भाग १
1. चिकन - ५०० ग्रॅम ( बोनलेस अथवा लेग पीस)
२. दही - ४०० ml
३. धनेपूड - २ टेबलस्पून
४. आले लसूण पेस्ट - २ टेबल स्पून
५. जीरेपूड - १ टी स्पून
६. लाल तिखट - ३ टी स्पून
७. काळा मसाला - १ टेबल स्पून
८. एमडीएच कीचेन किंग मसाला - २ टीस्पून
९. मीठ - चवीनुसार
भाग २
१. कांदा - २ मध्यम आकाराचे पातळ उभे काप करून
२. साखर - १ टी स्पून
३. हळद - २ टी स्पून
४. कसूरी मेथी
५. तेल - २-३ टेबलस्पून
१. चिकन स्वच्छ धुवून भाग १ मध्ये नमूद केलेले सर्व साहित्य एकत्र करावे.
२. चिकन कमीतकमी अर्धा तास दही आणि इतर मसाल्यात मुरवून ठेवावे.
३. एका कढईत तेल गरम करावे आणि त्यात साखर घालावी. साखरेचा रंग लालसर होईल.
४. कांद्याचे काप गरम तेलात सोडून भराभर हलवावे. साखर मस्ट आहे. साखरेमुळे दहयाचा आंबटपणा बॅलेन्स होतो आणि कांदा देखील पटकन ब्राऊन होतो.
५. कांदा तपकिरी रंगाचा झाल्यावर त्यात हळद टाकावी.
६. मुरवलेले चिकन देखील ह्याच वेळी कढईत ओतावे.
७. थोडा वेळ (२ मिनिटे) परतावे.
८. जसा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घालावे.
९. घातलेल्या पाण्यानुसार मीठ अॅडजस्ट करावे.
१०.कसूरी मेथी हाताने कुस्करून टाकावी.
११.साधारण २०-२५ मिनिटे कमी आचेवर झाकण घालून शिजवावे.
१. दही वापरल्या मुळे जास्त तेलाची आवश्यकता नाही.
2. दही शक्यतो आंबट नसावे.
3. दहयाबरोबर टोमॅटो अजिबात घालू नये भयंकर आंबट होऊ शकते.
मस्त दिसतय, चिकन.
मस्त दिसतय, चिकन.
मसाल्याचे मिश्रण छानच आहे.
मसाल्याचे मिश्रण छानच आहे.
यम्मी फोटो एका कढईत तेल गरम
यम्मी फोटो
एका कढईत तेल गरम करावे आणि त्यात साखर घालावी.>>> हे पहिल्यांदाच ऐकतीये
मस्त रेसिपी. दही वापरुन
मस्त रेसिपी.
दही वापरुन ग्रेव्ही करण्याची माझी पद्धत -
कोथिंबीर ( १ लहान जुडी ) +मिरच्या ( ४-५ ) + पुदिना ( ४-५ पाने ) दह्यासकट मिक्सरमधुन वाटुन घ्याव्यात.
वाटणाला गडद रंग येइल इतपत कोथिंबीर घ्यावी.
चिकन हळद,तिखट आणि मीठ लावून १-१ १/२ तास मुरवत ठेवावे.
तेलात कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
त्यात चिकनचे तुकडे टाकून वाफेवर शिजवून घ्यावेत. चिकन शिजताना त्याला आपोआप पाणी सुटते. तेव्हा अतिरीक्त पाणी टाकण्याची गरज नाही.
चिकन शिजलंय असं दिसलं की त्यावर हे वाटण टाकून एक चांगली उकळ काढावी. ग्रेव्ही घट्ट वाटल्यास पाणी घालुन किंचीत पातळ करावी.
मीठ चवीनुसार.
तांदळाच्या भाकरीसोबत सर्व्ह करावे.
नवीनच रेसिपी पहिली - या
नवीनच रेसिपी पहिली - या ऐत्वारीच ट्राय करतो घरी .
<<भाग २ १. कांदा - २ पातळ उभे
<<भाग २
१. कांदा - २ पातळ उभे काप
>>
२ पातळ उभे काप की दोन कांद्यांचे पातळ उभे काप?
रेसिपी आणि फोटो मस्तं आहे.
कांदा आणि साखर तेलात परतल्यावर कांदे कॅरामलाईज्ड होऊन मस्तं लागतात.
बिर्याणीवर पसरायला कांदे फ्राय करतो तेव्हाही त्यात थोडीशी साखर टाकावी.
कुठलीही ग्रेव्ही करताना जर कट हवा असेल तर सुरुवातीसच तेलात्/तूपात साखर टाकावी. थोडेसे तेल वापरूनही कट मस्तं येतो.
फोटोत दिसायला मला ते कोबी
फोटोत दिसायला मला ते कोबी बटाट्याच्या रस्साभाजीसारखे वाटतेय .. म्हणून रेसिपी चिकनची चव तोंडात घोळवत वाचली
आशुतोष, ह्या रेसीपीने करून
आशुतोष, ह्या रेसीपीने करून बघेन एकदा.
साती,
2 कांद्यांचे उभे पातळ काप
ऋन्मेऽऽष, कोबीची पातळ भाजी ???
मस्त. तोपासु.
मस्त. तोपासु.
मस्तच दिसतेय चिकन करी. मी
मस्तच दिसतेय चिकन करी. मी स्वत: शाकाहारी आहे पण मुलांसाठी बनवावच लागतं. ही तुमची रिसेपी नक्की करून बघणार.
ऋन्मेऽऽष, कोबीची पातळ भाजी
ऋन्मेऽऽष, कोबीची पातळ भाजी ??> स्नू रेसिपी चांगलीच आहे, पण मला ही फोटो कोबि/बटाटाच्या भाजी सारखाच वाटला.
अल्पना,प्राजक्ता ,आशुतोष आणि
अल्पना,प्राजक्ता ,आशुतोष आणि स्नेहा पुढ्च्या गटग ला पॉटलक करुयात .
स्नू ची चिकन करी , आशुतोष चे दही वाले चिकन फायनल.
बाकी आपण तिघिंनी काय आणायचं ते वॉट्स अॅप वर ठरवुया.
आशुतोष तिकीट बुक कर.लगेच्च्च !!
सुखदा, नक्की..लवकर
सुखदा, नक्की..लवकर ठरवा..ऑक्टोबर च्या आधी..
सगळ्यांना धन्यवाद. सामी,
सगळ्यांना धन्यवाद.
सामी, माझा प्रश्न होता की कोबीची पातळ भाजी पण करतात का?
खुप्च मस्त दिसतय.......
खुप्च मस्त दिसतय.......
छान पाककृती. दह्यामुळे मालवणी
छान पाककृती. दह्यामुळे मालवणी चिकन करीपेक्षा थोडी वेगळीच चव येत असणार. नक्कीच ट्राय करणार.
रच्याकने, कोबीच्या पातळ भाजीच्या प्रश्नासाठी खालील लिंक...
http://www.maayboli.com/node/53505
हम्म..आत्ता कळ्या मला.. कांदा
हम्म..आत्ता कळ्या मला.. कांदा बारीक चिरायचा आळस केला नसता तर त्याने कोबीच रुपड धारण केलं नसतं !!