आज १६ एप्रिल २०१५. आजच्याच दिवशी १६२ वर्षांपूर्वी दुपारी ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याद्वारे अवघ्या ३४ किलोमीटर अंतराच्या त्या लोहमार्गाने भारतीय उपखंडाबरोबरच संपूर्ण आशिया खंडातही रेल्वेसेवाचा शुभारंभ केला होता. म्हणूनच भारतीय रेल्वे दरवर्षी १० ते १६ एप्रिल हा सप्ताह रेल्वे सप्ताह म्हणून साजरा करते. गेल्या १६२ वर्षांमध्ये स्वतःचा विस्तार करत, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला अधिक व्यापक करत, त्यानंतर नवस्वतंत्र गरिबीने ग्रासलेल्या देशाच्या आर्थिक विकासात आणि राष्ट्रीय एकात्मता, अखंडत्वाचे रक्षण मोलाचे योगदान देत भारतीय रेल्वेने अनेक विक्रमही नोंदविले आहेत. मात्र अलीकडील काळात भारतीय रेल्वेकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची आणि तिच्या आधुनिकीकरणाबरोबरच सेवेचा दर्जा उत्तम राखण्याची कधी नव्हे इतकी आवश्यकता भासत आहे. मात्र त्यासाठी रेल्वेचे संपूर्ण खासगीकरण हा जो विचार अलीकडील काळात बळावत आहे, तो भारतासारख्या देशात पूर्णपणे लाभदायक निश्चितच नाही. खासगीकरणाचा विचार जाणीवपूर्वक सातत्याने मांडला जात आहे.
आजच्या ऐतिहासिक दिवशी (किमान वर्षातून एक दिवस तरी) रेल्वेतील उणिवा काढत बसण्यापेक्षा रेल्वेत सुधारणांसाठी जे प्रयत्न होत आहेत, त्याकडेही जाणीवपूर्वक पाहू या आणि जगातील सर्वाधिक, वैविध्यपूर्ण लोकसंख्येची, व मालवाहतुकीची देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अविरत वाहतूक करणाऱ्या या अवाढव्य यंत्रणेबद्दल थोडेसे शब्द कृतज्ञतेचेही बोलूया.
लिंक - http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-of-parag-purohit-about-...
रेल्वे
Submitted by पराग१२२६३ on 16 April, 2015 - 02:07
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद पराग. माहीत नव्हते.
धन्यवाद पराग. माहीत नव्हते. भारतीय रेल्वे वर हा एक बाफ आहे आधीच. येथे विषय वेगळा ठेवायचा असेल तर चालेल, नाहीतर या बाफवरही बोलू शकतो. मलाही या विषयावर वाचायला आवडते.
http://www.maayboli.com/node/47781
रेल्वेबद्दल तर कायमच कृतज्ञता
रेल्वेबद्दल तर कायमच कृतज्ञता वाटत आली आहे. रेल्वे नसती तर आमचं आयुष्य इतकं सुकर झालं नसतं
आम्हा मुंंबईकरांसाठी रेल्वे
आम्हा मुंंबईकरांसाठी रेल्वे म्हणजे लाईफलाईनच. तिच्या सोबत आमचा कामाचा दिवस सुरू होतो आणि संपतो सुध्दा तिचा निरोप घेऊनच.
या घटनेला दीडशे वर्ष झाली
या घटनेला दीडशे वर्ष झाली तेव्हा हीच जुनी गाडी याच मार्गावरुन पुन्हा चालवली गेली होती तेव्हा मुंबईत पाहीली होती. आधी वाटलं आरामात जाऊ कोण जातंय बघायला जुनी गाडी पण मग स्टेशनवर गेल्यावर बघितलं तर अक्षरशः जनसागर लोटला होता. गाडी पास झाली तेव्हा प्रचंड जल्लोष झाला. खूप मजा वाटलेली तेव्हा.
कोकण रेलवे बांधतना नेमलेल्या
कोकण रेलवे बांधतना नेमलेल्या अमेरिकन कंसल्टेंट्स ने सुद्धा "इथे पश्चिम किनारपट्टीवर रेलवे होऊ शकत नाही" देवा दयेने आपल्याकडे
ई श्रीधरन अन राजाराम बोजी होते !!
रेस्ट इज हिस्ट्री
ठाणे स्टेशनवर याबद्दलचा एक
ठाणे स्टेशनवर याबद्दलचा एक मोठा बॅनर लावलेला परवा पाहिला.