समान वेतन दिनानिमीत्ताने

Submitted by रैना on 15 April, 2015 - 02:11

आज अमेरिकेत 'समान वेतन दिवस' आहे असे शेरिल सँडबर्ग यांच्या फेसबुक पानावर वाचले. तेथील अहवाल चाळला. त्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि तसा तो दरवर्षी यावा अशी आशा आहे.

http://www.pewresearch.org/fact-tank/2015/04/14/on-equal-pay-day-everyth...

http://www.nationalpartnership.org/issues/fairness/2014-wage-gap-map.html

- समान कामासाठी स्त्रीपुरुषांना मिळणार्‍या वेतनात तफावत असते. (आणि पर्यायाने इतर वेतनातही. कारण पेन्शन/मेडिकल/इतर हे सर्व सहसा पगारावर कॅल्क्युलेट होते).

- हा फरक सहसा कुठल्याही व्यवसायात आढळून येतो असे अहवाल सुचवतो. म्हणजे शिक्षक/शिक्षिकेपासून ते प्रोग्रामर्स पर्यंत कुठेही. जिथे सहसा स्त्रियांचे प्रमाण जास्त अशा व्यवसायातही, आणि अर्थातच पुरुषांचे प्रमाण जास्त असणार्‍या व्यवसायातही.

- ही तफावत वयागणिक वाढत जाते, (आणि स्त्रियांचे प्रमाणही त्या त्या व्यवसायात कमी होत जाते ते वेगळेच.)

- शिक्षणाने ही तफावत कमी होत नाही. म्हणजे एकाच व्यवसायात उच्चशिक्षित स्त्रियांना आणि पुरुषांना मिळणार्‍या वेतनात (आणि संधींमध्ये) तफावत आढळतेच.

- वर्ण/रंग 'वुमेन ऑफ कलर' यांचे बाबतीत जास्त तफावत आढळून येते असे अहवाल म्हणतो

- ही तफावत मुलं नसणार्‍या स्त्रियांबाबतही आढळून येते

- (अवांतर माहिती 'जेंडर पे गॅप' सर्व देशात असते पण तरीही कोरिया आणि जपानात बरीच जास्त आहे असे वाचल्याचे स्मरते.)

जागतिक जेंडर तफावत अहवाल इथे वाचता येईल
http://reports.weforum.org/global-gender-gap-report-2014/

आरोग्य आणि सर्व्हायवल (जगण्याचा हक्क?), शैक्षणिक पात्रता, अर्थकारणात सहभाग आणि संधी, राजकीय सबलीकरण हे घटक विचारात घेतले जातात.
यातील रँकिगनुसार चीन -८७, भारत -११४, अमेरिका -२०, जपान- १०४

जागतिक बँकेच्या स्त्रियांच्या जागतिक व्यावसायिक सह्भाग इंडेक्सनुसार
चीन : ६४% महिला
भारत : २७% महिला
अमेरिका- ५६% महिला
जपान - ४९% महिला

http://data.worldbank.org/indicator/SL.TLF.CACT.FE.ZS

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रियांचं संघटित क्षेत्रातलं अर्थार्जन अजूनही दुय्यम (म्हणजे कुटुंबासाठी अत्यावश्यक नाही) असं समजलं जातं का? अनेकदा स्त्रिया 'निगोसिएशन'मध्ये कमी पडतात का? आपण जास्त पैसे मागितले तर हातचे काम जाईल अशी भीती त्यांना वाटते का? - याबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहे.

I never found this in the companies I worked. for example Alstom use to pay same package to male and female trainee engineers. Further increments are based on performance & I don't think their is gender bias at Management level. Even in current company there is no pay difference between male & female employee. I work in Power/Oil & Gas sector. The above referred gender difference is in which sector?

पण दुय्यम म्हणावे तर सिंगल मदर्सच्या बाबतीतला आणि वांशिक भेदभाव अधिकच थक्कं करणारा आहे. Happy
याच स्त्रियांच्या चरितार्थावर कुंटुंब चालते तर मग दुय्यम कसेकाय? पण सामाजिक दृष्ट्या अजूनही दुय्यम हे मात्र कदाचित खरंच.

निगोशिएशन आणि नेटवर्किंग कमी पडते हे खरंच पण दुसरी बाजू अशी की मुलं झाल्यानंतर नोकरी टिकवणे, जबाबदार्‍यात व्यावसायिक वाढ स्वीकारणे, हीच इतकी मोठी गोष्ट आहे की एका मर्यादेनंतर गॅप मिटवणे हे अधिकच कष्टाचे होऊ लागते. मिळेल ते आणि पडेल ते काम करत राहणे, नोकरी टिकवणे यावर फोकस होतो.

