अरुणा रामचंद्र शानबाग या २५ वर्षीय परिचारिकेवर के.इ.एम. रुग्णालयात , कंत्राटि कक्षसेवक सोहनलाल वाल्मिकी याने २७ नोव्हेंबर १९७३ च्या रात्री ती कपडे बदलत असताना तिच्यावर अतिप्रसंग केला आणि ती ओरडू नये म्हणून कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळला...ज्याची परिणिती तिच्या विकलांगतेत होवून ४२ वर्षे ना जिवंत ना मेलेल्या अशा वेजिटेटिव स्टेट मधे काढल्यानंतर १८ मे २०१५ ला अरुणाचा मृत्यू झाला.
सोहनलालला पकडण्यात आले आणि त्याच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला. मारहाण आणि चोरीचा गुन्हा सिद्ध होवून त्याला दोन वेळा ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली...ती त्याने भोगली.
अरुणा शानबागच्या म्रुत्यूपश्चात पुन्हा एकदा हे प्रकरण ताजे होवून बरीच चर्चा झडली. वृत्तपत्रे, टीव्ही आणि इतर माध्यमातून पुनश्च या प्रकरणाचा उहापोह झाला.
सकाळने या पुढे जावून सोहनलाल सध्या कुठे आहे आणि काय करतो आहे...याचा शोध घेतला
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील पारपा या गावी सोहनलाल रहात असून त्याला गावाने आणि नातेवाइकांनी अगदी पत्नीनेसुद्धा झिडकारले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ३० किलोमीटर दूर मजूरी करत असून त्यासाठी रोज ३० + ३० असे साठ किमी रोज वयाच्या ६३/ ६४ व्या वर्षी सायकल दामटवतो.त्याला मासिक ४००० वेतन मिळते. त्यातून त्याची गुजराण होते.
या बातमीनंतर सकाळने आज पुन्हा एक बातमी प्रसिद्ध केली आहे.
४२ वर्षे अरुणाला मरणयातना भोगायला लावलेल्या सोहनलालवर खुनाचा खटला दाखल करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री म्हणताहेत तर त्याला फासावर लटकवायला हवे अशी लोकांची संतप्त प्रतिक्रिया असल्याचे सकाळ म्हणत आहे.
मला वाटते..... अरुणावर अत्याचार झाले...४२ वर्षे मरणप्राय यातना भोगून तिचे निधन झाले. सोहनलालने शिक्षा भोगली आणि तोही जिवंत असून काही सुखात नाही. आता पुन्हा खटला... पुन्हा प्रसारमाध्यमात चर्वितचर्वण .... आणि सुटका झालेल्या अरुणाची पुन्हा एकदा विटंबना. हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय.
काय म्हणता माबोकर्स?
--डॉ.कैलास गायकवाड .
<< हे सगळं इथेच थांबावं असं
<< हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय. >>
सहमत. तसंही कायद्याच्या कक्षेत राहून त्यावर पुन्हा काही खटला चालविता येईल असे वाटत नाही. माजी न्यायमूर्ती श्री. कोळसे पाटील यांनीही तसेच मत व्यक्त केले आहे. फार तर सर्वांनी त्याच्यावर बहिष्कार घालावा याकरिता सोहनलालच्या गावी जाऊन तेथील लोकांचे मन वळविता येऊ शकेल.
खुनाचा गुन्हा दाखल हु शकतो.
खुनाचा गुन्हा दाखल हु शकतो.
सहमत.
सहमत.
सगळा मूर्खपणा आहे.
सगळा मूर्खपणा आहे.
<<<हे सगळं इथेच थांबावं असं
<<<हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय.>>>
हे एका दृष्टीने खर असल तरी जर शक्य असेल तर खुनाचा खटला जरूर चालवावा अस वाटत ..
>>> साती | 30 May, 2015 -
>>> साती | 30 May, 2015 - 12:46 नवीन
सगळा मूर्खपणा आहे.
