''अरुणा शानबाग, सोहनलाल भरता वाल्मिकी आणि सकाळ शोधपत्रकारिता''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 30 May, 2015 - 02:43

अरुणा रामचंद्र शानबाग या २५ वर्षीय परिचारिकेवर के.इ.एम. रुग्णालयात , कंत्राटि कक्षसेवक सोहनलाल वाल्मिकी याने २७ नोव्हेंबर १९७३ च्या रात्री ती कपडे बदलत असताना तिच्यावर अतिप्रसंग केला आणि ती ओरडू नये म्हणून कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळला...ज्याची परिणिती तिच्या विकलांगतेत होवून ४२ वर्षे ना जिवंत ना मेलेल्या अशा वेजिटेटिव स्टेट मधे काढल्यानंतर १८ मे २०१५ ला अरुणाचा मृत्यू झाला.

सोहनलालला पकडण्यात आले आणि त्याच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला. मारहाण आणि चोरीचा गुन्हा सिद्ध होवून त्याला दोन वेळा ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली...ती त्याने भोगली.

अरुणा शानबागच्या म्रुत्यूपश्चात पुन्हा एकदा हे प्रकरण ताजे होवून बरीच चर्चा झडली. वृत्तपत्रे, टीव्ही आणि इतर माध्यमातून पुनश्च या प्रकरणाचा उहापोह झाला.

सकाळने या पुढे जावून सोहनलाल सध्या कुठे आहे आणि काय करतो आहे...याचा शोध घेतला

sakal2.jpg

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील पारपा या गावी सोहनलाल रहात असून त्याला गावाने आणि नातेवाइकांनी अगदी पत्नीनेसुद्धा झिडकारले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ३० किलोमीटर दूर मजूरी करत असून त्यासाठी रोज ३० + ३० असे साठ किमी रोज वयाच्या ६३/ ६४ व्या वर्षी सायकल दामटवतो.त्याला मासिक ४००० वेतन मिळते. त्यातून त्याची गुजराण होते.

या बातमीनंतर सकाळने आज पुन्हा एक बातमी प्रसिद्ध केली आहे.

sakal1.jpg

४२ वर्षे अरुणाला मरणयातना भोगायला लावलेल्या सोहनलालवर खुनाचा खटला दाखल करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री म्हणताहेत तर त्याला फासावर लटकवायला हवे अशी लोकांची संतप्त प्रतिक्रिया असल्याचे सकाळ म्हणत आहे.

मला वाटते..... अरुणावर अत्याचार झाले...४२ वर्षे मरणप्राय यातना भोगून तिचे निधन झाले. सोहनलालने शिक्षा भोगली आणि तोही जिवंत असून काही सुखात नाही. आता पुन्हा खटला... पुन्हा प्रसारमाध्यमात चर्वितचर्वण .... आणि सुटका झालेल्या अरुणाची पुन्हा एकदा विटंबना. हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय.

काय म्हणता माबोकर्स?

--डॉ.कैलास गायकवाड .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय्ला, या नरकयातना?
वयाच्या ६० व्या वर्षी ३० कि मी सायकल चालवण्या इतपत धडधाकट आहे तो. मुलं नातवंड यांच सुख उपभोगुन आता थोडे कष्ट करतोय. या कसल्या नरकयातना? अरुणाला मात्र आयुष्यातुन उठवल याने.

साधना, नीधप, किंकर ह्यांच्याशी सहमत.

खरी शोककथा अरुणाची आहे आणि त्यावरच फोकस रहायला हवा. सोहनलालचा शोध ही मला सवंग पत्रकारिता वाटली. अरुणा शानभाग अजून ४ वर्षे जिवंत राहिल्या असत्या तर हाच सकाळचा पत्रकार आज सोहनलाल ला शोधायला गेला नसता. अरुणा जाण्याच्या स्टोरीमधला एकमेव कच्चा दुवा म्हणजे सोहनलालचे पुढे काय झाले हे कोणालाच माहिती नसणे. म्हणून लगेच हे बाहेर पडले आणि शोध लावला कि कसा तो हालाखीच्या परिस्थिती मधे आहे वगैरे.

