Submitted by निष्काम-कर्मयोगी on 29 April, 2015 - 04:00
पालघर, केळवे रोड मध्ये ३००० ते ४००० स्क्वे.फुट प्लॉट घेणे फायदेशीर ठरेल का? (४-५ वर्षे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी रिक्षा
माझी रिक्षा ...
http://www.maayboli.com/node/51665
पालघर ते केळवे रोड मध्ये
पालघर ते केळवे रोड मध्ये सध्या तरी काहीच बांधकाम नाही, ओसाड माळरान आहे, केळवे रोड म्हणाल तर केळवे खुप आत मध्ये आहे आणि पुर्ण खेडे आहे. तिथे तुम्हाला भाडेकरु मिळणे मुश्कील, पालघर पण असच आहे शक्यतो भाड्याचे दर कमी आहेत तिथे. ४-५ वर्षात तरी खुप जास्त प्रगती होईल असं वाटत नाही. पालघर ते बोईसर मधोमध पालघर साईडला ही एम. आय. डी. सी (जेनेसिस) एरीया आहे तिथे प्लॉट घेणे फायदेकारक होईल कारण तिथल्या जागेचे भाव खुपच वधारले आहेत (जवळपास ५-६ लाख रु. गुंठा; कदाचित त्याहुन जास्त), जवळचे गाव पालघरधील "नंडोरे". त्या भागात जायला स्वतःचे वाहन असणे आवश्यक, या भागात जवळचे रेल्वे स्टेशन उमरोळी आहे,
बोईसर ला खुप मोठा एम. आय. डी.सी. एरीया आहे , जवळपास ३०००-४००० फॅक्टरीच आहेत त्या मुळे बोईसर (वेस्ट) ला भाड्याचे दर बर्यापैकी आहेत. आता पोर्ट ही बनत आहे, रेल्वे , टाटाचा प्रकल्प आहे,
प्रतिसादा बद्दल धन्यवाद !!
प्रतिसादा बद्दल धन्यवाद !!
मी केळवे येथेच राहतो. आपण काय
मी केळवे येथेच राहतो. आपण काय दराने प्लॉट घेत आहात ते नमूद केलेले नाहीत. तरी डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरु झाल्याने येथे झपाट्याने किमती वाढत आहेत. तसेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. केळवे बीच हे पर्यटन क्षेत्र जाहीर झाल्याने मुंबई, ठाणे, नाशिक अश्या अनेक भागातून येथे पर्यटक मोठ्या संखेने येत असतात.माझ्या मते योग्य दर असल्यास जरूर investment करा.
कविता म्याडमचा फ्ल्याट आणि प्लॉट यात काहीतरी गोधळ होतो आहे. असे मला वाटते.
केळवे छान एरिया आहे. जर
केळवे छान एरिया आहे. जर वीकेंड होम म्हणून प्लॉट घ्यायचा असेल तर केळवे छान. त्या भागात गेले १५ वर्षे गेले नाही पण आय मिस बोईसर पालघर अँड केळवे.
डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरु
डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरु झाल्याने येथे झपाट्याने किमती वाढत आहेत. तसेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे >>> +१
मी केळव्याला प्लॉट घेतला
मी केळव्याला प्लॉट घेतला होता.कागदोपत्री अजूनही माझाच आहे.पण बर्याच वर्षांत तिथे जाणे न झाल्याने तो प्लॉट आहे की एनक्रोंचमेंट्मधे लाटला गेलाय ते देव जाणे.:अओ:
जिवंत असलाच तर अंदाजे काय भाव आहे.
केळवे नि केळवे रोड हे
केळवे नि केळवे रोड हे बर्यापैकी एकमेकांपासून दूर असलेले भाग आहेत.
मी केळव्याला प्लॉट घेतला
मी केळव्याला प्लॉट घेतला होता.>>>>> सॉरी! केळवे रोडला आहे.गट नं.५६( आता कसा शोधायचा)
एकाने सांगितले की तुमच्या प्लॉटमधे भर टाकली पाहिजे.कारण जो रस्ता शेजारून गेलाआहे,तो इतका वर आहेकी तुमचे प्लॉट खूप खाली गेले आहेत.त्यात भर टाकून रस्त्यालगत आणले तर भाव येण्याचा संभव आहे.
तुमचा प्लोट इथे शोधा
तुमचा प्लोट इथे शोधा
http://mahabhulekh.maharashtra.gov.in/property.htm
असामी, धन्यवाद!तुम्ही
असामी,
धन्यवाद!तुम्ही लिहिल्यानंतर मी फाईल काढूनतरी पाहिली.
किरकोळ,
धन्यवाद! ती लिंक ओपन केल्यानंतर ठाणे सिलेक्ट केल्यानंतर पुढे ओपन होत नाही. माझं कुठे चुकतंय का?
शशांक,
क्षमस्व.धाग्याशी संबंधित नसलेल्या पोस्टी टाकतेय.
किरकोळ, लिंक ओपन झाली.७/१२वर
किरकोळ,
लिंक ओपन झाली.७/१२वर नाव आहे.परत धन्यवाद!
देवकी म्याडम, मी केळवे -
देवकी म्याडम, मी केळवे - केळवे रोड येथेच राहतो आपणास काही मदत हवी असल्यास जरूर संपर्क साधा.
जय@, धन्यवाद! नक्कीच कळवेन.
जय@,
धन्यवाद! नक्कीच कळवेन.
३५० ते ४०० रु प्रति स्क्वे.
३५० ते ४०० रु प्रति स्क्वे. फुट भाव केळवे वेस्ट येथे सांगण्यात येत आहे. केळवे रोड स्टेशन पासून २.५ कि.मी अंतरावर आहे (अजून बघितला नाही). एका शेताचे (८१ गुंठे) विभाजन करून (५ -५ गुंठे) प्लॉट विकण्यात येत आहेत.
हा प्लॉट NA नाहीये. आता प्लॉट NA करून घेणे जास्त अवघड नाहीये असे कळाले? खाली दिलेल्या धाग्यावर बरीच माहिती कळाली.
http://www.maayboli.com/node/52319
५ गुंठे प्लॉट घेणे फायदेशीर ठरेल का? NA करता येईल का? का १६ गुंठे प्लॉट घ्यावा लागेल रजिस्ट्री करण्यासाठी?
@जय माहितीबद्दल धन्यवाद. माहितीत चांगला प्लॉट किंवा विश्वासु एजंट असेल तर कळवा.
आजच्या तारखेला केळवे,सफाळेला
आजच्या तारखेला केळवे,सफाळेला काय भाव आहेत प्लाॅटचे