<<<
सोहनलालला शोधण्याचे काम सकाळने केले हे चांगले म्हणावे लागेल. प्रश्न असा मनात येतो की अरुणा शानबाग जिवंत असताना हे कोणालाच का सुचले नाही की केवळ सात वर्षे शिक्षा भोगणारा सोहनलाल कुठेतरी आनंदात वावरत असेल आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे? आज सकाळने 'भूमिका' असा एक कॉलम लिहून 'जे भल्याभल्या वृत्तपत्रांनी केले नाही ते आम्ही केले' असे नोंदवले आहे. सकाळच्या पत्रकारितेला ही जाग येण्यासाठी एक अरुणा शानबाग मरणे तरी का आवश्यक होते?
सोहनलालला आता पुन्हा पकडणे हे एक उदाहरण ठरेल समाजापुढे! तंत्रज्ञानामुळे लहानसहान बातम्या व्हायरल होण्याच्या ह्या काळात 'एक सोहनलाल इतक्या वर्षांनी पुन्हा पकडला जाऊ शकतो आणि कायद्याच्या कचाट्यात सापडतो' ही बातमीही व्हायरल होईल आणि नक्कीच काहीजणांचे डोळे उघडतील.
माझ्या तुटपुंज्या माहितीवरून
माझ्या तुटपुंज्या माहितीवरून मला असे वाटते, कै अरुणाचा मृत्यू हा त्या घटनेमूळेच झाला हे सिद्ध करणे कठीण जाईल. तो मृत्यू नैसर्गिक रित्या ( वय होऊन ) झाला असेच मानले जाईल. त्यामूळे हा गुन्हा सिद्ध होणे कठिण आहे.
परवाच एका न्यायालयाने केवळ तांत्रिक गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने, फाशीची शिक्षा रद्द ठरवली ( अनेक जणांच्या खुनाचा आरोप होता. )
भारतीय न्यायव्यवस्थेत एकाच
भारतीय न्यायव्यवस्थेत एकाच गुन्ह्यासाठी झालेली शिक्षा पुर्ण केली असल्यास परत त्याच गुन्ह्याकरीता शिक्षा होत नाही. असे कुठे वाचनात आले होते. जर खटला चालू असताना पीडीत व्यक्ती मरण पावली असल्यास चालू असलेला खटल्यांमधले कलम ठेवून अजुन नविन कलम लावता येते. उदा. एखाद्याने प्राणघातक हल्ला केल्यास त्यावर सेक्शन ३०७ ATTEMPT TO MURDER असा चार्ज लावून खटला उभा करण्यात येतो. खटला चालू असताना पीडीत व्यक्तीचा उपचार करताना जीव गेला तर सेक्शन ३०७ + सेक्शन ३०२ असे दोन्ही कलम लावले जातात. (बहुदा शिक्षा भोगत असताना देखील पुन्हा नविन कलम जोडता येउ शकते)
शानबाग यांच्या केस मधे बहुदा सेक्शन ३७५ + सेक्शन ३७६ + सेक्शन ३०७ असे कलम लावून दोनदा ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा पुर्ण झाल्यानंतर आरोपी व्यक्तीला सोडण्यात आले होते. त्यावेळी पिडीत व्यक्ती जिवंत होती. शिक्षा पुर्ण झाल्यानंतर ४० वर्षांनी पीडीत व्यक्ती मरण पावली आहे. जरी त्या मरणामागे आरोपी व्यक्ती अप्रत्यक्ष जवाबदार असली तरी ४० वर्षानंतर पुन्हा ते कोर्टात सिध्द करणे इ. गोष्टींकरीता हुशार वकिलांची फौज उभारावी लागेल. १४ वर्ष सश्रम कारावास हा एका खुनाच्या खटल्यात देखील मिळतो. आणि सध्या असणारे आरोपीचे वय आणि त्याची सामाजिक अवस्था या दोन्ही गोष्टी आरोपीचा वकिल कोर्टापुढे मांडू शकतो. (जसे सलमान बाबतीत मांडले गेले की तो सामाजिक मदत चैरिटी इ. बरेच करतो.) त्यामुळे आरोपीला आता कितपत शिक्षा होउ शकते याबाबत साशंका जास्त आहे.