४२ वर्षे कोणी स्त्री अशा अवस्थेत काढते, झाल्या घटनेला ४२ वर्षे झाल्यामुळे तिचे नातेवाईकसुद्धा तिला फारसे भेटायला येत नसत व तिच्या मृत्युची बातमी झाल्यावर मग ते आले/ त्यांना यावे लागले, ही माझ्या दृष्टीने खरी शोकांतिका. एवढे भयानक कृत्य करणारा सोहनलाल कुत्र्याच्या मौतीने मरेल / मेला असेल हे मी स्वतःशी धरून चाललो होतो. 'करावे तसे भरावे' वरचा माझा पांढरपेशा विश्वास म्हणा हवं तर. पण मला तसा विश्वास आहे. तो माणूस कुठे आहे व कसा रहातो वगैरे मुद्दे गौण आहेत.

सोहनलालचा शोध ही मला सवंग पत्रकारिता वाटली. अरुणा शानभाग अजून ४ वर्षे जिवंत राहिल्या असत्या तर हाच सकाळचा पत्रकार आज सोहनलाल ला शोधायला गेला नसता.>>>> +१

सोहनलालवर पुन्हा खटला चालवून काहीही मिळणार नाही. सुरुवातीलाच त्याला एवढी कमी शिक्षा झाली ह्याचा अर्थ आपल्या कायद्यामध्ये कमी आहे. पुन्हापुन्हा खटले चालवून त्याला फुकट प्रसिद्धि देण्याऐवजी स्त्रियांवरील अत्याचार कसे कमी होतील, असे अत्याचार करणार्‍या नराधमांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, त्यासाठी कायद्यामध्ये काय तरतुदी करता येतील आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कायदे अंमलात कसे येतील हे पाहणे महत्वाचे आहे. सोहनलालला पुन्हा शिक्षा झाल्याने समस्त स्त्रीवर्गास न्याय वैगेरे मिळनार नाहिये आणि तसा तो अरुणा शानबाग ह्यांनासुद्धा मिळणार नाहिये!!

नीधप यांच्याशी सहमत
नरकयातना कसल्या डोंबलाच्या ?
काय झालंय त्याला रोज ६० किमी सायकल चालवण्या इतका धडधाकट आहे तो नालायक
व्यवस्थित खातोय पितोय , ,मुला नातवंडांमध्ये राहतोय
आणि या देशातल्या असंख्य लोकांना पोट भरण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतात

ह्या नीच माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्याच्या तुलनेत काहीच शिक्षा झाली नाहीये

नी, सुमुक्ता आणि त्यांच्यासारख्या मतांशी सहमत. शोधपत्रकारिता म्हणजे नक्की काय? सोहनलालचा शोध घेण्याची गरज नक्की कोणाला वाटत होती? आणि का? बातमी/लेख तर आजीबात वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिलेला नाही. सगळीकडे स्वतःची मते घुसडली आहेत! लेख वाचून सोहनलालविषयी चीड उत्पन्न होण्याऐवजी ह्या मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या पत्रकारांविषयी चीड उत्पन्न झाली Angry ४२ वर्षे अरुणा जिवंत होती तेव्हा ह्यांना शोधपत्रकारिता करण्याची गरज वाटली नाही कारण त्याला काही बातमीमूल्य मिळालं नसतं. आता इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. आणि एवढे करून ह्या शोधपत्रकारितेचे फलित काय? चार दिवसांची प्रसिद्धी/टीआरपी. It's a low dignity act by Sakal. नालायकपणा नुसता!

