साखरेचे मांडे

Submitted by दिनेश. on 4 May, 2015 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ / ५ मांडे होतील.
माहितीचा स्रोत: 
रुचिरा व माझे प्रयोग
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसताहेत मांडे!
हैदराबादेत खूप कुरकुरीत आणि अतिशय पातळ असा एक आपल्या चिरोट्यासारखा पदार्थ मिळातो, नाव विसरले, तो असाच दिसतो. त्यात असंच तुपाळ गोडसर सारण असतं.

तुम्ही धन्य आहात, हौशी आहात आणी वरकड म्हणजे सुगरण दिसताय. मान्डे छानच दिसतायत, कृती पण सोपी वाटावी इतकी सोपी दिसतीय. साखरेमुळे सोपी वाटते, नाहीतर गुळ म्हणले की धसकाच बसतो. फार कौश्यल्याचे काम आहे. पण मस्त दिसतायत मान्डे.

मस्त.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात असे मांडे करतात. लग्नात जावयासाठी हवाच. आकाराने बराच मोठा, अतिशय पातळ, कुरकुरीत, बेताचे गोड असतात. धारवाडला एका लग्नात खाल्ला (पहिल्यांदाच) होता. वेलची घातलेले मांडे चुरून, दूध आणि त्यावर तूप! अगदी दुसर्‍यांदा मागून घेऊन खाण्याइतका आवडला. मग किचनमधे जाऊन कसे करतात बघण्याचा प्रयत्न केला पण ते लोक सोवळ्यात स्वैपाक करत होते म्हणे Uhoh , त्यामुळे दारातून जेवढे बघता आले तेवढे बघितले.

दिनेशदा, चिन्चवड ला कधी येताय ?
मी सगळे सामान गोळा करुन ठेवते...

पहिला फोटो तर मलई पेढ्याचा म्हणून चालुन जाईल...

धन्य!!!!!!!!!!!!

कसल्या कसल्या हौशी असतात माणसांना................ आम्हाला फक्त आयते खायची हौस आहे. Happy

दिनेशदा, एक नंबर! खरी हौस आहे तुम्हाला!
तुम्हाला ज्युली अँड ज्युलिया हे पुस्तक/सिनेमा माहिती आहे का? मध्यंतरी फेसबूक वर वाचले की इंग्लंडमध्ये कोणीतरी तसाच प्रयोग रुचिरा वापरून करत आहे. I am sure you can take up that challenge and complete it successfully!

इतका कलाकुसरीचा पदार्थ प्रत्येक स्तेपला फोटो काढणे.हे सगळे खरच तुम्ही एकटे करता? great. माझ्या दिराच्या लग्नात खाल्ला होता. अगदी तोंडात विरघळेल असाच होता. खरच करण्यासाठी मनाची तयारीच हवी.

दिनेश, जबरी मेहनतीचे काम आहे. तुमच्या हौसेला खरच सलाम.

चिकन स्टफ्ड मांडा मस्तच दिसतोय Happy

मंजूडी, तू म्हणतेस त्या पदार्थाचे नाव पोतरेकू (हा शब्द खूप हेल काढून म्हटला जातो. शेवटी मी त्याचे स्पेलींग लिहायला लावले आणि त्यावरून माझा उच्चार बेतला) प्रचंड फॅट्स असलेला पण चवीमुळे त्या फॅट्स विसरायला लावणारा प्रकार आहे.

कोंबडी .. मी पहिला फोटो पाहून घेतले आणि पोळीवर तुम्ही कोंबडीचे चित्र का काढलेयत म्हणून विचारात पडलेलो Proud

धन्यवाद.. खुप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.
माधव, मंजूडी.. हा पुतरेकुलू बघायला पाहिजे. मांडे नाव घेतलं तर खानदेशी असाच शब्द डोक्यात येतो.

पण यात पातळ लाटण्याचा भाग सोडला तर फारसे कठीण काही नाही. तसेच मैदा नीट तिंबून घेतला कि तो फार लवचिक होतो, सहज लाटला जातो. आतल्या सारणामूळे लाटताना आक्रसत नाही. लाटताना काही भागात सारण पोहोचत नाही, पण मैद्यात थोडी साखर घातल्याने, तो भागही अगोड लागत नाही.