>>>माझ्या तुटपुंज्या
>>>माझ्या तुटपुंज्या माहितीवरून मला असे वाटते, कै अरुणाचा मृत्यू हा त्या घटनेमूळेच झाला हे सिद्ध करणे कठीण जाईल. तो मृत्यू नैसर्गिक रित्या ( वय होऊन ) झाला असेच मानले जाईल. त्यामूळे हा गुन्हा सिद्ध होणे कठिण आहे.<<<
ती ४२ वर्षे कोमात असणे हे तरी त्या घटनेमुळेच झालेले आहे. त्यासाठी सोहनलालला फक्त सात वर्षांची शिक्षा मिळणे योग्य आहे का हा प्रश्न तरी समाजात कोणत्या तरी व्यासपीठावर ह्या निमित्ताने विचारला जाईल.
बाकी आता आंदोलने, पत्रकारिता वगैरेंना ऊत येण्याचे प्रकार झाले तर किळसच वाटेल त्या सगळ्याची हे नक्की!
कायद्याच्यaपुस्तकात दिले आहे
कायद्याच्यaपुस्तकात दिले आहे की दोन प्रकारचे न्याय असतात.
,१. नैसर्गिक न्याय.
म्।अणजे उपरवाले का न्याय. किंवा हिंदु भाषेत बोलायचे तर् वाइट कर्माची मिळालेले वाइट फळ.
२. मानवनिर्मित न्याय .... म्।अणजे कायदा न्यायालय यानी दिलेली शिक्षा.
१ व २ हे एकमेकाना सब्स्टिट्युट होउ शकत नाही.
सोहनलाल कष्टात जगत आहे असे असताना त्याला कायदेशेर न्याय कशाला असे सांगुन डॉ. कैलासराव २ ला १ हे सब्स्टिट्युट म्हणुन वापरु पहात आहेत.
No substitute please !
if only natural justice is enough , then why the law , court are made ?
वरील चर्चेवरून तोच मुद्दा
वरील चर्चेवरून तोच मुद्दा पुन्हा सरफेसवर येतो की प्रत्येक कॅटेगरीतील गुन्ह्याला एकाच प्रकारची शिक्षा ठोठावणे योग्य आहे का?
म्हणजे, बलात्काराला समजा १९७३ मध्ये सात वर्षे कारावासाची शिक्षा असेल तर ती सोहनलालला दिली गेली हे ठीक आहे. पण पुढची ४२ वर्षे अरुणाने जे काही भोगले त्याचा न्याय कुठे झाला? सोहनलाल कसाही जगत असला तरी जिवंत आहे आणि समाजात वावरतही आहे. रोज साठ किलोमीटर की काय ते सायकलिंग करावे लागते असे म्हणण्यापेक्षा तो ते करू शकण्याच्या शारीरिक अवस्थेत आहे ह्याकडे का पाहिले जाऊ नये? अरुणा शानबागला जे झाले ते झाले नसते तर समाजाने तिला आधीचा सन्मान देऊ केला असता का? प्रत्येक गुन्ह्याची केस टू केस बेसिसवर तपासणी व्हायला हवी असे वाटते.
बेफि, उद्देशने
बेफि, उद्देशने लिहिल्याप्रमाणेच.. याचा थेट संबंध ( कोमाचा आहेच, मृत्यूचा म्हणतोय मी ) आणि तोही कायद्याला मान्य होईल असा लावणे कठिण आहे. साक्ष देणार्या मेडीकल डॉक्टरला हे स्पष्ट करावे लागेल.
केवळ जनमतामूळे असा खटला सरकार दाखल करेलही पण तो कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, ते बघावे लागेल.
दिनेश, ते मला समजले आणि
दिनेश,
ते मला समजले आणि पटलेही. म्हणूनच त्यावर मी लिहिले की न्यायव्यवस्थेतील काही नियम री-इव्हॅल्युएट व्हावेत असे वाटण्याचा मुद्दा पुन्हा सरफेसवर येतो आहे.
पुन्हा विचार अनेक गोष्टींचा
पुन्हा विचार अनेक गोष्टींचा व्हायला हवाच आहे. पण आपण कालमर्यादाही बघितली पाहिजे. हा खटला ज्यावेळी चालला त्यावेळीही कै. अरुणा याच अवस्थेत होती. मे. न्यायालयाने याचा विचार केलाच असेल. तिची साक्ष होत नाही म्हणून न्यायदानाला विलंब झाला नाही. परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानली गेली.