मंदार,
तफावत क्षेत्रनिरपेक्ष आढळून येते.
- हा फरक सहसा कुठल्याही व्यवसायात आढळून येतो असे अहवाल सुचवतो. म्हणजे शिक्षक/शिक्षिकेपासून ते प्रोग्रामर्स पर्यंत कुठेही. जिथे सहसा स्त्रियांचे प्रमाण जास्त अशा व्यवसायातही, आणि अर्थातच पुरुषांचे प्रमाण जास्त असणार्‍या व्यवसायातही.

ऑईल आणि गॅस क्षेत्रात मुळातच स्त्रियांची भरती कमी होते असा माझा समज होता. आकडेवारी देणार का कृपया, म्हणजे गैरसमजाचे निराकरण व्हायला मदत होईल ?

ऑईल आणि गॅस क्षेत्रात मुळातच स्त्रियांची भरती कमी होते असा माझा समज होता. >> हो तुमचा समज बरोबर आहे. बाकी क्षेत्रांच्या तुलनेत तर खुप कमी. आकडेवारी माहित नाही तरी आमच्या येथे साधारण १५ ते २०% आहेत. पण पगारात तफावत नक्कीच नाही. असो मी काही एच आर चा माणुस नाही.

ऑईल आणि गॅस क्षेत्रात मुळातच स्त्रियांची भरती कमी होते असा माझा समज होता. >> स्त्रियांचे प्रमाण प्लांट्स, रिफायनरीज, डेपोजमध्ये जिथे शिफ्ट ड्युटीज असतात तिथे जाणून बुजून कमी असतं पण गेली काही वर्षं तेही प्रमाण वाढले आहे कारण स्त्रियाही सक्षमपणे ऑपरेशन्स हँडल करत आहेत. टँक्सवर चढून कामं करत आहेत. ऑफिसेसमध्ये ५०% किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. पगारात तफावत अज्जिबात नाही. असा काही कन्सेप्टच नाही.

ऑफिसेसमध्ये ५०% किंवा त्यापेक्षाही जास्त आहे.>> This may be for administrative or marketing offices. For core engineering and constrction side it is not more that 15 to 20%. Few days back Flour Daniel, Gurgaon advertised for only female engineers recruitment drive.

This may be for administrative or marketing offices.>>>> हो. हेड ऑफिसेस, रिजनल, झोनल, कॉर्पोरेट ऑफिसेस तसेच डेपो, प्लांट, रिफायनरी ऑफिसेस मध्ये स्त्रिया खूप आहेत. जिथे शिफ्ट ड्युटीज आहेत तिथे शक्यतो स्त्रियांचे पोस्टिंग कमी असते. इंजिनियर स्त्रिया (सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) बर्‍या प्रमाणात आहेत पण साईटवर तुम्ही म्हणता तसं अगदी कमी पोस्ट केल्या जातात. पण नॉन टेक्निकल बॅकग्राउंड असलेल्या स्त्रियांना जर लोकेशनला पोस्टिंग असेल तरी त्या त्यांचं काम खरंच कौतुकास्पद रित्या पार पाडतात. त्रास खूप होतो त्यांना. लोकेशनना टँक ट्रक ड्रायव्हर्स, इतर वर्कर्सशी कुठल्याही शिफ्टमध्ये निभावून न्यावे लागते आणि आवश्यक ती अधिकारी जरबही ठेवावी लागते. अश्यावेळी त्या कुणा पुरुष सहकार्‍यांना सोबत घेऊन चेकिंग वगैरे पार पाडतात.

केश्विनी, बी- तफावत बहुतेक क्षेत्रात आढळते. मी तज्ञ नाही परंतू एक कयास असा आहे की ज्या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी असते, तिथे उलटपक्षी जास्त तफावत आढळून येते. कारण economies of scale या न्यायाने पूरक सुविधा (म्हणजे क्रेश, नर्सिंग रुम्स, फ्लेक्सी आवर्स वगैरे) पुरवता येत नाहीत.

आता प्राथमिक शाळेतील शिक्षिका घ्या उदाहरणार्थ. मला वाटले होते किमान तिथेतरी तफावत नसणार? तरीही तिथेही तफावत आढळून येते.

