अरुणा रामचंद्र शानबाग या २५ वर्षीय परिचारिकेवर के.इ.एम. रुग्णालयात , कंत्राटि कक्षसेवक सोहनलाल वाल्मिकी याने २७ नोव्हेंबर १९७३ च्या रात्री ती कपडे बदलत असताना तिच्यावर अतिप्रसंग केला आणि ती ओरडू नये म्हणून कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळला...ज्याची परिणिती तिच्या विकलांगतेत होवून ४२ वर्षे ना जिवंत ना मेलेल्या अशा वेजिटेटिव स्टेट मधे काढल्यानंतर १८ मे २०१५ ला अरुणाचा मृत्यू झाला.
सोहनलालला पकडण्यात आले आणि त्याच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला. मारहाण आणि चोरीचा गुन्हा सिद्ध होवून त्याला दोन वेळा ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली...ती त्याने भोगली.
अरुणा शानबागच्या म्रुत्यूपश्चात पुन्हा एकदा हे प्रकरण ताजे होवून बरीच चर्चा झडली. वृत्तपत्रे, टीव्ही आणि इतर माध्यमातून पुनश्च या प्रकरणाचा उहापोह झाला.
सकाळने या पुढे जावून सोहनलाल सध्या कुठे आहे आणि काय करतो आहे...याचा शोध घेतला
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील पारपा या गावी सोहनलाल रहात असून त्याला गावाने आणि नातेवाइकांनी अगदी पत्नीनेसुद्धा झिडकारले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ३० किलोमीटर दूर मजूरी करत असून त्यासाठी रोज ३० + ३० असे साठ किमी रोज वयाच्या ६३/ ६४ व्या वर्षी सायकल दामटवतो.त्याला मासिक ४००० वेतन मिळते. त्यातून त्याची गुजराण होते.
या बातमीनंतर सकाळने आज पुन्हा एक बातमी प्रसिद्ध केली आहे.
४२ वर्षे अरुणाला मरणयातना भोगायला लावलेल्या सोहनलालवर खुनाचा खटला दाखल करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री म्हणताहेत तर त्याला फासावर लटकवायला हवे अशी लोकांची संतप्त प्रतिक्रिया असल्याचे सकाळ म्हणत आहे.
मला वाटते..... अरुणावर अत्याचार झाले...४२ वर्षे मरणप्राय यातना भोगून तिचे निधन झाले. सोहनलालने शिक्षा भोगली आणि तोही जिवंत असून काही सुखात नाही. आता पुन्हा खटला... पुन्हा प्रसारमाध्यमात चर्वितचर्वण .... आणि सुटका झालेल्या अरुणाची पुन्हा एकदा विटंबना. हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय.
काय म्हणता माबोकर्स?
--डॉ.कैलास गायकवाड .
सुमुक्ता, लिन्क्स बद्दल
सुमुक्ता, लिन्क्स बद्दल धन्यवाद.
>>>> काही अपरिहार्य स्थितीमुळे मारहाणीचा आणि अमानवी अत्याचाराचाच गुन्हा दाखल झालेल्या सोहनलालची न्यायालयाने दिलेली शिक्षा संपली; पण जगण्याची शिक्षा तो अजूनही रोज भोगतोय. कायद्याच्या चौकटीबाहेर एक न्याय असतोच. <<<<
>>>> ‘खबर तो बियालीस साल पहले भी आयी थी... तब भी उसमें रेप का जिकर नहीं था ।’ असं सांगायलाही हा नराधम विसरला नाही. <<<<
पहिल्या दोनही लिंकमधिल ही वाक्ये जरा अधोरेखित कराविशी वाटली.
एकुणच दोनही लेखात कुठेही, सोहनलालबद्दल सहानुभुती निर्माण व्हावि अशा प्रकारे शब्दरचना नाही, आहे ती केवळ सद्यस्थिती मांडलेली आहे.
एकुणच वरील दोनही लेख, या धाग्यावर जे आक्षेप "सकाळ" व त्याचे वृत्तप्रतिनिधी यांचेबाबत घेतले जात आहेत ते अयोग्यच नव्हे तर "साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखे" वाटले.
हे माझे मत.
माझ्या आधीच्या पोस्टमधिलही एकही शब्द बदलायची गरज मला वाटत नाहीये. मी माझ्या मतांवर ठाम आहे.
