पार्ट टाईम एम.ई. बद्दल माहिती हवी आहे

Submitted by _आनंदी_ on 27 May, 2015 - 02:42

पार्ट टाईम एम्.ई. कोणी केले आहे का?
मी सध्या ठाण्यात आहे...
प्रेग्नंसी, डिलिवरी, मुलगी लहान आणि वर्किंग ..
या सगळ्यातुन पुढे काही शिकायच राहुन गेलं..
कोणाला काही अनुभव माहिती असेल तर मदत करा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

BITS mdhye एक पार्ट टाईम MS चा चांगला कोर्स आहे. मी अधिक माहिती काढून सांगतो ..

AICTE अंतर्गत येणारे तांत्रिक उच्च (एम ई एम टेक वगैरे) शिक्षण पार्ट टाईम किंवा बाहेरुन शक्य नाही
मात्र UGC ची मान्यता असणारे कर्नाटक ओपन विद्यापीठाचे एम टेक हा एक पर्याय आहे, हे विद्यापीठ एमपीएससी किंवा शिक्षण सेवा परिक्षासाठी ग्राह्य धरले जाते.
http://karnatakastateopenuniversity.in/ इथे अधिक माहीती मिळू शकेल
याची पुणे मुंबई येथे स्टडी सेंटर आहेत , परिक्षा तिथेच होतात . पुण्यासाठी ०२०-२५५४१७७६६ येथे संपर्क करु शकता.

BITS mdhye एक पार्ट टाईम MS चा चांगला कोर्स आहे. >>> तो कोर्स आता M.Tech म्हणून देतात. कारण भारतात MS ला मान्यता नाही म्हणे. Uhoh

ओ बी ई नन्तर me commaon zale ahe ata eka uni madhye 5 6 collage ahe me provide karanare
khup sopp ahe ata te sarv mahiti havi aslyas kuthlyahi me faculty la engg col madhlya vichara
only shani shukra collage khup nivantpane hoel sarv
tu shodhun bagh milel mahiti nahitar mala vichar

आनंदी, तुम्ही वर लिहिताना वर्किंग असं लिहिलंय. लेक्चरर म्हणून काम करत असाल तर जिथे शिकवताय त्याच कॉलेजला एम ई ची चौकशी करोन बघा. अन्य प्रकारचा जॉब असेल तर थोडं कठीण जाऊ शकतं कारण-

पुण्यात तरी जवळपास सगळ्याच कॉलेजेस मधे हजेरी सक्तीची आहे. पहिलं वर्ष पूर्णवेळ कॉलेज करणं म्हणजे ७५% हजेरीचा नियम बहुतेक ठिकाणी पाळला जातो. मी ज्या वेळी अ‍ॅडमिशन घेतली त्यावेळी लेक्चरर म्हणून काम करत होते, ते सोडून पूर्णवेळ एम ई केलं १ वर्ष. मग दुसर्‍या वर्षी प्रोजेक्ट चालू झाल्यावर विजिटिंग फॅकल्टी म्हणून अगोदरच्याच ठिकाणी लेक्चरर म्हणूनच रिजॉइन केलं. मधल्या काळात प्रेग्नन्सीमुळे ते काम सोडलं.मग डिलिवरी आणि आता मुलगी लहान म्हणून माझं शेवटचं सेमिस्टर अडखळत चालू आहे. पण एम ई च्या पहिल्या वर्षीच मला "लग्न झालंय तर घरची जबाबदारी आहे", किंवा "नोकरी आहे" (अ‍ॅडमिशन कन्फर्म झाल्यावर नोकरी सोडणार असं सांगितलं होतं इंटर्व्यूमधे) या व्यक्तिगत कारणामुळे कोणतीही सवलत मिळणर नाही असं सांगितलं होतं. आता माझ्या मुलीमुळे नियमित जाऊ शकत नाही मी अजून, पण गाईडना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे माझी अडचण आणि कामातली प्रगती दोन्ही सांगते मी त्यामुळे विलंब होतोय हे माहिती असूनही स्टाफकडून सहकार्य मिळतंय. पहिल्या वर्षी सिन्सिअरली अभ्यास आणि ८५% कॉलेज केल्याचं क्रेडीट आहेच Happy

ओळखीच्यांकडून मुंबईतसुद्धा हजेरीचा नियम पाळणार्‍या कॉलेजची संख्या खूप आहे असं समजलंय. त्यामुळे कदाचित तुम्हालाही अशा ठिकाणी तुम्ही कायकाय पर्याय (नोकरीमधे/ मुलीला सांभाळणं वगैरे) निवडू शकता याचा अंदाज घ्यावा लागू शकतो.

तुम्हाला शुभेच्छा!! Happy

सर्वाना खुप धन्यवाद..
सध्या प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करत आहे...
शनीवार सुट्टी नाही फक्त रविवार सुट्टी..
लेक्चरर म्हणुन जॉब करण्याचा विचार होता.. कस अप्लाय करायच , कुठे विचारायच कळत नाहिये..
घरी माझी आईच मुलिला बघते... नवरा सपोर्टिंग आहे..
नाहितर ऑफिस मधुन सबॅटिकल लिव्ह घ्यावी लागेल असे वाटते..
अडकल्यासार्ख होतय .. पुढे शिकायचय रस्ता मिळत नाहिये..

