडाची पण करतात
छान व सोप्पी! हडाची पण करतात का?
दिनेशदा धन्यवाद.. नेहमीचे
दिनेशदा धन्यवाद.. नेहमीचे शब्द टाळता नाही ना येत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजुताई, आम्ही तर नाही करत..
आणखी एक आवडता प्रकार माझा नैवेद्यातला पुरणच्या मोदकांखालोखाल ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोडणी दिलेल्या हरभर्याच्या डाळीचा नैवैद्य असतो पण आमच्याकडे अनंतचतुर्दशी ला
टीना, कुठेतरी खाल्लीये. असो!
टीना, कुठेतरी खाल्लीये. असो! गणपतीतली डाळ, काकडी अन ओल्या नारळाच्या चकत्या ... तोंपासू
मंजुताई, आम्ही तर नाही
मंजुताई, आम्ही तर नाही करत..फोडणी दिलेल्या हरभर्याच्या डाळीचा नैवैद्य असतो पण आमच्याकडे अनंतचतुर्दशी ला स्मित आणखी एक आवडता प्रकार माझा नैवेद्यातला पुरणच्या मोदकांखालोखाल स्मित ++१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी एरवी सुद्धा करते हि डाळ! खुप आवडते मला..
महालक्श्मी च्या नैवेद्यात मोकळी डाळ करतात..मिक्सर मधुन एकदा काढायची ..फोडणी देण्याआधी!!
हडाची पण करतात का? >> काय रे
हडाची पण करतात का? >> काय रे ते शॉर्टफॉर्म. ह.घ्या.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी आपले हडाची की हाडाची मधे कन्फ्युज. हाडाची कशी होईल डाळकांदा की हाडकांदा
मृदुलचा प्रतिसाद वाचला आणि क्लिक झाले.
निल्सन हाडकांदा
निल्सन हाडकांदा
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडती भाजी मी हरभरा, मुग ,
आवडती भाजी
मी हरभरा, मुग , मसूर ची पण करते.
डाळी प्रमाणे इतर जिन्नस , त्यांचे प्रमाण, भिजवणे , शिजवणे यांचे प्रमाण बदलते
छान दिसतेय डाळभाजी. एव्हरेस्ट
छान दिसतेय डाळभाजी.
एव्हरेस्ट चिकन मसाला
<<
<<
हा मसाला केंव्हा टाकायचा ह्या डाळीत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आंग्रेंना पडलेला प्रश्न मलाही
आंग्रेंना पडलेला प्रश्न मलाही पडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांभार म्हणजे???
कोथिंबीर
कोथिंबीर
मस्त फोटो गं! अगदी बाजुला
मस्त फोटो गं! अगदी बाजुला सॅटीनची फुलं पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांभार म्हणजे??? >> कोथिंबीर..
सांभार म्हणजे कोथिंबीर लिहिलय
सांभार म्हणजे कोथिंबीर लिहिलय कि मी वर..
निल्सन हडाची वाचुन दोन मिनीटांसाठी मी पन सटपटलेच होते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मृणाल १ , हरभरा नै पण इतर मी पण करते.
ओह..चिकन मसाल्यालाच गरम मसाला लिहिलय वाटते मी ... करते बदल.. मला वाटल कळून जाईल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चनस, आता तु निदर्शनास आणलच आहे तर सांगते.. माझा अभ्यास, माझ वर्कशॉप, माझा डाईनिंग सगळ काही तो टेबल आहे .. बेडवर बसुन या गोष्टी होत नाही अग माझ्यानं.. दोन चार आनखी रेसिपी टाकल्यावर कळेल की ताटवाटी पण तिच असते
.. बघ मागं स्पिकर पन आहे ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
टीना, मस्त रेसिपी.. मेरकूभी
टीना, मस्त रेसिपी.. मेरकूभी होस्टल का मेरा टेबल याद आया![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
याला आतल्या "फोडणिची डाळ "पण
याला आतल्या "फोडणिची डाळ "पण म्हणतात ना?
मस्त << कामचलाऊ भाजी.. >>>
मस्त << कामचलाऊ भाजी.. >>> बर्याचदा डब्यात न्यायचो शाळेला , आता कधीतरी होते घरी पण आवडती आहे माझी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला पण अशी डाळ खुप आवडते. मी
मला पण अशी डाळ खुप आवडते. मी टॉमॅटो टाकते. नुसत्या लाल तिखटात केलेल्याची चव मला आवडते. बाकी मसाले टाकलेत तर चव बदलते.
बरं
बरं
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त आहे. चिकन मसाल्याला
मस्त आहे. चिकन मसाल्याला पर्याय काय? तुरडाळ खात नाही. चणाडाळ घालून बघेन. माझ्या कोल्हापूरच्या मैत्रिणी बहुतेक कांदा लसूण मसाला टाकतात. तो घालून बघेन.
फोटोपण मस्त. डिशच्या बाजूची सजावटीची फुलं पण तूच केलेली दिसतायेत टीना. ऑलराउंडर आहेस.
अन्जू, कुठलाही गरम मसाला इन
अन्जू,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठलाही गरम मसाला इन आहे.. त्यातल्या त्यात चिकन मसाला टेस्टी लागतो म्हणुन मी तो टाकते..
हि भाजी कांद्यामुळे जरा गोडसर होते म्हणुन स्पाईसेस..नाहीतर तर ती ही आवश्यकता नसती.. निव्वळ गोड गोड लागु नये करिता मसाला
सजावटीची फुलं >> हो. तरी त्यांना फिनीशिंग टच दिलाच नाही.. बस करुन ठेवलीत.
धन्यवाद टीना. आमच्याकडे चिकन
धन्यवाद टीना. आमच्याकडे चिकन मसाला नसतो म्हणून विचारले.
बायगो, तुझ्या बस करून
बायगो, तुझ्या बस करून ठेवलेल्या फुलांसाठी तुला ___/\___. कसली मोहक आहेत ती.
थँक्यु गो..
थँक्यु गो..
आमच्याकडे ह्यालाच बहुतेक
आमच्याकडे ह्यालाच बहुतेक पेंडपाला म्हणतात .
मस्त दिसत आहे डाळकांदा!
मस्त दिसत आहे डाळकांदा!
सांभार म्हणजे कोथिंबीर हे माहीत नव्हते.
Pages