Submitted by भगवती on 12 May, 2015 - 10:09
चोरचोळी हा कार्यक्रम, मुलगी गर्भवती असताना कितव्या महिन्यात करतात? आणि काय पद्धत आहे?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चोरचोळी हा कार्यक्रम, मुलगी गर्भवती असताना कितव्या महिन्यात करतात? आणि काय पद्धत आहे?
http://www.lokprabha.com/diwa
http://www.lokprabha.com/diwali-2011/diva03.htm
धन्यवाद किरकोळ,खुप उपयुक्त
धन्यवाद किरकोळ,खुप उपयुक्त माहिती.
चोरचोलि ही चौथ्या महीन्यात
चोरचोलि ही चौथ्या महीन्यात माहेरी केली जाते, माहेरी करायची पद्धत नसेल तर मोठी लग्न झालेली बहीण,मावशी कोणीही केली तरी चालते, एक हिरवा पीस एक नारळ ओटी तांदूळ ओटी हिरव्या बांगड्या शक्य असेल तर हिरवी साडी यांची ओटी भरावी, सहसा इतरांना कळू देऊ नये, या चोलीच्या कार्यक्रमासाठी फुलांचे दागीने लागत नाहीत
एक शंका, चोरचोळी नंतर मग
एक शंका, चोरचोळी नंतर मग मुलिने कुणाकडूनही ओटी भरुन घ्यायची नसते, असे काही आहे का?
३ महिने पूर्ण झाल्यावर
३ महिने पूर्ण झाल्यावर भरतात.
चोरचोळी नंतर मग मुलिने कुणाकडूनही ओटी भरुन घ्यायची नसते, असे काही आहे का?>>>> हो. मग नंतर ओटी डोहाळेजेवणालाच भरायची...
ओके हर्षा, धन्यवाद.
ओके हर्षा, धन्यवाद.
तिन महीने पर्यंत गर्भवती
तिन महीने पर्यंत गर्भवती स्त्रीने सहसा कोणाला सांगु नये असे म्हणले जाते. तीन महिन्यापर्यंत जर गर्भाची वाढ निट न झाल्यास निसर्गतः गर्भपात होतो असे एक प्रतिथयश डॉक्टरांचे मत आहे. यासर्वांमुळे ही बातमी तीन महिन्यांनी उघड करणे योग्यच आहे.
काही ठिकाणी या दिलेल्या
काही ठिकाणी या दिलेल्या पीसाच्या ब्लाऊजपासून बालाचे पाचवीचे टोपडे करतात
आम्हि त्यला चोर ओति ...
आम्हि त्यला चोर ओति ... म्हनतो
पूर्वी घरामध्ये शिंकाळी
पूर्वी घरामध्ये शिंकाळी असायची.त्यात दही दुध लोणी मध तूप भरून छोटी बुडकुली ठेवली जायची.त्या खाली जमिनीवर चौरंग मांडून त्यावर मुलीला बसवून ओटी भरून दही दुध भात कालवून खायला द्यायचे.पुढचे महिने त्या मुलीने रोज बुडकुल्या तील पंचामृत एकत्र करून खायचे.अर्थात तेच दुध नाही वापरायचे.नवे घ्यायचे.हे सारे सकाळी लवकर करायचे ,कोणी घरात यायच्या आत.त्या हिरव्या खणाची नंतर टोपडे व कुंची शिवली जायची.मला फार आवडली होती ही पद्धत.तसेही आता आयुर्वेद सांगतोच कि रोज थोडे पंचामृत घ्यावे.सासुरवाशिणीला पूर्वी कदाचित हे अवघड जाईल खूप माणसांच्यात हे करणे,म्हणून तिला वेगळीच भांडी भरून ठेवावीत हा उद्देश्य पण असेल.माझ्या आज्जीने हे माझ्या एका बहिणीचे केलेले फार पूर्वी मी बघितले होते.मला अजून ही आठवते.ते सारे.शेणाने सारवलेली जमीन,पांढरी रांगोळी.दारातल्या फुलांची रांगोळी,केळीच्या पानावरचा तो कालवलेला भात, जुने लिंबाचे लोणचे,पंढरी कुरडई,सुखावलेली बहीण.जसेच्या तसे उभे राहते डोळ्यासमोर.बहिणीने किती खाल्ले सारे आठवत नाही.पण आम्ही मात्र मस्त ताव मारला होता हे पक्के.!!!
आमच्याकडेही याला चोर ओटी असेच
आमच्याकडेही याला चोर ओटी असेच म्हणतात.
चोर ओटी कशी भरायची? काय काय
चोर ओटी कशी भरायची? काय काय पदार्थ करतात, कोणती वस्त्रे देतात? कोणत्या महिन्यात करायची असते ? कोणी अगदी सुरुवाती पासून माहिती देऊ शकेल काय