अशी कालमर्यादा अनेक बाबींसाठी आहे. टाईम बारींग अॅक्ट आहे ( अर्थात तो दीवाणी बाबींसाठी आहे. )
आता गुन्हेगाराला अटक केले तर त्याच्या जेवण्याखाण्याचा प्रश्न सुटेल आणि या नव्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्याचाही कदाचित मृत्यू होईल. आणि समजा निकालापर्यंत तो जिवंत राहिलाच तर मे. न्यायालय त्याचे वय बघता, फाशीची शिक्षा सुनावणार नाहीत... दरम्यान मिडीयाला मात्र बाईट्स मिळत राहतील !
मी जर आरोपीचा वकिल असेल तर
मी जर आरोपीचा वकिल असेल तर बचाव मुद्दा एकच मांडेल "मरण कशी पावली?" सहाजिकच सरकारी वकील "कोमात होती आणि त्यातच मरण आले" हेच उत्तर देईल. त्यावर "वृध्दापकाळामुळे देखील मरण येउ शकेलच ना" अशी माझ्याकडून विचारणा झाल्यास संबंधीत डॉक्टरांना देखील सहमती दर्शवावी लागेल. अर्थात माझ्या अशिलामुळे पिडीतव्यक्ती कोमात गेली मरण नाही पावली" हे म्हणायला मला २ सेकंद देखील लागणार नाही.
मग केस कुठल्या बेस वर उभी राहणार. उदा. कुली चित्रपटाच्या दरम्यान पुनित इस्सार च्या ठोश्याने अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती आणि गेल्याच वर्षी त्याच दुखापतीमुळे त्यांना इस्पितळात भरती व्हावे लागले होते.
या सर्व गोष्टी लक्षात घेउन एक तर कायदा दुरुस्त करावा लागेल अथवा सोडून द्यावे लागेल. कारण ही केस दुर्मिळ आहे. कोर्टात जर जनमतामुळे सरकारने केस उभी करून चालवली आणि ती हारली तर ( ज्याची शक्यता जास्त आहे) परत लोक सरकारलाच शिव्या घालणार आहे.
कोर्ट जनभावनेतून शिक्षा देत नाही अथवा आरोपी मानत नाही.
(माझे कुठल्याप्रकारे आरोपीला समर्थन नाही आहे कृपया लक्षात घ्यावे. मी फक्त तटस्थपणे नेमके काय होईल हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे)
६६ वर्षे हे काही वृद्ध होउन
६६ वर्षे हे काही वृद्ध होउन मरण्याचे वय नव्हे.
कॉमात गेल्याने अवयव लवकर निकामी होणे , इन्फेक्शन याने मेली .
त्या कोमाला सोहनलाल जबाबदार आहे म्हणजे मृयुत्युला तोच जबाबदार ठरतो.
....
पुनीत इस्सरने बच्चनला मुद्दाम मारले नव्हते ! अकारण तुलना नको.
काउंशी सहमत आहे.
काउंशी सहमत आहे.
पुनीत इस्सरने बच्चनला मुद्दाम
पुनीत इस्सरने बच्चनला मुद्दाम मारले नव्हते ! अकारण तुलना नको. >> काउ आपल्या माहीती करीता सांगू इच्छितो पुनित वर अजुन ही टांगती तलवार आहे. तो एक अपघात जरी असला तरी पुनित यांना शिक्षा होउ शकते. उद्या जर अमिताभ यांना त्या जखमेमुळे बरेवाईट झाले तर गुन्हा दाखल करता येउ शकेल. ( अद्याप शिक्षा झाली नाही म्हणून) हे सर्व मागील घटनेच्यावेळी सविस्तर एका वृत्तपत्रामधे वकिलाने लिहिले होते. त्याची निव्वळ आठवण आली म्हणून तो संदर्भ इथे देण्यात आला
वर डॉक्टरांनी माबोकरांची मते
वर डॉक्टरांनी माबोकरांची मते विचारलीत म्हणुन... माझे व्यक्तीगत मत आता काहीही करु नये हे आहे. अरुणा कधीच न्यायान्यायाच्या पलिकडे गेलीय. त्याला फासावर चढवले तरी तिचे आयुष्य परत येणार नाही. फारतर त्याचा राहण्याजेवण्याचा प्रश्न सुटेल एवढेच.
