Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 April, 2015 - 06:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
चोर बोंबिल किंवा सोयरे बोंबिल ची खवले काढून घ्यावीत. शेपुट, पर काढून टाकावेत. मासा आतून पुर्ण साफ करून त्याचे साधारण तिन तुकडे करावेत. आता ह्या तुकड्या तिन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
धुतलेल्या तुकड्यांना (जर आवडत असेल तर आल-लसुण वाटण लावावे) हिंग, हळद, मसाला, मिठ चोळून घ्यावे.
तवा गरम झाला की त्यावर तेल सोडून ह्या तुकड्या तळण्याठी ठेवाव्यात. गॅस मिडीयम ठेवावा.
५-६ मिनिटांनी तुकड्या पलटून दुसर्या बाजुन ५-६ मिनिटे शिजू द्यावे.
खरपूस गरमागरम तुकड्या जेवणासाठी वाढाव्या.
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी २ तुकड्या
अधिक टिपा:
चोर बोंबिल किंवा सोयरे बोंबिल हे दिसायला साधारण खरबी सारखे असतात.
बोंबील मध्ये जसे केसा सारखे बारीक काटे असतात तसे ह्यात मध्ये मध्ये कडक काटे असतात. म्हणजे करली सारखे पण तोकडे.
खाण्यासाठी हा मासा मांसल व चविष्ट आहे.
हा जास्त महाग नसुन मध्यम किंमतीतच मिळतो.
माहितीचा स्रोत:
मासळी बाजार
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पैली
मी पैली
बापरे चोर सुद्धा आणि सोयरे
बापरे चोर सुद्धा आणि सोयरे सुद्धा. एकाच नावात दोघेही...
कुठे मि़ळतील हे सोयरे? बेलापुर गावात नक्कीच मिळतील बहुतेक. फक्त मोबाईलवर फोटो चेक करत राहावा लागेल.
कीती दिवसानी रेसीपी घेवुन
कीती दिवसानी रेसीपी घेवुन आलीस जागु
अश्वे साधना मिळतील ग. आपण
अश्वे
साधना मिळतील ग. आपण सहसा अशा माशांकडे लक्ष देत नाही म्हणून दिसत नाहीत आपल्याला.
सृष्टी हो ग जवळ जवळ दिड महिन्यांनी मायबोलीवर येतेय.
हो जागु खूपच दिवसानी आली.
हो जागु खूपच दिवसानी आली.:स्मित:
मासे फोटोतसुद्धा ताजे दिसतायत.
फोटो मोबाईलवरून काढलेत
फोटो मोबाईलवरून काढलेत त्यामुळे तितकेसे छान नाहीत.
चोर / सोयरे नाव वाचुन आत
चोर / सोयरे
नाव वाचुन आत डोकावलोय.
माशांमधील काहि कळत नाही आणि मी खात पण नाही म्हणुन वाचत नाही जनरली.
चोर बोंबिल म्हणल्यावर मला
चोर बोंबिल म्हणल्यावर मला वाटलं, शिजवल्यावर आकाराने कमी होतात की काय.
भेंडी किंवा पालेभाज्या कशा दिसताना ढिगभर दिसतात आणि शिजल्यावर कमी होतात, त्यांना आम्ही चोरट्या भाज्या म्हणतो तसं.
बाकी हा मासा मी आयुष्यात कधी खाईन असं वाटत नाही.
ह्यालाच युय्स ला 'व्हायटींग'
ह्यालाच युय्स ला 'व्हायटींग' म्हणतात ना. इथे खुप मिळतात.
छान दिसताहेत हे मासे.. बिफोर
छान दिसताहेत हे मासे.. बिफोर आणि आफ्टर ही
छान रेसिपी
छान रेसिपी
जागु मस्तच....
जागु मस्तच....
चोर बोंबिल हा मासा भारतात
चोर बोंबिल हा मासा भारतात असताना कधी बघितला/खाल्ला नाही. अनिलभाई म्हणतात ते व्हायटिंग फिलेट असल्याने खवले, काटे काढलेले असतात. पूर्वी बरेचदा आणायचे कारण २० वर्षांपूर्वी लोकल ग्रोसरी स्टोअरमधे तेवढा एकमेव प्रकार नेहमी मिळायचा. तो ही फ्रोजन.
स्वाति, इथे व्हायटींग तुला
स्वाति,
इथे व्हायटींग तुला 'फार्मस मार्केट' किंवा 'चायनीज मार्केट' मधे ताजे मिळतील.