तूमच्यापैकी कुणीही इथे असते तर मला धन्य वाटले असते, कारण यातला फक्त एकच छोटासा तूकडा मी खाल्ला, बाकीचे मित्रांना दिले.

स्वतः पदार्थ केला तर त्या करण्यातच समाधान वाटते, मग खाण्याची फारशी ईच्छा रहात नाही. ( हा अनुभव अनेकजणांनी घेतला असेलच. )

दिनेशदा, तुमच्या साखरेच्या मांड्यात मी तुपाचा प्रश्न विचारते आहे. त्याबद्दल सॉरी. पण मी मागे कधीतरी तुम्ही बाजारातील तुप पुन्हा कढवता असे वाचले होते. बाजारातील तयार तुप पण घरी कढवून ठेवता येते याविषयी मला थोडं सविस्तर सांगाल का?
आमच्याकडेही बाजारातील तयार तुपच वापरले जाते. ते पुन्हा कसे कढवायचे? कारण ते आधी कढवलेले असते ना! किती वेळ कढवायचे? त्यात कोणते पान टाकायचे? किती वेळ ठेवायचे? म्हणजे मला घरी आणलेले तुप पुन्हा कढवता येईल.

मांडे अत्यंत कष्टाचे आणि कलाकुसरीचेही काम समजले जाते. दिनेश----------/\------------------!
यावरून एक जरा घाणेरडी वाटणारी जुनी म्हण आठवली
असोच.................................................................................................................................................
हो आणि ते पुरणाचे मांडे.......इथे बचत गटाच्या महिलांनी एक्झिबिशनमधे केले होते. आकार खूपच मोठा आणि कमी गोड.
तेव्हा वाटलं पुरणपोळीला मांडे का म्हणतात?

मयुरी, बाजारातले तूप हे क्रीमपासून केलेले असते. त्याला दही विरजून केलेल्या तूपाची चव येत नाही. तसा डबा आणला तर ते सगळे तूप एका जाड बुडाच्या पातेल्यात काढून मंद आचेवर ठेवायचे. त्याची बेरी जमत नाही पण खमंग वास सुटतो. अनुभवाने वासावरून कळते. रंग मात्र बदलू द्यायचा नाही.

बाजारात जे बटर मिळते त्याचेही तूप चांगले होते. त्याची थोडीफार बेरी जमते. बटर सॉल्टेड असेल तर कढल्यानंतर मीठ खाली बसते. अश्यावेळी वरचेच तूप अलगद काढून घ्यायचे. अनसॉल्टेड असेल तर प्रश्नच नाही.

तूप कढले कि नाही हे बघायची एक युक्ती म्हणजे त्यात पाण्याचा एक थेंब टाकायचा, त्याचा ताबडतोब कडकड आवाज आला पाहिजे, म्हणजे तपमान योग्य आहे. पण तो हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हि पद्धत वरच्या दोन्ही प्रकारासाठी वापरता येते.

कढलेले तूप कधीही फ्रिजमधे ठेवायचे नाही. जर ते नैसर्गिक रित्या थंड झाले, तरच ते कणीदार होते.

कढलेले तूप कधीही फ्रिजमधे ठेवायचे नाही. जर ते नैसर्गिक रित्या थंड झाले, तरच ते कणीदार होते. - ह्या वरून आठवले. एकदा घाईघाईने गार करायचे म्हणुन फ्रीज मध्ये ठेवले . चिकट झाले कोणीही खाल्ले नाही . डालडा असेल असे वाटत होते

धन्यवाद दिनेशदा,
तुम्ही दिलेली माहिती खरंच उपयुक्त आणि वेगळी आहे. मी लगेच ती अंमलात आणणार आहेच.
आता फक्त अजून एक शंका. आमच्याकडे अधुनमधून आमच्या पारंपरिक किराणा दुकानदाराकडुन सुटे तुप आणले जाते. त्याचे दुकान अगदी शंभरवर्षांचे आहे. त्याच्याकडचे तुप अगदी घरच्या तुपासारखे थोडेसे रवाळ दिसते. ते पण पुन्हा कढवले तर चालेल ना? पुन्हा कढवल्याचा तुपाच्या पौष्टिकतेवर परिणाम होतो का?

त्याच्याकडचे तूप पारंपरीक पद्धतीने केलेले असेल तर ते परत कढवायची गरज नाही. जास्त कढवले तर तूप जळेल. ( त्याला जळकट वास येईल. )