ह्या पत्रकाराला प्रमोशन, टीआर्पी, भत्ते, प्रसिद्धी मिळाली ना मग अजुन काय पाहिजे त्याला? कस्ला सोहन आणि कसली अरूणा... त्या सोहन पेक्शा हा पत्रकारचं नराधम वाटतो मला तर. असं लिहुन त्याचा टीआर्पी वाढवतोय असं ही वाटतय मला, पण राहवल नाही.
सकाळ म्हणजे काय परत एक पवारच ना, पैसे सत्ता ह्याचा खेळ करणार कुणाशी काय घेणं देणं
:रागः

बेफिकीर,

>> तो ताण आहे गामा! नरकयातना नाहीत.

नरक ना मी बघितलाय, ना तुम्ही, ना वाचकांनी. नरकयातना नक्की कशा असतात हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे सोहनलालची अमुक एक परिस्थिती चांगली किंवा वाईट आहे असं ठरवता येत नाहीये.

म्हणून एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही न्यायाधीश असलात तर सोहनलालला काय शिक्षा ठोठावली असती? भादंवि वगैरे विसरा. तुम्ही सर्वसत्ताधीश आहात. अरुणाची काय हालत झालीये ती तुम्हाला माहितीये.

आ.न.,
-गा.पै.

खरी शोककथा अरुणाची आहे आणि त्यावरच फोकस रहायला हवा. सोहनलालचा शोध ही मला सवंग पत्रकारिता वाटली. अरुणा शानभाग अजून ४ वर्षे जिवंत राहिल्या असत्या तर हाच सकाळचा पत्रकार आज सोहनलाल ला शोधायला गेला नसता.
----- सहमत... तसेच निधप यान्च्या सर्वच पोस्टशी सहमत...

त्याने गुन्हा केला, कोर्टापुढे जो काही सज्जड पुरावा ठेवला होता त्या आधाराने कायद्याच्या चौकटीत त्याला शिक्षा मिळाली. मिळालेली शिक्षा त्याने भोगली. आता अरुणा यान्चे निधन झाल्यावर खुनाचा गुन्हा नोन्दवण्याचे घाटत आहे. मग पुन्हा पुरावा, कोर्ट... आणि मुख्य म्हणजे तिचा मृत्यु हा त्या प्राणघातक हल्ल्यामुळेच झालेला आहे हे सिद्ध करणे.... न्युमोनिआमुळे तिचा अन्त झाला असे डॉक्टरान्चे निवेदन वाचल्याचे स्मरते. केस चालवुन त्याला खुनाच्या आरोपात अडकवले जाण्याची शक्यता निव्वळ अशक्य वाटते.

कोर्टाला भावना नसतात, त्याला पुरावे हवे असतात, सज्जड पुरावे समोर ठेवण्याचे महत्वाचे आपण समजायला हवे.... आणि म्हणुनच असे महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचे अगदी पद्दतशीर प्रयत्न काही अट्टल, सराईत गुन्हेगार, उद्द्योजक, ढोन्गी बाबा, स्वामी करत असतात. कोर्टाच्या बाहेर साक्षीदार विकत घेणे, मारले जाणे, किव्वा कृत्रिम अपघात घडवुन त्यान्ना सम्पवण्याचे प्रयत्न होणे हे कायद्याचे राज्य नसल्याचे प्रतिक आहे. अत्यन्त गम्भिर गुन्ह्यात अडकलेला सन्जय दत्त वारम्वार बाहेर येणे, गम्भिर आरोपामधुन सलमान सुटणे, महत्वाचे साक्षीदार नाहिसे होणे. आसारामान्च्या केस मधे आतापर्यन्त दोन साक्षीदारान्ची निर्घुण हत्या झालेली आहे, अनेक हल्ले झाले आहेत.
या केस मधे पुरावे नष्ट होण्याचा किव्वा साक्षीदारावर दडपण आणण्याचा प्रकार होणार नाही पण पुरावा गोळा करणे आणि हल्ला-मृत्यु यान्चा सम्बन्ध सिद्ध करणे महा कठिण कार्य आहे.