अनिलभाई, इंटरनॅशनल मार्केटमधे
अनिलभाई, इंटरनॅशनल मार्केटमधे बघेन ताजे आहेत का ते. आजकाल त्यांच्याकडे ताजी सुरमयी, मांदेली, बांगडे वगैरे असतात त्यामुळे बाकी काही न बघता तेवढेच आणले जाते.
नेहमीच्या बोंबिलांपेक्षा बरेच
नेहमीच्या बोंबिलांपेक्षा बरेच वेगळे दिसतात हे चोर/सोयरे बोंबिल
मस्त
मस्त
मस्त!!!!!!! बोंबिल माझी ऑल
मस्त!!!!!!!
बोंबिल माझी ऑल टाईम फेव्हरेट मासळी पण हे चोर बोंबिल कुठे कधी मासळी बाजारातसुध्दा पाहिले नाहीत. थोडा शोध घ्यावा लागेल असं दिसतंय.
मस्तच
मस्तच
जागूताई, बोईट म्हणतात ते हेच
जागूताई, बोईट म्हणतात ते हेच का?
मस्तच ! पण ह्यांना चोरटे/
मस्तच !
पण ह्यांना चोरटे/ सोयरे का म्हणतात ? पाण्यात पण चोर्या करतात का हे पंटर ?
बोईटच वाटतायत!
बोईटच वाटतायत!
माझ्या मच्छीवालीनी एकदा बोईट
माझ्या मच्छीवालीनी एकदा बोईट मासे आणून दिले होते.. भलतेच स्वस्त होते.. आणी चवीला नंबर वन.. पण खूप काटे असल्याने कुणीच खाल्ले नाहीत घरात.. सारे के सारे मेर्कुच मिले
हे बोईटच आहेत का जागु?? कारण पूर्वी तू बोईट ची रेस्पी टाकली होतीस इकडे.. बहुतेक..
बोंबील मध्ये जसे केसा सारखे
बोंबील मध्ये जसे केसा सारखे बारीक काटे असतात तसे ह्यात मध्ये मध्ये कडक काटे असतात. म्हणजे करली सारखे पण तोकडे. >>>>>>>>>>
ते केसा सारखे बारीक काटे काढुन टाकायचे कि तसेच खायचे ?
काढायचे.
काढायचे.
बोंबील फ्राय केले तर एकदम
बोंबील फ्राय केले तर एकदम कुरकुरीत करायचे आणि मग काटे काढून टाकायची गरज नसते ते चावून खाता येतात. पण शिजवले किंवा मऊसर फ्राय केले तरी काटे काढूनच टाकायचे. नाहीतर घशात अडकतील.
केसा सारखे बारीक काटे काढुन
केसा सारखे बारीक काटे काढुन टाकायचे कि तसेच खायचे ..... जितके खाता खाता काढता येतील तितके काढायचे.
थॅन्क्स ... देवकी, निधी, सोनु
थॅन्क्स ... देवकी, निधी, सोनु...
मला मासे खुप आवडतात खायला पण ते काटे प्रकरण कस हाताळायच तेच माहीत नाही वा नव्हत.. (घरा मध्ये किंवा आमच्या एकुन सगाळ्या मिळुन फॅमिली मध्ये मीच एकमेव जो मासे खातोय)...सुरवात म्हणुन मग..पापलेट व मोठे मासे आणले ज्यामध्ये मोठे काटे हाडे आहेत..ते काढायला सोपे जातील पण मग कळल इतर खुप चवीष्ट मासे आहेत..पण ते काटे कस हाताळायचे तेच कळत नाही.. ( कोणते खायचे, कोणते काढायचे) भात आणि आमटी मिक्स केली तर मग कसे खायचे इ.इ..
बोंबील फ्राय केले तर एकदम
बोंबील फ्राय केले तर एकदम कुरकुरीत करायचे आणि मग काटे काढून टाकायची गरज नसते ते चावून खाता येतात. पण शिजवले किंवा मऊसर फ्राय केले तरी काटे काढूनच टाकायचे. नाहीतर घशात अडकतील.
Submitted by Nidhii >>>>
अरे बापरे ..ते घशात अडकतील हे अत्ता वाचल... म्हणजे.. खरच काटे घशात अडकतात का ?
आणि चुकुन पोटात गेले तर.. पोटात दुखत तर नाही ना ?
मासे शिजवण्या आधी काटे काढायची काही पध्दत आहे का एखादी ?
काटे घश्यात अडकले की सुका भात
काटे घश्यात अडकले की सुका भात खायचा. आत जातात. एकदा पोटात गेले की काही होत नाही.
लहान पोरांना काटे काढून द्यायचे. तरी अडकलाच की आईचे धपाटे खायचे. बाहेर येतात.
मला बोंबील आवडत नसल्याने पाकृला माझा पास
Pages