आनंदी, माझ्या पत्नीचे एम.ई. आताच पूर्ण होईल. प्रोजेक्ट गाईडने अ‍ॅप्रुव्ह केलाय. पण बाकीचे सोपस्कार व्हायचे आहेत. ती लेक्चरर म्हणुन काम करत होती. एमई च्या पहिल्या वर्षी ७५% हजेरी सक्तीची असल्याने तिने व्हिजिटींग लेक्चररची पोष्ट घेतली आणि पहिले वर्ष पूर्ण केले. दुसर्‍यावर्षी प्रोजेक्ट असल्याने तुम्ही पूर्णवेळ नोकरी करु शकता. फक्त गाईडला भेटण्यासाठी जावे लागते तेव्ह्ढा वेळ काढावा लागेल.

फादर अ‍ॅग्नेल, वांद्रे येथुन तिने एमई केले/ करत आहे.

आनंदी, यंदापासुन gate paasing ची अट आहे एमई साठी असे घरुन कळले. तुम्ही सुद्धा माहिती काढुन पहा.
शुभेच्छा!

अट gate passing ची नाही, non-zero gate score ची आहे. २०% सीट या व्यवस्थापन कोटा मधे असतात. त्यासाठी ही अट शिथिल होऊ शकते.

अट gate passing ची नाही, non-zero gate score ची आहे. >> म्हणजे GATE द्यायलाच हवी असे आहे का.?

आत्ता मी मित्रांना विचारलेल्या माहिती नुसार ,साध्या कॉलेजमध्ये ME ला डायरेक्ट प्रवेश मिळू शकतो.
म्हणजे कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय ..

आपण एकदा जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करावी.

म्हणजे GATE द्यायलाच हवी असे आहे का.?>> जर तुम्हाला DTE conduct करत असलेल्या Central Admission Process (CAP) मधुन प्रवेश घ्यायचा असेल तर हो.

साध्या कॉलेजमध्ये ME ला डायरेक्ट प्रवेश मिळू शकतो.>> हे फक्त २०% management quota सीट्स साठी आहे. बाकी ८०% सीट्स या CAP मधुनच भरल्या जातात. जर CAP नंतर त्यापैकी काही शिल्लक असतील तर त्या इतर २०% management सीट्स सोबत भरल्या जातात.

तसेच दरवर्षी CAP सुरू होतांना DTE GATE compulsary आहे म्हणुन सांगते, अगदी management quota सीट्स साठी सुद्धा. नंतर जेव्हा सीट्स रिकाम्या राहतात तेव्हा ही अट शिथील केली जाते आणि non-GATE candidates ला allow केले जाते.

--
एका engg. कॉलेजचा ME admission coordinator

अच्छा ओके ओके ।
मी वर जी माहिती दिलेली आहे त्यमधल्या माझ्या मित्राने साध्या कॉलेज मधे एडमिशन घेतलेली आहे । (कॉलेज अगदी टाकाऊ नाही। )
मॅनेज्मेंट सहित सर्व राउंड होऊन सुद्धा त्या कॉलेज मध्ये सीट्स बाकि होत्या ।
त्यामुळे कोणताहि एक्स्ट्रा चार्ज न घेता त्याला सीट देण्यात आली ।
असे बऱ्याच कॉलेज मध्ये होते म्हणे शेवटी ।

ओके.. तर प्रत्यक्ष कॉलेज मध्ये चौकशी करणे योग्य ठरेल..
धन्यवाद सगळ्याना.. माझ्याबरोबर ईतर कोणी वाचत असतिल तर त्यानाही फायदा होईल तुम्ही देत असलेल्या माहितीचा..
खुप धन्यवाद सगळ्याना..

सर्व उमेदवारांना सूचित केलं जातं की देवी अहिल्या विश्वविद्यालय (DAVV) म्हणून ओळखल्या जाणार्या B.A निजी/मुख्य-नियमित परीक्षेचे निकाल वर्ष 2023 साठी जाहीर झाले आहेत. DAVV बॅचलर ऑफ आर्ट्स परीक्षा घेतली होती आणि मध्य प्रदेश राज्यातील अधिक संख्येने उमेदवार ही BA परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर, उमेदवार DAVV BA 1st 2nd 3rd Final Year Private ATKT निकाल 202२ शोधत असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की नवीनतम सूचनेमध्ये, विश्वविद्यालयाने आपले DAVV BA 1st 2nd 3rd 4th 5th 6th Sem रेगुलर / प्रायवेट ATKT निकाल घोषित केले आहेत. उमेदवार खाली दिलेल्या निकाल बॉक्समध्ये त्यांची रोल नंबर टाकून त्यांचे निकाल तपासू शकतात.

सर्व उमेदवारांना सूचित केलं जातंय की वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटीने त्यांच्या बीए १ वर्षाचा निकाल घोषित केला आहे. युनिव्हर्सिटीने राजस्थान राज्यातील एकामुळे उमेदवार एप्रिल-मे महिन्यांतील बीए परीक्षा घेतली होती. परीक्षा यशस्वीरित्या युनिव्हर्सिटीद्वारे घेण्यात आल्या होत्या आणि आता उमेदवार परीक्षा देण्याच्या नंतर त्यांचे बीए २ वर्षाचे निकाल भरण्याची इच्छुकता व्यक्त करत आहेत. युनिव्हर्सिटीने बीए ३ वर्षाचा निकाल घोषित केला आहे. जे उमेदवार त्यांचे निकाल शोधत आहेत ते कृपया खाली दिलेल्या निकाल बॉक्समध्ये त्यांचा शॉलर नंबर नोंदवावा.