१. अर्धा किलो कोलंबी.
२. १ मध्यम कांदा बारीक चिरून.
३. ४ / ५ सुक्या मिरच्या.
४. ४/५ लवंगा.
५. १ टेबलस्पून जीरे.
६. दालचीनीचा लहान तुकडा
७. थोडी हळद.
८. १ टेबलस्पून आले पेस्ट.
९. १ टेबलस्पून व्हिनेगर्/लिंबूरस.
१०. १/२ टीस्पून मीठ.
११. दोन टेबलस्पून तेल.
१. कोलंबी सोलून त्यातली शीर काढून टाकून स्वच्छ करून घ्या.
२. सगळे मसाल्याचे पदार्थ व व्हिनेगर्/लिंबूरस एकत्र वाटून एकजीव करून घ्या (पाणी न टाकता मिक्सरमधे फिरवा).
३. कढईत तेल टाकून त्यावर कांदा नीट भाजून घ्या.
४. त्यावर वाटलेला मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
५. त्यात मीठ व कोलंबी टाका. झाकण ठेऊन कोलंबी शिजेपर्यंत शिजवा. मधून मधून परतून घ्या..
१. पाणी न टाकता हा सुका मसाला करायचा असतो.
२. वरून आवडत असल्यास कोथिंबीर टाकू शकता.
३. चपाती/पराठ्याबरोबर मस्त लागतो. शक्यतो ताजाच खावा.
४. तिखटाचा त्रास असेल तर मिरच्या जरा कमीच टाका...
५. कोलंबी ऐवजी काय/काय टाकावे ते स्वतःच ठरवा...
कोलंबी ऐवजी काय/काय टाकावे ते
कोलंबी ऐवजी काय/काय टाकावे ते स्वतःच ठरवा... >>>>
मस्त आहे रेसिपी. करून बघू नक्की.
छान रेस्पी. बरट्यांसारखीच
छान रेस्पी. बरट्यांसारखीच पाणी न घालता करायची आहे. अर्थात मसाला वेगळा आहे.
प**, ब** किंवा यूनिकॉर्नचं शिंग घालून करून पाहीन.
(No subject)
सही दिसतेय. आजचा बेत.
सही दिसतेय. आजचा बेत.
मस्त रेस्पी. कॉस्टकोतून
मस्त रेस्पी. कॉस्टकोतून फ्रोजन कोलंब्यांचं पुडकं आणलंकी करतेच.
मस्त वाटत आहे रेसिपी .. >>
मस्त वाटत आहे रेसिपी ..
>> आजचा बेत.
अगदी अजचाच असं नाही पण बटाटे/ पनीर/ कच्ची केळी/अरवी वगैरे घालून लवकरच ..
विकांताला श्रींप आणायच्या
विकांताला श्रींप आणायच्या आहेत बरं झालं लगेच रेसिपी आली.
झाकण ठेऊन कोलंबी शिजेपर्यंत
झाकण ठेऊन कोलंबी शिजेपर्यंत शिकवा >>> कोणाला काय शिकवायचं?
रमड.. ... तो एकच शब्द नेहमीच
रमड.. ... तो एकच शब्द नेहमीच चुकतो..
मस्त यम्मी पाकृ !
मस्त यम्मी पाकृ !
फोटो तोंपासु आहे!
फोटो तोंपासु आहे!
कोलंबी वीक पॉईंट.. मस्त
कोलंबी वीक पॉईंट.. मस्त स्टार्टर सारखे दिसतेय.. लेमनज्यूस बरोबर एकेक तोंडात टाकत खायला मजा येईलसे वाटतेय
बरटं इज विदाउट आलं आणि धिस
बरटं इज विदाउट आलं आणि धिस इज विदाउट लसूण. तर घरातलं काय संपलंय त्याप्रमाणे कधी बरटं आणि कधी सुका मसाला करता येईल. कोळंबी हा कॉमन घटक ठेवल्याबद्द्ल धन्य्वाद.
कृतीवरून आणि फोटोवरून आवडेल असं वाटतंय.
यम्मी!
यम्मी!
भारी दिसतेय फोटोतली कोलंबी.
भारी दिसतेय फोटोतली कोलंबी.
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
जबरीच व्वा व्वा
जबरीच
व्वा व्वा
मस्त पाकृ. उद्याचा बेत!
मस्त पाकृ. उद्याचा बेत!
फोटो एकदम तोंपासू!
अरे व्वा!!!! माझी आवडती डिश
अरे व्वा!!!! माझी आवडती डिश आणि आमची पाककृतीसुध्दा एकदम शेम टू शेम.:)
मस्त! तोपासु.
मस्त! तोपासु.