फायदा होईल तो मिडीयाचा. त्यांचा चार दिवसांचा ब्रेकिंग न्युजचा प्रश्न मिटेल. आणि यात होरपळतील ते सोहनलालचे कुटूंबिय. त्यांना काय हवे-नको याचा विचार मिडीया अजिबात करणार नाही. या बाबतीत आपली मिडीया शक्य तितक्या नीच पातळीवर जाऊ शकते हे आजवर अनेकदा देशाने पाहिले.
राहता राहिला समाजाला काहीतरी संदेश जाण्याचा प्रश्न. तर तिथेही सगळा आनंद आहे. आपल्या समाजाने डोळे उघडून काही संदेश स्विकारला असता तर निर्भयानंतर एकही बलात्कार झाला नसता. पण चित्र उलटे आहे. त्यामुळे समाजाला संदेश वगैरे गोष्टी बाजुलाच ठेवलेल्या ब-या. सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर समाजाला योग्य संदेश गेला वगैरे मानणा-यांनी नंतर फोडलेले फटाके आणि जल्लोष पाहिला असेलच. जल्लोष करणाराही आपलाच समाज.
त्यामुळे जे आहे ते तसेह राहिलेले बरे. तसेही त्याला त्यावेळेस जी योग्य वाटली ती शिक्षा झालेली आहेच.
>>>े. राहता राहिला समाजाला
>>>े. राहता राहिला समाजाला काहीतरी संदेश जाण्याचा प्रश्न. तर तिथेही सगळा आनंद आहे<<<
हे विधान स्त्री आय डी कडून यावे ह्याचे थोडे नवल वाटले. संदेश देत राहायलाच हवेत असे वाटते. कुठेतरी, काहीतरी सूक्ष्म बदल होत राहतीलच की?
>>>आपल्या समाजाने डोळे उघडून काही संदेश स्विकारला असता तर निर्भयानंतर एकही बलात्कार झाला नसता. <<<
निर्भयावर अत्याचार करणार्यांना शिक्षा झाली हे समजल्यानंतर बलात्कार थांबतील ही अपेक्षाही तशीच आश्चर्यकारक आहे. ही रानटी प्रवृत्ती मग निर्भयाच्या अपराध्यांनाच शिक्षा झाल्यावर का बरे नष्ट व्हायला हवी होती? आधीही अनेकांना शिक्षा झालेल्याच होत्या की? ही प्रवृत्ती हळूहळूच नष्ट होईल. बरीचशी शिक्षेच्या भीतीने आणि थोडीफार संस्कार बदलल्यामुळे! कदाचित पूर्णपणे नष्ट होणार नाहीसुद्धा!
हे सगळं इथेच थांबावं असं
हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय.
पुन्हा कधी कुठली अरूणा शानबाग होऊ नये यासाठी सामाजिक स्तरावर चळवळीच्या माध्यमातुन व कडक कायदे करुन काय करता येईल ते बघावे.
>>>पुन्हा कधी कुठली अरूणा
>>>पुन्हा कधी कुठली अरूणा शानबाग होऊ नये यासाठी सामाजिक स्तरावर चळवळीच्या माध्यमातुन व कडक कायदे करुन काय करता येईल ते बघावे.<<<
अरे वा? आणि आज हातात असलेल्या एकाला कडक शासन करण्याची संधी सोडून द्यायची का? मग उद्या तरी चळवळी आणि कडक कायदे कशाला करायचे?
ठिक आहे . सोहनलाल याला आता
ठिक आहे . सोहनलाल याला आता काय शिक्षा व्हावी हे अपेक्षित आहे ? यावर मत व्यक्त करा. कायद्याने त्याला फाशीची शिक्षा होणे बहुदा अशक्य आहे. तर त्याऐवजी दुसरे काय ?
त्याच वेळेस त्याला ७ वर्षा
त्याच वेळेस त्याला ७ वर्षा एवजी जन्मठेप द्यायला हवे होते.आता खुप वर्ष नुघुन गेली आहेत .
आत्ताच्या त्याच्या आवताराकडे बघुन तो जास्त वर्ष जगेल असे वाटत नाही.