अरुणा शानबाग यान्ची ४२ वर्षे अखन्ड, अविरत सेवा शुश्रूषा करणार्‍या KEM च्या परिचारिका, वैद्यकीय कामगार, स्वच्छता ठेवणारे कामगार या सर्वान्ना मनोभावे नमस्कार. त्या सर्वान्च्या सान्घिक कार्याची दखल घेणे अत्यन्त गरजेचे आहे. माझ्यासाठी KEM च्या परिचारिका ह्या शान्ततेच्या नोबेल पारोतोषिकाच्या मानकरी आहेत. त्यान्च्या कार्याला सलाम.

एक जण आकाशाकडे पाहू लागला की येणार्‍या जाणार्यातील बरेच जण त्या एकाच्या बाजुला उभारुन आकाशात पाहू लागतात...
एकाने एक दगड उचलुन एकीकडे मारला, तर कित्येकजण तशाचप्रकारे दगड उचलुन एकीकडे मारू लागतात....
गर्दीचा हा स्थायीभाव असतो. व त्याची प्रचिती कोणत्याही प्रसंगात येऊ शकते.

गेली बेचाळिस वर्षे, जनतेपुढे दरवर्षी या प्रसंगाची आठवण लेख/स्फुट/फोटो याद्वारे मांडण्याचे काम सकाळ व तत्सम वृत्तपत्रांनीच केले आहे. तसे ते केले नसते, तर आजच काय, गेल्या बेचाळीस वर्षातही अरुणाबद्दल कुणालाच काही माहित असण्याचा संबंध नव्हता. (आता असे निलाजर्‍यासारखे वावदूक युक्तिवादही करू नका की त्यात विशेष ते काय केले, तो त्यांचा "धंदाच" होता.

माझ्या आठवणीप्रमाणे (मी वाचता यायला लागल्यापासून म्हणजे १९६७ पासून २००० पर्यंत सकाळ वाचत आलोय), आत्ताच नव्हे तर पूर्वीही सकाळ व तत्सम वृत्तपत्रांनी त्या गुन्हेगाराचा मागोवा घेतला होता. त्याची शिक्षा भोगुन सम्पल्यावर त्याबद्दलची माहितीही बातमीद्वारे पुरविलि होति. कारण माझ्या माहितीतील तेव्हांच्या सर्व जाणत्या लोकांस माहित करुन घेण्याची इच्छा होतीच होती की अरुणा तर अंथरुणास खिळली आहे, तरी त्या गुन्हेगाराचे पुढे काय झालय.

आजही जेव्हा अरुणाचे निधन झाले, तेव्हा तत्काळ एक प्रश्न समोर उभा राहिलाच, की तिच्या या अवस्थेस कारणीभूत असणारी व्यक्ती , तिचे वर्तमान काय आहे? भूत भविष्य काय आहे ? बेचाळीस वर्षांच्या मरणासन्न अवस्थेच्या तुलनेत त्या व्यक्तिस झालेली "शिक्षा" पुरेशी होती का? भले कायद्याने/कायद्याच्या चौकटीत पुरेशी असेल, नैतिकतेच्या चौकटीत त्या व्यक्तिचे काय अस्तित्व मोजावे?

सकाळने सध्या दिलेली बातमी मी "सखोल/संपुर्ण/शब्दशः" वाचलेली नाही. पण एक नक्की की त्यांनी त्या गुन्हेगार व्यक्तिचा शोध घेऊन त्याची माहिती "शोधपत्रकारिता(?)" किंवा तत्सम बाबीखाली शोधुन दिली असल्यास त्यात काहीच गैर केलेले नाहीये.

