Submitted by prachi_b on 13 August, 2009 - 07:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३ दिवस
लागणारे जिन्नस:
लिंबं
मीठ
क्रमवार पाककृती:
लिंबं अख्खी भरल्या वांग्याप्रमाणे चिरायची म्हणजे नुसत्या २ बाजूनी चिरा द्यायच्या. त्यात भरपुर मीठ भरायचं आणि झालं.
ही लिंबं बरणीत भरून ठेवायची आणि बरणी रोज गोल गोल फ़िरवयची म्हणून बहुदा हे ढकललिंबू. मुरायला जरा जास्त दिवस लागतात पण मुरलं की झकास. खूप दिवस टिकतं.
वाढणी/प्रमाण:
आवडीप्रमाणे
अधिक टिपा:
जुन्या मायबोलीवरुन
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=769644#P...
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Lalu : Friday, March 24, 2006
Lalu : Friday, March 24, 2006 - 1:02 pm:
हे खरं नाव असावं हा प्रकार याच नावाने मला पण माहित आहे. यात साखरही घालतात. उन्हात ठेवतात का ते नक्की आठवत नाही.
Arch : Friday, March 24, 2006 - 2:16 pm:
ए, ह्या ढकललिंबूमध्ये तिखट वगैरे नाही घालायच का?
Dineshvs : Friday, March 24, 2006 - 8:31 pm:
हे मातीच्या मडक्यात ठेवुन ऊन्हात ठेवायचे. यात लिंबे सुकल्यासारखी होतात. दहिभाताबरोबर खातात.
Prachi_b : Sunday, March 26, 2006 - 8:27 pm:
नाही मीठाशिवाय काहीच नाही लागत याला. तरी मस्त चव येते. दिनेश म्हणाले तस उन्हात पण ठेवतात. आम्ही चिनीमातीच्या फिरकीच्या झाकणाच्या बरणीत ठेवायचो आणि ती बरणी (झाकण लावून) जमिनीवर आडवी ठेवून एकमेकान्कडे ढकलयचो. लोणच लवकर मुरत म्हणे अशानी.
Prajaktad : Monday, March 27, 2006 - 6:13 am:
हा प्रकार औषधी आहे,पित्त,जळजळ, pregnancy मधे होणार्या कोरड्या उलट्या यावर उपयोगी आहे.
Dineshvs : Monday, March 27, 2006 - 10:53 am:
आखाती देशात अशी लिंबे नुसतीच वाळवुन ठेवायची पद्धत आहे. त्याला सोहारी लाईम असे म्हणायचे ( निदान मस्कतमधे तरी ते नाव होते. तिथे सोहार नावाचए गाव आहे. )
याची पुड करुन ठेवतात. सकाळी चहाच्या ऐवजी या पुडीवर गरम पाणी ओतुन ते पितात. हे पेय कडवट लागले तरी आरोग्याच्या दृष्टीने खुप छान आहे.
ढकललिंबू >>> काय पण नाव आहे
ढकललिंबू >>> काय पण नाव आहे
मला वाटले मिलिंदाने एखादा खेळ
मला वाटले मिलिंदाने एखादा खेळ सुरु केला आहे जो जुन्या मायबोलीवर लोकप्रीय होता
(No subject)
लिंबूटिंबू ने हे वाचल्यावर एक
लिंबूटिंबू ने हे वाचल्यावर एक स्वगत येईल...
"जुन्या एचजी वर खेळतच होते लोक हा खेळ. लिंब्याचा गेम करायचा खेळ. एकट्या लिंब्याला धरून त्यावर उभे आडवे वार करायचे. त्यावर झोंबतील असे तिखट्जाळ बोलायचे आणि मग लिंब्याला बाजुला ढकलून त्याचा अनुल्लेख करायचा.... ई.ई.ई....."
ढकललिंबू वरून मला तो जुन्या
ढकललिंबू वरून मला तो जुन्या मायबोलीतला बहुचर्चित 'चिकट मावशीचा' गेम आठवला .. HH, तू कर की त्याचा जीर्णोद्धार .. :p
अगं मला नाही भाईंना आवडायचा
अगं मला नाही भाईंना आवडायचा तो खेळ फार
क्या बात है सशल. मला पण हाच
क्या बात है सशल. मला पण हाच खेळ आठवला. सेम पिन्च.
आयला चिकट मावशी म्हटल्यावर आलीच ह. ह.
तुच खेळायचीस ना तो खेळ..
पहा चिकटमावशीचं नाव काढताच
पहा चिकटमावशीचं नाव काढताच भाई हजर!!
आता परत लोक काय म्हणतील
आता परत लोक काय म्हणतील म्हायताय?.