काउ... सहज माहित असावे म्हणून
काउ... सहज माहित असावे म्हणून विचारतो. तिच्या डेथ सर्टीफिकेट मधे हे लिहिलेले असेल का ? असेल तर मे. न्यायालय ते ग्राह्य धरेल.
तरिही, त्याला फाशीची शिक्षा होणे अशक्य. सामाजिक बहिष्कार हि शिक्षा मे. न्यायालय कधीच देऊ शकले नसते, ती तो भोगतोच आहे.
हे विधान स्त्री आय डी कडून
हे विधान स्त्री आय डी कडून यावे ह्याचे थोडे नवल वाटले. संदेश देत राहायलाच हवेत असे वाटते. कुठेतरी, काहीतरी सूक्ष्म बदल होत राहतीलच की?
निर्भयानंतर जे काही झाले आणि अजुनही होतेय हे तुम्ही पाहात नाहीत का? त्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्यानंतर समाजाला काही संदेश गेला आणि बलात्कारांची संख्या कुठेतरी जर्राशी घटली असे तुम्हाला वाटले का? आणि गुन्हेगारांनी त्यांना शिक्षा दिली गेली म्हणुन समाजात काय संदेश गेलाय यावर जे तारे तोडले आणि त्याचे समर्थन करणारे किती वीर निघाले ते तुम्ही पाहिले नाहीत काय?
याचा अर्थ संदेश म्हणुन जे काही अभिप्रेत आहे ते अतिशय व्यक्तीसापेक्ष आहे. तुम्हाला जो संदेश सकारात्मक वाटत असेल तोच इतर कुणाला नकारात्मक वाट्णे शक्य आहे. मग काय अर्थ उरला या संदेशाला?
संदेश वगैरे गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर ठेवा, नो प्रॉब्लेम. पण मला आता असे अजिबात वाटत नाही. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत आहे. तुम्ही उगीच त्याचे नवल वगैरे करु नका.
सुरेख, आपण जरी जन्मठेप असा
सुरेख, आपण जरी जन्मठेप असा शब्द वापरत असलो तरी ती शिक्षा १४ वर्षांचीच असते.
http://www.thehindu.com/news/national/life-imprisonment-means-jail-term-...
उलट आता जर सोहनलालला शिक्षा
उलट आता जर सोहनलालला शिक्षा झाली तर एक तर ती सश्रम नसेल त्यामुळे जिथे गावात उघड्यावर जगत होता तिथे तुरुंगात आरामात जगेल. दोन वेळचे जेवन मिळेल . जिथे त्याला ८-१० किमी सायकल चालवून काम करावे लागत होते तिथे तुरुंगातच काम करत बसेल. वर ४ पैसे देखील मिळतील. आता त्याचा शोध घेतल्यावर त्याच्या घराभोवती अक्षरश: पिपली लाईव्ह चालू झाले असेल त्यातून देखील काही कमाई तो काढून घेतच असेल यावरून त्याचे नुकसान नाही तर फायदाच होत आहे. मग त्याला शिक्षा काय मिळावी >? हा प्रश्न येतोच
दिनेश, मला आयुष्यभर तुरुंगातच
दिनेश, मला आयुष्यभर तुरुंगातच राहणे ही शिक्षा म्हणायचे होते यासाठी कुठला कायदा आहे?
न्यायालयात बलात्काराचा गुन्हा
न्यायालयात बलात्काराचा गुन्हा सिद्ध होवू शकला नाही. न्यायालयात चोरी आणि बळजबरी सिद्ध झाली ज्यासाठी त्याने शिक्षा भोगली आहे.
जी पोलिस यंत्रणा बलात्काराचा एविडन्स देवू शकली नाही,ती यंत्रणा खुनाचा काय पुरावा देणार आहे?
कसा काय खटला चालवला जावू शकेल?
म्हणजे आता पुन्हा सोहनलालला अटक करुन ट्रायल देणे या बाबी फक्त प्रसिद्धी देवू शकतात.... मिडिया अटेन्शन मिळवू शकतात पण न्याय मिळो न मिळो त्या अश्राप आत्म्याचे पुन्हा धिंडवडेच निघतील जे पहाणे क्लेशदायक आहे.
Pages