ओल्या लाल मिरचीच्या ठेच्यातले लिंबाचे लोणचे (फोटोसह)

Submitted by सारीका on 19 March, 2015 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

**जानेवारी ते मार्च २ महीने बाजारात कमी तिखट असणार्‍या ओल्या लाल मिरच्या मिळतात, त्यामुळे हे लोणचे याच दरम्यान केले जाते.

**लोणच्यासाठी लागणारा वेळ हा १५ दिवसांचा आहे, वर मी फक्त फोडणी करुन ती थंड करुन लोणच्यात मिसळण्याचा वेळ दिला आहे. प्रत्यक्ष फोडणीचा वेळ हा ५ मिनीटाचा आहे.

साहीत्यः

एक किलो लिंबु

अर्धा किलो मीठ

एक किलो ओल्या लाल मिरच्या (तिखटपणा कमी असलेल्या)

धणे आणि जिर्‍याची पूड प्रत्येकी अर्धी वाटी

एक वाटी आलं + लसूण पेस्ट

फोडणीचे साहीत्यः

एक वाटी शेंगदाणा तेल

२ चमचे मोहरी

१ चमचा जिरे

हिंग आवडीनुसार (फोडणी पुरता)

क्रमवार पाककृती: 

एक किलो लिंबू धुवून चांगले कोरडे करुन त्याच्या प्रत्येकी चार फोडी कराव्यात.
या फोडी एका पातेल्यात घेऊन वर सांगितलेल्या मीठापैकी पाव किलो मीठ चोळावे.
हे मिश्रण रोज एकदा चमच्याने ढवळावे. असे १५ दिवस करावे.

१५ व्या दिवशी ओल्या लाल मिरच्या आणुन त्या चांगल्या धुवुन कोरड्या कराव्यात, त्याची देठं काढुन घ्यावीत, एखादी सडली पिचलेली मिरची असेल तर ती काढुन टाकावी.
उरलेल्या पाव किलो मीठाबरोबर मिक्सरमधे वाटुन ओल्या मिरचीचा ठेचा करावा. अगदी फाइन पेस्ट करायची आहे.
यात अजिबात पाणी वापरायचे नाही.
आता हा ओल्या मिरचीचा ठेचा, धने जिरे पुड आणि आले + लसूण पेस्ट फोडींमधे मिसळावे.
.सर्व जिन्नस नीट मिक्स करुन घ्यावेत.
एक वाटी तेलाची फोडणी करुन त्यात मोहरी जिरे हिंग घालावे, फोडणी पुर्ण थंड करुन लोणच्यात मिसळावी.
लोणचे कालवुन घ्यावे.

हे तयार लोणचे Happy

IMG_1045.JPG

हि लिंबाची फोड (यम्मी Happy )

IMG_1046.JPG

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

१) मुळ कृतीचा वेळ १५ दिवसांचा आहे.

२)मिरचीचा ठेचा फ्रीज मधे ठेऊन नंतर लोणच्यात मिक्स केल्यास लोणच्याची चव आणि पुर्ण लोणचे बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे मिरच्या ताज्या घ्याव्यात.
३) मिरचीची चव बघुन मिरच्या घ्याव्यात, मिरच्या जर खुप जास्त तिखट असतील तर प्रमाण कमी करावे. फाईन पेस्ट करताना पाणी अजिबात वापरायचे नाही.

४) सासुबाई म्हणाल्या, मिरच्या आणुन फ्रीज मधे ठेऊन नंतर नॉर्मल टेंप्रेचर ला आणुन ठेचा केला तरी चालेल थोडा चवीत फरक पडेल पण त्यानंतर लोणचं फ्रिजमधेच ठेवावे लागेल.

५) वरील पद्धतीने केल्यास लोणचे खराब होत नाही.

६) १५ दिवसांतच लिंबाच्या फोडी चांगल्या मुरतात, नरम होतात.
त्यामुळे लोणचे लगेच खाण्यालायक होते.

उपवासाला न चालणारे जिन्नस वगळता उपवासाचे लिंबाचे लोणचे देखिल बनवता येते.

माहितीचा स्रोत: 
नवर्‍याची आत्या (तेलंगणा खासीयत)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साबांनी लोणचं बरणीत भरल्याने फोटो काढता आला नाही तरी एखाद्या वाटीत घेऊन फोटो काढुन डकव्ते.
विनीता चुक दुरुस्त केली आहे. Happy

resipi vachtaanaa tondala itake paani sutale................................

pan mirachyaa kiti tikhat te saangaa. naahitar tondala sutalele paani vaaparun tondaachi aag vijhavaayachi vel yaayachI.. Happy

मस्त रेसिपी. सुपर्ब लागतं, फेवरेट. आत्या आणि बहिण दरवर्षी वेगवेगळे प्रकार पाठतात, ह्या वर्षीच्या लिस्ट्मधे अ‍ॅड करते Happy आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद Happy

लोणच्याचा हा प्रकार मस्तच वाटतोय. किमान मिरच्यांचा तरी फोटो टाका म्हणजे नेमक्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या ते कळेल.

ओह ! यात बिझी होतीस तर.. मिरची लिंबू म्हणजे माझा विक पॉईंट..
लवकरच करुन बघण्यात येईल.. Happy
ठेच्यातले लोणचे असला विचार पण नव्हता केला कधी.. मस्तच असणारं..

बाकी सारीका, यात हळद नै का घालत.. रंग कसा असणार विचार येतोय मनात.. लवकर फोटो टाक. Happy

गजानन, या रविवारी मिर्च्या मिळाल्या तर नक्की फोटो टाकते.

टिना या लोणच्यात हळद नाही घालायची.
तु आली असतीस तर तुला दिले असते चवीला. Happy

Pages