आमच्या क्षेत्रात/ देशात/ परिचयात कोणतीही तफावत आढळून येत नाही असे आपल्याला वाटते. बिग पिक्चर टेल्स अ डिफरंट स्टोरी. Happy

आता प्राथमिक शाळेतील शिक्षिका घ्या उदाहरणार्थ. मला वाटले होते किमान तिथेतरी तफावत नसणार? तरीही तिथेही तफावत आढळून येते.>>>> अरे बापरे! इकडे भारतात?

मी लेखाशी सहमत आहे.
>>>> पगारात तफावत अज्जिबात नाही. असा काही कन्सेप्टच नाही <<<<
भारतातील राज्या राज्यांच्या दरवर्षीच्या किमान वेतनाच्या अधिकृत अधिसूचना पहा, तिथेच तुम्हाला पहिल्यांदा फरक आढळेल.
सरकारी पातळीवरच स्त्रीयांसंबंधीच्या किमान वेतनाबाबतच अक्षम्य हेळसांड होत्ये, तर कमाल वेतनाबाबत किती होत असेल? अन सरकारी नोकरिव्यतिरिक्त तर कितीतरी अधिक प्रमाणात हेळसांड होते, जाणूनबुजून बायस्ड अशा प्रकारेच केली जाते.
समान वेतन वगैरे अपेक्षा फार लांबच्या, कमीतकमी नैसर्गिकविधीच्या सुविधा तरी पुरेशा असाव्यात तर त्या देखिल नसतात.

Pay is linked to performance. Are these women performing as per the standards of organization, on the parameters set by the Organization? Then they should make an issue of it.

If their performance is not meeting the required standards, the pay will lag. Beyond a point , the employer cannot make excuses for the woman's status but must go by performance and usefulness to the organization.

Do not use gender as the parameter use performance as one. Then check for equal pay. Why settle for equal to men? go for higher, better, more.

अमा, तुमचे काम आणि तुमची बढती, पगारवाढ आणि इतर अनेक फायदे हे दरवेळी लिन्क्ड असतातच असे नाही. कित्येकदा योग्य ते जजमेन्ट दिले जात नाही. ही खूप खेदाची बाब आहे आणि तेवढीच फ्रस्टेटींगसुद्धा. ह्यासाठी एक चांगला मॅनेजर असणे खूप गरजेचे आहे.

एखाद्या देशात उदाहरणार्थ चीन, स्त्री आणि पुरुषाचे निवृत्तीचे वय ही वेगळे आहे. ५० हे स्त्रियांसाठी आणि ६० पुरुषांसाठी. हे अर्थातच कायद्याने वेगळे आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Retirement_age

याला काय लॉजिक आहे हे मला आजवर कळलेले नाही. Uhoh

सामाजिकशास्त्रशाखेच्या अ‍ॅकॅडेमिक्समधे वेतनात लिंगसापेक्ष तफावत नसते कारण सरकारी चौकटीने आखून दिलेल्या श्रेणीप्रमाणे पगार मिळतात - असि. प्रोफेसर, असो. प्रोफेसर, प्रोफेसर... असे.
हेच विद्यापीठीय आणी सरकारी पगारांमधून चाललेल्या संशोधनकार्यातही असणार. बाकी भले कितीही डिस्क्रिमिनेशन्स आणि बायसेसशी स्त्रियांना लढा द्यायला लागत असला तरी इथे समानताच आहे असे माझे तरी आजपर्यंतचे निरिक्षण आहे.
सरकारी, अनुदानित किंवा अगदी खाजगी शाळाशिक्षकांमधे लिंगसापेक्ष वेतन-तफावत भारतात आणि महाराष्ट्रात असते? मला वाटलं नव्हतं असं काही असेल.

जर्मनीसारख्या प्रगत देशात सुद्धा "बहुतेक" सर्व क्षेत्रात आयटी असो वा इतर कोणतेही क्षेत्र असो, स्त्री आणि पुरुषांच्या पगारात तफावत आहे असे ऐकून आहे, त्यानिमित्ताने टिव्हीवर इतर मिडियात विविध चर्चा केल्या जात असतात. अर्थात इथे कोणीच उघडपणे आपले पगार कलीग्स इ. ना सांगत नसल्याने मला त्याचा अजिबातच अनुभव नाही.