मूळ मुद्दा बाजुला राहून विनाकारण "सकाळ", "वृत्तपत्रकारिता" वगैरे बाबींवर चूकीच्या मुद्याने गुद्दे लगावले जात आहेत असे मला वाटते.
मला हा सकाळचा लेख टिपिकल सबसे
मला हा सकाळचा लेख टिपिकल सबसे तेज , आज तक टाइप हिंदी भंपक बातमीपत्रे असतात त्याच्या रूपरेखेवर बेतलेला वाटला. भाषा सगळी गिमिक्स ने भरलेली, उगीच सगळ्या गोष्टींना नाटकी वळण देण्ञाचा प्रयत्न! उथळ सवंग पत्रकारितेचं उदाहरण वाटलं अगदी
"पारपा (उत्तर प्रदेश): ‘अब क्या है...कहानी खत्म हुई है... अब क्या पूछेंगे आप?... मैं तो बस अपने बचे हुए टाइम को गुजार रहा हूँ... मजदूरी करता हूँ।’ हे हताश उद्गार आहेत सोहनलाल भरता वाल्मीकीचे.
‘सकाळ’ने त्याला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील पारपा या गावात गाठले. एक गूढ बनलेला सोहनलाल आता चलतीफिरती लाश बनला आहे. अरुणा शानबागवर अत्याचार केल्याने त्याला गावाने, नातेवाइकांनी आणि अगदी पत्नीनेही झिडकारले आहे. रोज सकाळी ३० किलोमीटर तो सायकल दामटत जातो. मेहनत करतो. पुन्हा तशीच सायकल दामटत घर गाठतो. साठी ओलांडल्यानंतरही त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी, अवघ्या चार हजार रुपयांसाठी हातपाय झिजवावे लागत आहेत. समाजानंतर आता डोळ्यांनीही त्याची साथ सोडलीय...
अरुणाच्या मृत्यूनंतर सोहनलालवर पुन्हा खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची चर्चा त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या कानावरसुद्धा आली होती. त्यामुळेच बहुधा पुन्हा आपल्याला अटक तर होणार नाही ना, ही भीती सायकलवरून कामावर जाता-येतानाही त्याचा पिच्छा पुरवते. ‘बाबूजी, मैं मजदुरी करता हूँ । अपने बच्चों को पालने पोसने का काम करता हूं ।....."
याला सरळ सरळ सेन्सेशनॅलिझम आणि एक प्रकारे सहानुभूती पण निर्माण करण्याचा प्रयत्न नाही तर दुसरं काय म्हणावं !!
बाकी आधी बातमी न वाचताच प्रतिक्रिया देणे आणि आता वाचल्यानंतर " माझं बरोबर होतं की , माझी प्रतिक्रिया कायम आहे " इ. ला काही अर्थ उरत नाही !
मै +१
मै +१
न्यायालयाने दिलेली शिक्षा
न्यायालयाने दिलेली शिक्षा संपली; पण जगण्याची शिक्षा तो अजूनही रोज भोगतोय>>>>>>
@लिंबुटींबु - ही काय सहानभुती निर्माण करणारी लाईन नाहीये? जगण्याची शिक्षा भोगतोय म्हणजे तो काय करतोय? सर्वच लोक जगण्याची शिक्षा भोगतायत. सर्वच लोक रोजगारासाठी कष्ट करतायत.
ह्या विषयावरची तुमची लाईन चुकलीच आहे. आता उगाच काहीतरी सारवासारव करता आहात.
जन्मठेप म्हणजे १४ वर्ष शिक्षा हे ज्या लोकांनी ठरवले ते कोण महान लोक आहेत?
डॉ. कैलास गायकवाड , आपण
डॉ. कैलास गायकवाड ,
आपण आपल्या दिनांक ३ जूनच्या प्रतिक्रियेत /प्रतिसादात - इथे लिहिणारा प्रत्येक जण त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्यासारखा लिहितो आहे. असे नमूद करून प्रत्येकाच्या प्रतिसादातील एक एक वाक्य लिहिले आहे .
त्यामुळे आपण नमूद केलेले प्रतिसाद बरोबर कि चूक आणि त्यावर आपणास काय म्हणावे वाटले हे समजले नाही . अन्य प्रतिसादाबाबत मी आता काही म्हणणार नाही ,पण माझ्या प्रतिसादातील -लाख अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.हे एकच वाक्य वेगळे काढून आणि त्या वाक्यास -आपली घटना सांगते, हे वाक्य सुरवातीस जोडून-आपली घटना सांगते, लाख अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. असे दिले आहे .
