Veg Crispy

Submitted by nikitasurve on 26 September, 2013 - 08:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
भाज्या
१ मध्यम भोपळी मिरची, मोठे उभे तुकडे
१ मध्यम गाजर, पातळ चकत्या, १०० ग्राम पनीर, मोठे तुकडे
१ लहान कांदा, मोठे तुकडे आणि पाकळ्या वेगवेगळया कराव्यात
२ पातीकांद्याच्या काड्या
बॅटर
४ टेस्पून मैदा, ६ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१ टीस्पून लसूण पेस्ट, १/२ टीस्पून मीठ
२ ते ३ चिमटी खायचा लाल रंग (किंवा गरजेनुसार), २ चिमटी मिरपूड
इतर साहित्य
तळण्यासाठी तेल
१ टेस्पून तेल सॉस बनवण्यासाठी
२ टीस्पून लसूण पेस्ट, १ टीस्पून आले पेस्ट
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून, १ लहान कांदा, बारीक चिरून
१ टेस्पून टोमॅटो केचप + १/२ टीस्पून सॉय सॉस + १ टेस्पून रेड चिली सॉस + १/४ कप पाणी
१/२ टीस्पून व्हिनेगर (किंवा आवडीनुसार), १ टीस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टीस्पून मिरपूड, चवीपुरते मीठ

क्रमवार पाककृती: 

कृती:
१) "बॅटर" या लेबलखाली दिलेले सर्व साहित्य एका वाडग्यात घालून मिक्स करावे. [मैदा, कॉर्न फ्लोअर, लसूण पेस्ट, मीठ, खायचा लाल रंग, मिरपूड]. थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. या बॅटरमध्ये भोपळी मिरची, गाजर, कांदा, आणि बेबीकॉर्न यांचे तुकडे घालून मिक्स करावे. सर्व भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवाव्यात.
२) भाज्या गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात. तळलेल्या भाज्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात. उरलेल्या बॅटरमध्ये पनीरचे तुकडे घोळवून तेही तेलात तळून घ्यावेत.
३) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. कांदा नीट परतावा.
४) कढईत टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, आणि १/४ कप पाणी घालावे. नीट ढवळावे. लागल्यास थोडे मीठ घालावे.
५) लहान वाटीत २ टेस्पून पाणी आणि १ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. कढईत घालून थोडे घट्टसर होवू द्यावे. मिनिटभर ढवळावे. त्यात व्हिनेगर घालावे.
६) आता यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून १५-२० सेकंदच मिक्स करावे. वरून थोडी मिरपूड घालावी.
सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून चिरलेली कांद्याची पात घालून सर्व्ह करावे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhaan.
Churchgate Station madhe je outlet aahe tithe miLat ase ashee bhaajee purvee.

Majhi favourate dish aahe hi. Pan gharat banavali nahi ajun. Aata banun baghen

दोन तीन दिवसांपूर्वी हे बनवून पाहिलं होतं. अतिशय चटपटीत आणि तंतोतंत हॉटेलसारखं झालं आहे. रेसिपीसाठी धन्यवाद. फक्त शब्दखुणांमध्ये नाव मराठीत दिलंत तर हा धागा सर्चमध्ये येईल.

माझी पन आवडती डिश.. पण कशी बनवतात हे नव्ह्त माहिती .. रेसिपी बद्दल धन्यवाद.. घरी गेल्यावर करुन पाहण्यात (खाण्यात) येईल .. Wink

आशूडी, खरंच एखाद्या हॉटेलमधल्या डिशचाच फोटो पाहतेय असं वाटलं. जबरदस्त तोंपासु दिसतंय प्रकरण ! Happy