आमच्यात नटमंडळींच्यात हे असतंय. म्हणजे चकचकीत स्टार्स मधे. त्याचे कारण सेलेबिलिटी हे आहे.
हीरोच्या नावावर जेवढा गल्ला खेचला जातो तेवढा हिरविणीच्या नावावर खेचला जातोच असे नाही.
त्या त्या प्रमाणात मिळतात पैसे. गल्लाभरू हिंदी सिनेमात क्वचितच हिरविणीला कचकड्याच्या शोपीसपेक्षा जास्त काम असते त्यामुळे ते तसे काय अन्यायकारक वाटत नाही मला.
जेवढे तुम्ही मोठे होत जाता तेवढी ही तफावत दिसते.
सुरूवातीच्या काळात, किंवा तुम्ही मध्यम श्रेणी कलाकारांपर्यंत बघितलेत तर तफावत दिसणार नाही.

बाकी नटमंडळी सोडली तर बाकी पडद्यामागच्या सर्वांना मेरिट, ज्येष्ठता, पुरस्कार व तत्सम कामाशी रिलेटेड गोष्टींवरच पैसे मिळतात. तिथे जेण्डर मधे येत नाही.

लेबर मधेही हा मुद्दा फारसा येत नाही. क्ष प्रकारच्या लेबरमधे फक्त पुरूषच असतात आणि य प्रकारच्या लेबरमधे प्रामुख्याने स्त्रिया असेही दिसून येते. ज्या प्रकारात स्त्री व पुरूष दोघेही आहेत तिथे निव्वळ स्किल या कारणानेच त्यांचा दर बदलतो अन्यथा नाही.

आमच्यासारख्या खासगी शाळांच्या शिक्षकांमध्ये अशी कोणतीही तफावत मला तरी आढळलेली नाही. तुमचे वेतन किती हे ठरण्यामागे अनेक कारणे असू शकतात पण त्यात स्त्री-पुरुष हे अजिबातच नाही.

इंटरेस्टींग माहिती... मी राष्ट्रीयत्वावरून पगार बदललेले पाहिले आहेत. ( गल्फ आणि आफ्रिकन देशांत )

हा फरक सरासरी असेल तर त्याचे कारण ग्लास सिलींग असण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे अधिकाराच्या (आणि जास्त पगारच्या) जागांवर खूपच कमी स्त्रिया आढळून येतात!!

भारतातरी शिक्षकांच्या किंवा कुठल्याही सरकारी/निमसरकारी/अनुदानित आस्थापनांच्या कर्मचार्‍यांना जेंडर बायसमुळे पगार कमी जास्त नसतो.
खाजगी आस्थापनात पगार जेंडरवाईज कमी जास्त असेल पण याला परिश्रम, चमकोगिरी, कामाला दिलेला वेळ अशी अनेक कारणे असतील. केवळ स्त्री असल्यामुळे कमी किंवा जास्त असे पगार नसतील.
उदा. माझ्या हॉस्पिटलात सर्वसाधारणपणे मुलींपेक्षा मुलांना जास्त पगार आहे कारण त्यांचे कामाचे तास्/परिश्रम आणि ते करत असलेली नर्सिंगव्यतिरिक्त इतरही अनेक छोटी मोठी कामे.

श्रमाच्या कामामधे रोजाचा दर स्त्री पुरूषांमागे वेगळा असतो देशात.
आम्ही एक वर्कशॉप केले होते तिथे शेतमजूर स्त्रिया आल्या होत्या. त्यांनी तेव्हा सांगितले होते की बापयगड्याला जास्त मजुरी मिळते कारण त्यांचे काम जास्त कष्टाचे होते.
मग आम्ही त्यांच्या आणि बाप्यांच्या कामाची यादी केली होती तर अवजड वजन उचलणे व तत्सम ताकदीची कामे बाप्ये करत पण ती मोठी एक दोनच कामे करत तर बाया बरीच छोटी छोटी गरजेची कामे करीत.
मग आम्ही गणित केले तर मजूरी समानच असायला हवी असे आले.
पण ते त्यांना पटेना आणि आम्हाला त्यांना पटवून देता येईना.

याला खूप वर्ष झाली त्यामुळे तपशील अजिबात आठवत नाहीत.

अमेरीकेत पगाराबाबत गोपनियता बाळगणे हे बर्‍याच कंपन्यांच्या पॉलीसीत आहे. खरे तर नॅशनल लेबर रिलेशन अ‍ॅक्ट प्रमाणे हे चुकीचे आहे परंतू बर्‍याचदा एम्प्लॉयी हॅन्डबुकात गोपनियतेबद्दल लिहिलेले असते. बरेचदा मॅनेजर्सही सॅलरी डिस्कस करु नका असे सांगतात.
अमेरीकेत स्टार्टिंग सॅलरी, पगार वाढ , बोनस सगळे निगोशिएबल असते. पक्की वेतन श्रेणी असे काही नाही त्यामुळे अगदी अप्रेझल सारखे असले तरी मोबदला/ पगारवाढ सारखी असेलच असे नाही. इक्वल पे अ‍ॅक्टला ५० वर्ष्रे झाली तरी तफावत आहे.