मला सहज रामन राघवनची केस आठवली, खूप जुनी केस आहे, व मलाही तितकासा तपशील आठवत नाही पण लोकांना "वेडा ठरवून फाशीची शिक्षा टळलेल्या" रामन राघवनचे पुढे काय झाले/होतय हे जाणुन घेण्याची उत्सुकता असायचीच, व तो मेल्यावर त्याचीही बातमी यच्चयावत वृत्तपत्रात आल्याचे स्मरते.

पण.........
पण वर सुरवातीला उल्लेखिलेल्या गर्दीच्या स्थायीभावाप्रमाणे सकाळ व त्यांच्या पत्रकारावर "शाब्दिक दगड" मारायची इनथीम एकाने सुरु केल्यावर बरेच जण निव्वळ मेंढरांच्या सवईने सामिल होत असतील, तर ते वाचित बसुन सोडून देणेही अशक्य होतय म्हणून ही पोस्ट.

मी सकाळ वृत्तपत्राच्या स्व.परुळेकरांनंतरच्या वाटचालीवर व त्यांच्या एकंदरीतच राजकीय एकतर्फी विचारसरणीशी सहमत नसल्याने, बहुषः विरोधीच असल्याने सकाळबद्दल माझे "प्रेम उतू जाणे" शक्य नाही. तरीही वरील माहितीच्या प्रकरणात विनाकारण सकाळ वर आगपाखड होते ती मला मान्य नाही, पटत तर नाहीच नाही.

कदाचित असेही असेल, की शोधपत्रकारीतेमार्फत बॉलिवुड वा हॉलिवुडमधील कोणत्या नटनट्या वा राजकारणातले कोणते नेते कसे हगलेपादले याच्याच बातम्या वाचायची सवय लागल्याने इतक्या गंभीर विषयाचा-गुन्हेगाराचा मागोवा झेपला नसेल, पचला नसेल. असो.

सकाळने दिलेली बातमी न वाचताच त्या बातमीची भलावण करत, ती बातमी वाचून प्रतिक्रिया देणार्‍या लोकांना वावदूक, गंभीर विषय पचला नाही वगैरे विशेषणे लावण्याचा खेळ अगम्य, दुर्दैवी आणि हास्यास्पद आहे.

ह्या धाग्याने काऊ, नीधप, बेफिकीर आणि पगारे सुद्धा एका मतावर आले हा भारतात लोकशाही कीती मुळापर्यंत गेली आहे ह्याचा पुरावाच नाही का?

इथे लिहिणारा प्रत्येक जण त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्यासारखा लिहितो आहे.

त्या रात्री काय झाले हे तुम्ही पाहिले आहे काय?

वैद्यकीय तपासणीत बलात्कार न झाल्याचे सिद्ध झाले आहे.

आपली घटना सांगते, लाख अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.

अपराध्याला आपल्या बचावाची पूर्ण संधी देण्यात येते. आणि सरकारपक्ष / फिर्यादिपक्ष पुराव्यानिशी अपराध सिद्ध करुन गुन्हेगारास शिक्षा व्हावी अशी बाजू मांडते.

ज्या अपराधाविरुद्ध पुरावा होता ते अपराध सिद्ध होवून सोहनलालने शिक्षा भोगली आहे.

काहीही अपराध नसताना गळ्याभोवती आवळलेल्या साखळी मुळे मेंदूस इजा होवून ४२ वर्षे अरुणाने अपरिमित दुखणे सहन केले आहे.

आता सोहनलाल वरील आरोप कसे सिद्ध होतील?

काहीही होणार नाही....

होईल ती सकाळची प्रसिद्धी ... आणि

निघतील ते..

अरुणाच्या अब्रुचे धिंडवडे...बास..बाकी काही नाही.

सोहनलालला तो आत्ता करत असलेल्या नोकरी वरुन काढल असं याहू वर एका बातमीत वाचल..
म्हणजे सकाळच्या शोधानंतर..