प्रत्यक्षात माझा प्रतिसाद व भावना या दुर्दैवी घटना ,त्यावरील चर्चा आणि आजची परिस्थिती यांचा एकत्रित विचार करून दिलेला प्रतिसाद आहे ज्याचा शेवट -वरील परिस्थितीचा आज एकत्रित विचार केला तर अरुणा हि योग्य न्याय मिळवण्याच्या बाबतीत पोलिस यंत्रणा आणि सामाजिक बंधने ,चालीरीती या कात्रीत अडकून बळी गेलेली पिडीत आहे असे मला वाटते .
यानंतर विलंबाने मिळणारा न्याय हा देखील अन्याय ठरतो .हि संकल्पना आणि शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एक निरपराधी अडकता कामा नये , या सारख्या विचार धारा या ठिकाणी कशा हाताळल्या जाव्यात या बाबत मी ठाम निर्णय घेण्याच्या मनस्थितीत देखील नाही . त्यामुळे माझ्याकडे आता हे सर्व थांबवा किंवा वाल्मिकीचा वाल्या झाला असल्याने पुनश्च नवीन खटला उभा करा यातला कोणता निर्णय घेतला जावा हे सांगण्याचे धारिष्ट्य राहिलेले नाही . हेच खरे , असा आहे.
आपण वरील प्रतिसादातील -शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एक निरपराधी अडकता कामा नये एवढेच वाक्य स्वतंत्र दिल्याने त्यातून प्रतिसादाची दिशा बदलते . जसे हा धागा सुरु करताना आपण त्यात म्हटले आहे कि ",मला वाटते … सोहनलालने शिक्षा भोगली आणि तोही जिवंत असून काही सुखात नाही " एवढाच भाग जर तुमचे मत म्हणून दिला तर ?
तेंव्हा चर्चा जरूर करू पण संदर्भा सह एवढेच मला वाटते.
मैत्रेयी आणि टोचा यांच्याशी
मैत्रेयी आणि टोचा यांच्याशी पूर्ण सहमत .......
मुळात ह्या बातमीच शीर्षकच चुकीच आहे
काय तर म्हणे 'रोज भोगतोय नरकयातना '
कसल्या नरकयातना ???????????
अगदी नॉर्मल आयुष्य जगतोय तो नालायक माणूस
मुलाबाळां बरोबर राहतोय ,चांगला व्यवस्थित आहे तो काही धाड भरली नाहीये त्याला
नरकयातना अरुणाच्या नशिबी आल्या ,आणि तेही कुठलाही गुन्हा केलेला नसताना
"नरकयातना"? एखाद्याला बेचाळीस
"नरकयातना"? एखाद्याला बेचाळीस वर्षं स्वतःच्या कृत्यामुळे मेल्यासारखे जीवन भोगायला लावणे,(तेही भावना जिवंत आणि फक्त शरीर असहाय असताना) याची खरी शिक्षा खूप मोठी असायला हवी. आता तो प्रसंग घडला नसता तर एका डॉक्टराशी लग्न करुन सामान्य समाधानी आयुष्ञ जगत असती ती. एक आयुष्य फक्त त्याला शिस्त पाळायला लावली म्हणून कीरकोळीत पूर्ण बरबाद करणे याची जी शिक्षा मिळावी ती त्याला कधीच मिळालेली नाही. आणि आता मिळाली तरी वयामुळे तुरुंगात जास्त काही हाल न होता नैसर्गिक म्हातारपणाने मरेल.
"त्याने पण भोगलं, आता जाउदे ना अजून काय शिक्षा करायची" असं म्हणणारे खूप मोठा विनोद करत आहेत. (आता उपयोग नाही, फक्त त्याच्यावर सरकार चा अजून खर्च होईल हा मुद्दा मात्र पटतो.)
अरुणा हि योग्य न्याय
अरुणा हि योग्य न्याय मिळवण्याच्या बाबतीत पोलिस यंत्रणा आणि सामाजिक बंधने ,चालीरीती या कात्रीत अडकून बळी गेलेली पिडीत आहे असे मला वाटते .
+१
Pages