पूर्वी कधीतरी टेनिसबाबत ही चर्चा ऐकलेली.
पुरुषांच्या विजेत्याला महिलांपेक्षा जास्त रक्कम का म्हणून?
सध्याही तसेच असते का हे माहीत नाही, बहुतेक असावेच.
पुरुष ५ सेट खेळतात आणि महिला फक्त ३ सेट खेळतात असा काहीसा युक्तीवादही ऐकलेला तेव्हा.

बाकी बोर्डाच्या परीक्षेत गेले काही वर्षे सतत एक वाक्य ऐकतो, यंदाच्या वर्षीही मुलींनी बाजी मारली, मुलांपेक्षा चांगला निकाल वगैरे.. पण या मुली पुढे जातात कुठे हे समजत नाही.

मलाही वरदाला पडला तोच प्रश्न. सरकारी नियमावली असताना असे कसे होऊ शकते ?

प्राथमिक शिक्षण (भारत)
http://www.wageindicator.org/main/Wageindicatorfoundation/WageIndicatorg...

http://182.71.188.10:8080/jspui/bitstream/123456789/428/1/Gender_Wage_Ga...(1).pdf
पान क्रमांक २३ आणि २४
____________________________
Gender Pay Gap in the Formal Sector in India (2006-2013)
http://www.wageindicator.org/documents/publicationslist/publications-201...

हा एक जरा सुखवस्तु आणि लिमिटेड डेटा असलेला सर्व्हे. यांच्या अहवालानुसार उच्चशिक्षित (सी.ए वगैरे) स्त्रियांच्या बाबतीत आकडेवारीतील तफावत अतिशय उल्लेखनिय आहे.
The gender pay gap increases with higher educational qualifications. Women who attained educational qualification below 10thstandard earned 9.37% less than men, whereas women with professional qualifications such as CA/CS/ICWA or equivalent earn 44.25 % less than male.

The gender pay gap is different across various industries. Women employed in; accommodation & food service activity and industry earned 4.19% less than men whereas those employed in arts, entertainment and recreation industry earned 41.17% less than men.

___________

आता पॉलिसी लेव्हल वर हा पेपर काय म्हणतो ते पाहू या. ज्या क्षेत्रात स्त्रियांची भरती अधिक असते तिथे कालांतराने हळूहळू स्त्रियांच्या वेतनातील तफावत कमी होत जाते अशी आपली अपेक्षा.
पण असेही होऊ शकते की त्या क्षेत्रातील वेतनांचेच अवमुल्यन होते.

http://download.ei-ie.org/Docs/WebDepot/feature2%20-%20100303%20-%20reas...

The Teaching profession & gender pay gap , पान क्रमांक ४

यांचे दोन पेपर्स सापडले. दोन्ही विचारप्रवर्तक आहेत.

So this difference in salaries are mainly in non technical areas. For engineers I never observed such gender bias as a policy (my experience is in India.)

You did not observe is perhaps a correct statement !!

But "So this difference in salaries are mainly in non technical areas" is not supported by the data on page 3-24 (second link posted by Raina) and hence an untrue statement. The difference in salary for women who possess four year degree (BE included) as compared to men is ~27%.

याला काय लॉजिक आहे हे मला आजवर कळलेले नाही. >> आई ग!!! रैना हे खरोखर लॉजिक च्या बाहेर आहे कारण २०११ मध्ये चीन मध्ये महिलांची लाईफ एक्स्पेक्टंसी ७५ वर्षे होती तर पुरूषांची ७१ वर्षे. जो जास्त काळ जगणार त्याला लवकर रिटायर केल तर जास्त पेंशन घेणार / जास्त रिटारमेंट प्लान करावी लागणार . खरच लॉजिक नाही समजत !!!!!!

पगारात तफावत अज्जिबात नाही. असा काही कन्सेप्टच नाही. > खरंच केश्विनी? Happy

पगारात तफावत असते. आयटी क्षेत्रातही आहे. एकाच लेव्लला काम करणार्‍या स्त्री पुरुषांच्या पगारात
तफावत पाहिली आहे.

Pages

Back to top