कैलास, मला वाटतं बर्‍याच जणांचा आक्षेप सकाळने सोहनलालबद्दल जी सहानुभूती निर्माण करायचा प्रयत्न केलाय त्यावर आहे.
या उलट डॉ. रवि बापटांनी जे लिहिलेय ते फार योग्य आहे.

डॉ. रवी बापटांनी जे लिहिलंय ते योग्य असले तरी मला ते खूप काही नवीनच असल्यासारखे वाटले नाही. म्हणजे ते सगळे आधीच वाचल्यासारखे वाटले. अचानक त्यांनी हा लेख का लिहिला? आधीच का नाही लिहिला, वगैरे मनात आले. पण त्यांचा लेख योग्य आहे हे नक्कीच वाटले.

नीधपंचे पटते आहे. सकाळच्या वर्तनावर खरा आक्षेप घ्यायला हवा आहे. कदाचित कायद्याच्या मर्यादा सोहनलालला पुन्हा अडकवू शकणार नाहीतही (/नाहीतच) पण निदान सकाळवाल्यांना जबाबदारीचे भान असायला हवे असे वाटत आहे.

डॉ. बापट घटना घडली त्या काळात के ई एम मधेच होते. दुर्घटनेच्या नंतर घडत गेलेल्या अनेक गोष्टींचे ते साक्षीदार असणार अर्थातच.
सोहनलालची भलावण करणारी सकाळची कामगिरी वाचून कुठल्याही सेन्सिटिव्ह/ सहृदय माणसाला अस्वस्थ होईल. त्यामुळे त्यांना हा लेख लिहावेसे वाटणे हे साहजिक वाटते.

सोहनलालची भलावण करणारी सकाळची कामगिरी वाचून कुठल्याही सेन्सिटिव्ह/ सहृदय माणसाला अस्वस्थ होईल. त्यामुळे त्यांना हा लेख लिहावेसे वाटणे हे साहजिक वाटते.

+१

सकाळची पत्रकारिता कशासाठी आहे हे उघड आहे.

रोज ६० किमी सायकल चालवणे तेही या वयात......
मला काहितरी घोळ वाटतोय. ताशी १० किमी जरी चालवत असेल किंवा १५ तरी नुसते सायकल चालवायचे ४/६ तास काम कधी नी शरीराचे काय ?
की तो ठोकुन दिलेला आकडा आहे ?

नीधप,

>> सोहनलालची भलावण करणारी सकाळची कामगिरी वाचून कुठल्याही सेन्सिटिव्ह/ सहृदय माणसाला अस्वस्थ
>> होईल. त्यामुळे त्यांना हा लेख लिहावेसे वाटणे हे साहजिक वाटते.

ती भलावण आहे की नाही यावर वाद होऊ शकेल. पण संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल हे नक्की.

अशीच अस्वस्थता मोनिका किरणापुरेच्या खुन्यांच्या बाबतीत दाखवावी म्हणून सुचवेन. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/crime...

निरपराध मोनिका जिवानिशी मेली आणि तिचे खुनी बाराचौदा वर्षे शिक्षा भोगून सुटणार. या नराधमांचं काहीतरी करायला हवंय ना?

आ.न.,
-गा.पै.

डॉक मला भिती वाटतेय पुढच्या बिग बॉस सिझनमध्ये सोहनलाल वाल्मिकि यायचा नाही ना??? Sad

वय झालंय त्याचं म्हणून नाहीतर कन्फर्म या लोकांनी तेही एन्कॅश केलं असतं....

येस भुंगा.... जितका मोठा बदनाम ...तितका मोठा सेलेब्रिटी असं या माध्यमांचं गणित आहे.

सोहनलालला शोधताना ह्या लेखाची लिंक http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5690240122869006869

सोहनलाल जिवंत आहे पण.... ह्या लेखाची लिंक http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5198983411237664600

सोहनलाल विषयक ई-सकाळ वरील इतर बातम्या http://online5.esakal.com/TagSearch.aspx?TagName=Sohanlal

Pages