२-३ प्लम्स, किसलेला गूळ किंवा ब्राउन शुगर किंवा साखर - अर्धा ते पाउण वाटी, मीठ , हिरव्या मिरच्या २-३ , तेल , हळद, तीळ अर्धा चमचा.
ही अशी कुठली खास पाककृती वगैरे नाही, एक प्रयोग केला अन रिझल्ट आवडला म्हणून इथे देतेय
नवर्याने अचानक प्लम्स चा एक बॉक्स आणून टाकला. इंपल्सिव्ह शॉपिंग !! तसेही ते घरात कुणाचं फेवरेट फळ नाही, त्यात हे प्लम्स होते आंबट, २ दिवस ठेवून जरा मऊ झाले पण आंबट ते आंबटच!! इथे सध्या इतकी थंडी आहे, आंबट काही खायचा विचार पण करवत नाहीये ! म्हणून म्हटलं फेकून द्यायच्या ऐवजी काहीतरी वापर करावा. या प्रयोगाचे फळ (की फळावरचा प्रयोग ?) ही चटणी!
तर छोट्या पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करून जिरे, हळद घाला, हि. मिरच्यांचे तुकडे अन २-३ प्लम्स चे बारीक तुकडे करून त्यात सुमारे दोन मिनिटे परता. मी सालासकटच घेतले प्लम्स. प्लम्स शिजल्यावर/ परतले गेल्यावर गॅस बंद करून ब्राउन शुगर / साखर / किसलेला गूळ घाला अन नीट हलवून मिक्स करा. दुसरीकडे तीळ भाजून त्याची पूड करा. मग थंड झालेलं प्लम्स चे मिक्स्चर, तिळाची पूड, चवीप्रमाणे मीठ हे मिक्सर मधे फिरवा. पाणी घालायची गरज नाही. चटपटीत चटणी तय्यार !
याची चव साधारण टोमॅटोच्या चटणीसारखी लागते , पण एक किंचित फ्रूटी फ्लेवर येतो तो मस्त लागतो.
रंगावरून जरा क्रॅनबेरी सॉस / चटणीची पण आठवण येते - चव तशी नाही.
होल व्हीट ब्रेड वर , पोळीशी , कोल्ड कट सॅडविचेस मधे अशी कुठेही वापरता येते.
प्लम्स म्हंजी काय रे भाऊ /ताई
प्लम्स म्हंजी काय रे भाऊ /ताई ?
क्या हूड, गुगाळने का ना ! हे
क्या हूड, गुगाळने का ना ! हे पहा : http://en.wikipedia.org/wiki/Plum
खर्जुर काय ? होक्के होक्के...
खर्जुर काय ? होक्के होक्के...
नाय ना भाव! खजूर वायला न प्लम
नाय ना भाव! खजूर वायला न प्लम वायला. प्लम म्हंजे आलूबुखार विंग्रजीत.
पण माझ आवडत फळ आहे न हे.. कोइ
पण माझ आवडत फळ आहे न हे..
कोइ क्यु इसे शहिद करेगा ?
दिल पे पथ्थ्र रख के ट्राय मारावी म्हणते.. करुन बघेल..
रच्याकने फ्रिज बाहेर किती दिवस टिकेल ?
Pages